(सर्वात आधी एक नवीन आभासी खातं मायबोलीवर तयार केलं. उगीचच सध्या सत्तेत असलेल्या विरुद्ध दोन शब्द इकडे तिकडे व्हायचे आणि एक दोन महिने तुरुंगाची हवा खायला लागायची. रिस्क नको.)
मागील काही दिवस महाराष्ट्रातील राजकारणात प्रचंड उलथापालथ झाली. प्रसार माध्यमातून दिवसभर मनोरंजनही चालू आहे. अगदी उत्कंठा शिगेला पोहोचते आणि त्या दिवशीचा एपिसोड संपतो. परत दुसऱ्या दिवशी तेच चक्र.
हा तिढा सुटणार तरी कसा? हा "बाहुबलीने कटप्पा को क्यो मारा" या प्रश्नासारखाच गहन प्रश्न तमाम मराठी बंधू भगिनींना पडला नसेल तरच नवल.
१)
# शिवसेना शिंदे गट: (शिवसेना ठाकरे गटाला उद्देशून) तुम्ही मविआ तून बाहेर पडा. आम्ही भाजप सोबत जायची मागणी मागे घेतो. पण मवीआ सोबत परत कधीही न जायचं वचन द्या.
# शिवसेना ठाकरे गट: ठीक आहे, मवीआ तून आपण कायमचं बाहेर पडू. तुम्ही सर्व परत या. आपण एकत्र राहून स्वबळावर निवडणूक लढू. काय निकाल लागतो ते पाहून पुढील दिशा ठरवू.
२) राष्ट्रवादी: शिवसेना फोडायला जरी जमलं नाही तरी भाजपा सोबत त्यांना जाऊ दिलं नाही, वर अडीच वर्षे राज्य केलं. आहेत की नाही आमचे काका पुतणे हुशार.
३) काँग्रेस: बुडता बुडता वाचलो, तेवढाच काडीचा आधार. अडीच वर्षे सुखात गेली. आणि आमच्या मॅडम खुश, नापासांच्या वर्गात आम्ही काठावर का असेना पास झालो. बास, आता जास्त ताण नको डोक्याला.
४) भाजप: कसं पाडलं सरकार? आणि मवीआ चा प्रयोग आता परत होणार नाही याचीही तजवीज करून ठेवली. आमचा मोटा भाई होशियार छे. आणि देवेंद्र भाई लई मेहनत घेते.
ठाकरे कंपनीला विरोध करून
ठाकरे कंपनीला विरोध करून मतदार फोडू शकतो हे दाखवणारा गट आला आहे.
ह्ये समद मुंबई मनपासाठी चाललय
ह्ये समद मुंबई मनपासाठी चाललय बाबा हो कस हाय ना आते देशामंधी काय इकता इल आस दिसना तवा मंग गरीब बिचाऱ्या इडीअदानी अंबानीच प्वाट कस भरल याचीभी चिंता समद्या भाजपलेच पडली व्हती म्हंजी वरूनच तसा आदेश व्हता म्हनाना नी मंग फडनविसासारखा पक्षनिष्ठ मानूस कामाले लागल नायत काय करल काही आमदारांले ईडीच्या जाचातुन सोडवायच त काहींले मंत्रीपदाच तर काहीले खोके[कसले त्ये किय मालूम नाय पर म्या बातम्यांमधी एकल व्हत ब्वा आस करुनशिवसेनेच आमदार फोडले मंग आता मुंबई मनपा भाजपच्या ताब्यात ईलच की तस भी भाजपले दुसऱ्याची पोर दत्तक घ्यायची सवयच हाय ना ।
जुने सगळे प्रतिसाद उडाले का
जुने सगळे प्रतिसाद उडाले का
व्हय झाल आसल तसभी जुने
व्हय झाल आसल तसभी जुने प्रतिसाद उडवण्यात मायबोलीभी प्रगतीपथावर हाय ।
आता जो तमाशा देशात चालला आहे
आता जो तमाशा देशात चालला आहे.आणि त्याला लोकशाही चे सोनेरी वेष्टन आहे.
ह्या असल्या लोकशाही पेक्षा राजेशाही अती उत्तम.
कमीत कमी राजाचं खानदान तरी राज्यकारभार मध्ये कुशल असते.आणि त्यांच्यावर कोणाचा दबाव पण नसतो.