https://www.maayboli.com/node/63952 ------> गडदुर्गा - श्री पट्टाई देवी
https://www.maayboli.com/node/63966 ------> गडदुर्गा - जाखमाता, किल्ले मोरगिरी (२)
https://www.maayboli.com/node/63998 ------> गडदुर्गा - श्री कोराई देवी, कोरीगड (३)
https://www.maayboli.com/node/64000 ------> गडदुर्गा - हस्तमाता, नारायणगड (४)
https://www.maayboli.com/node/64002 ------> गडदुर्गा - पाटणादेवी, कन्हेरगड (५)
https://www.maayboli.com/node/64016 ------> गडदुर्गा - धोडंबदेवी, धोडप (६)
https://www.maayboli.com/node/64032 ------> गडदुर्गा - श्री जोगेश्वरी देवी, भैरवगड, हेळवाक (७)
===========================================================================
पुणे परिसरात अनेक किल्ले आहेत, काही परिचित काही अपरिचित, काही एकल तर काहींची द्वयी, काही पर्यटकानी गजबजलेले तर काही निवांत. लोहगड गजबजलेला तर विसापुर निवांत, पुरंदर वर वर्दळ तर वज्रगड शांत. अशीच एक द्वयी आहे तिकोना व तुंग. तिकोण्यावर गर्दी तर तुंगवर असतो काहीसा एकांत. मावळ खोऱ्यातील सूंदर प्रदेश पवना जलाशयामुळे अजुनच विहंगम झाला आहे आणि या जलाशयाने ह्या किल्ल्यांना दिलेल्या मिठीमुळे गडावरुन दिसणारे दृश्य डोळ्यांचे पारणे फेडते.
समुद्र सपाटी पासून १०७५ मीटर उंच उठावलेल्या तुंगवर जाण्यासाठी सर्वात प्रथम तुंगवाडी हे पायथ्याचे गाव गाठावे लागते. चहुबाजूनी २०-२५ मीटर कातळकडे गडाला नैसर्गिक संरक्षण देतात तरीही प्रवेशद्वारा जवळ व पश्चिम टोकाला तटबंदी बांधुन गड भक्कम करण्यात आला आहे. वाड्याची जोती, ७ टाके, दरवाजे तसेच गणेश, हनुमान, तुळजाई देवतांच्या मुर्त्या आहेत.
गडाची गडस्वामीनी तुंगाई देवी आहे. गडाच्या सर्वोच्च माथ्यावर देवीची तांदळा स्वरूपातील मूर्ति असून छोटेसे देवालय आहे. गडावर नेहमी पूजा-अर्चा होते. भक्त गडावर येवून देवीची भक्ति करून मन तृप्त करून घेतात.
गडाला प्राचीन इतिहास असून १५व्या शतकाच्या शेवटी निजामशाह अहमद ह्याने बहमनी सत्तेसाठी तुंग किल्ला जिंकल्याची नोंद आहे. पुढे हा किल्ला आदिलशाही मधे गेला व नंतर स्वराज्यात आला. चढाईस खडतार मार्ग असल्याने शिवाजी महाराजांनी किल्ल्यांचे नामकरण "कठीणगड" असे केले व नेताजी पालकर ह्यांना किल्ल्यावर देखरेख करण्यास सांगितले. पुढे पुरंदरच्या तहात हा देखणा किल्ला मुघल राजवटीकडे गेला. ई.स. १६७० मधे शिवाजी महाराजांनी हा किल्ला पुन्हा स्वराज्यात आणला. ई.स. १७०४ मधे किल्ल्याला औरंगजेबाकडून "बंकीगड" असे नाव मिळाले. १७०७ मधे औरंगजेब कर्णाटकात गेल्याचे निम्मित साधुन शंकाराजी नारायण सचिवांसाठी रामाजी फाटक ह्यांनी तुंग जिंकला. ई.स. १८१८ मधे हा किल्ला इंग्रजांनी जिंकला खरा पण त्याचा कार्यभार भोर संस्थानाकडेच ठेवला. स्वतंत्रोत्यर काळा नंतर जेव्हा संस्थाने खालसा झाली तेव्हा हा किल्ला भारत सरकारकडे आला.
पुण्यापासून साधारण ७०किमी अंतरावर असलेल्या ह्या मनोहारी किल्ल्यावरुन दिसणारे पवना धरणाचे जलाशय, लोहगड - विसापुर, मोरगिरी, कोराईगड हे किल्ले बघण्यासाठी गडभटके हमखास कठीणगडास भेट देतातच.
~विराग
माहिती छान लिहिलीय, पण अजून
माहिती छान लिहिलीय, पण अजून फोटो हवे होते.
सचिन,
सचिन,
दुर्गा बद्दल माहिती वर भर होता म्हणून किल्ला किंवा इतर फोटो नाही दिले.
मस्तच
मस्तच
गडाच्या सर्वोच्च माथ्यावर
गडाच्या सर्वोच्च माथ्यावर देवीची तांदळा स्वरूपातील मूर्ति असून छोटेसे देवालय आहे. गडावर नेहमी पूजा-अर्चा होते.>>>>>हा क्लोज-अप माझ्या कॅमेर्यातुन