विनोदी लेखन

स्वप्न

Submitted by फेसबुके on 28 July, 2012 - 03:19

स्वप्नं लैच काहीच्या बाही पडतात च्यामायला ,दिवसाढवळ्या ! तर आपण निशाचर असल्यामुळे दिवसा सुमारे २-३ तास डुलकी घेत असतो, हे ओघानेच आले. पण झोप कधी लागते कधी लागत नाही. म्हणून आपल्याला जेव्हा झोप लागते, तेव्हा लैच तर्राट झोपतो आपण. बायको सुद्धा आपल्याला उठवण्याची हिम्मत करीत नाही; मात्र सदर जबाबदारी ती माझ्या दोन्ही बच्चूंवर सोपवत असते. तर आज असाच मस्त झोपलो होतो आणि स्वप्न पडलं. ते स्वप्न होतं हे नंतर समजलं. कारण स्वप्नात हे स्वप्न आहे, असे लैच वेळा समजत नाही.

गुलमोहर: 

चेहेरे

Submitted by श्रीकांत जोशी on 19 July, 2012 - 04:58

म्हणजे चेहेर्‍याच्या साधर्म्यामुळे किंवा नावातील साधर्म्यामुळे कसे गोंधळ होतात बघा. सिनेमात नाही का? लहान अमिताभ मास्टर बबलूसारखा, पण मोठेपणी हुबेहूब स्वतासारखा. केस काळे किंवा पांढरे एव्हढाच फरक. पण बघायच मात्र कस? की चाळीशीतला अमिताभ पंचवीसचा समजायचा आणि तोच पांढरे केस करून आला की साठीचा. प्रत्यक्षात शक्य आहे का?
अहो नाही काय? आहे, शक्य आहे. कशावरून सांगतो.मध्यंतरी मी मणीपालहून येत होतो. मी म्हणजे बायको, मुलगा आणि मी.

गुलमोहर: 

कांदासंस्थानाचे चिलखती उत्तर

Submitted by ३_१४ अदिती on 19 July, 2012 - 00:02

कांदा संस्थान, दि. १८ जुलै. - संस्थानात खास भरवण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत संस्थानाच्याच संशोधन संस्थेत बनवलेल्या चिलखताची चाचणी दाखवण्यात आली. कांदा संस्थान ग्रामपंचायतीतल्या सर्व स्तरातल्या ग्रामस्थांनी या प्रकल्पात सहभाग घेतल्याचे आवर्जून सांगण्यात आले. काय आहे हे चिलखत? ऐकू या संस्थानाच्या संशोधन संस्थेच्या प्रभारी श्रीमती ज्योतीकिरण छेदी यांच्याच शब्दांत.

गुलमोहर: 

गण्याच्या ऒफीसमधे मॊकड्रील (आपत्ती व्यवस्थापन ) होते

Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 18 July, 2012 - 03:17

गण्याच्या ऒफीसमधे मॊकड्रील (आपत्ती व्यवस्थापन ) होते

मंत्रालयाला लागलेल्या भिषण आगीमुळे मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या मॊकड्रीलच्या धर्तीवर ढेमसे बाईंनी आपल्या ऒफीसमध्ये मॊकड्रील घेण्याचे ठरविले. ढेमसे बाईनी आपल्या बाबु गण्या खारोडेला याची कल्पना दिली आणि सांगीतले उद्या ११.०० वाजता कार्यालयात मॊकड्रील संबंधि मिटींग होईल याची कल्पना सर्व कर्मचायांना द्या असे सांगीतले. गण्या सरळ उर्मीले कडे गेला. त्याने सांगीतले जा आणि ऒफीसमधील सर्वांना सांगा उद्या ११.०० वाजता मॊकडील संबंधी मिटींग आहे मॆडमच्या दालनात.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

जनता दरबार

Submitted by चिखलु on 9 July, 2012 - 14:26

एक म्हातारबाबा- साहेब, पेन्शन मिळत नाही
नामदार -तुमचा नाव काय?
म्हातारबाबा- कल्याण
नामदार - तुमचा गाव कुठला?
म्हातारबाबा- गोविन्दवाडी
म्हातारबाबा- तिकडे ते पाध्ये राहतात ना, ते मेडीकलवाले त्यांच्या बाजूच्या बिल्डींग मध्ये राहतो,
नामदार- बरं
म्हातारबाबा- तिथे कुणालाही विचारा की रामचंद्र जोशी कुठे राहतात, कुणीही सांगेल तुम्हाला
नामदार - आता हे रामचंद्र जोशी कोण?
म्हातारबाबा- एल आय सी मध्ये
नामदार - ते एल आय सी मध्ये असतात का? त्यांचा इथे काय संबंध
म्हातारबाबा- माझी बायको
नामदार - काय? ते तुमच्या बायकोचे नातेवाईक आहेत का?
म्हातारबाबा- माझ्या बायकोचा ज्वाइन्ट अकौंट

गुलमोहर: 

झुणका X बर्गर - अ बिग फाईट

Submitted by Kiran.. on 7 July, 2012 - 06:31

काही काही गोष्टींचे संस्कार आपल्या मनावर खूप खोलवर झालेले असतात. जसं देऊळ दिसताक्षणी मराठी माणूस झटकन हात जोडतो. आत कुठला देव आहे याची चौकशी न करता ! हे संस्कार बालपणापासून झालेले असतात.

असेच संस्कार आपल्या मागच्या दोन पिढ्यांवर हिंदी सिनेमाने केले. या मातीत रहायचं तर या मातीत जे पिकतं आणि उगवतं त्याला नाक मुरडायचं नाही हा एक मुख्य संस्कार आहे. मागच्या दोन्ही पिढ्यांना हिंदी सिनेमातले नायक नायिका गाणं म्हणतात याचं आश्चर्य कधीच वाटलं नाही. कोवळ्या मनावर तसं ठसवलंच गेलं. आणि डीएनए मधे ही माहिती साठवून ठेवली गेल्याने पुढच्या पिढीने ते नैसर्गिकरित्या अ‍ॅक्सेप्ट केलं.

गुलमोहर: 

हौस सिनेमाची

Submitted by bnlele on 5 July, 2012 - 06:14

आमच्या लहानपणी, मुलांना सिनेमा बघण्याची संधि फार कमि मिळायची. पॉकेटमनि शून्य आणि वर मोठ्यांचा धाक.
परवानगी न देण्याच्या बाबतीत एकमत. या एकाच विषयावर त्यांच दुमत कधिच झाल नाही याच तेंव्हा आश्चर्य वाटयच -
स्वतः कुटुंबवत्सल झालो तेंव्हामात्र स्पष्ट कळल !
शहरात सहा-सात थिएटर्स होती. सदर क्षेत्रात दोन - तिथे केवळ इंग्रजीच सिनेमे दाखवीत. त्या भागात जाण्याचे योग कमि.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

बंड्या

Submitted by मराठी टायगर on 5 July, 2012 - 05:28

दररोज शिस्तीचा भाग म्हणून व्रुत्तपत्र वाचणार्‍या बंड्याने
त्याच्या बाबानां विचारलं,"बाबा, शासन व्यवस्था म्हणजे काय हो?"
"त्याचं असं आहे" बाबा विचार करत म्हणाले,"हे बघ मी घरात पैसे कमवून आणतो,म्हणजे मी भांडवलदार;तुझी आई हा पैसा कुठे कसा खर्च करायचा हे
ठरवते म्हणजे ती सरकार; आपल्या घरातील मोलकरीण काम करते म्हणून ती झाली कामगार; तु सामाण्य नागरीक आणि तुझा लहान भाऊ म्हणजे भावी पिढी.
समजलं?"
बंड्या विचार करत झोपी गेला.रात्री त्याचा लहान भाऊ रडायला लागल्यावर

गुलमोहर: 

गंम्पू

Submitted by मराठी टायगर on 5 July, 2012 - 02:05

गंपू : हॅलो, माझा मोबाइल
माझ्या म्हशीने गिळलाय!!
.
.
कस्टमर केअर : मग, आम्ही काय
... करू?
.
.
.
गंपू : मला फक्त एवढं सांगा की,
ती गावाबाहेर गेली तर मला 'रोमिंग'
नाही ना लागणार......
गंपू roxx
कस्टमर केअर shocks....

गुलमोहर: 

यू टर्न

Submitted by चैतू on 4 July, 2012 - 06:45

एकदा अविनाश एका फाइव्ह स्टार हॉटेल समोर कोनाची तरी वाट पाहत उभा होता. तेव्हढ्यात तिथे एक BMW येउन थांबली. तिच्यामधुन एक सुटबुटातला माणूस खाली उतरला. अविनाशने तिकडे पाहिले आणि तो त्या माणसाकडे जाउ लागला. त्या माणसानेही अविनाशकडे पाहिले. अविनाशने ते पाहून स्मित केले. तो त्या माणसासमोर जाउन उभा राहिला. त्याच्याकडे पाहुन आपला हात पुढे केला आणि म्हणाला,
"अल्लाके नाम से कुछ दे दे बाबा".

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - विनोदी लेखन