विनोदी लेखन

बकरी चोर

Submitted by ज्ञानेश्वर धानोरकर on 17 May, 2012 - 08:21

नागपुर भंडारा रोडपासून थोड्या आडवळनाच्या मार्गावर आयुध निर्माण वसाहत आहे. आजूबाजूला डोंगराळ प्रदेश आहे. या भागात वन्य प्राण्यांचे अस्तित्व असते. कधी कधी पाणी वगैरे मिळाले नाही तर ते मनुष्यवस्तीचा सहारा घेतात. मानव वस्तीत वन्यप्राण्याने अचानक भटकणे, भीतीदायक, धोकादायक, कधी कधी गमतीदार असते. अशीच एक घटना जवाहरनगर आयुध निर्माण वसाहतीच्या परिसरात घडली. रात्री साडेदहा-अकरा वाजण्याच्या सुमारास एक वाघ वसाहतीच्या काही भागात फिरून निघुन गेला. कधी कधी वाघ डोगरपायथ्याकडे फिरायला जाणार्‍यांच्या नजरेस पडायचा. लोकांना भीती वाटायची.

गुलमोहर: 

जनगणना - एक अब्ज सतरा कोटी सदुसष्ठ लाख पंच्चाण्णव हजार नऊशे त्रेचाळीस अधिक एक.

Submitted by धुंद रवी on 15 May, 2012 - 05:11

एका कोंकणी माणसाने तेलगुत अनुवाद केलेला संस्कृतमधला असा एक हिब्रु श्लोक आहे की,
माजलेला ढग गडगडत राहतो, जोपर्यंत तो पर्वताला धडकत नाही.
माजलेला झेंडा फडफडत राहतो, जोपर्यंत तो पावसाला धडकत नाही. आणि...
माजलेला माणुस बडबडत राहतो, जोपर्यंत तो पुणेकराला धडकत नाही.

विक्रमादित्य अंबिलढगे असाच एक माजलेला ढग होता जो पुण्यातल्या पर्वताला धडकला आणि हवेतच विरुन गेला. तो असाच एक माजलेला झेंडा होता जो पुणेरी पावसात फाटुन गेला. शेवटी पुण्यात पाऊल टाकताना कोणाच्याही जिवाचा थरकाप होतो, ते उगीच नाही !

गुलमोहर: 

एका पप्पूची वार्षिक डायरी

Submitted by बेफ़िकीर on 4 May, 2012 - 04:31

पप्पू या एका अर्भकाने वयाच्या आठव्या वर्षापर्यंत प्रत्येक वाढदिवशी लिहिलेल्या या डायरीतील काही भाग प्रकाशित करताना अजिबात आनंद होत नाही आहे. आनंद होत आहे असे म्हणण्याची प्रथा मोडून काढणे या एकाच हेतूने असे म्हणालो आहोत. वास्तविक पाहता आनंद होतच आहे की आजही आपल्याला काहीतरी सुचले व आजही आपण सर्वांसमोर ते टाकून छान छान प्रतिसाद मिळवू शकलो. आमच्या मनात प्रतिभा इन्स्टॉल करणार्‍या सुदैवाला आम्ही नमस्कार करत आहोत.

तर वाचा डायरी पप्पूची.

===================================

वर्ष पहिले:

गुलमोहर: 

जागतिक कंटाळा दिवस !

Submitted by A M I T on 4 May, 2012 - 02:53

वासूचँप यांना निरनिराळ्या गडांवर भटकंती करण्याचा शौक आहे. ते जेव्हा भटकंतीवरून परत येतात तेव्हा त्यांची दाढी हातभर वाढलेली असते. मिलींद गुणाजी म्हणे त्यांचच अनुकरण करतात, असं खाजगीत म्हटलं जातं.
रात्रीच्या वास्तव्यात त्यांनी बरेचदा 'अमानवीय' प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहीलेले आहेत. अशावेळी त्यांचे सहकारी सदैव 'पिवळ्या' बरमुड्यात वावरत असतात, अशी कबुली मागे त्यांनी दिली होती. असो.

गुलमोहर: 

भावनेने ओथंबलेले स्क्रॅप्स, खरडी, विपु इ. इ.

Submitted by Kiran.. on 22 April, 2012 - 08:49

ऑर्कुटच्या काळात जीमेल मधे जपल्या गेलेल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या पाऊलखुणा आज सहज चाळता चाळता हाती लागल्या. त्यात काही डॉक फाईल्स होत्या, एकमेकांना आलेले मेल, तर काही हेरगिरी करून सेव्ह केलेले स्क्रॅप्स, खरडी, विपु असा नजराणाच सापडला. त्यातलं सिलेक्टेड नमुने इथं पेश करतोय.

नमुना एक

तू मला हा मेल का पाठवलास कळेल का ?

गुलमोहर: 

पकडा-पकडी !

Submitted by राफा on 14 April, 2012 - 11:01

मी: नमस्कार. आपण बनसोडे बोलताय का ?
बनसोडे: बोला.
मी: मी संरजामे. आपण सर्पमित्र, प्राणीमित्र वगैरे असल्याचं ऐकलं. आमच्या बाल्कनीत..
बनसोडे: ते सर्पमित्र वेगळे ! ते छंद वगैरे जोपासतात. लोकसेवा वगैरे. आपला व्यवसाय आहे, आधीच सांगतो !
मी: सांगा ना.
बनसोडे: च्च. तसं नै. लोक नंतर पैशे द्यायला कटकट करतात. म्हणून आधीच सांगतो. लोकांनी पैसे नाय दिले ना तर मग पकडलेला साप तसाच सोडून येतो आपण. मग बसा बोंबलत !
मी: काय सांगताय ?

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मागतोय ना.. कर मदत!

Submitted by राज जैन on 13 April, 2012 - 02:10

मास्तर कायम म्हणायचा मला, राजा, राजा लेका दुसर्‍याला मदत केली की देव तुला मदत करेल. जो अडलेला दिसेल त्याला मदत कर, जो मदत मागेल त्याला मदत कर. आता मास्तर म्हणाले म्हणजे करायला नको का? तेव्हा पासून मनाला जे वळण लागले ते त्यामुळे अंगावर वळ उठले तरी सुटले नाही बघा. मास्तरांनी सांगितले मागेल त्याला मदत कर. परिक्षेत एका मुलाला काय बी येत नव्हतं.. त्याने माझाकडे मदत नजरेनेच मागीतली गुपचुप व मी ती त्याला दिली. आता पन्नास कॉप्या अंगाखांद्यावर! दिल्या चारपाच काढून. देवानं कसे गुपचुप पुण्य जमा करून टाकायचे की नाही.. पण नाही. कॉप्या देताना मास्तरानंच पकडला, पापाचा हिशोब वाढवला. धु धु धुतला.

गुलमोहर: 

नव्या आर्थिक वर्षाचे साहीत्यिक संकल्प..

Submitted by Kiran.. on 6 April, 2012 - 19:50

णमस्कार्स

या नव्या आर्थिक वर्षात प्रसवायच्या साहीत्याचे संकल्प सोडलेले आहेत. आर्थिक वर्ष हे धर्मनिरपेक्ष असल्याने संकल्पासाठी हा मुहूर्त सोडला आहे.

गुलमोहर: 

गझलेची कार्यशाळा - २ (अंतिम भाग)

Submitted by बेफ़िकीर on 2 April, 2012 - 05:08

http://www.maayboli.com/node/33927 - गझलेची कार्यशाळा - १

=========================================

गुर्जर सभागृह.

येथे बोडण, डोहाळजेवण, बारसे व बारावा या विधींसाठी हॉल मिळेल.

अशी पाटी वाचून मी खाली पाहिले.

'चौकशी' असा शब्द लिहून एक बाण दाखवला होता. तो बाण जिकडे निर्देश करत होता तिकडे दोन गायी बसलेल्या होत्या.

हॉलवाल्यांनी माणसाचा संपूर्ण आयुष्यकाळ कव्हर केलेला दिसत होता. बारश्यापासून बाराव्यापर्यंत सर्व काही तिथे चालत होते.

"सर, या हॉलला लाडाने सगळे बोडोबाबा हॉल म्हणतात"

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - विनोदी लेखन