भाग २- मध्ययुगातले गावः किर्केल, जर्मनी (फोटोज आणि व्हिडिओजसहित)

Submitted by सानी on 23 May, 2011 - 12:25

भाग १ येथे पाहता येईल.
---------------------------------------------

नमस्कार लोकहो! Happy

२ वर्षांपूर्वी जेंव्हा मी पहिल्यांदा जर्मनीतील किर्केल गावी दरवर्षी मे महिन्यात दोन दिवस भरणार्‍या मध्ययुगीन गावाचे/ बाजाराचे (ज्याला जर्मन भाषेत मिटलआल्टरमार्क्ट असे म्हणतात) छोटेखानी प्रदर्शन पहायला गेले होते, तेंव्हा आम्हाला तिथे पोहोचायला फार उशीर झाला होता. त्यामुळे त्यावेळी फक्त निवडक फोटो काढले गेले होते. जे मी भाग १ मध्ये टाकले आहेत. मागच्या वर्षी आम्ही गेलो, तेंव्हाचे काढलेले फोटो काही केल्या सापडले नाहीत, फक्त एक व्हिडिओ मात्र मिळाला, त्याचीही लिंक भाग १ मध्ये दिली आहेच. ह्या वर्षी जायचे की नाही, हे काहीच ठरवले नव्हते, पण मायबोलीवर मागच्या भागाच्यावेळी सगळ्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे आणि या विषयात दाखवलेल्या उत्साहपूर्ण अभिरुचीमुळेच केवळ या वर्षी या मध्ययुगीन गावात जायचे ठरवले.

मध्ययुगातील लोक कसा पेहराव करत, कशी भांडी वापरत, कसे दागिने घालत, थंडीपासून कसे संरक्षण करत, राजघराण्यातील लोकांचे पेहराव, स्वसंरक्षणासाठी बनवलेली शस्त्रे, लोहारकाम, सुतारकाम इ. गोष्टींची माहिती सर्वांना व्हावी यानिमित्ताने एक छोटेसे प्रदर्शन जर्मनीत वेगवेगळ्या गावांमध्ये भरवले जाते. ११ वर्षांपूर्वी ही परंपरा सुरु झाली आणि आजपावेतो जोपासली गेलेली आहे. या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे हे प्रदर्शन पाहायला जाणारे बरेचसे लोक आधीच्या वर्षीच्या प्रदर्शनातून (किंवा जिथे कुठे मिळत असतील तिथून) विकत घेतलेले पोषाख आणि दागिने घालूनच प्रदर्शन बघायला येतात. यात लहान मुलांचाही अपवाद नाहीच. त्यामुळे आपण खरोखर मध्ययुगीन गावात वावरत आहोत, असा भास होत राहतो. ह्या परंपरेचे मुख्य आकर्षण म्हणजे पारंपारिक कपडे आणि दागिने घालून काही ललना करतात तो बेली डान्स.

ह्या दोन दिवसांच्या मध्ययुगीन गाव/ बाजार/ प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी (२१ मे २०११) दुपारी फायर शो ने झाले. पण आम्ही रविवारी दुपारीच जाऊ शकलो असल्याने, त्याचे फोटो नाहीत. गेल्या १५-२० दिवसांपासून येथे जाण्याचे केलेले प्लॅनिंगपण फसणार अशी चिन्हे रविवारी दुपारी पडणार्‍या पावसामुळे दिसायला लागली होती. हा उन्हाळ्याचा ऋतू असल्याने पाऊस पडेल, असा विचारही कधी मनात आला नव्हता, पण मग हवामानाचा अंदाज पाहिला, तर दुपारी वीजा कडकडून पाऊस पडणार आणि संध्याकाळी ६ नंतर हवामान पूर्ववत होणार असे भाकित केलेले दिसले. ६ नंतर म्हणजे हे मार्केट बंद होणार आणि आपण ते मिसणार याची जवळ जवळ खात्रीच झाली. त्यानुसार पाऊस सुरुही झाला आणि थांबायची चिन्हे दिसेनात. निराश मनाला बाजूला सारून काहीही झाले तरीही हे मिशन यशस्वी करायचेच, ह्या निर्धाराने आम्ही किर्केलला गेलो. आम्ही पोहोचलो, तेंव्हा मात्र मस्त ऊन पडलेले होते त्यामुळे आमच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या.

१. किर्केल येथे ह्या बुरुजाच्या पायथ्याशीच हा बाजार वसवलेला होता.
Kirkel_Fort.JPG

२. इथे गाडी पार्क करुन मार्केटच्या दिशेने निघालो.
Board_Mittlealtermarkt.JPG

३. हा फोटो मिटेलआल्टरमार्क्टची दिशा दर्शवणारा:
Directions.JPG

४. पार्किंगपासून किर्केलच्या बुरुजाच्या पायथ्याशी पोहोचण्यासाठी अंदाजे पाऊण ते एक कि.मी. चा चढ चढावा लागतो. तोच हा चढः
Heading towards_MiAlMkt1.JPG

५. एवढा चढ चढूनही काही चेहरे आनंदी होते, याचा अर्थ हा बाजार पाहण्याचा उत्साह त्यांच्या आविर्भावात दिसतोय, नाही का? :
Heading towards_MiAlMkt2.JPG

६. गेल्यावेळीप्रमाणेच ह्या ही वेळी प्रवेश द्वारापाशी किरकोळ शुल्क भरुन तिकिट म्हणून असा शिक्का हातावर मारुन आम्ही मार्केटजवळ पोहोचलो.
Entry_Stamp.JPG

७. भरपूर गर्दी होतीच आमच्यासोबतीला:
The crowd.JPG

८. आत हे असे निरनिराळे स्टॉल्स लागलेले होते, ज्यात जुन्या काळातल्या वस्तुंचे प्रदर्शन मांडलेले होते:

स्टॉल क्र. १: शस्त्रास्त्रे
Arrows.JPG

स्टॉल क्र. २: शस्त्रास्त्रे
Markt3.JPG

स्टॉल क्र. ३: शस्त्रास्त्रे
Markt2.JPG

स्टॉल क्र. ४: शस्त्रास्त्रे
Markt4.JPG

स्टॉल क्र. ५: सुगंधी साबण
Fragrant_Soaps.JPG

स्टॉल क्र. ६: खाण्याचे पदार्थ. यात साखरेच्या पाकात तळलेले केळ्याचे गोलाकार काप, हॅसेलनट, चेरी इ. अनेक सुखामेव्याच्या प्रकारांचा समावेश होता.
Old_Age_Edibles.JPG

स्टॉल क्र. ७: भांडी
Old_Time_Pots.JPG

स्टॉल क्र. ८: दागिने, वनस्पती आणि वनौषधी
Kräuter.JPG

स्टॉल क्र. ९: दागिने
Schmuck.JPG

स्टॉल क्र. १०: राजेशाही पोषाखः
Old_Time_Royal_Clothes_&_Accessories.JPG

स्टॉल क्र. ११: साधे पोषाखः
Old_Time_Dresses.JPG

स्टॉल क्र. १२: दिसायला दिसतात साधे, पण किंमती तर गगनाला भिडलेल्या... किंमतीचे लेबल दर्शवतेय पोषाखाची किंमत ६९ €:
Dress_With_Pricetag.JPG

९. स्टॉल्स बघत चालत असतांनाच मागच्याच वर्षीप्रमाणे हे घुबड आमच्या स्वागताला रस्त्याच्या बाजूला उभे होते. ते घुबड आणि त्याची मालकीण एकदमच एकमेकांना शोभणार्‍या. तीक्ष्ण नजर आणि धारदार नाकः
Eule_Mit_Eulefrau_resize.JPG

१०. मध्ययुगीन काळात कडाक्याच्या थंडीपासून संरक्षण करत झोपणे म्हणजे तारेवरची कसरतच, हा पहा त्याचा नमुना:
१. Schlafzimmer1.JPG

२. Schlafzimmer2.JPG

११. त्या काळातली स्वयंपाकाची पद्धतः
१. Cooking_In_Middleage_resize.JPG

१२. त्या काळातली लोहारकामाची पद्धतः फोटो आणि फोटोखालीच आहे व्हिडिओ लिंकः
Blacksmith.JPG

आणि हा लोहारकामाचा व्हिडिओ:
http://www.youtube.com/watch?v=JEyi8GWvci8

१३: हे आहे सुतारकाम. त्याचा फोटो आणि खालोखाल व्हिडिओ:
Woods_Shaping_Up.JPG

आणि हा सुतारकामाचा व्हिडिओ:
http://www.youtube.com/watch?v=m4TG3XmsIvg

१४. सुतारकामाच्या ह्या व्हिडिओमध्ये जंगली पक्ष्यांच्या कर्णकर्कश्य किंकाळ्यांचा आवाज येतोय ना? तो आवाज चक्क एक माणूस काढतोय, जीभेवर विशिष्ट प्रकारची शिट्टी त्याने लपवली आहे. त्याचाही व्हिडिओ पाहता येईलः
http://www.youtube.com/watch?v=JZvutZd0uGw

१५. फिरुन फिरुन दमलात? मग हा आहे खादाडीचा एक स्टॉलः हे आहेत सॉसेजेस, ज्याला जर्मनमध्ये वुर्स्ट म्हणतात....
Wurst_Food4ThisAge.JPG

१६. आम्ही बरेचसे फोटो काढेपर्यंत निसर्गाने आम्हाला साथ दिली पण बेली डान्सचे फोटो काढून व्हिडिओ शूट करायला सुरुवात करताच अचानक मेघ दाटून आले आणि ५-१० मिनिटे जोरदार पाऊस पडला. त्यामुळे बेली डान्स करणार्‍या ललनांना म्युझिशियन्ससाठी बनवलेल्या स्टेजचा आसरा घ्यावा लागला. तेंव्हा मोबाईलला पाण्यापासून वाचवत काढलेला हा व्हिडिओ:
http://www.youtube.com/watch?v=r1rnUL2ZScQ

१७. ह्या व्हिडिओत काही लोक जर्मन मध्ये गात आहेत, "वियर वोलेन, वियर वोलेन फ्राई बियर" म्हणजेच आम्हाला हवी, आम्हाला हवी फुकटची बियर" .... Happy एवढे दिवसभर वाद्य वाजवून, गाऊन आणि नाचून, थोडक्यात आपले मनोरंजन करुन दमल्यावर ते एवढी तरी किमान अपेक्षा करणारच ना? आणि अर्थातच त्यांना आयोजकांकडून "फ्राई बियर" पुरवली गेलीच... Happy

ती श्रमपरिहाराची बियर पितांनाचे ते कलाकारः
Wir_Wollen_Frei_Bier.JPG

आणि पावसापूर्वी काढलेले बेली डान्सचे हे दोन फोटोज:

१. Belly_Dance.JPG

२. Belly_Dance1.JPG

त्यानंतर पाऊस संपला, त्या कलाकारांची बियर पिऊन झाली. पण तो डान्स काही पुन्हा सुरु झाला नाही.

१८. परतीच्या वाटेवर....
Returning_From_MiAlMrkt.JPG

मायबोलीकरांच्या अधिक सविस्तर माहिती आणि फोटोंच्या मागणीचा यथाशक्ती पुरवठा करण्याचा हा प्रयत्न. आशा आहे, मायबोलीकरांना आवडला असेलच. तुम्हा सर्वांच्या प्रतिसादांच्या प्रतिक्षेत....

धन्यवाद! Happy

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

क्या बात है! सानीजी, आपण फारच सुंदर चित्रे प्रकाशित केलीत. आपल्यात एक गुणी छायाचित्रकार आहे.

लगे रहो ! सर्वच्या सर्व चित्रे व दिलेली महिती अत्तिशय आवडली.

अजून छायाचित्रांच्या प्रतीक्षेत! प्रामाणिकपणे!

शुभेच्छा व अभिनंदन!

-'बेफिकीर'!

आपली मनापासून आभारी आहे, बेफिकीरजी!
छायाचित्रणाचे आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगचे बरेचसे श्रेय मात्र नवर्‍याला जाते. Happy

सानी.. मस्त वर्णन आणी फोटोज गं..
हां.. दुसर्‍या फोटूतली इन्की पिन्की..तूच ना??? Happy
खाऊ,कपडे,दागिने,भांडी प्रचंड आवडले.
परतीच्या वाटेवर चक्का ऊन ही ?? फक्त बेली डान्स पाहण्याकरताच आलेला दिस्तोय रसिक पाऊस Lol
धन्स सानी.. तुझ्या नवर्‍याला ही थँक्स .. पावसात मी तर कॅमेराच काढला नसता..
रच्याकने.. मला जर्मन सॉसेजेस फार आवडतात

मस्त आहेत प्रकाशचित्र !!

अवांतर : विपु बद्दलचे नियम मोडून आजच मी सानी यांची विपु वाचली आणि फिरत फिरत प्रतिसाद वाचता वाचता मला कळाले कि माबोवरचे मोस्ट प्लेझंट व्यक्तिमत्व यात आहे :).

उत्सुकता वाढल्याने विचारतोय, तो राजहंसाबरोबर काढलेला फोटो दिलाय तेच का ते ?

छान Happy

छान आहेत प्रची ....

त्यांच्या खाद्यपदार्थांवर लेखमाला टाकायला काही हरकत नाही ना Wink

सारेच अचंबित करणार आहे
तिकीटासाठी हातावर शिक्का काय, ति शस्त्र, राजेशाही पोषाख

छानच फोटो. हे सगळे जतन केल्यामूळेच त्या काळातले म्हणून जे चित्रपट निघतात, ते अस्सल वाटतात.

मस्त Happy

छान फोटो ,
त्या घुबडाच्या मालकीणीने फक्त दोनच ठिकाणी टोचुन घेतेलय अजुन एक डाव्या बाजुला टोचुन घेतलं असतं तर टोचणी कशी बॅलन्स झाली असती Proud

सर्वांचे मनापासून अनेक आभार!!! Happy

वर्षू, स्वाती, नवर्‍याला नक्की तुमचे धन्यवाद कळवते. पावसात व्हिडिओ रेकॉर्डिंग करतांना त्याचा मोबाईल खराब होईल, ही रिस्क असूनही, माझा हट्ट त्याने पुरवला, खास माबोसाठी लिहितेय म्हणून.... Happy

वर्षू, तुमने बरोब्बर ओळख्या Wink आणि सॉसेजेसबद्दल सेम पिंच! Happy आणि अगदी तू म्हणतेस, तस्संच झालं... खट्याळ, रसिक पाऊस बेली डान्स पहायलाच आला होता. डान्स संपल्या संपल्या असा गायबला, की पुन्हा त्याचा पत्ताच लागला नाही... Lol

गौतम, व्हेज ऑप्शन्स आहेत तर! भरपूर लोक इकडे व्हेजिटेरियन सुद्धा आहेत! सॅलेडचे, नूडल्सचे, बटाट्यांचे, बीन्सचे आणि अनेक भाज्यांचे (भाज्यांची तशी रेलचेल असले इकडे) विविध चवदार प्रकार इथे बनतात. Happy

रश्मी, लेखमालेची कल्पना विचाराधीन.... धन्स गं Happy

दिनेशदा, खरं आहे.... इतक्या डोळसपणे वस्तू जतन करतात हे लोक आणि वातावरण निर्मितीपण करतात, त्यातून त्यांची अभ्यासूवृत्ती पदोपदी दिसून येते. त्यामुळेच त्यांचे चित्रपट अस्सल वाटतात. Happy

मुकु, ते तसलं एकच हातपाय उरलेलं बाहुलं अमानवीय इफेक्ट साठी खास ठेवलं होतं, असा माझा अंदाज आहे! Proud

किरण्यके Biggrin गब्बर Rofl दक्षे Lol

Pages