Submitted by यक्ष on 22 September, 2024 - 01:35
आज वृत्तपत्रात बाडेन - वुटम्बर्ग , जर्मनी बद्दल पानभर जाहिरात पाहिली.
चालु घडामोदिबद्दल जेवढी (मर्यादित) माहिती आहे त्यप्रमाणे युरोपमध्ये स्थलांतरासठी दिवसेन्दिवस कठोर नियम होत आहेत व ते शक्यतो मर्यादित करत आहेत. त्यासंदर्भात ही जाहिरात एक कुतुहल जागवणारी वाटली.
कुणास ह्याबद्दल अधिक माहीती असल्यास, जाणून घ्यायला आवडेल.
काही चांगल्या संधी असल्यास माझ्या संपर्कात असलेल्या व नवीन - चांगल्या संधीच्या शोधात धडपडत असलेल्या तरुणाई पर्यंत त्या पोहोचव्या ह्यासाठी प्रयत्न करावे असे वाटते.
धन्यवाद!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कुठल्या वृत्तपत्रात काय
कुठल्या वृत्तपत्रात काय जाहिरात आहे, ते कळले तर काही संदर्भ लागेल.
This must be pertaining to
This must be pertaining to recent agreement between govt of India and Germany to provide skilled and unskilled manpower to Germany
ट्रेड केलेल्या कुशल
ट्रेड केलेल्या कुशल कामगारांची भरती करणार आहेत आणि इच्छुक उमेदवारांना जर्मन भाषा शिकवण्यासाठी पुण्या-मुंबईत केंद्र उघडणार आहेत. अशी केंद्र फक्त शहरात उघडण्यापेक्षा तालुक्याच्या ठिकाणी ऑनलाईन लर्निंग सेंटर काढली तर सोयीचे होईल.
https://www.punekarnews.in/pune-maharashtra-government-signs-mou-with-ba...
क्षमस्व. जाहिरात ही २२
क्षमस्व. जाहिरात ही २२ सप्टेंबरच्या सकाळ ह्या वृत्तपत्रात आली होती.
मूळ वेबसाइट ची लिंक इथे देतोय...
https://www.thelaend.de/en/
ड केलेल्या कुशल कामगारांची
ड केलेल्या कुशल कामगारांची भरती करणार आहेत आणि इच्छुक उमेदवारांना जर्मन भाषा शिकवण्यासाठी पुण्या-मुंबईत केंद्र उघडणार आहेत. अशी केंद्र फक्त शहरात उघडण्यापेक्षा तालुक्याच्या ठिकाणी ऑनलाईन लर्निंग सेंटर काढली तर सोयीचे होईल.>>>>>
सावंतवाडी तालुक्यात रुलिंग पार्टीच्या व शिक्षणमंत्र्याच्या कृपेने अशी मोठाली होर्डिंग्स लागली आहेत. (हा त्याचा तालुका) शिकवायला सुरवात केलीय का माहित नाही. शिकवणारे हवेत म्हणुनही वेबसाईटवर लिहिलेय. त्यावर माझ्या मुलीने दोन आठवड्यपुर्वी अर्ज केलाय. अजुन उत्तर नाही. गोथे इन्स्टिट्युटच्या सहकार्याने हे शिक्षण होणार आहे.
तालुक्यात पार्टीचे व शिक्षणमंत्र्याचे ऑफिस आहे तिथे जाऊन विचारावे असे एकदा वाटले पण राजकिय लोकांशी ओळख व्हावी असे मनातुन वाटत नाही त्यामुळे अजुन गेलो नाही.
इंटरेस्टिंग. अशा वेळेस काही
इंटरेस्टिंग. अशा वेळेस काही लोकांनी पुढाकार घेउन माहिती करून घेतली व या संधीचा फायदा घेऊन जर्मनीत जर नोकरी मिळवली, तर ते हळुहळू इतरांनाही खेचतात, किंवा त्यांच्या संपर्कातून इतर लोक जातात. पुण्यात पूर्वी टाटा मोटर्सच्या काही स्पेसिफिक शॉप्स मधून ऑस्ट्रेलियाला अनेक लोक गेले. हे रूढ अर्थाने उच्चशिक्षित नव्हते. पण टेल्को मधे त्यांना चांगला अनुभव मिळाला होता. त्यामुळे असे अनेक लोक शॉप फ्लोअर ट्रेनी- मग तेथील कामगार - आणि मग थेट ऑस्ट्रेलियात कामाला, व नंतर तेथेच सेटल - या मार्गाने गेले आहेत. हा आयटीवाला रूट नव्हता पण आयटीत नसलेल्या अनेकाना परदेशी नोकरी व सेटल होण्याची संधी मिळाली.
तसे काहीतरी इथे होऊ शकते. यात सरकार फार करते असे नाही. बहुधा काही लोकच पुढाकार घेउन माहिती काढतात, परदेशी संपर्क करतात आणि सहसा परदेशी संस्थांमधून, कंपन्यांमधून किमान उत्तरे मिळतात. आणि एकदा १०-१२ लोक जरी गेले तरी एक मार्ग खुला होतो इतरांना. माझ्या अंदाजाने गल्फ मधे जाणारे असेच जातात.
स्वाती२ - तुमची कल्पना योग्य आहे. पण किती प्रॅक्टिकल आहे माहीत नाही. कारण शिकवणार्यांची उपलब्धताही जरूरी आहे. जेथे आयटीआय सारख्या संस्था (ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. आयआयटी नव्हे) असतात, किंवा जेथे मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या असतात (उदा: पुण्याजवःळ पिंपरी-चिंचवड) तेथे असा कामगारवर्ग उपलब्ध असतो त्याच्या जवळपास जर्मन शिकवणारे असले तर फायदा होईल.
फारएन्ड ह्यांनी
फारएन्ड ह्यांनी ऑस्ट्रेलियाबद्दल लिहिलेलं एकदम परफेक्ट, त्यातले काहीजण मराठी vloggers आहेत, त्यांनी कसे कसे गेलो ते सर्व सांगितलं, बरेच जण टेलको तून गेलेत.