अतिशय चविष्ट, सोपा आणि हमखास यशस्वी चॉकलेट केक. मुख्य म्हणजे यात पीठ, मैदा वगैरे काहीही नाही. फक्त चॉकलेटची तोंडात विरघळणारी अशी छान चव येते.
साहित्यः
बटर - २०० ग्रॅम
बिटर चॉकलेट (७०% कोको असलेलं)- २०० ग्रॅम
बदामाची पावडर - २०० ग्रॅम
साखर - २०० ग्रॅम
व्हॅनिला फ्लेवरची साखर - एक सॅशे (१५ ग्रॅम)
बेकींग पावडर - अर्धा सॅशे (७ ग्रॅम)
अंडी - ४
चिमुटभर मीठ
कृती:
दरवर्षी हिमवृष्टी होईल की नाही, हा प्रश्नच असतो. ती नक्की व्हावी, किमान ख्रिसमसच्यावेळी तरी आसमंत शुभ्र असावा, अशी बहुतेकांची इच्छा असतेच. पण ती नेहमीच पूर्ण होते, असं नाही. ह्या बर्फाची एक गंमत म्हणजे, काल पर्यंत मागमूसही नाही आणि सकाळी उठून पहावे, तर निसर्गाने बर्फाचा पांढरा शुभ्र गालिचा अंथरलेला, असाच अनुभव नेहमी येतो. फारच मनोहर दृश्य असते ते!
भाग १ येथे पाहता येईल.
---------------------------------------------
नमस्कार लोकहो!
प्रेरणा: आशुचॅंपचे १०० वर्षांपूर्वीचे गाव
जर्मनीत किर्केल या गावी दरवर्षी 'मिडलआल्टर मार्क्ट' म्हणजे मध्ययुगातला बाजार. हा उन्हाळ्यात वसवला जातो. त्यात जुन्या काळातल्या लोकांचा पेहराव, दाग दागिने, वाद्ये, संस्कृती यांचे प्रदर्शन घडवले जाते. २ वर्षांपूर्वी तिथे जाण्याचा एकदा योग आला होता. पण त्याचे जास्त फोटो नाहीत. जेवढे आहेत, तेवढे टाकते आहे. यावर्षी जाणे झाले, तर परत नवीन फोटो टाकेन.
शुल्लक शुल्क भरले की हातावर असा शिक्का मारतात, तेच प्रवेशाचे तिकिट.
तुम्ही हापूस आंबे खात नाही??? मग तुम्ही आजवर काय जगलात? ह्या प्रश्नाइतकाच जिव्हाळ्याचा प्रश्न तुम्ही मलाही नक्कीच विचारु शकाल... सारं जग क्रिकेटवर फिदा आणि तुला ते आवडत नाही? कसं शक्यय? तुझ्या जीवनाला काय अर्थ आहे??? पण नाही, लोकहो! मी एकटीच नाहीये क्रिकेट न आवडणारी. एकतर सारं जग क्रिकेटवर फिदा नाहीच. बरंचसं जग फुटबॉलवर फिदा आहे, टेनिसवर फिदा आहे आणि ज्यांना क्रिकेटमध्ये किती खेळाडू असतात हे ही माहिती नाही, असे प्रगत राष्ट्रातलेसुद्धा लोकही आहेत!!! दचकायला होतं ना? अहो खरंच! माझ्या एका युरोपियन मित्राने कधीही क्रिकेटचा 'क' पण पाहिला नव्हता...
डॉ. कैलास यांनी सुचवलेल्या ओळीप्रमाणे गझल लिहिली आहे. एकंदरच, गझल लिहिण्याचा आयुष्यातला हा माझा पहिला वहिला प्रयत्न... कृपया, गोड मानून घ्यावा... चुकाही नक्की सांगाव्यात. धन्यवाद!
************************************************************************************************************
निरभ्र आढळेल आसमान एकदा तरी
ठरेन या जगात मी महान एकदा तरी
सदा जगात कष्ट पेलते भुकेस साहुनी
शमेल का अतृप्त ही, तहान एकदा तरी
महान ते असूनही विचार का असा नसे
बघू जगास होऊनी, लहान एकदा तरी
असे नको तसे नको जसे असू तसे दिसू
बनून मित्र गाऊयात, गान एकदा तरी
मुळ गाणे पहा: आभास हा
कधी हा प्रबंध कधी तो प्रबंध
जन जाहले मंद का
का हे कसे लिहिती असे हा घोर लागे जीवा
कसे संपवू मी संपवू गं मी स्वत:
दिवा(:दिवा:)स्वप्न का हे झोपताना ही मला
अभ्यास हा अभ्यास हा छळतो मला छळतो मला
अभ्यास हा अभ्यास हा
क्षणात सारे विचार वेडे झुळुक होऊनी जाती
कधी दूर तुही पण जवळ वाटे अन जर्नल दिसते हाती
मी अशीच बसते उगीच वाचते पुन्हा तुला विसरते
मग मिटून डोळे तुला पाहते तुझ्यापुढे मी हरते
तू असतांना नसल्याचा खेळ हा
दिवा(:दिवा:)स्वप्न का हे झोपताना ही मला
श्वेतांबरी वय वाढते आहे तुझे लक्षात घे....
आम्हालाही आता तुझ्या पक्षात घे
आयआयटी स्टूडंट्सना छळायच सोडुन दे
माबोवर तुझा वावर असाच कायम असु दे
मुहुर्ताचं औचित्य साधुन..
तेवढा हा नारळ लगेच फोडून दे ...
वाढदिवसाला नारळाची बर्फी करु...
फारच काही नाही तर, ओल्ड मन्क लार्ज चा एक पेग आवर्जुन भरू
बेफिकीर एनीवेज लिहितो गल्लाभरू
बेफिकीर, असा विचार नका करु
नाहीतर आम्ही इतरांस कसे पुरुन उरु?
केलात आपण चांगला उपक्रम सुरू ....
श्वे, वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा तुला
आमची भेट तुला आवडेल अशी आशा आहे आम्हाला...
प्रेरणा: दिनेशदा
केवळ आणि केवळ दिनेशदांच्याच प्रेमळ आग्रहाखातर मी ह्या विषयात पडले. अन्यथा मी कविता हा माझा प्रांत नाही असेच मानते. काही वेळा केवळ गंमत म्हणून मी काही रचना केल्या आहेत आणि काही वेळा काही मोजक्याच पण आवडणार्या कवितांवर प्रतिसाद लिहिले आहेत, या पलिकडे माझा कवितेशी काही म्हणता काही संबंध नाही.
त्याचे झाले असे, मी नुकतीच एक कविता रचली आणि दिनेशदांच्या विपुत तिची रिक्षा फिरवली. मग काय, मला अपेक्षा सुद्धा नव्हती असे काहीसे घडले. दिनेशदांचे कवितेविषयीचे मत समजले आणि आमची ह्या विषयावर खुप चर्चा झाली. कवींविषयी, कवितांविषयी आणि प्रतिसादकांविषयीही आम्ही भरभरुन बोललो.