कोल्हापुर परगणा
विकेंडची एक्सप्रेस हायवेवरची गर्दी, पुढे सातारा कराड पेठ नाका सांगली वाडी कुरूंदवाड टाकळी मार्गे सायंकाळी खिद्रापुरात पोहचलो तेव्हा सुनिल आमची वाट पाहतच उभा होता. सुनिल आणि त्याच्या घरातल्या मंडळींनी जे काही आमचे आदारतिथ्य केले त्या बद्दल काय सांगू. असे म्हणतात मैत्रीत किंवा आपल्या माणसांमध्ये धन्यवाद आभारी वगैरे असल्या शब्दांना किंमत नसते. त्यामुळे असे काही शब्द वापरून मी त्यांच्या प्रेमाचे मोल कमी करणार नाही.
खिद्रापुरचे उत्कृष्ट शिल्पकलेचे प्राचीन शिवालय !
राजगडाच्या केवळ दर्शनाने पाणवणाऱ्या डोळ्यांच्या कडा.. त्याच्यावरील असंख्य आठवणी ..पैकी कोणती आठवण छान आणि कोणती सर्वात छान अशी नेहमीचीच तुलना. संजीवनीवरचा स्वर्गीय सूर्यास्त ! त्या क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी केलेल्या राजगडाच्या असंख्य वाऱ्या.
तोरण्याच्या बुधल्या शेजारी अस्ताला जाणारा सूर्य. त्या प्रचंडगडाच्या सावलीची ठळक झालेली सीमा... आणि मनामध्ये सुरू झालेला "तव तेजांतील एक किरण दे ।" असा जप ...
भारताच्या ट्रीप वरून कालच परतले, ह्या वेळेस राजस्थान ह्या प्रदेशाची फेरी मारली, पुष्कळ वर्ष पूर्वी कॉलेज मध्ये असताना गेले होते. राजस्थान चे मोठ-मोठे किल्ले, महाल आणि वैभव बघुन तेव्हा पण हा प्रश्न डोक्यात आला होता आणि आता परत तोच प्रश्न घेऊन परतले ...
भारताला अत्यंत संपन्न ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. या ठेव्याच्या खाणाखुणाही भारतभर अनेक रुपांत विखुरल्या आहेत. त्यातीलच एक रत्नं म्हणजे ऐतिहासिक वास्तू. गड, किल्ले, राजवाडे, वाडे , गढ्या अशा विविध स्वरुपात हा वैभवशाली गतकाळ आपल्या आठवणी जपून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. पण सरकारी अनास्था आणि जनतेची उदासिनता यामुळे हे अवशेष ढासळत जातात.
निमित्त झाले ते रणबीर कपूरच्या एका जाहिरातीचे. जुन्या काळातल्या रहदारीविरहित मुंबईतून गाडी चालवत गाणे गुणगुणत जाणारा नायक आणि तोही कृष्णधवल रंगांत. भूतकाळात डोकावणे हा तसाही माझा आणि माझ्यासारख्या इतर अनेक स्वप्नाळू माणसांचा आवडता छंद आणि त्यात आपण न पाहिलेल्या काळात डोकावणे म्हणजे कायमच कुतूहल वाढवणारे...
बरयाच दिवसापासून मायबोलीवरील साहित्य वाचत होतो , विशेष म्हणजे आपले प्राचीन पूर्वज आणि शिवकालीन इतिहास.
माबो करांनी किल्ल्यावर केलेलं गिर्यारोहन आणि त्याचे वर्णन हा तर मायबोलीवरील एक आगळा ठेवा.
त्या पासून प्रेरणा घेऊन एख्यादा किल्लावर जावे असे वाटत होते, तसे पुण्याजवळ किल्ले बरेच आहेत. शेवटी पवना धरणाशेजारील तिकोना ठरवला. पण उन भरपूर होते, पावसाची वाट पहावी लागणार होती.
पण मन काही ऐकेना, शेवटी ठरवले, निघायचे , भर उन्हात.
२९ मे २०११ , रविवार.
मी आणि आमचं मंडळ ( म्हणजे बायको ) दोघेच निघालो.