महाराष्ट्र माझा

Submitted by sarika choudhari on 4 December, 2023 - 04:27

संस्कृतीचा परिपाठ तो ,
संस्कारांचा सुबक पाट तो...... महाराष्ट्र माझा II1II

सह्याद्रीचा घाट तो,
गोदेचा पवित्र काठ तो .....महाराष्ट्र माझा II2II

कास पठाराचा थाट तो,
निसर्गाच्या कुशीत उभा ताठ तो....महाराष्ट्र माझा II3II

आर्थिक राजधानीची भरभराट तो
काळया मातीत राबणारा सम्राट तो.... महाराष्ट्र माझा II4II

विठू माऊलीची वारी तो,
गणेश उत्सवाचा जल्लोष तो.... महाराष्ट्र माझा II5II

झुणका भाकरी साठी खास तो,
पुरणपोळीचा ही स्वाद तो.... महाराष्ट्र माझा II6II

लताचा सूर तो ,
सचिनचा षटकार तो... महाराष्ट्र माझा II7II

हिंदवी स्वराज्याचा कणा तो ,
मराठी माणसाचा बाणा तो... महाराष्ट्र माझा II8II

आसमानी संकटात खंबीर तो,
माणुसकीचा ओला झरा तो.... महाराष्ट्र माझा II9II

शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू तो,
नोकरीच्या भरतीचा कंत्राट तो,
जुन्या पेन्शनचा आवाज तो,
कुठे नेऊन ठेवला तो..... महाराष्ट्र माझा II10II

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

१ ते ९ अगदी सुरळीत चालू होता, १० मध्ये नोकरी भरती , जुनी पेन्शन वगैरे टाकून कवितेचा सूर आणि आत्मा दोन्ही भरकटवला, असे का केले तुम्ही.