जनता दरबार

Submitted by चिखलु on 9 July, 2012 - 14:26

एक म्हातारबाबा- साहेब, पेन्शन मिळत नाही
नामदार -तुमचा नाव काय?
म्हातारबाबा- कल्याण
नामदार - तुमचा गाव कुठला?
म्हातारबाबा- गोविन्दवाडी
म्हातारबाबा- तिकडे ते पाध्ये राहतात ना, ते मेडीकलवाले त्यांच्या बाजूच्या बिल्डींग मध्ये राहतो,
नामदार- बरं
म्हातारबाबा- तिथे कुणालाही विचारा की रामचंद्र जोशी कुठे राहतात, कुणीही सांगेल तुम्हाला
नामदार - आता हे रामचंद्र जोशी कोण?
म्हातारबाबा- एल आय सी मध्ये
नामदार - ते एल आय सी मध्ये असतात का? त्यांचा इथे काय संबंध
म्हातारबाबा- माझी बायको
नामदार - काय? ते तुमच्या बायकोचे नातेवाईक आहेत का?
म्हातारबाबा- माझ्या बायकोचा ज्वाइन्ट अकौंट
नामदार -अहो काय बोलता तुम्ही कल्याणराव? म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का कि रामचंद्र जोशी आणि तुमची बायको यांचे संबंध आहेत?
म्हातारबाबा- आं?
नामदार - अहो, तुमच्या बायकोचे संबंध आहेत असं म्हणायचं आहे का तुम्हाला?
म्हातारबाबा- तर मी काय म्हणतो, कि तेवढं प्रकरण तुम्ही मिटवून द्या साहेब, तुमचे खूप उपकार होतील.
नामदार - अहो, या वयात हे कसा शक्य आहे? म्हणजे संबंध?
म्हातारबाबा- आं?
आणि अचानक काहीतरी लक्षात आल्यासारखं करून, खिशातून एक मशीन काढून कानात लावतात आणि म्हणतात हां बोला.
नामदार - अहो, मी काय म्हणतो, या वयात हे कसं शक्य आहे? म्हणजे संबंध?
म्हातारबाबा -संबंध? कुणाचे? काय बोलता काय तुम्ही?
नामदार - अहो तुम्ही तर म्हणाला ना, तुमच्या बायकोचे संबंध आहेत
म्हातारबाबा - थोबाड फोडील. मी कधी म्हणालो. आणि माझी बायको मारून १० वर्ष झाले.
नामदार - अहो, मग तुमची बायको मरायच्या आधी तिचे संबंध होते असं तुम्हाला म्हणायचं आहे का? झाला गेलं विसरून जा आता.
म्हातारबाबा - कसल्या अश्लील गोष्टी करत आहात तुम्ही. आणि अशे घाणेरडे आरोप कसा काय करू शकता तुम्ही.
नामदार - शांत व्हा, काही हरकत नाही कल्याणराव.
म्हातारबाबा - ओ, काहीच्या काही काय लावलंय आणि हा कल्याण कोण?
नामदार - तुम्हीच तर तुमचा नाव सांगितला कल्याण म्हणून.
म्हातारबाबा -अहो, कल्याण माझ्या गावाचा नाव
नामदार - मग तुम्ही कोण?
म्हातारबाबा -रामचंद्र जोशी
नामदार -काय? अहो तुम्ही जरा नीट सांगाल का तुम्हाला काय झालाय?
म्हातारबाबा - अहो अशात जरा विसरायला होतं, काही काही आठवत नाही
नामदार -मी काय मदत करू तुम्हाला
म्हातारबाबा - चालताना त्रास होतो
नामदार - ओ, काहीच्या काही काय लावलय, तुम्ही डॉक्टर कडे का जात नाही
म्हातारबाबा -आणि मग तुम्ही कोण आहात?
नामदार -अहो असं काय करताय तुम्ही, मी मुख्यमंत्री
म्हातारबाबा -आठवल्यासारखं करून, तरी म्हटला तुम्हाला कुठेतरी पाहिला आहे, परवा भेळ खाताना, कागदावर तुमचा फोटो पाहिला. भेळ फार छान होती, रामप्रसाद भेळ सारखी भेळ कुठेही मिळत नाही. तुम्ही एकदा खावून बघा
नामदार - तुम्हाला काय हवंय.
म्हातारबाबा - हो हो अगदी, २ ओली भेळ बांधून द्या, कांदा जरा जास्त टाका
नामदार - अहो मी मुख्यमंत्री आहे
म्हातारबाबा -तुम्ही तर म्हणाले कि तुम्ही रामप्रसाद आहात
नामदार -अहो मी मुख्यमंत्री, रामचंद्र जोशी
म्हातारबाबा - (काहीतरी आठवल्यासारखं करून) वा वा तुमचंही नाव रामचंद्र जोशी आहे, माझपण तेच आहे.
नामदार -(खुश होवून, एकदाची आली गाडी रुळावर म्हातारबाबांची) हं बोला काय मदत करू मी आपली
म्हातारबाबा -शौचास साफ होत नाही... औषध द्या.
(नामदार बेशुद्ध होवून पडतात)

गुलमोहर: 

वा......फारचं छान्...नामदार्....आं....म्हातारबाबा...नाही ,नाही....कल्याणराव्...आं, काहीतरी गडबड होतेय्...रामचंद्र जोशी,आं चुकलं..चुकलं.....चि़खल्या...

सुन्दर जाम आवडलं बाबा आपल्याला.............

चिखल्या

ओरिजिनल प्रोफाईलने फार चिडता तुम्ही म्हणून इथेच मनापासून मित्रत्वाचा सल्ला देतोय. अनेकदा जालाचं व्यसन लागलं कि सतत काहीतरी लिहून आपला धागा वर असावंसं वाटू लागतं. अशी स्थिती आहे असं ज्या वेळी जाणवेल तेव्हां जे लिखाण करायचं आहे ते २४ तासांनंतर करावं. २४ तासांनंतरही ते लिखाण करायची उर्मी राहिली तर नक्कीच त्याच्यामागे लागावं अन्यथा सोडून द्यावं. आपल्या दोन लिखाणांमधे किमान चार दिवसांचं अंतर राहील याची दक्षता घ्यावी. एकदा हे करून पहा. नुकसान काहीच नाही.

ही पोस्ट आवडली नाही तर कळवा. एडीट करता येईल.

Kiran..
ओरिजिनल प्रोफाईलने फार चिडता तुम्ही म्हणून इथेच मनापासून मित्रत्वाचा सल्ला देतोय. >>>
म्हन्जे? नाही कळले.

बाकी तु लिहिले ते पटले.
ठीक आहे, तु म्हणतो तसे करुन बघतो मी. धन्यवाद.