महाराष्ट्र

नमस्कार माझा महाराष्ट्रभूला।।

Submitted by चंद्रहास शास्त्री on 1 May, 2024 - 02:59

नमस्कार माझा महाराष्ट्रभूला।।
©️ चन्द्रहास शास्त्री

इथे थोर राजे तसे थोर संत
सुभक्ती सुशक्ती निराळीच माती।
इथे आसमंती निनादे मृदंग
नमस्कार माझा महाराष्ट्रभूला।।

इथे ज्ञान विज्ञानरूपी पताका
इथे दिव्य ओव्या नि गाथा नि दिंड्या।
इथे पेटती संक्रमाच्या मशाली
नमस्कार माझा महाराष्ट्रभूला।।

इथे देव जाते दळायास येई
इथे देव पाणी भरायास येई।
इथे देव लेकूरवाळाचि होई
नमस्कार माझा महाराष्ट्रभूला।।

शब्दखुणा: 

महाराष्ट्र माझा

Submitted by sarika choudhari on 4 December, 2023 - 04:27

संस्कृतीचा परिपाठ तो ,
संस्कारांचा सुबक पाट तो...... महाराष्ट्र माझा II1II

सह्याद्रीचा घाट तो,
गोदेचा पवित्र काठ तो .....महाराष्ट्र माझा II2II

कास पठाराचा थाट तो,
निसर्गाच्या कुशीत उभा ताठ तो....महाराष्ट्र माझा II3II

आर्थिक राजधानीची भरभराट तो
काळया मातीत राबणारा सम्राट तो.... महाराष्ट्र माझा II4II

विठू माऊलीची वारी तो,
गणेश उत्सवाचा जल्लोष तो.... महाराष्ट्र माझा II5II

झुणका भाकरी साठी खास तो,
पुरणपोळीचा ही स्वाद तो.... महाराष्ट्र माझा II6II

शब्दखुणा: 

महाराष्ट्रातील कालबाह्य झालेले व्यवसाय

Submitted by मंगलाताई on 13 March, 2023 - 07:57

महाराष्ट्रातील कालबाह्य झालेले व्यवसाय
भारतात आता अनेक व्यवसाय आहेत . समाजाच्या मागणीनुसार आणि गरजांनुसार व्यवसाय देखील बदलत आहेत . कँटरिंग , लाँन , हॉटेल अशा मोठ्या व्यवसायात अनेक लहान व्यवसाय गुंतलेले आहेत . छोट्या छोट्या व्यवसायांवर मोठे व्यवसाय सुरू असतात . हल्ली हे व्यवसाय तर फक्त फोनवरही सुरू असतात . यांची एक साखळी असते .

महाराष्ट्र : ‘सुप्रीम’ सत्ता-संघर्ष

Submitted by pkarandikar50 on 4 March, 2023 - 00:06

महाराष्ट्र : ‘सुप्रीम’ सत्ता-संघर्ष
महाराष्ट्र : ‘सुप्रीम’ सत्ता-संघर्ष
गेले काही महिने निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय यांचेसमोर कायदेशीर घमासान सरू होती. ‘वहावत’ जाणाऱ्या मराठी वृत्त-वाहिन्या एखाद्या क्रिकेट सामन्याचे धावते वर्णन करावे अशा पध्दतीने ‘ब्लो बाय ब्लो’ बातम्या देत होत्या आणि कायदे-पंडित तसेच स्वघोषित घटना-तज्ञ यांचे समालोचन ‘पेशे-खिदमत’ करण्यात आकंठ बुडाल्या होत्या. त्यांच्याकडे स्वत:चे असे अभ्यासू संपादक-पत्रकार नसल्याने, सगळीच उसनवारी. समाज-माध्यमेही मोकाट सुटलेली. त्यामुळे काही महत्वाच्या आणि ‘बेसिक’ मुद्द्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होताना दिसले.

महाराष्ट्रातील सत्ताकारणाची पुढील दिशा

Submitted by मराठीमाणूस on 25 June, 2022 - 15:21

(सर्वात आधी एक नवीन आभासी खातं मायबोलीवर तयार केलं. उगीचच सध्या सत्तेत असलेल्या विरुद्ध दोन शब्द इकडे तिकडे व्हायचे आणि एक दोन महिने तुरुंगाची हवा खायला लागायची. रिस्क नको.)

मागील काही दिवस महाराष्ट्रातील राजकारणात प्रचंड उलथापालथ झाली. प्रसार माध्यमातून दिवसभर मनोरंजनही चालू आहे. अगदी उत्कंठा शिगेला पोहोचते आणि त्या दिवशीचा एपिसोड संपतो. परत दुसऱ्या दिवशी तेच चक्र.

हा तिढा सुटणार तरी कसा? हा "बाहुबलीने कटप्पा को क्यो मारा" या प्रश्नासारखाच गहन प्रश्न तमाम मराठी बंधू भगिनींना पडला नसेल तरच नवल.

विषय: 

आमची माती आमची माणसं : शेतीतल्या संज्ञा

Submitted by गजानन on 25 October, 2021 - 15:02

इथून मागे कदाचित प्रत्येक दहा दहा वर्षांच्या टप्प्यावर उभे राहून बघितले तर शेतीतल्या अनेक कामांचे स्वरूप पूर्णपणे बदलून गेलेले आढळेल. शेतीतल्या अनेक आधुनिक स्वयंचलीत अवजारांनी आधीच्या अवजारांची जागा घेतल्याने, नवनव्या लागवडीच्या पद्धती आल्याने, त्या त्या कामांचे स्वरूप ओघातच बदलून जाते. या नवीन कार्यपद्धतींत नवीन संज्ञा जन्म घेतात आणि त्या यथावकाश रूळतात. यात काही पारंपारीक संज्ञा मागे पडतात. शेतीतल्या अशा नव्या-जुन्या संज्ञांचे संकलन करण्यासाठी हा धागा.
माहिती विचारण्यासाठी / शेअर करण्यासाठी / पडताळून पाहण्यासाठी.

नातं निसर्गाशी: अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा

Submitted by जिज्ञासा on 27 June, 2021 - 22:22

गेल्या तीन भागांमध्ये आपण हळूहळू ग्लोबल इकॉलॉजी ते लोकल इकॉलॉजी असा प्रवास करत आहोत. पहिल्या दोन भागांत आपण एकूण पृथ्वीच्या इकॉलॉजीविषयी थोडक्यात बोललो. तिसऱ्या भागात आपण भारताचे भौगोलिक स्थान आणि इकोलॉजीच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा काही गुणवैशिष्ट्यांविषयी गप्पा मारल्या. आता या भागात आपण केतकीशी आपल्या महाराष्ट्राच्या इकॉलॉजीविषयी गप्पा मारणार आहोत.

महाराष्ट्राचे राज्य फुल ताम्हण

Submitted by मंगलाताई on 19 July, 2020 - 11:03

download.jpg
देशी फुलझाडांच्या मालिकेतील सहावे फुल ताम्हण.
एक मे महाराष्ट्र दिन सर्वत्र उत्साहात साजरा करतात . विधान भवनावर रोषणाई करतात . महाराष्ट्रात सर्वत्र चैतन्यमय वातावरण आढळते अशावेळी ऐन दुपारच्या रणरणत्या उन्हात आपले स्वागत करायला रस्त्याच्या दुतर्फा ताम्हण आपली जांभळी तुरे घेऊन आपल्याला खुणावत असतो . एक मे महाराष्ट्र दिनाच्या काळात तो बहरून येतो. तो आहे आपला ताम्हण , म्हणजेच महाराष्ट्राचे राज्य फुल.

महाराष्ट्राचे किल्ले -महाल वाईट परिस्थितीत कां?

Submitted by kokatay on 8 January, 2019 - 11:53

shanivar vada.jpgभारताच्या ट्रीप वरून कालच परतले, ह्या वेळेस राजस्थान ह्या प्रदेशाची फेरी मारली, पुष्कळ वर्ष पूर्वी कॉलेज मध्ये असताना गेले होते. राजस्थान चे मोठ-मोठे किल्ले, महाल आणि वैभव बघुन तेव्हा पण हा प्रश्न डोक्यात आला होता आणि आता परत तोच प्रश्न घेऊन परतले ...

विषय: 

महाराष्ट्रदेशा

Submitted by पुरंदरे शशांक on 1 May, 2018 - 05:42

महाराष्ट्रदेशा

भाषा मराठीचा डौल
विलक्षण गहिरासा
ओवी अभंग ओठात
अंतरात भक्तिठसा

डफ पोवाड्यांनी गर्जे
इतिहास मराठ्यांचा
तलवारीसंगे साजे
दिमाख तो भगव्याचा

शब्द रांगडे कोमल
दिले माय मराठीने
भान जगण्याचे उरी
महाराष्ट्राच्या मातीने

भाषा मराठी वसते
नित्य मुखी अंतरात
नाही लाभणार माय
शोधू जाता दुनियेत

किती जन्म झाले इथे
पांग फिटेना कधीच
लेकराची ताटातूट
माय करीना मुळीच...

जय महाराष्ट्र
जय मराठी

Pages

Subscribe to RSS - महाराष्ट्र