तिकोना

गडदुर्गा - तुंगाई, किल्ले कठीणगड उर्फ तुंग (८)

Submitted by मध्यलोक on 28 September, 2017 - 08:08

https://www.maayboli.com/node/63952 ------> गडदुर्गा - श्री पट्टाई देवी
https://www.maayboli.com/node/63966 ------> गडदुर्गा - जाखमाता, किल्ले मोरगिरी (२)
https://www.maayboli.com/node/63998 ------> गडदुर्गा - श्री कोराई देवी, कोरीगड (३)

जायचे होते 'तुंग' पोचलो 'तिकोना'ला !!!

Submitted by MallinathK on 28 December, 2012 - 01:01

सकाळ सकाळी ६.३० ला जाग आल्यावर कंटाळा येण्यासारखं काय असतं? तेही शनिवारी? पण तरी कंटाळा आला.
मग काय, मित्राला फोन करुन विचारले 'जायचे का कुठेतरी ट्रेकला?'
पलीकडुन एकच शब्द ऐकु आला 'चल'. बिच्यार्याला झोपेतुन सुद्धा निट जागे होउ दिले नव्हते. Proud

त्याला ४ वाजता काम असल्याने इथे नको, तिथे नको, हे नाही, ते नाही करत, ३ पर्यंत कसंही करुन परत यायचे ठरवुन जायचे पक्के झाले. आता ३ पर्यंत परत यायचे म्हणुन ठिकाण तैलबैला नको, घनगड नको, तिकोणा मी आधीच केलाय म्हणत म्हणत तुंगला जायचे ठरले.

शब्दखुणा: 

वितंडगड (तिकोना) - भाग २

Submitted by राज जैन on 15 June, 2012 - 04:55

तिकोना हा विसापूर-लोहगडच्या अगदी मागच्या बाजूला पवना धरणाच्या बाजूला वसलेला गड आहे. समोर तुंग उभा असून मध्ये पवनेचे अथांग पाणी व हिरवेगार खोरं असे मनोहरी रूप दिसतं. गडावरून पुर्ण मावळ प्रांत आपल्या नजरेच्या टप्पात येतो. तिकोना जरी अवघड श्रेणीतील गड नसला व चढाई सोपी जरी असली तरी थोडी फार काळजी घेत गड चढणे आवश्यक आहे. तुम्ही लोहगड सारखे निर्धास्तपणे येथे वावरू शकत नाही. त्याचे प्रमुख कारण म्हणजे निसर्गाच्या मार्‍यामुळे गडाची झालेली हानी.

गुलमोहर: 

वितंडगड (तिकोना) - भाग १

Submitted by राज जैन on 8 June, 2012 - 04:06

लोहगडावरून नेहमी खुणवणारा तिकोना मागच्या वर्षी राहून गेला होता, पण काल योग होता, अगदी मागच्याच रवीवारी राजमाचीची सफर झाली असल्यामुळे शरीर जरी थकलेले होते तरी तिकोना म्हणाल्या म्हणाल्या परत शरीरात उत्साह संचारला व सकाळ सकाळीच स्वामी व मी बाईक वरून तिकोनाकडे वाटचाल चालू केली. इ.स.१६५७ मध्ये शिवाजीराजेंनी हा गड आपल्या साम्राज्यात घेतला, व नेताजी पालकर (इ.स.१६६०) येथील सर्वेसर्वा होते. या गडाची निर्मिती व त्याचा गतकाळासंबधात काहीच माहीती उपलब्ध नाही असे दिसते आहे.

गुलमोहर: 

किल्ले तिकोना

Submitted by संदीप पांगारे on 18 June, 2011 - 06:34

बरयाच दिवसापासून मायबोलीवरील साहित्य वाचत होतो , विशेष म्हणजे आपले प्राचीन पूर्वज आणि शिवकालीन इतिहास.
माबो करांनी किल्ल्यावर केलेलं गिर्यारोहन आणि त्याचे वर्णन हा तर मायबोलीवरील एक आगळा ठेवा.
त्या पासून प्रेरणा घेऊन एख्यादा किल्लावर जावे असे वाटत होते, तसे पुण्याजवळ किल्ले बरेच आहेत. शेवटी पवना धरणाशेजारील तिकोना ठरवला. पण उन भरपूर होते, पावसाची वाट पहावी लागणार होती.
पण मन काही ऐकेना, शेवटी ठरवले, निघायचे , भर उन्हात.
२९ मे २०११ , रविवार.
मी आणि आमचं मंडळ ( म्हणजे बायको ) दोघेच निघालो.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

तीन कोनांची टोपी चढविलेला.... तिकोना

Submitted by रोहित ..एक मावळा on 14 March, 2011 - 13:33

१७ डिसेंबर,स्थळ: ठाणे स्टेशन.... "अरे सुट्टी नाही मिळणार आणि वैयक्तिक कारणांमुळे पियुष पण येऊ शकणार नाही." गोपिचा फोन आला.

पवनाकाठचा तिकोना ...

Submitted by सेनापती... on 24 October, 2010 - 14:52

गेल्या महिन्यात २५ सप्टेंबर रोजी तब्बल २५ भटक्यानी पवना धरणाच्या समोर असलेला तिकोनागड सर केला. तारीख २५ आणि भटके देखील २५. पहाटे ६ वाजताच ट्रेकसाठी धाव मारली. आता धाव गाडीने मारली. आम्ही आपले त्यात बसून... Lol तासाभरात पनवेलला आणि मग अजून तासाभरात लोणावळ्याला पोचलो. सर्वात महत्वाचा असा खादाडी ब्रेक घेतला आणि मग तिथून कामशेतच्या दिशेने निघालो. कामशेत फाट्याला उजवू मारत आमचा लवाजमा तिकोना पेठ गावाच्या दिशेने निघाला.

Subscribe to RSS - तिकोना