सर्व काही पोटासाठी म्हणत धावणाऱ्या वाटाडयांनी मळवलेल्या वाटेवरून, तर कधी सह्याद्रीने आपल्या अंगाखांद्यावरून कात टाकल्याप्रमाणे खाली दरीमध्ये सोडून दिलेल्या दगडधोंड्यातून चालत चालत दीडेक तासांची चाल कधी झाली ते कळलंच नाही. खरतरं चालताना नजरेच्या टप्प्यात सह्याद्रीमधील अद्वितीय निसर्गशिल्प सतत दिसत असेल तर तुमच्या मनासमंतात इतर कोणत्याही गोष्टींची घुसखोरी होण्याची अजिबात शक्यता नाही.
चढावावर वाऱ्यासांगे धावणाऱ्या श्वासावर नियंत्रण आणण गरजेचं होत. खांदे रिकामी केले आणि डोळे मिटून, नाकपुड्या फुलवून एक दीर्घ श्वास घेत खाली बसकण मारली. डोळे उघडल्यावर मन सभोवताली दिसणाऱ्या कड्यातील प्रत्येक कपारीमंध्ये जाऊन येत होते. प्रस्तरारोहण मोहिमांदरम्यान जिथे फक्त तेजतर्रार पाकोळ्या आणि त्यांचे पारधीच जातील अश्या कपारींमध्ये घालवलेले तासनतास डोळ्यासमोर तराळले. समोरील उभा डोंगर पलीकडून असंख्य वेळेस पाहिला होता, आता तर त्याच्या पायथ्यालाच हाकेच्या अंतरावर होतो. तोही त्याच्याकडे येण्यासाठी खुणावत होता. अंतर्मनातून डोळ्यांत आलेली ईच्छा त्यानेही लगेच ओळखली आणि आम्ही दोघांनीही भेट नक्की केली.
ज्या वाटेवरून आलेलो ती वाट काळसर हिरव्या रंगात बुडालेली होती. क्षणभर मागे वळून पाहिल्यावर डोळ्यांना दिलासा मिळत होता. झाडांच्या शेंड्यावर नुकतंच फुललेलं हिरवं यौवन सूर्यशुक्राणू पिऊन मोहक रंगात तरारून निघालेलं.
खरतर मरणपंथाला लागलेले, पण सकाळचे दव पिऊन उगीच जिवंतपणाची आस लागून राहिलेले गवत उद्या कुणीतरी पेटवून देईल आणि मातीत मिसळून जाईल. पावसाळी थंडगार पाण्याची तरारी दोनतीन महिने हिरव्या रंगात मिरवून, सूर्याच्या तेजाने सोनपिवळ्या रंगात घडल्यावर, जमिनीशी नाळ तुटलेल्या भाताच्या पेंढ्या आडव्या पडल्या होत्या. नुकत्याच सरलेल्या पावसाने काळवंडलेली कौलारू घरांची दाटी दूरवर दिसत होती. सकाळी गावातून निघताना, रात्रीच्या काळोखात लपलेल्या कळकीच्या/कारवीच्या काड्यांनी उभारलेल्या भिंती सकाळी उजाडल्यावर उघड्या पडल्या होत्या. काही घरांना सिमेंट लागलं होत तर काही भिंती आपली जुनी मातीची ओळख तशीच ठेऊन होत्या. डोंगर माथ्यावर तरारलेली नवी कारवी, आता पावसाच्या पाण्याने कुजलेलया जुन्या भिंतीची जागा घेईल आणि एक वर्तुळ पूर्ण होईल.
कड्याच्या पोटात अगदी पायथ्याला असल्याने क्षितिज डोक्यावर आले होते. मान वर करून पाहिल्यावर कड्याच्या पलीकडून येणाऱ्या सकाळच्या आडव्या सूर्यकिरणांनी कड्याचा वरील भाग धूसर करून टाकला होता. ‘मी, डोक्यावर येण्याआधी खिंडीतली वाट चढून जा’, असं सांगणारा हा इशारा होता. कड्याच्या पलीकडे असतो तर हीच सकाळची कोवळी किरणे प्रसन्न वगैरे वाटली असती पण आज मात्र ती नकोशी वाटत होती. कारण त्यांनी सह्याद्रीची शिल्पकला डोळ्यात साठवण्यासाठी आडकाठी केली होती.
कड्याच्या मुख्य चढाईसाठी निघण्याच्या वळणावर इतर सवंगड्यांची वाट पाहत असताना गेल्या महिनाभरातील, सकाळी लवकर उठून केलेली धावपळ किती उपयोगी पडलीय याची जाणीव झाली. थोडं निवांत झाल्यावर ज्या वाटेवरील दगड तुडवायचे आहेत तिच्याकडे नजर गेली. वर्षानुवर्षे वरून येणाऱ्या पावसाळी पाण्याच्या धडपडण्याने डोंगराला दोन भागात विभागून एक मजेशीर भूदृश्य निर्माण केलं होत. खरंतर दोन डोंगर एकमेकांचे चुंबन घेण्यासाठी अगदी जवळ आल्यासारखे वाटतं होते पण त्यांचं चुंबन पूर्णत्वास जाऊ नये म्हणून बरोबर त्यांच्यामध्ये डोंगराच्या वरील टोकास एक सुळकासदृष्य खडक 'सिरियली' सासूसारखा ठाण मांडून होता. खालून बघितल्यावर तो खडक अगदी समोर दिसत होता, म्हणजे एकदीड तासात पोहोचू हा विचार चमकून गेला. डोंगर जेव्हढे जवळ दिसतात ते तसे कधीच नसतात. जोपर्यंत त्यावर स्वार होत नाही तोपर्यंत त्यांचा अंदाज येतच नाही.
खांद्यावरील दोराचा भार आता इतरांनी आपल्या खांद्यावर घेतला होता. अंगावर येणारा चढ सुरु होणार असल्याने पाठ मोकळी वाटायला लागली. पाठीमागे येऊन सूर्याने शरीरातील पाणी शोषून घेण्याचे आपले काम सुरु केले होते. असंख्य आकाराचे धोंडे, दगड, खडक खाली घरंगळण्यासाठी आपला नंबर येण्याची वाट पाहत एकमेकांच्या अंगावर आडवेतिडवे पडले होते. काही दगाबाज मित्रासारखे मोक्याच्या ठिकाणी आडवे होऊन तुम्हाला पाडण्याची वाट पाहत असलेले, तर काही धोंडे संपूर्ण वाटच आपल्या आकाराने अडवून बसले होते. काहीतर अगदी वेळ काढून तासून काढल्यासारखे चौकोन आणि आयतात. पळत्या पाण्याने केलेल कोरीवकाम बघताना भूगोल विसरून कधी भूमितीच्या रेषांमध्ये गुंतून जातो तेच कळत नाही. नजरेसमोर उन्हात तापत असलेले फक्त दगड आणि दगडांच एकसुरी रखरखीत साम्राज्य.
‘या दगडावर त्या दगडावर, जपूनी पाय ठेवावे’.
क्रमश: आहे का?
क्रमश: आहे का?
‘या दगडावर त्या दगडावर, जपूनी पाय ठेवावे’. फोटो कुठेय?
जे फोटो दिले आहेत ते मस्तच. आणि कुठे गेला होतात, कधी, कसे तेही सांगा हो. शिर्षक असे का दिले आहे तेही सांगा.
भारी लिहिलय.
हो लिहिलंय मस्तच! सहीच ..
हो लिहिलंय मस्तच! सहीच .. मला पण शीर्षकाचं काय कळलं नाही !
भारी आहे हे!!!
भारी आहे हे!!!
माझ्या आकलनानुसार खांडेकरी शैलीतलं ट्रेकचं वर्णन आहे.
मला वाटतंय खांडेकर चावला हे
मला वाटतंय खांडेकर चावला हे जागेचं नाव असावं.
सत्या, अरे एकाच दगडात किती
सत्या, अरे एकाच दगडात किती पक्षी मारशील ??
खांडेकरांच्या शैलीत
खांडेकरांच्या शैलीत लिहिण्याचा उगीच केलेला प्रयत्न आहे हो. फोटोंची गर्दीही नको होती.
शाली
पहिला फोटो बघून पण नाही कळलं.
अच्छा !! भारीच !
अच्छा !! भारीच !
चढावावर वाऱ्यासांगे धावणाऱ्या
चढावावर वाऱ्यासांगे धावणाऱ्या श्वासावर नियंत्रण आणण गरजेचं होत. खांदे रिकामी केले आणि डोळे मिटून, नाकपुड्या फुलवून एक दीर्घ श्वास घेत खाली बसकण मारली. डोळे उघडल्यावर मन सभोवताली दिसणाऱ्या कड्यातील प्रत्येक कपारीमंध्ये जाऊन येत होते. प्रस्तरारोहण मोहिमांदरम्यान जिथे फक्त तेजतर्रार पाकोळ्या आणि त्यांचे पारधीच जातील अश्या कपारींमध्ये घालवलेले तासनतास डोळ्यासमोर तराळले. >>
इसकाळ वर "स्वाती ठकार" म्हणून एक आयडी आहे. तो तुमचाच आहे का?
त्यांनी हा पॅरा तिथे कॉपी
त्यांनी हा पॅरा तिथे कॉपी पेस्ट केलाय का?
या स्वस्त फोटोग्राफीच्या
या स्वस्त फोटोग्राफीच्या काळात डोंगरभटक्यांनी अनंत काणेकर ( लाल माती निळे आकाश) होऊ नये काय?
शाब्दिक वर्णन,कवीकल्पनांनी निसर्ग रंगवावा लागत असे तेव्हा.
सूर्यशुक्राणू डोंगरावर दिसताहेत एका फोटोत.
वि. स. खांडेकर हे सुंदरीच्या चेहऱ्यावरच्या बटा टाकाने हळुहळू चारपाच पानांत दूर करत असत. डोंगरावरच्या धुक्याचे माहीत नाही.
लेख आवडला.
डोळखांबकडून रतनगड परिसर?
डोळखांबकडून रतनगड परिसर?
भारी रे सत्या...
भारी रे सत्या...
नाळेची वाट समोर उभी राहिली..
अजून चावून घे..
विलभ
विलभ
स्वाती ठकार फेबुला मित्र यादीत आहेत.
srd
कोकणकडा
खांंडेकर म्हणजे कसा किडा असतो
खांंडेकर म्हणजे कसा किडा असतो ह्या उत्सुकतेने बघायला आले होते...तर .....
हाहा! मजा आली वाचून
हाहा! मजा आली वाचून
>> खांंडेकर म्हणजे कसा किडा
>> खांंडेकर म्हणजे कसा किडा असतो ह्या उत्सुकतेने बघायला आले होते
+111 Mala watle kahi bhagat winchu kinwa koli chi eikhadi prjati wagaire asel ya nawachi
मला वाटले ट्रेक दरम्यान साप
मला वाटले ट्रेक दरम्यान साप चावला कुठला तरी
(No subject)
वर्णन मस्त केलंय पण. अगदी
वर्णन मस्त केलंय पण. अगदी अगदी खांंडेकरी शैली. "झाडांच्या शेंड्यावर नुकतंच फुललेलं हिरवं यौवन सूर्यशुक्राणू पिऊन मोहक रंगात तरारून निघालेलं." वा! `ययाती`` वगैरे वाचत असल्यासारखे वाटते.