पराभवाच्या निमित्ताने ! ( भाग २ )

Submitted by दुर्गविहारी on 30 November, 2024 - 13:19

आधीचा भाग इथे वाचु शकता

आता आपण बघुया विरोधी पक्षाची बाजु, अर्थात महाविकास आघाडीची.
१) बेरोजगारी आणि महागाई :-
अच्छे दिन आणि मंहगाई कमी करण्याचे गारंटी देउन सत्तेवर आलेल्या मोदी १.० आणि २.० या सरकारने याबाबतीत काय उजेड पाडला आहे हे सर्वश्रुत आहे. शेतकर्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुपट्ट आणि दरवर्षी दोन कोटी रोजगार मिळणार होते. प्रत्यक्षात नाली कि गॅस काढून पकोडे तळायचा रोजगार चांगला आहे असा सल्ला देण्यात आला. तरीही जनतेने मोदी आणि त्यांच्याच पक्षाला मत देण्याचे पुण्यकर्म केले. त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेले. त्याची यादी अशी
१) आंतराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (IFSC)
https://www.bbc.com/marathi/india-52516632
२) वेदांता फॅाक्सकॅान
https://indianexpress.com/article/political-pulse/foxconn-vedanta-projec...
३. टाटा एअरबस
https://www.thehindu.com/news/cities/mumbai/modi-asked-ratan-tata-to-shi...
४) बल्क ड्रग पार्क
https://www.deccanherald.com/india/maharashtra-loses-three-major-project...
५. नॅशनल मरीन पोलिस अकॅडेमी आणि नॅशनल सिक्युरिटी गार्ड्स (NSG)
https://www.thehindubusinessline.com/news/national/Maharashtra-Centre-sp...
६. मुंबई चा हिरे बाजार मुंबईच्या वांद्रे कुर्ला कॉम्पेक्समधील भारत डायमंड बोर्स हे जागतिक दर्जाचं मोठं डायमंड कॉम्प्लेक्स गुजरातला
https://www.bbc.com/marathi/articles/cjm4kwm823po
७. टेस्ला प्रकल्प -
https://www.indiatoday.in/india/story/revanth-reddy-exclusive-interview-...
८. सिंधुदुर्गमधील पाणबुडी प्रकल्प :
https://marathi.indiatimes.com/maharashtra/sindhudurg/india-first-submar...
९. मोदी सरकारने पेटंट, डिझाईन आणि ट्रेडमार्कचं ऑफिस दिल्लीला हलवलं आहे.
https://m.economictimes.com/news/politics-and-nation/government-weighs-s...
१०. मुंबईच्या पोर्ट ट्रस्टमध्ये होत असलेलं शिप रेकिंगचं काम गुजरातमधल्या अलंगला नेण्यात आलं आहे.
११. महाराष्ट्रात केंद्र सरकार द्वारे एक आशिया खंडातील सर्वात मोठा ऑईल रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित होता.. परंतु मोदी सरकार द्वारे आता तो रद्द करण्यात आला असून.. त्या प्रकल्पाचे तुकडे करुन तो प्रकल्प महाराष्ट्र बाहेर नेण्याची योजना आहे..
याशिवाय धारावीची झोपडपट्टी विकसित करण्यासाठी अदानीला देणे, विमानतळे अदानीला देणे, नवी मुंबईचा विमानतळ, महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प अदानीला देणे हे सर्व संताप आणणारे होते. मात्र महाविकास आघाडीपैकी शरद पवार हे अदानी समर्थक असल्यामुळे त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा असा प्रश्न मतदारांना पडला असल्यास नवल नाही. प्रचंड वाढलेली महागाई आणि त्यापायी त्रस्त झालेली जनता हा मुद्दा उचलून धरणे गरजेचे होते.
२) शेतमालाचे पडलेले दर :-
सोयाबीन, कापुस यांना हमीभावाचे आश्वासन देउन महायुती सरकार सत्तेवार आले खरे, मात्र दिलेले आश्वसन ते पुर्ण करु शकले नाही. हा प्रश्न महाविकास आघाडीने उचलून धरणे गरजेचे होते. यासाठी लोकसभा निवडणुक संपल्यावर लगेच जनतेतून जाणे गरजेचे होते. मात्र मिळालेल्या अनपेक्षित विजयाच्या धुंदीत जनतेत जाणे गरजेचे आहे आणि लोकांचे प्रश्न उचलून धरणे आवश्यक होते. मात्र महाविकास आघाडीने हे केले नाही.
३) शिवपुतळ्याचा अवमान :-
मालवण जवळ असलेल्या राजकोट येथे पंतप्रधान नंरेद्र मोदींच्या हस्ते शिवपुतळा उभा केला होता. नौदल दिनाच्या निमीत्ताने हा पुतळा उदघाटन करायचे असल्यामुळे घाईघाईने कल्याणच्या जयदीप आपटे या शिल्पकाराने तयार केलेला हा पुतळा २७ ऑगस्ट २०२४ ला कोसळला.

https://timesofindia.indiatimes.com/travel/travel-news/maharashtra-35-fo...
Shivaji collapses in Sindhudurg, sparks controversy

महाराष्ट्रात आजअखेर अनेक शिवाजी महाराज आणि अन्य महापुरुषांचे पुतळे उभारले असले तरी पुतळा पडण्याचा प्रसंग हा कदाचित पहिलाच असावा. महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या शिवाजी महाराजांचा हा अवमान हा महाविकास आघाडीकडे मोठा मुद्दा होता. त्याचे उत्तर म्हणून राहुल गांधी यांच्या हस्ते कोल्हापुरला शिवछत्रपतींचा अप्रतिम पुतळा उभा केला गेला. पुतळा पडल्याचे कारण म्हणून मुख्यमंत्र्यांनी वारा जोरदार होता असे थुकरट कारण दिले. कोकणात इतक्या वेगाचा वारा असणे हे नेहमीचेच असल्यामुळे आणि अन्य कोणत्या घराचे कौलही हलले नसताना,' शिवपुतळा पडला. त्यात शिव पुतळा पडला हे बरेच झाले' असे वादग्रस्त विधान मंत्री दीपक केसरकर यांनी केले. अजित पवार यांनी लगेच माफी मागीतली, मात्र खुप वाद निर्माण झाल्यावर पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री शिंदे यांनी माफी मागितली खरी, पण ती माफी वरवरची वटली. शिवाय मोदींनी या प्रकरणी काहीही संबंध नसताना सावरकरांचा मुद्दा आणला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर साधी माफी तर मागितली नाहीच, पण काहीही कारण नसताना 'शिवाजी महाराजांनी सुरत लुटली नव्हती' असे वादग्रस्त विधान केले. इतकी वादग्रस्त विधाने आणि स्मस्त महाराष्ट्राला लाज आणणारा हा प्रकार म्हणजे महाविकास आघाडीच्या हातात महत्वाचा मुद्दा होता.
यावर उत्तर म्हणून महाविकास आघाडीने राहुल गांधी यांच्या हस्ते कोल्हापुरला शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उदघाटन केले

https://www.bhaskar.com/national/news/rahul-gandhi-maharashtra-visit-kol...
राहुल ने कोल्हापुर में शिवाजी महाराज की प्रतिमा का अनावरण किया

४) बदलापुर बालिका अत्याचार प्रकरण :-
महायुतीच्या काळामध्ये अत्यंत लाजीरवाणे असे हे प्रकरण. बदलापुर येथे भाजपशी संबधीत संस्थेच्या शाळेत एका सफाई कर्मचारी महेश शिंदे याने दोन चिमुरड्या बालिकांवर लैंगिक अत्याचार केला. पोलिस स्टेशनमध्ये याचा साधा बारा तास लिहून घेतला नाही, कारण शाळा प्रशासन सत्ताधारी पक्षाशी संबधीत होते. प्रकरण खुप पेटले. बदलापुर स्टेशनवर रेल्वे रोको आंदोलन झाले. पोलिसांनी आंदोलकांना अटक करुन गुन्हे दाखल केले. त्यामुळे संताप उसळला. शेवटी जनक्षोभ शांत करण्यासाठी आरोपीचा एन्काउंटर करण्यात आला. कहर म्हणजे राज्याचे गृहमंत्री असणार्या फड्णवीस यांचे एखाद्या डॉनसारखे हातात पिस्तुल घेतलेले फोटोचे बॅनर लावण्यात आले, हि प्रकरण महायुती सरकारच्या कारकीर्दीवर कलंक होते.
५) मनोज जरांगे आंदोलन आणि फसवणुक
मनोज जरांगे यांनी मराठवाड्यात मराठा आंदोलन सुरु केले. वास्तविक अंतरवाली सराटी सारख्या छोट्या गावातून सुरु झालेले हे आंदोलन वेळीच आवरायला महायुतीला अपयश आलेले होते. त्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी जरांगे यांना प्रश्न सोडवायचे आश्वासन दिले. अगदी पेढे वाटले गेले. मात्र पुढे काहीच झाले नाही. सहाजिकच हि फसवणुक झाली अशी मराठा समाजात भावना झाली, त्याचा फायदा घेणे महाविकास आघाडीला नक्कीच शक्य होते, त्याचा प्रत्यक्ष किती झाला हा प्रश्नच आहे. बहुतेक जरांगे पाटील यांचा प्रभाव संपला असावा.

https://www.youtube.com/watch?v=tqSiuTbSRqE
मराठ्यांच्या लढ्याला यश, मनोज जरांगेंची विजयी सभा लाईव्ह | Eknath Shinde

https://www.bbc.com/marathi/articles/c6pv764598qo
मराठा आरक्षण: मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे एकनाथ शिंदे यांचा फायदा झाला आहे का?

https://sarkarnama.esakal.com/maharashtra/jarangs-should-cooperate-chief...
CM Eknath Shinde News : जरांगेंनी सहकार्य करावे, आम्ही मराठा समाजाची दिशाभूल करणार नाही..
६) दोन पक्ष फोडणे
लोकसभेची २०१९ च्या निवडणुकीनंतर उद्दव ठाकरेंनी भाजपसोबत जाण्यास नकार दिला. मुख्यमंत्रीपद कोणाला ? हा वादाचा मुद्दा झाला. नेमके काय घड्ले हे सांगता येत नस्ले तरी उद्दव ठाकरेंनी एका मुलाखतीत अगदी आई, वडीलांची शपथ घेउन सांगितले कि अडीच -अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाची वाटप बोलणी करताना ठरले होते. त्या निवडणुकी दरम्यान अमित शहा दोनदा मातोश्रीवर उद्दव ठाकरेंना भेट दयायला गेले होते ( बहुतेकदा अमित शहांना भेटाय्ला दिल्लीला जातात हे इथे लक्षात घेणे गरजेचे आहे. नुकतेच राज ठाकरे अमित शहांना भेटायला गेले होते हे सर्वांना स्मरणात असेलच ) यामुळे कदाचित उद्दव ठाकरेंचा दावा खरा असावा असे वाटते.
उद्दव ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस यांच्याबरोबर युती करुन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. अर्थात यामुळे पुढील विधानसभेत सत्ता मिळवायची तर आपल्या बाजुने मतदानाचा टक्का वाढवावा लागेल असे महाराष्ट्र भाजपच्या लक्षात आले. त्यातून आधी शिवसेना आणि नंतर शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष फोडण्यात आले. अगदी काँग्रेसचेही अशोक चव्हाण आणि काही इतर नेते गळाला लावण्यात आले. हे पक्ष फोडणे ज्याचा प्रचार 'घर फोडले' असा प्रचार केला. घर फुटणे हे अगदी सर्वसामान्य माणुस आपल्या आयुष्यात अनुभवत असल्यामुळे आणि त्याचे दु:ख माहिती असल्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या मनात भाजपबद्दल चीड निर्माण झाली. त्याचा राग अर्थात लोकसभेत निघाला. विधानसभेत ही मुद्दा चालवायचा प्रयत्न झाला.परंतु त्या रागाचा निचरा झाल्यामुळे कदाचित तो मुद्दा या निवडणुकीत चालला नाही.
७) हिंदु मुस्लिम वाद
महायुतीच्या चार वर्षात हिंदु- मुस्लिम वाद मोठ्या प्रमाणात पेटवण्यात आला. यात जास्त गाजले ते गजापुर प्रकरण. एतिहासिक विशाळगडावर खुप वर्षापासून अतिक्रमण होते, त्याचा न्यायालयीन निकाल ही आला.

https://www.etvbharat.com/mr/!state/vishalgad-encroachment-case-update-b...
विशाळगडावरील अतिक्रमण विरोधी कारवाईला उच्च न्यायालयाची स्थगिती,

https://www.lokmat.com/kolhapur/removal-of-encroachments-on-vishalgad-re...
https://www.lokmat.com/kolhapur/removal-of-encroachments-on-vishalgad-re...

https://www.loksatta.com/explained/kolhapur-vishalgad-case-mumbai-high-c...
का धुमसत आहे विशाळगड प्रकरण?

https://marathi.aajtak.in/india/story/maharashtra-bombay-high-court-will...
विशालगड किल्ला पाडल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार, हिंसाचार उसळला होता.

मात्र कोणतेही अतिक्रमण पावसाळ्यात काढण्यासाठी परवानगी नसताना तसा प्रयत्न केला गेला. अतिक्रमण काढणे हे स्वागतार्ह असले आणि विशाळगडावर काही चुकीच्या गोष्टी होत असतील तर शासन म्हणून कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र काहीही संबध नसताना काही युवक- युवतींनी आणि संघटनांनी विशाळगडापासून लांब असलेल्या गजापुरजवळय्चा एका वाडीला लक्ष्य केले आणि तेथील मुस्लिम गावकर्यांना त्रास दिला. विशाळगडावरील अतिक्रमणाशी संबंध नसलेल्या लोकांवर हल्ला करणे हे चुकीचे होते.

वास्तविक प्रतापगडाच्या माचीवर असलेल्या आणि मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेल्या अफझलखानाच्य्या कबरी नजीक झालेली अतिक्रमणे सरकारने काढली तेव्हा कोणताही विरोध झाला नाही, हे लक्षात घेणे गरजेचे आहे.हा मुद्दा अर्थातच महाविकास आघाडीच्या बाजुने होता.

८) खारघर पालघर प्रकरण

कोविड काळामध्ये प्रवासाला बंदी असताना किंवा परवानगीची आव्श्यकता असताना १६ एप्रिल २०२० रोजी रात्री सुशीलगिरी महाराज (३५) आणि कल्पवृक्ष गिरी महाराज (७०) आणि चालक नीलेश तेलगडे (३०) हे देशव्यापी कारमधून कांदिवलीहून सुरत येथे अंत्यसंस्कारासाठी निघाले होते. त्यावेळी गडचिंचिल गावात चोर समजून जमावाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास सुरुवातीला पालघर पोलीस करत होते. त्यानंतर हे प्रकरण सीआयडी-गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. मात्र या तपासावर शंका उपस्थित करत संबंधित साधूंच्या कुटुंबियांना या प्रकरणाची सीबीआय आणि एनआयए चौकशीची मागणी केली होती.

https://marathi.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/maharashtra-govt-...
पालघर साधू हत्याकांड प्रकरण सीबीआयकडे, तुषार भोसलेंचा मविआवर निशाणा, काँग्रेसचा पलटवार

https://lokmat.news18.com/videos/sanjay-raut-sadhu-massacre-in-palghar-o...

https://www.lokmat.com/crime/palghar-sadhu-murder-case-14-accused-grante...
पालघर साधू हत्याकांड प्रकरण, १४ आरोपींना जामीन मंजूर

https://www.loksatta.com/maharashtra/ram-kadam-comment-on-palghar-mob-ly...

https://www.aajtak.in/crime/video/palghar-mob-lynching-inside-story-poli...
पालघर में साधुओं की हत्या की INSIDE STORY

https://divyamarathi.bhaskar.com/national/news/palghar-sadhu-murder-case...
सुमारे अडीच वर्षांनंतर पालघर साधू हत्याकांडाचा तपास सीबीआयकडे, मुले पळवणारे समजून जमावाची मारहाण

वास्तविक केंद्र सरकार आणि राज्य सरकारने ठरवून दिलेल्या नियमाचे उल्लंघन करुन हे साधू सुरतला निघाले होते. तरीही त्याचे खापर मोदी-भाजप समर्थक उद्दव ठाकरेंवर फोडतात. राज्याचा प्रमुख या नात्याने या घटनेची जबाबदारी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री याची नक्कीच आहे,पण लोकांनी कायद्याचे उल्लघंन करायचे आणि जणु काही हा गुन्हा उद्दव ठाकरेंनी केला असे दर्शविले जाते.
https://www.bbc.com/marathi/india-56608190
कोरोनामुळे परवानगी नसतानाही बगाड यात्रेत हजारो लोकांची गर्दी कशी काय झाली?

असेच एक आणखी एक प्रकरण् म्हणजे सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधन गावातील बगाड यात्रेच्या वेळी घडले. जनता जर त्यांच्या हितासाठी घालून दिलेले नियम तोडणार असेल तर राज्यकर्ते दोषी कसे ?
विशेष म्हणजे देशाच्या गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या आणि आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भुषण पुरस्कार दिला गेला, त्या कार्यक्रमात उष्माघाताने ११ भाविकांचा मृत्यु झाला. मात्र याबाबतीत हे मोदी-भाजप समर्थक चिडीचुप असतात.

https://lokmat.news18.com/maharashtra/maharashtra-bhushan-award-appasahe...
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा : उष्माघाताने 11 जणांचा मृत्यू, राज्य सरकारकडून मदत जाहीर

https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/state/mumbai/bombay-high-c...
खारघर उष्माघात मृत्यू प्रकरण; मुंबई HC ने याचिका काढली निकाली

https://timesofindia-indiatimes-com.translate.goog/city/navi-mumbai/11-a...
Maharashtra Bhushan Award ceremony turns deadly; 11 die, over 600 suffer heatstroke in Kharghar

महत्वाचे म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या वेळी घाटकोपर येथे मोठे होर्डींग पडून त्यात काही लोकांचा मृत्यु झाला. देशाच्या पंतप्रधानांची नंतर रॅली दुसर्या दिवशी तिथून अगदी जवळून गेली तरी पंतप्रधानांनी साधी खंत व्यक्त केली नाही कि एखादे ट्वीट करायचे कष्ट घेतले नाही, एरवी हिंदुहिताच्या नावाने गळे काढणारे हे नेते किंवा पक्ष या मुद्द्यावर मिठाची गुळणी घेउन बसतो. मृत्युमुखी पडलेले हिंदु नव्हते का ?

याशिवाय सत्ताधारी महायुतीच्या विरोधात जाणारे अनेक मुद्दे होते .उदा.
९ ) पेपर फुटणे

https://www.lokmat.com/latur/crime-against-four-in-latur-in-neet-exam-pa...
नीट पेपरफुटी प्रकरणात लातुरात चौघांविराेधात गुन्हा

https://www.loksatta.com/nagpur/paper-leak-examination-malpractices-act-...
पेपरफुटी, परीक्षेतील गैरप्रकारांवर कायदा! निंबाळकर समितीकडून अहवाल सादर

https://www.tv9marathi.com/maharashtra/5-years-imprisonment-and-fine-of-...
5 वर्षे तुरुंगवास, 10 लाखांचा दंड… शिंदे सरकारच्या पेपरफुटी विधेयकात आणखी काय?

https://pudhari.news/national/undisputed-that-neat-paper-leak-happened-s...
'नीट' पेपरफुटी झाली हे निर्विवाद : सर्वोच्च न्यायालय

हा सरळ सरळ विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ होता. हा ही मुद्दा महायुतीच्या विरोधात जाणारा होता.

१०) नगर रोड कार अपघात प्रकरण
पुणे - अहिल्यानगर महामार्गावर झालेल्या अलिशान पोर्शे कारच्या अपघातात एक तरुण-तरुणीला आपला जीव गमवावा लागला.

https://www.lokmat.com/topics/pune-porsche-accident/
या लिंकवर सर्व संबधीत बातम्या एकत्र आहेत

इथे सताधारी आमदार आरोपीला मदत करताना सापडला. न्यायालयाने अतिशय ढीसाळ निकाल दिला. या प्रकरणी संतापाचा उद्रेक झाल्यावर संबंधीतावर कारवाई करण्यात आली.
त्यानंतर लगेचच भाजप प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांचा सुपुत्र संकेत बावनकुळे यांच्या ऑडी कारने अपघात घडवला,

https://www.esakal.com/vidarbha/nagpur/nagpur-hit-and-run-case-update-ch...
Nagpur Hit and run Case: अपघात झालेल्या ऑडीत संकेत बावनकुळे होता? पोलिसांनी केली चौकशी, दोन्ही मित्रांना जामीन

https://www.bbc.com/marathi/articles/c2dg93kn073o
नागपूर ऑडी अपघात : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?

यात जिवीतहानी झाली नसली तरी वित्तहानी झाली.
११) नेत्यांची वादग्रस्त वक्तव्ये :-
पुणे इथं भाजपाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला.या मेळाव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यातील मराठा आरक्षणावरून शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी यांच्यावर टीका केली. तर, राज्याचे उपुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपावर टीका करणाऱ्यांना 'ठोकून काढा' असं म्हणत महाविकास आघाडीवर टीका करण्याची सर्व कार्यकर्त्यांना खुली सूट दिली.

https://www.youtube.com/watch?v=Fkg1iVN_Lig
मैदानात उतरुन ठोकून काढा - देवेंद्र फडणवीस

https://www.etvbharat.com/mr/!state/sanjay-raut-demands-arrest-dcm-deven...
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तातडीनं अटक करा; 'ठोकून काढा' वक्तव्यावर संजय राऊतांचा हल्लाबोल

ज्याने या राज्यात आणि देशात कायदा आणि सुव्यवस्था पाळायची तेच गृहमंत्री ठोकून काढायची भाषा करताना दिसले हे आपले दुर्दैव .
तसेच देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी याच सभेत उद्धव ठाकरे यांना औरंगजेब फॅन क्लबचे नेते अशी उपमा दिली. ज्यांनी कसाबला बिर्याणी दिली, त्याच लोकांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसले आहेत, अशी टीका अमित शाह यांनी केली.
वास्तविक उद्दव ठाकरे ज्या औरंगजेबाचा उल्लेख करत होते , तो शिवाजी महाराजांचा शत्रु मोघल बादशहा औरंगजेब नसून काश्मीरमध्ये या देशासाठी बलीदान दिलेला सैनिक होता.

https://www.aajtak.in/india/jammu-kashmir/story/martyr-aurangzeb-brother...
आतंकियों के हमले में शहीद हुए थे औरंगजेब, अब दो भाई हुए सेना में शामिल https://www.aajtak.in/india/jammu-kashmir/story/martyr-aurangzeb-brother...

https://www.youtube.com/watch?v=9qowNDmkNeU
Video Of Army Jawan Aurangzeb's Last Minutes Surfaces Can Be Seen Being Questioned By Terrorist

मात्र सोयीस्कर नाव पुढे करुन रेटून खोटे बोलायचे हा या लोकांचा नेहमीचा उद्योग.अर्धवट कापलेल्या व्हिडीओवर सुशिक्षीत लोकही विश्वास ठेवून फॉरवर्ड करताना दिसतात. खर तर पाकिस्तानात जाऊन जिनांच्या कबरीवर फुलं उधळणारे कोण होते ? किंवा पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाच्या केक कापण्यात आणि खाणारे कोण आहेत ? हे या भाजप समर्थकांनी आधी समजून घेतले पाहिजे. या देशातल्या देशभक्त आणि स्वाभिमानी मुस्लिमांची बाजू मांडणं यात काही गैर नाही. देशाच्या संघर्षाच्या काळात अनेक मुस्लिमांनी देखील बलिदान दिलं आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अहिल्यानगरच्या (अहमदनगर) सावेडी येथे पदाधिकारी आणि बूथ कार्यकर्त्यांच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांना आगामी निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसंदर्भात मार्गदर्शन करताना. “पत्रकारांनी २०२४ पर्यंत आपल्याविरोधात (भाजपा) बातम्या छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला न्या. पत्रकारांना चहा प्यायला न्यायचं म्हणजे काय ते तुम्हाला समजलंच असेल. तसेच पत्रकारांना ढाब्यावर जेवायला घेऊन जा. तुम्ही ज्या बूथवर काम करताय. त्या बूथवर इलेक्ट्रॉनिक मीडियावाला कोण आहे? त्याची माहिती घ्या. आपण इतकं चांगलं काम करतो, ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आपल्या बूथवर जे चार-पाच कलाकार पत्रकार आहेत, त्यांची यादी बनवा. या पत्रकारांना महिन्यातून एकदा चहा प्यायला बोलवा. त्यांनी २०२४ पर्यंत आपल्याविरोधात लिहू नये यासाठी त्यांना चहा प्यायला बोलवा. चहा प्यायला बोलावणे म्हणजे काय ते तुम्हाला माहिती आहे. त्यांना ढाब्यावर वगैरे घेऊन जायचं. त्यांना व्यवस्थित सांभाळून ठेवायचं. आपल्याविरोधात एकही बातमी आली नाही पाहिजे,

https://www.loksatta.com/maharashtra/take-journalists-to-drink-tea-supri...
“पत्रकारांना चहा प्यायला न्या”, बावनकुळेंच्या विधानावर सुप्रिया सुळेंची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाल्या, “भाजपाने एकतर…”

https://zeenews.india.com/marathi/maharashtra/take-the-journalists-to-dr...
'पत्रकारांना चहा प्यायला न्यायला पहिजे म्हणजे...'; त्या' वादग्रस्त विधानावर बावनकुळेंचं स्पष्टीकरण!

अर्थात यावर काहीही कारवाई अपेक्षेप्रमाणे झाली नाही.

वास्तविक काँग्रेसी नेते गांधी घराण्याची हुजरेगिरी करतात, अशी टीका भाजप नेते कायम करत असतात, मात्र राज्यातील क्रमांक दोनच्या नेत्याने एक वक्तव्य करुन जणू काँग्रेसच्या लोकांना फिके पाडले.

https://www.loksatta.com/pune/i-can-not-tolerate-abuse-against-pm-modi-a...
“आई-वडिलांना शिव्या द्या चालेल पण मोदी, शाहांना शिव्या देणं सहन करु शकत नाही”; जाहीर भाषणात चंद्रकांत पाटलांचं विधान

https://www.youtube.com/watch?v=NwElxE27rYw
आई वडिलांना शिव्या द्या मोदी-शाहांना नको म्हणणं हा आई वडिलांचा अपमान

याच चंद्रकांत पाटीलांवर पुण्यात शाईफेकीचा प्रकार घडला.

https://www.tv9marathi.com/maharashtra/pune/samta-parishad-workers-throw...
चंद्रकांत पाटील यांच्यावर पुण्यात शाईफेक, प्रचंड गदारोळ, नेमकं काय घडलं?

https://www.youtube.com/watch?v=YvFkP7Q4xdI
चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेक संपूर्ण प्रकरण, नेत्यांची प्रतिक्रिया

शरद पवार यांच्यावर असभ्य भाषेतील कविता पोस्ट केल्यावर केतकी चितळे हीच्यावर कारवाई झाल्यावर तीची बाजु घेणारे या प्रकरणी चिडीचुप होते. यावरुन आपला तो बाब्या असा मोदी समर्थकांचा खाक्या दिसतो.

१२) शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्ये :-
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी भाजप नेत्यांनी सातत्याने अनादर दाखविला आहे. एका पाठोपाठ एक अवमानकारक वक्तव्य करुन नेत्यांनी आपली घसरती पातळी दाखवून दिली. जे लोक स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतात त्यांच्याकडून अशी वक्तव्य अपेक्षित नव्हती.

https://www.tv9marathi.com/politics/prasad-lad-on-chhatrapati-shivaji-ma...
“शिवरायांचा जन्म कोकणात झाला”, भाजप नेते प्रसाद लाड यांचं वक्तव्य

https://www.lokmat.com/maharashtra/bjp-union-minister-raosaheb-danve-vid...
भाजप नेते रावसाहेब दानवेंकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख! नव्या वादाची शक...

https://www.tv9marathi.com/politics/sudhanshu-trivedi-on-chhatrapati-shi...
औरंगजेबला पत्र लिहून शिवरायांनी 5 वेळा माफी मागितली”, भाजप प्रवक्त्याचं वादग्रस्त वक्तव्य

https://www.loksatta.com/maharashtra/its-an-honour-for-shivaji-maharaj-t...
“मोदींशी तुलना होणे हा शिवाजी महाराजांचा सन्मानच”; भाजपा नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

https://www.marathiebatmya.com/political/mohan-bhagwat-made-controversy-...
मोहन भागवत यांचे वादग्रस्त विधान, शिवरायांची समाधी टिळकांनी शोधली वक्तव्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता

https://bolbhidu.com/bjp-leaders-controversial-stetment-on-shivaji-maharaj/
छत्रपती शिवरायांचा अपमान करण्यात फक्त कोश्यारीच पुढे नाहीत तर BJP नेत्यांची यादीच आहे

https://www.dainikprabhat.com/mangal-prabhat-lodha-explanation-after-his...
शिवरायांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर लोढा यांनी स्वतःच दिले स्पष्टीकरण, म्हणाले...

https://www.mumbailive.com/mr/politics/no-end-to-controversy-over-chhatr...
ही’ १२ वादग्रस्त वक्तव्ये, ज्यामुळे शिवरायांनाही झालं असेल दु:ख

https://pudhari.news/latest/governor-bhagat-singh-koshyaris-controversia...
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे पुन्हा शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान

याच्या विरुध्दात अर्थातच सर्व विरोधी पक्षांनी आंदोलन केली.

https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/state/mumbai/reaction-of-c...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनामी प्रकरणी काँग्रेस, राष्ट्रवादी अक्रमक, वाचा कोण काय म्हणाले..

https://www.esakal.com/pune/pune-close-13th-december-chhatrapati-shivaji...
पुणे बंदची १३ डिसेंबरला हाक; विरोधी पक्ष, संघटनांकडून निर्णय

अर्थात काही विरोधी पक्षाच्या नेत्यांनी देखील शिवाजी महाराजांविषयी अवमानकारल वक्तव्य केली. याचा देखील निषेध करायला हवा.

https://www.navarashtra.com/maharashtra/a-controversial-statement-was-ma...
भाजपाच्या ‘या’ नेत्याचं धक्कादायक वक्तव्यं; आमदार जितेंद्र आव्हाडांची जीभ कापणाऱ्यास 10 लाख बक्षिसाची घोषणा, पुढे आमदार म्हणाले…

https://marathi.hindustantimes.com/maharashtra/chhatrapati-shivaji-mahar...
छत्रपती शिवाजी महाराज कुणबी समाजाचे होते; नाना पटोलेचं वादग्रस्त वक्तव्य

https://www.bbc.com/marathi/articles/c20mg54mx7no
सुप्रीम कोर्टात आश्वासन देऊनही महाराष्ट्रात विखारी भाषणांना मोकळं रान मिळतंय का?

मात्र हा मुद्दा नक्कीच महाविकास आघाडीला सत्ताधारी पक्षाविरुध्द प्रखरपणे वापरता आला असता.
१३) गृहमंत्रालयाचे अपयश :-

https://www-aninews-in.translate.goog/news/national/general-news/maharas...
उल्हासनगर पोलिस स्टेशनवर भाजप आमदार-यूबीटी सेनेच्या नेत्यामध्ये गोळीबार झाला

उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस ठाण्यात शिवसेनेच्या कल्याण विभागाचे प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार करणारे भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांना शनिवारी अटक करण्यात आली. भाजप आणि मुख्यमंत्री यांच्यातील हिंसक भांडणासाठी विरोधी एमव्हीएच्या हल्ल्याखाली एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सेना.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच गृहमंत्री, म्हणाले की त्यांनी डीजीपीला चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. "कल्याणची घटना गंभीर आहे. कायद्यापुढे सर्व समान आहेत," असे फडणवीस म्हणाले.सेनेचे महेश गायकवाड यांची प्रकृती गंभीर असून सेनेचे कार्यवाह राहुल पाटील यांच्यावरही गोळी झाडली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव आणि अन्य चार भाजप कार्यकर्त्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपच्या दोन कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे, तर अन्य तिघांचा शोध सुरू आहे. सहाही आरोपींवर खुनाचा प्रयत्न, गुन्हेगारी कट रचणे, दंगल करणे आणि शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस ठाण्यात शिवसेना नेत्यावर गोळीबार केल्याप्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड यांना अटक

https://ndtv.in/videos/facebook-live-shooting-shiv-sena-leader-abhishek-...
फेसबुकवर खून LIVE... या कारणामुळे घोसाळकरांवर अभिषेकचा राग होता...

https://www.bbc.com/marathi/articles/cw9ep74xz2qo
अभिषेक घोसाळकर आणि मॉरिसभाई यांच्यात काय वाद होता?

उल्हासनगर प्रकरण झाल्यावर लगेच तसाच प्रकार घडला. दहिसर परिसरात माझी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर माॅरिस नावाच्या इसमाने गोळ्या झाडल्या.
भाजप आमदार निलेश राणे यांनीही मशिदीसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केली.

https://www.youtube.com/watch?v=7VCOB15vfV8
जब मैं मस्जिद जाऊंगा...

https://www-newindianexpress-com.translate.goog/nation/2024/Sep/02/mahar...
महाराष्ट्राचे भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर 'मशिदीमध्ये हल्ला' करण्याची धमकी, द्वेषपूर्ण भाषणासाठी गुन्हा दाखल

वर यासाठी सागर बंगल्यातील बॉस आपल्या पाठीमागे आहे, त्यामुळे काळजी नाही असेही सांगितले. हे कमी म्हणून कि काय, राजकोट येथील शिवपुतळ्याचा अवमान झाल्यावर तिथे अदित्य ठाकरे भेट द्यायला गेल्यावर नितेश राणे यांनी पोलिसांशी हुज्जत घातली.

https://marathi.abplive.com/news/politics/bjp-leader-nitesh-rane-controv...
Nitesh Rane: पोलिसांनो, मस्ती कराल तर... नितेश राणे म्हणाले, त्या वक्तव्यावर मी ठामच, पण सगळे पोलीस अधिकारी तसे नसतात

https://www.youtube.com/watch?v=NgtYEsEtWBs
निलेश राणेंची अरेरावी,थेट पोलिसावर धावून गेले |Rajkot Thackeray Vs Rane

राज्याचे आमदार अशी बेताल वक्तव्य आणि चुकीची वागणूक दाखवत असताना त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. एकंदरीत या सर्व बाबी गृहमंत्रालयाचे अपयश अधोरेखीत करणार्या होत्या. फडणवीस या सगळ्यांवर वचक ठेवायला अपयशी ठरले.
१४) नेत्यांना संरक्षण :-
संजय राठोड, किरीट सोमय्या यासारख्या लैंगिक गुन्ह्यात अडकलेल्या नेत्यांवर कोणतीही कारवाई झाली नाही.

https://www.tv9marathi.com/maharashtra/shivsena-sanjay-raut-crtitizes-sa...
“सर्वोच्च न्यायालयाने पूजा चव्हाण प्रकरणाची दखल का घेतली नाही?” संजय राऊतांचा घणाघात, म्हणाले “संजय राठोड फडणवीसांच्या…”

https://www.youtube.com/watch?v=aP4zrLZeMkY
संजय राठोड विरोधात काय कारवाई केली चित्रा वाघ भडकल्या Chitra Wagh on Sanjay rathod

https://www.loksatta.com/maharashtra/bjp-leader-kirit-somaiya-viral-vide...
Kirit Somaiya : आक्षेपार्ह व्हिडीओप्रकरणी मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू; ‘या’ तज्ज्ञांची घेणार मदत

या उलट सत्ताधारी पक्षाच्या वळचणीला जाउन बसलेल्या चित्रा वाघ, रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
१५) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न होणे :-
राज्यातील बहुतेक स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे महापालिका, नगरपालीका, नगर पंचायत येथील नगरसेवकांची मुदत संपल्यावर निवडणुका होणे अपेक्षित होते. मात्र लोकांमध्ये सत्ताधार्याविरोधात नाराजी आहे, त्यामुळे या सर्व संस्था आपल्या हातातून जातील या भितीने महायुतीने इथल्या निवडणुका होउ दिल्या नाहीत. स्थानिक् पातळीवरचे प्रश्न सोडवायला नगरसेवकच उपयोगी पडतो, त्यामुळे छोटे प्रश्न सुटत नसल्यामुळे लोकांमध्ये रोष होता. त्याला तोंड फोडणे महाविकास आघाडीला आवश्यक होते.
१६) पत्रकारांवर हल्ला प्रकरण :-
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे माध्यम अर्थात पत्रकारीता. मात्र महायुती सरकारला विरोध सहन होत नसल्यामुळे त्यांनी विरोधात लिखाण करणार्या पत्रकारांविरुध्द कारवाई सुरु केली,

लोकसभा निवडणुकीच्या वेळी निर्भय बनो आंदोलनाच्या माध्यमातून लोक जागृतीचे काम हाती घेतलेल्या विश्वंभर चौधरी, असीम सरोदे आणि निखील वागळे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रकार घडला. वास्तविक सुरवातीला निर्भय बनोच्या सभांना अल्प उपस्थिती असायची, मात्र नंतर सभा गाजू लागल्या. नागपुरला अगदी वसंतराव देशपांडे सभागृहात सभा घेतली गेली.
https://www.youtube.com/watch?v=Tv9k6y0037g
ज्येष्ठ विचारवंत Dr. Vishwambhar Chaudhari यांचं सिन्नर सभेतील धडाकेबाज भाषण...| Ma

https://marathi.indiatimes.com/maharashtra/nashik/vishwambhar-choudhari-...
भाजप, संघासह बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून सिन्नरमध्ये व्याख्यानावेळी मोडतोड अन् धक्काबुक्की: विश्वंभर चौधरी

वाढती लोकभावना पाहून विश्वंभर चौधरी यांच्या सिन्नर येथील वाचनालयाच्या कार्यक्रमात गोंधळ घालण्यात आला.

https://sabrangindia-in.translate.goog/nikhil-wagle-other-attacked-in-pu...
पुण्यात निखिल वागळे व इतरांवर हल्ला, पोलिसांची नजर, निर्भय बानोच्या सभांना मोठी गर्दी

त्यानंतर पुण्यात निखील वागळे आणि विश्वंभर चौधरींच्या गाडीवर हल्ला करण्यात आला.
जर महायुतीला आपल्या विकासकामाचा आणि कर्तूत्वाची इतकी खात्री होती तर दखलपात्र नसलेल्य निर्भय बनोची इतकी भिती का होती ?
१७ ) पुणे ड्रग प्रकरण :-
महाराष्ट्राची संस्कृतिक राजधानी, विद्येचे माहेरघर आणि महत्वाचे शहर असलेल्या पुण्यात मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ सापडले.

https://www.esakal.com/pune/pune-mephedrone-worth-40-lakhs-was-found-at-...
ड्रग्सचा विळखा काही सुटेना.. पुण्यातील 'या' ठिकाणी सापडला तब्बल ४० लाखाचा मेफेड्रोन!

https://sarkarnama.esakal.com/pune/drugs-worth-rs-1-crore-found-again-in...
पुण्यात चाललंय तरी काय? एक कोटीचे ड्रग्स पुन्हा सापडले

गृहमंत्रालयाचे हे आणखी एक अपयश
१८ ) कोविड मध्ये केलेली उत्तम कामगिरी
डिसेंबर २०१९ मध्ये चीनमधून जगभर पसरलेल्या साथीने महाराष्ट्रामध्ये व्यापला. मुंबईत धारावीसारख्या लोकसंख्येची प्रंचंड घनता असणार्या भागात काय होणार असा प्रश्न निर्माण झाला. मात्र उद्द्व ठाकरे यांनी मुख्यमंत्री या नात्याने आणि राजेश टोपे यांनी आरोग्यमंत्री या नात्याने खुप मेहनत घेउन या साथीला आवाक्यात आणले. याचे कौतुक जागतिक स्तरावर तर झालेच पण अगदी पंतप्रधान मोदींनी देखील त्याचे कौतुक केले.

https://www.bhaskar.com/local/maharashtra/news/narendra-modi-phone-call-...
मोदी ने की उद्धव की तारीफ:कोरोना संकट पर पीएम मोदी की मुख्यमंत्रियों से बातचीत, कहा- दूसरी लहर से सही ढंग से लड़ रहा है महाराष्ट्र

त्याच दरम्यान उद्दव ठाकरे यांचे ऑपरेशन झाल्यामुळे त्यांना घरी बसून काम करावे लागले. त्यामुळे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संपर्क करावा लागला. अर्थात त्यावर प्रंचंड टीकाही झाली. मात्र वास्तव समजून घेतले गेले नाही. अर्थात कोविड काळात महाविकास आघाडी सरकारकडून काही चुका निश्चित झाल्या. पण त्यामुळे या लेखाची लांबी वाढेल. त्यामुळे त्या इथे मांडत नाही.
याशिवाय अजून बरेच मुद्दे होते. विरोधकांकडे इतके मुद्दे असून आणि सत्ताधारी महायुती सरकारला त्यांनी धारेवर धरणे अपेक्षित असताना, आणि या सर्व मुद्द्यावर जनतेमध्ये असंतोष असताना देखील महाविकास आघाडीचा का पराभव झाला ? याची कारणे पुढील लेखात जाणून घेउया.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

दुर्गाविहारी - अभ्यासपूर्ण लेख आहे, सर्व लिंक वाचून काढतो. बहुतेक सर्वच मुद्द्यांचा आढावा घेतलेला आहे.

समाजाची स्मरणशक्ती क्षीण असते, भक्त दुर्लक्ष करतात आणि बांधावर बसलेले लाडकी बहीण आणि तत्सम गोष्टीच्या मागे जातात. आता बघा पुढचे ५ वर्ष कसा कारभार होईल कारण आता महाराष्ट्र वेगवान होणार आहे.

पेपरला जास्तीत जास्त मार्क मिळून पास व्हायचे असेल तर सर्व प्रश्नांची बरोबर उत्तरे लिहिली पाहिजेत.
सर्व प्रश्नांची बरोबर उत्तरे लिहिण्यासाठी वर्षभर खूप अभ्यास केला पाहिजे.
किंवा आदल्या दिवशी पेपर आणि त्याची रेडीमेड उत्तरे मिळाली पाहिजेत

किंवा तुमच्या ऐवजी दुसऱ्या हुशार मुलाला पेपर रायटर म्हणून बसवले पाहिजे.
यातील पहिला मार्ग वैध .
बाकीचे दोन अवैध समजले जातात.
अत्यंत स्कॉलर मुलाने वर्षभर अभ्यास करून शिवाय आदल्या दिवशी पेपर मिळवून त्याची उत्तर पत्रिका पाठ करून सुंदर उत्तर लिहिले तर तो पहिला येउ शकतो.
बाकीचे नुसते स्कॉलर म्हणतात की त्याने कॉपी केली.
बाकीचे सर्वसामान्य विद्यार्थी म्हणतात की तो पहिल्यापासूनच स्कॉलर आहे.
हेच तत्व निवडणुकीच्या बाबतीतही लागू होते

भारतात सत्ता मिळवायची असेल तर
निवडणुका जिंकता यायला हव्यात.
निवडणुका जिंकायच्या असतील तर लोकांकडून मते मिळायला/मिळवायला हवीत.
लोकांकडून मते मिळवायची असल्यास त्यांना काय दिले म्हणजे मते मिळतील याचा अभ्यास करायला हवा.
भारतात निवडणुका पैशावर लढवल्या जातात.
फक्त तो कुठून आणायचा आणि कसा किती व कुठे खर्च करयाचा याचे उत्तम प्लॅनिंग ज्याच्या कडे आहे तो पक्ष निवडणूक जिंकतो.
माझ्या मते दुर्ग विहारी यांचे सर्व मुद्दे हे मविया निवडणूक हरायची causes नसून reasons आहेत.

खरतर महायुतीचा पराभव अपेक्षित होता आणि हे सरकारलाही कळुन चुकले होते म्हणून सावधगिरी बाळगत महाराष्ट्रावर कर्जाचा डोंगर नाही तर हिमालय कोसळणार आहे हे माहीत असतांनाही सरकारने महिलानुनय करत लाडकी बहीण ही योजना निवडणुकीआधी जाहीर केली व महिलांच्या खात्यात भरघोस रक्कम [खरतर लाचच] जमा केली लोकसभेत निर् पराभवानंतर खोट्या निरेटिव्हच्या नावान बोंबलणाऱ्या सरकारन निवडणूक लागण्याआधीच या योजनेची जाहिरात करत युतीच्या प्रचाराला सुरवात केली तर प्रत्यक्ष निवडणूक प्रचारात सरकारने विरोधकांविरुद्ध खोटे निरेटिव्ह महिलांमधे पसरवले कि विरोधक सत्तेत आल्यास ही योजना बंद करणार यात संघाचे श्रेय महत्वाचे आणि महिला मतदार आघाडीपासून दुर गेला दुसरे म्हणजे सत्ताधारी पक्षाने अनेक ठिकाणी पैशाचा ममोठा वापर केला त्यामुळेच निवडणुकीआधीच विरोधीपक्ष हरला होता.