हा किस्सा २००० सालातला आहे. नुकताच एका IT company मध्ये स्थिरावलो होतो आणि नोव्हेंबर १९९९ मध्ये दक्षिण जर्मनीतल्या एका छोट्याशा गावात वर्षभराच्या onsite assignment साठी येऊन पोहोचलो होतो. सोबत २ colleague ही होते. तिघांच्याही गेल्या ७ पिढ्यांमधली पहिलीच परदेश वारी होती. त्यात भर म्हणून German भाषेचं गमभन ही येत नव्हतं.
नमस्कार ,
मला म्युनिकमधे एका कंपनीमधे ऑफर मिळाली आहे . त्याविषयी थोडी माहिती हवी आहे .
इथे म्युनिक किंवा जर्मनीमधले कुणी आहे का ?
मी आधी "जर्मनीमधले मायबोलीकर " असा धागा पाहिला होता , पण आता सापडत नाहीये.
प्लीज कुणी मदत कराल का ?
जर्मनी : एका वेड्या राजाचे स्वप्न : नॉईश्वानस्टाईन कॅसल
(म्युनिक- नॉईश्वानस्टाईन कॅसल डे टूर - भाग २)
Neuschwanstein Castle-Dream Of A Mad King, Munich-Neuschwanstein Castle Day Tour : Part -2
मुखपृष्ठ – ००१
जर्मनी : लिंडरहॉफ पॅलेस आणि ओबरआमेरगॉव
(म्युनिक- नॉईश्वानस्टाईन कॅसल डे टूर - भाग १)
Germany : Linderhof Palace And Oberammergau
(Munich-Neuschwanstein Castle Day Tour – Part 01)
मुखपृष्ठ – ००१
Will Update Picture Soon
स्टिव्हन स्पीलबर्ग च्या ‘लिंकन’ चित्रपटात एक मस्त प्रसंग आहे: लिंकन यांनी कृष्णवर्णीयांची गुलामगिरी संपवण्याच्या हेतूने अमेरिकन सिनेट मध्ये एक बिल आणले. त्याच्या चर्चेदरम्यान एक सिनेटर गृहस्थ उभे राहतात आणि म्हणतात - “तशी गुलामगिरी विषयी मला घृणाच वाटते, पण तरीही गुलामांना मुक्त करावं अशा मताचा मात्र मी नाही. आज मुक्त करा म्हणतायत... उद्या मतदानाचा अधिकार देतील!” ह्यावर तत्कालीन अमेरिकन सांसद थोडे चुळबुळतात. आपले गृहस्थ पुन्हा दरडावतात “आणि परवा? अहो! बायकांना मतदानाचा अधिकार देतील!” सांसद भलतेच खवळतात. एखाद्या वेदपाठशाळेत हे घडलं असतं तर उद्गारले असते अब्रह्मण्यम! अब्रह्मण्यम!
स्त्रियांबाबत केली जाणारी हिंसा ही काही नवीन गोष्ट नाही. परंतु दिवसेंदिवस या हिंसेचे वाढत चाललेले उग्र रूप ही एक अत्यंत चिंतेची व शरम आणणारी वस्तुस्थिती बनत चालली आहे. आजूबाजूच्या या परिस्थितीकडे काणाडोळा करून उपयोग नाही, कारण त्याची झळ कधी तुम्हांला लागेल ते सांगता येत नाही. अनेकदा स्त्रियांचे बाबतीत घडणारा हिंसाचार हा त्यांच्या जोडीदाराकडून होतो. इ.स. २०१२मध्ये हत्या झालेल्या स्त्रियांमधील जवळपास अर्ध्या स्त्रिया त्यांच्या जोडीदाराकडून किंवा कुटुंबसदस्याकडून मारल्या गेल्या.
लहानपणी शाळेत असताना संस्कृतमधे, 'स्त्रियश्चरित्रं, पुरुषस्य भाग्यम् | देवो न जानाति, कुतो मनुष्यः||' असे एक सुभाषित आम्हाला शिकवले गेले होते. त्याचा अर्थ अगदी सहज समजेल असा आहे. पण तेव्हा त्या वयात त्यावर फारसा विचार केला नव्हता. ५० मार्कापैकी सुभाषितं आणि त्यांची भाषांतरं फारतर ४-५ मार्कांपुरती असतील. तेवढाच उपयोग. पण हे सुभाषित कायम आठवायचं. अगदी कधीही. पुढे पुढे मोठं होत असताना मला नेहमी आजूबाजूला काय चाललंय, कोण कसं वागतंय, कसं बोलतंय अशा गोष्टी निरीक्षण करायची सवयच लागली. त्यावरून एक गोष्ट पटली...
सध्या चाळीशीत किंवा पन्नाशीत असलेल्या पिढीला निरुपमा प्रधान या भारताच्या एक प्रसिध्द बॅडमिंटन खेळाडू होत्या हे कदाचित आठवत असेल. काही अपवाद वगळता (खासकरून क्रिकेट) आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवलेले आपले खेळाडू नंतर काय करतात, कुठे जातात याबद्दल आपल्याला फारसे ठाऊक नसते. त्याबद्दल जाणून घेण्याचा आपण विशेष प्रयत्नही करत नाही. या अनुषंगाने ‘आठवणींच्या जगात. जर्मनीतील तीन तपांचा अनुभव.’ हे पुस्तक म्हणजे निरुपमा प्रधान यांनी बॅडमिंटन कारकीर्दीला निरोप दिल्यानंतरच्या त्यांच्या आयुष्याचा दीर्घ असा लेखाजोखा म्हणता येईल, जो त्यांनी स्वतःच्या शब्दांमधे वाचकांसमोर मांडलेला आहे.
दरवर्षी हिमवृष्टी होईल की नाही, हा प्रश्नच असतो. ती नक्की व्हावी, किमान ख्रिसमसच्यावेळी तरी आसमंत शुभ्र असावा, अशी बहुतेकांची इच्छा असतेच. पण ती नेहमीच पूर्ण होते, असं नाही. ह्या बर्फाची एक गंमत म्हणजे, काल पर्यंत मागमूसही नाही आणि सकाळी उठून पहावे, तर निसर्गाने बर्फाचा पांढरा शुभ्र गालिचा अंथरलेला, असाच अनुभव नेहमी येतो. फारच मनोहर दृश्य असते ते!