सकाळ सकाळी ६.३० ला जाग आल्यावर कंटाळा येण्यासारखं काय असतं? तेही शनिवारी? पण तरी कंटाळा आला.
मग काय, मित्राला फोन करुन विचारले 'जायचे का कुठेतरी ट्रेकला?'
पलीकडुन एकच शब्द ऐकु आला 'चल'. बिच्यार्याला झोपेतुन सुद्धा निट जागे होउ दिले नव्हते.
त्याला ४ वाजता काम असल्याने इथे नको, तिथे नको, हे नाही, ते नाही करत, ३ पर्यंत कसंही करुन परत यायचे ठरवुन जायचे पक्के झाले. आता ३ पर्यंत परत यायचे म्हणुन ठिकाण तैलबैला नको, घनगड नको, तिकोणा मी आधीच केलाय म्हणत म्हणत तुंगला जायचे ठरले.
गेल्या महिन्यात २५ सप्टेंबर रोजी तब्बल २५ भटक्यानी पवना धरणाच्या समोर असलेला तिकोनागड सर केला. तारीख २५ आणि भटके देखील २५. पहाटे ६ वाजताच ट्रेकसाठी धाव मारली. आता धाव गाडीने मारली. आम्ही आपले त्यात बसून... तासाभरात पनवेलला आणि मग अजून तासाभरात लोणावळ्याला पोचलो. सर्वात महत्वाचा असा खादाडी ब्रेक घेतला आणि मग तिथून कामशेतच्या दिशेने निघालो. कामशेत फाट्याला उजवू मारत आमचा लवाजमा तिकोना पेठ गावाच्या दिशेने निघाला.