गण्याच्या ऒफीसमधे मॊकड्रील (आपत्ती व्यवस्थापन ) होते
मंत्रालयाला लागलेल्या भिषण आगीमुळे मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या मॊकड्रीलच्या धर्तीवर ढेमसे बाईंनी आपल्या ऒफीसमध्ये मॊकड्रील घेण्याचे ठरविले. ढेमसे बाईनी आपल्या बाबु गण्या खारोडेला याची कल्पना दिली आणि सांगीतले उद्या ११.०० वाजता कार्यालयात मॊकड्रील संबंधि मिटींग होईल याची कल्पना सर्व कर्मचायांना द्या असे सांगीतले. गण्या सरळ उर्मीले कडे गेला. त्याने सांगीतले जा आणि ऒफीसमधील सर्वांना सांगा उद्या ११.०० वाजता मॊकडील संबंधी मिटींग आहे मॆडमच्या दालनात.
उर्मीला बाई जोरात ओरडते काय मॊकड्रील म्हणजे काय अस्ते? गण्या हळुच बाई समजा आपल्या ऒफीसला आग लागली तर काय काय करता येईल. उर्मीला पुन्हा म्हणजे ? अव समजा तु आगीत अडकली तर तुले वाचवाचे कसे याचे धडे त्या बाई सांगणार आहे आण तसे प्रात्यक्शीक ते बाई करुन घेणार आपल्या कडुन. अस व्हय.
उर्मीला बाई सगळ्या ऒफीसमध्ये निरोप देते. उद्या ११ वाजाता मोकड्रील हाय सर्वांनी ढेमसे बाईच्या दालनात जमा व्हाव. तेवढ्यात कुसुम ओरड्ते कायच व मॊकड्रील शोड्रील असीन, व्यायाम व्हाव म्हणुन.
उर्मीला बाई मोठ्या दिमाखात सांगते नाय व कुसुम शोड्रील नाय मॊकड्रील.
मॊकड्रील म्हणजे त्या गणेश बाबुनी सांगीतले आपत्ती व्यवस्थापन. आगबिग लागलीतर काय करायचे याचे शिक्शन.
कुसुम अस व्हय. मग मजा हाय तुई
उर्मीला - माई कायले मजा. मजा त सार्याईची हाय.
दुसया दिवशी सर्व लोक मिटींगला वेळेवर हजर होतात. ११ वाजता बरोबर ढेमसे बाईच्या दालनात मिटींग सुरु होते. गण्या सर्वांना बाईचे पत्र वाचुन दाखवतो.
आज आपण येथे मॊकड्रील घेण्यासंबंधी जमलो आहो. मॆडम आपणा सर्वांना कोणी कसे वागायचे काय करायचे यासंबंधी मार्गदर्शन करतील.
ढेमसे बाई अगदीच ढेमसासारख्या गुटगुटीत थोडे पुढे सरकत तोडांचा खाकार करुन बोलायला सुरुवात करतात.
मंड्ळी तुम्हाला माहीतच आहे मंत्रालयाला आग लागली त्यात कित्येक फाईल जळाल्या, प्राणहानी झाली. असे केव्हा घडेल याचा नेम नाही. म्हणुन आपण मॊकड्रील घेणार आहोत तेवढ्यात चंदा माकडे उभी राह्ते. हीला ऑफस मधले सगळे शीर्ट मधे सी. एम. म्हणतात. ही एकतर खुर्चीवर झोपते नाहीतर कामावर येतच नसते. एक दिवस ही झोपली असताना गण्याने तीच्या वेणीला मी सी.एम. आहे असा कागद लिहुन बांधुन दिला आणि अशीच सर्व ऑफीस भर फिरत होती, तेव्हा पासुन ती सी. एम.झाली.
ढेमसे बाई - बोला चंदा बाई.
चंदाबाई - मॅडम पण आग पण लावणार आहात काय?
ढेमसे बाई- हो - ती तुम्हीच लावायची थोडीच लावाल धुर जास्त होऊद्या
चंदा बाई- मी नाय लावणार बापा आग बीग . वाटल तर आगीत तेल टाकील . माफ करा पाणी टाकील
ढेमसे बाई- बर बर तेल टाका की पाणी टाका पण जबाबदरीने टाका
कुसुम - बाई मी काय करु
ढेमसे बाई- तुम्ही एक खोली निपचित पडुन राहायचे. थोड बाजुला जाऊन तोंड काळ करायचे ,तुम्हाला उचलुन न्यायला दांदळे हे शिपाई येतील. दांदळे तुम्हालाही कळले ना. तुम्ही तिकडे तोंड नका काळ करु. दांदळेचा चेहरा पाहण्या सारखा होतो.
दांदळे- मॅडम पण मला कुसुमला उचलता तर आले पाहीजे.
ढेमसे बाई- फरफटत न्या.
गण्या- आन बाई तुम्ही काय करणार,
ढेमसे बाई- मी - मी स्टोअर रुम मध्ये असेल . तुम्ही मला उचलुन जिण्यावरुन नाही तर सरळ पाईपनी खाली न्यायचे. मी पण तोंड काळ करणार आहे.
ह तर आजचा विषय संपला
सगळे बाहेर पडता-
चंदा - गणेश बाबुकडे पाहाते वा बाईले उचलणार तुम्ही निट उचला तिलेच काय तोंड वळखता आले पाहीजे. नाहीतर दुसरीच उचलाल.
गण्या अरे हो हे लक्षातच आले नाहॉ- गण्या तडक क्याबीन मधे जातो - मॅडम मी तुम्हाला कसा ओळखु
ढेमसे - सोप आहे. लाल ब्लाऊज काळी साडी
गण्या - खुशीतच लाल ब्लाऊज, काळी साडी.
चंदा- गणेशभाऊ खुशीत दिसता. आपत्तीचे निट व्यवस्थापन करजा. असे संगळेच गणेश खारोडेला चिडवता.
दुसर्या दिवशी चंदाबाई सगळे जमा झाल्यावर एका हॉल मध्ये जाऊन आग लाऊन देते, आग जोरात पसरते तशी ती पाणी पण टाकत राहते. बाकी आप आपल्यावर सोपविलेल्या जागी जाऊन बसतात.
चंदा ओरडत येते आग आग. गण्या बस चुप नाही तर बंब यायचा विझवायला .
चंदा- बंबच पाहीजे आग जोरात हाय.
दांदळे - एका खोलीत जाऊन पडलेल्या कुसुमला शोधु लागतो- कुसुमबाई - बाई-
कुसुम- या ईकड म्या तोंड काळ केल हाय , तुम्ही नका करु, झटपट उचला आता जिव घाबरला
दांदळे - कसा उचलु, तुमीच कडेवर या अशे , नायतर फरफाटत नेतो
कुसुम- मी नाय येणार कडे गिडे. वाटल त फरफाटत न्या.
दांदळे जोरात उचलतो तसा तोल जाउन एकमेकावर पडतो.
चंदा- हटा हटा बाजुले चुलीत गेलं ते मॉक्ड्रील
तशीच फनकार बाहेर येते
ईकडे वाढलेल्या आगीमुळे सर्वजण मॉकड्रील सोडुन सरळ खाली येतात. ढेमसे बाई आणि गण्याच तेवढे बाकी असतात. गण्या सरळ स्टोअर रुमला जातो तिथे ढेमसे बाई त्याची वाटच पाहत असतात, अहो केवढा वेळ - या असे, गण्या म्यॅडम- म्यॅडम करतो जवळ जातो
ढेमसे बाई अहो लाजु नका, तुमच्यावर कुठलीही आपत्ती येणार नाही याची मी ग्वाही देते. आता गण्याचाही धीर सुटतो. एव्हान आग आटोक्यात येते. सगळे वर सरळ स्टोअर रुम कडे पळतात तेव्हा ढेमसे बाई आणि गण्या दोघेही आपत्तीजणक स्थितीत असतात. सगळी मंडळी आल्या पावली निघुन जातात. दुसर्या दिवशी सगळी मंडळी मॉकड्रील जोरात झाले म्हणुन गण्याकडे टकमक पाहत राहतात. ढेमसे बाई देखील कोणाल माहीती नसेल या विचाराने सगळ्यांना विचारता कसे झाले मॉक्ड्रील. सगळेच छान छान करत तोडाला रुमाल लाऊन बसतात.
.
.
एक दिवस ही झोपली असताना
एक दिवस ही झोपली असताना गण्याने तीच्या वेणीला मी सी.एम. आहे असा कागद लिहुन बांधुन दिला आणि अशीच सर्व ऑफीस भर फिरत होती, तेव्हा पासुन ती सी. एम.झाली. <<
छान लिहले
छान लिहले
धन्यवाद !
धन्यवाद !
ही ही ही... :ड
ही ही ही... :ड
(No subject)
ठीक आहे !
ठीक आहे !
अरे ! हे वाचलेलं पण प्रतिसाद
अरे !
हे वाचलेलं पण प्रतिसाद कसा काय राह्यला द्यायचा
मुकु
लिहीत रहा. तुझ्या पुढील लिखाणासाठी मनापासून शुभेच्छा !