स्वागतास भास्कराच्या नेसून हिरवा शालू
सोनकिचे अलंकार चढवून नभ घेता बाहू
तीन टप्प्या मधली चिलखती ची अभेद्यता
शिकवून जाई आम्हा झुंजार ची निडरता
मलाच काय सगळ्या भटक्यांचे आकर्षण म्हणजे नेढे
ह्या राजगडच्या पूर्वेच्या सोन्याचे कौतुक करावे तेवढे थोडे
सुवेळी खुलणारी म्हणून तू सुवेळा
जनसामान्यांना किती लावशील ग तू लळा
जिजाऊ नंतर राजांचा अधिक सहवास तुझ्या म्हाळी ग
चिरतरुण राजगडाची धाकटी लेक शोभते ग
-ऋषी
प्रेम म्हणजे सह्याद्री नि सह्याद्री म्हणजे मित्रत्व
धेय्य म्हणजे सह्याद्री नि सह्याद्री म्हणजे पितृत्व
पराक्रम म्हणजे सह्याद्री नि सह्याद्री त्याचीच साक्ष
शूरता म्हणजे सह्याद्री नि सह्याद्री म्हणजे पावसाचं लक्ष्य
हिरवी चादर म्हणजे सह्याद्री नि सह्याद्री म्हणजे शाही दरबार
भगवी झालर म्हणजे सह्याद्री नि सह्याद्री म्हणजे सोनेरी अलंकार
समजले तर सह्याद्री म्हणजे शिखरं ,लेण्या, अन किल्ले-गड
नाही समजले तर सह्याद्री म्हणजे न उमगलेले दगड
सह्याद्री म्हणजे महाराष्ट्राचे आन-बान-शान आनं मुकुट
सह्याद्री म्हणजे कपटी आणि धूर्त मुघलांसाठी सावट
राजगडाच्या केवळ दर्शनाने पाणवणाऱ्या डोळ्यांच्या कडा.. त्याच्यावरील असंख्य आठवणी ..पैकी कोणती आठवण छान आणि कोणती सर्वात छान अशी नेहमीचीच तुलना. संजीवनीवरचा स्वर्गीय सूर्यास्त ! त्या क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी केलेल्या राजगडाच्या असंख्य वाऱ्या.
तोरण्याच्या बुधल्या शेजारी अस्ताला जाणारा सूर्य. त्या प्रचंडगडाच्या सावलीची ठळक झालेली सीमा... आणि मनामध्ये सुरू झालेला "तव तेजांतील एक किरण दे ।" असा जप ...
सर्व काही पोटासाठी म्हणत धावणाऱ्या वाटाडयांनी मळवलेल्या वाटेवरून, तर कधी सह्याद्रीने आपल्या अंगाखांद्यावरून कात टाकल्याप्रमाणे खाली दरीमध्ये सोडून दिलेल्या दगडधोंड्यातून चालत चालत दीडेक तासांची चाल कधी झाली ते कळलंच नाही. खरतरं चालताना नजरेच्या टप्प्यात सह्याद्रीमधील अद्वितीय निसर्गशिल्प सतत दिसत असेल तर तुमच्या मनासमंतात इतर कोणत्याही गोष्टींची घुसखोरी होण्याची अजिबात शक्यता नाही.
काही दिवसांच्या ब्रेक नंतर आणिक दोन नविन शब्दचित्रे घेऊन आलोय. पहील्या तिन भागांच्या लिंक इथे आहेत -
http://www.esakal.com/pune/marathi-news-sinhagad-rope-way-pune-101334
तर ह्या बातमीनुसार, सिंहगडावर दोन वर्षात ‘रोप वे’ होणारे...
सिंहगडाची आताच तुळशिबाग झाली आहे, कधीही जा तिथे जत्रा भरलेलीच असते. पुण्यापासुन जवळ, वरपर्यंत गाडी नेता येते, आणि गडावर भरपुर खादाडी करण्याची सोय हे सगळं असल्यावर जत्राच भरणार म्हणा.. तर रोप वे झाल्यावर सध्या तुळशीबाग झालेल्या सिंहगडाचं कशात रुपांतर होणार आहे?
शनिवार रविवार नेहमीप्रमाणे कॅम्पिंग ट्रिप च्या नियोजनासाठी वेल्ह्याला जाणे झाले. अगदी अचानक ठरल्यामुळे एकट्यावरच सगळी जबाबदारी आली. एकटाच असल्यामुळे दुचाकी वर जाणेच पसंत केले. पुणे बेंगलोर महामार्ग सोडुन वेल्ह्याकडे निघालो. तस पाहता चेलाडी-वेल्हे-केळद(-महाड) हा देखील राज्य महामार्गच आहे. रस्त्यावर गाड्यांची वर्दळ होतीच. दुचाकी असल्याने वेग मर्यादीत होता. त्यातच आपल्याकडे रात्रीच्या वेळी वाहने चालवताना समोरच्या गाडीच्या हेडलाईट चा झोत डोळ्यावर आल्याने डोळे दिपुन जात होते. त्यातच हेल्मेट घातले होते, त्यामुळे रस्त्यावर किंवा आजुबाजुला फारसे पाहता येत नव्हते किंवा दिसत ही नव्हते.
ग्रीष्मात रापलेल्या सह्याद्रीवर मुसळधार पावसाचा अभिषेक झाला की त्याच बदलेलं हिरवगार रौद्र रुप मनाला भुरळं घालतं. घाटमाथ्या वरुन खोल दरित स्वत:ला झोकून देणारे भव्य जलप्रपात बघितले की निसर्गाच्या या किमये पुढे नतमस्तक होण्या शिवाय पर्यायच नसतो.
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३