सिंहगडावर दोन वर्षात ‘रोप वे’

Submitted by अग्निपंख on 6 March, 2018 - 03:25

http://www.esakal.com/pune/marathi-news-sinhagad-rope-way-pune-101334
तर ह्या बातमीनुसार, सिंहगडावर दोन वर्षात ‘रोप वे’ होणारे...
सिंहगडाची आताच तुळशिबाग झाली आहे, कधीही जा तिथे जत्रा भरलेलीच असते. पुण्यापासुन जवळ, वरपर्यंत गाडी नेता येते, आणि गडावर भरपुर खादाडी करण्याची सोय हे सगळं असल्यावर जत्राच भरणार म्हणा.. तर रोप वे झाल्यावर सध्या तुळशीबाग झालेल्या सिंहगडाचं कशात रुपांतर होणार आहे?
ताम्हिनि घाटात की अजुन कुठेतरी सह्याद्रितच ग्लास ब्रिज होणार अशी वाचल्याचं स्मरतय. सगळ्या टेकड्यांवर घरं, सोसायट्या बांधुन झाल्या, आता गड किल्ले राहिलेत तर तेहि एखाद्या दशकात स्वाहा होणार अस दिसतय.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिंहगडाची आताच तुळशिबाग झाली आहे, कधीही जा तिथे जत्रा भरलेलीच असते. पुण्यापासुन जवळ, वरपर्यंत गाडी नेता येते, आणि गडावर भरपुर खादाडी करण्याची सोय हे सगळं असल्यावर जत्राच भरणार म्हणा.. >>>> Lol Sad

माळशेज घाटात होणार आहे हा ग्लास ब्रिज. महान आहेत. जाऊ दे पुढचे बोलत नाही.

सिंहगड चा गाडीरस्ता बंद करणार असतील तर चांगली गोष्ट आहे, सगळ्यात जास्त प्रदूषण आणि रस्ता कोंडी होते.
पण ते आणि वर हे म्हणजे मरणोन्मुख गडाला अजून दणके देण्याचा प्रकार आहे

भारतात जिथे अजून रस्ते आणि रेल्वेप्रवास सुद्धा पूर्ण सुरक्षित नाही, इतकेच काय गेलाबाजार इमारती मधल्या लिफ्टच्या सुद्धा वारंवार बातम्या येत असतात तिथे रोप वे, ग्लास ब्रिज वगैरे वापरणाऱ्यांच्या धाडसाला सलाम करावा कि बुद्धीची कीव करावी ? माझ्याच्याने तरी होणार नाही. त्यापेक्षा चालत जाईन गडावर.

जिथे already वरपर्यंत गाडी रस्ता आहे तिथे रोप वे करण्याचे प्रयोजन कळले नाही. खरं तर जे अवघड ट्रेक आहेत (अलंग, मदन / लिंगाणा, ढाक बहिरी इत्यादी) तिथे लोखंडी शिड्या लावल्या किंवा होल्ड वगैरे लावून त्या वाटा सुरक्षित केल्या तर अजून लोक त्या गडभ्रमंतीचा आस्वाद घेऊ शकतील. काही मुरलेल्या ट्रेकरलोकांना हे म्हणणे रुचणार नाही कदाचित पण या गडांविषयी बोलताना अनेक ट्रेकलोकांच्या ब्लॉगवर 'जेमतेम पाऊल पडेल एवढीच जागा होती', 'डावीकडे कडा तर उजवीकडे दरी, जरा चुकीला क्षमा नाही', '५० फुटांची कातळ भित, जरा काही चूक झाली की थेट खाली दरीतच कोसळणार', अशा प्रकारची अनेक वाक्ये आहेत. हे thrill तरूण रक्तात असते हे मान्य केले तरी शेवटी आपला जीव लाखमोलाचा आहे, आणि आपली सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे. म्हणूनच हे ट्रेक जर अजून सुरक्षित करता येऊ शकले तर त्याचा फायदा आपल्यालाच आहे.

सिंहगड पुण्याच्या ( पुणं म्हणून नाही, मोठं शहर म्हणून) नको तितका जवळ आहे Happy . तसं पहायला गेलं तर शिवनेरीवरसुद्धा बरीच वरपर्यंत गाडी जाते, थोड्याच पायर्या चढायला लागतात. पण तो लांब असल्याने तिथे तुळशीबाग/ जत्रा भरत नाही.
आपण सिंहगडावर घडलेला इतिहास जास्त महत्त्वाचा मानतो. पण बदलणार्या काळानुसार निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी, भजी- झुणका भाकर खाण्यासाठी तिथे गर्दी वाढणार, हेही आपण मान्य केले पाहिजे. पुण्याच्या जवळ असल्याने तिथे लोक enjoy करायला येणार.
स्वच्छता आणि इतरांना त्रास होऊ नये याची खबरदारी या दोन गोष्टी पाळल्या गेल्या पाहिजेत एवढंच आपण म्हणू शकतो ( जे कुठल्याही सार्वजनिक जागेसाठी खरं आहे).

माळशेज घाटात होणार आहे हा ग्लास ब्रिज. महान आहेत. जाऊ दे पुढचे बोलत नाही.>>
कोट्य्यवधींचा चुराडा..
सिंहगड चा गाडीरस्ता बंद करणार असतील तर चांगली गोष्ट आहे, सगळ्यात जास्त प्रदूषण आणि रस्ता कोंडी होते.>>सहमत तो रस्ता बंद तरी करावा किंवा फक्त वयस्करांसाठी असावा (हेमावम)
२ वर्षात... झाला मग..>>> पुणे मेट्रो बहुतेक २००० पासुन सुरु होता होता २०१८ उजाडलय..
रोप वे, ग्लास ब्रिज वगैरे वापरणाऱ्यांच्या धाडसाला सलाम करावा कि बुद्धीची कीव करावी ? माझ्याच्याने तरी होणार नाही. त्यापेक्षा चालत जाईन गडावर.>>मारुति सुझुकिच्या गाड्या सुद्धा वापरतो हो आम्ही, मासुला अजुनही सेफटी स्टँडर्ड, क्रॅश टेस्ट वगैरे प्रकार माहिती नाहित.
ट्रेक जर अजून सुरक्षित करता येऊ शकले तर त्याचा फायदा आपल्यालाच आहे.>> हो हे व्हायला पाहिजे, तरीही बहुतेक वेळा अपघाताला फाजिल आत्मविश्वास, सेल्फी, दारु, नको तिथे चढुन फोटो काढण्याची हौस, माज इ इ कारणीभूत आहे असं वाटतं.
स्वच्छता आणि इतरांना त्रास होऊ नये याची खबरदारी या दोन गोष्टी पाळल्या गेल्या पाहिजेत >> भारतीय जनता अजुन एव्हढी प्रगल्भ नाही. हे तर आम्ही सिनेमा थिएटर, पुस्तक प्रदर्शन, रेल्वे स्टेशन इ ठिकाणी सुद्धा पाळत नाही, मग गडावर तर अशक्य

भारतात जिथे अजून रस्ते आणि रेल्वेप्रवास सुद्धा पूर्ण सुरक्षित नाही, इतकेच काय गेलाबाजार इमारती मधल्या लिफ्टच्या सुद्धा वारंवार बातम्या येत असतात तिथे रोप वे, ग्लास ब्रिज वगैरे वापरणाऱ्यांच्या धाडसाला सलाम करावा कि बुद्धीची कीव करावी ? माझ्याच्याने तरी होणार नाही. त्यापेक्षा चालत जाईन गडावर.
नवीन Submitted by इनामदार on 6 March, 2018 - 21:45

<<

@इनामदार,
तुम्ही किल्ले रायगडाचे नाव कधी ऐकले आहे का ?
तिथे मार्च १९९६ पासून ते आजगायत रायगड 'रोपवे' एकही अपघात न होता अगदी व्यवस्थित सुरु आहे.

रोपवे म्हणजे कसा? दोरीला लटकून आपण स्वत: जायचे की एखादी गाडी नेणार? की दोन कड्यांना जोडलेला रोप वे? म्हणजे त्या दुसरया कड्यावर आधी जाऊन तिथून सिंहगडावर यायचे का? की हा रोप वे सिंहगडावर जायचा एक मार्ग नसून फक्त थ्रिल आणि मनोरंजनासाठी आहे..?

पर्सनली मला असे वाटते की काही नवे ईंटरेस्टींग बनत असेल तर त्याला सपोर्ट व्हावा. लोकं गैरवर्तन करत असतील तर त्यांना फटके द्या ना. विकास आणि प्रगतीला का खीळ द्यायची? आपल्या येथील लोकं अमुकतमुक वास्तू जपायच्या लायकीची नाही म्हणत त्या वास्तूच उभारू नये हे सोल्युशन नाही झाले. लोकांवर शिस्त लादली कि ते पाळतातच.

सिंहगडावर मी फार म्हणजे फार्र बालपणी गेलेलो. पायीपायीच चढत गेलेलो. चढण्यापेक्षा घरंगळत उतरायला मजा आलेली. तिथे वर झुणका भाकर (जी मला हास्यास्पद वाटली होती) सोबत कांदाभजी आणि मटका दही की लस्सी खाल्ल्याचे आठवतेय. गर्दी काही विशेष नव्हती. तसेही मुंबईकरांना गर्दीचे कसले कौतुक. स्वच्छता कितपत होती कल्पना नाही. कारण लहान मुलांना स्वच्छतेशी काही घेणेदेणे नसते. ती कुठेही रमतात Happy

टुरिस्ट रेव्हेन्यु वाढेल.सेफ्टी सांभाळून केले म्हणजे झाले.
अवांतरः ग्लास ब्रिज वरुन आठवले.कोणाला हल्ली उठसूट कठड्या ऐवजी ग्लास पॅनेल वाल्या गॅलर्‍या देण्याचा ट्रेंड आहे त्याबद्दल चिंता वाटत नाही का? बिल्डर ने चांगली फायबर ग्लास वापरली आहे का, ती पॅनेल मध्ये फिक्स बसली आहे का, कोणी आपटल्यास त्याची लोड बेअरिंग कपॅसिटी किती आहे याची माहिती इथे या फिल्ड मधलं कोणी देऊ शकेल का?
मला १०-११ मजल्यांची घरं विथ ग्लास पॅनेल गॅलरी कधी सेफ वाटलेली नाहीत.फिक्स्चर चेक करण्याचा प्राथमिक उपाय काहीच नाही.

ग्लास पॅनेल वाल्या गॅलर्‍या
>>>>
+786
त्या किती सेफ असतात ते नंतर.. सायकोलॉजिकली सुद्धा अनसेफ वाटतात. निदान गगनचुंबी ईमारतींबाबत तरी. सध्या मी नवीन घराच्या शोधात फिरत आहे. किमान 10+ माळ्यावर राहायचे अशी ईच्च्छा आहे. काही घरे या गॅलरीमुळेच रिजेक्ट केली. पण कोणाला बोल्लो नाही Happy

बिल्डर ने चांगली फायबर ग्लास वापरली आहे का, ती पॅनेल मध्ये फिक्स बसली आहे का, कोणी आपटल्यास त्याची लोड बेअरिंग कपॅसिटी किती आहे याची माहिती इथे या फिल्ड मधलं कोणी देऊ शकेल का?>>
बिल्डरच्या भरवशावर राहुच नका, त्या काचेच्या आत जाळी बसवुन घ्यावी जेणेकरुन लहान मुलं सुरक्षित राहतिल, हल्लि खुप प्रमाण वाढलय अशा अपघातांच.

>> हल्ली उठसूट कठड्या ऐवजी ग्लास पॅनेल वाल्या गॅलर्‍या देण्याचा ट्रेंड आहे
>>सायकोलॉजिकली सुद्धा अनसेफ वाटतात. निदान गगनचुंबी ईमारतींबाबत तरी.

१०+ मजल्यावर ग्लास पॅनेल वाली गॅलरी? Uhoh कल्पना करूनच पाय आखडू लागलेत माझे Lol इतक्या वरच्या मजल्यांवर मला मजबूत अशी चांगला छातीपर्यंत उंच कठडा असलेली जाडजूड कॉंक्रीटची ग्यालरीच योग्य वाटते. Proud

बाकी रोप वे बाबत सिंगापोर केबल कारचा थरारक अनुभव आहे. हि टांगलेली कार समुद्रावरून जाते. जीव टांगणीला लागणे म्हणजे काय त्याचा शब्दशः अनुभव आला होता. Biggrin भर समुद्रात दीड हजार फुट उंचीवर मधला टॉवर आहे. आधीच मनात नकोनको त्या शंका येत होत्या. टॉवरला लावलेल्या आधारावरून केबल जाते. तिथून पलीकडे हि कार जात कशी असेल? नुसतीच केबलवर ठेऊन वरच्यावर सरकवत नेत आहेत कि काय? त्याला खाली पण सपोर्ट आहे का नाही? असेल तर मधल्या खांबापाशी आधारावरून पलीकडे जाते तिथे कसे होईल? Lol आणि प्रत्यक्ष तिथे गेल्यावर खाली दीड हजार फुटावर रोरावता भीषण समुद्र असताना वर केबलच्या इथे खट्कन कसलातरी आवाज आला. मला वाटले निसटली Rofl Rofl त्यात आणि तिथे पूर्वी कधीतरी त्या केबलकारचा भीषण अपघात झालेले वाचून गेलो होतो. भर समुद्रात त्याच टॉवरपाशी उलटी झाली होती आणि दरवाजा उघडला जावून त्यातले सगळे प्रवासी खाली थेट समुद्रात पडले होते. Sad Sad मला सवय आहे आपण जिथे जातो त्या ठिकाणाची आधी थोडीफार माहिती करून घेऊन जायची Lol Biggrin

अतुलपाटील, मोशी वुडसव्हिले बघा.१२-१३ मजली ग्लास पॅनेल गॅलरीज आहेत.
आणी पीसीएमसी मधल्या अनेक नवीन स्किम्स.बांधलेले कठडे आणि वरती बार हे डिझाईन जवळ जवळ हद्दपार झालेय. ग्लास पॅनेल चा बनवायचा टाईम टु मार्केट वेळही कमी आहे.

अतुलपाटील, थ्रिल हवे तर रिस्कही हवीच. अनुभव भारी असणार. ते आपले गोव्याचे समुद्रातले प्याराग्लायडींग करायलाही किती मजा येते. फार फार तर काय समुद्रात पडणार. ज्यॅकेट असते अंगात. थोडावेळ तरंगलो तर कोणीतरी वाचवेल आपल्याला हा विश्वास ठेवला की झाले. पण त्या केबलकार अपघातात लोकांच्या अंगात लाईफ जॅकेट होते का? की ते मेलेच? पोहोणारे वाचलेही असतील.. पण एवढ्या ऊंचीवरून पडून त्यांनी समुद्राचा तळच गाठला असेल. वर येईपर्यंतच मेले असतील. बिच्चारे...

..

१०+ मजल्यावर ग्लास पॅनेल वाली गॅलरी? ऊहोह्
>>>>
हो ना च्यायला. रोज आपल्या घरात अशी डेअरींग करून कोण राहणार. नवी मुंबई मध्ये घर शोधताना हे आढळले. एका वीस बावीस माळ्याच्या बिल्डींगमध्ये असेच किचनलाही एका भिंतीच्या जागी जवळपास त्याच आकाराची काच होती. थोडक्यात एक भिंतच वीटादगडांऐवजी काचेची होती. तिथून खडेखडे आसपासच परीसर बघून डोके गरगरवून घ्यायचे. ऑफिसवगैरे जागी हे ठिक आहे. पण रोजच्या राहत्या घरात. बहुधा हे सारे वेस्टर्न फॅड असावे. पण तेथील मजबूती आणि क्वालिटीबद्दल जास्त खात्री असते, आपल्याकडे जास्त शंका असते. ते घर सुद्धा बाद केले. तसेही बजेटच्या जरा बाहेर होते. सव्वा करोड बोलत होता. मुंबईच्या बाहेर अशी सव्वादिड करोडची घरे विकायला लोकांना आकर्षित करायला हे ग्लास फंडे वापरताहेत वाटते.

आताही आम्ही मुंबईत राहतो ती ईमारत अशीच गगनचुंबी आहे. पण तिला ग्यालरीच नाही. नेहमीसारखी खिडकी आणि मजबूत फुल विंडो ग्रिल. त्या ग्रिलच्या पिंजरयात उतरून मस्त बागडून आले तरी जराही भिती वाटत नाही. बारकी पोरंही छान कपडे सुकत घालावेत तसे तंगड्या टाकून त्यात बसलेली असतात. एकदा मनातली भिती गेली की जास्त मजा येते. आपल्याकडे ग्लास विंडो आणि ग्यालरीनी तो विश्वास अजून कमवायचा आहे असे वाटते..

>> त्या केबलकार अपघातात लोकांच्या अंगात लाईफ जॅकेट होते का? की ते मेलेच?

अंगात लाईफ जॅकेट घालून नावेत बसवतात हे एकवेळ ठीक वाटते. पण केबल कार मध्ये? Lol असो. नाही. जे पडले होते ते गेले सगळे. दोन केबिन मधले लोक गेले. बाकीच्या केबिन ज्या केबलला लटकत राहिल्या होत्या त्यातल्या लोकांना एअरफोर्सच्या हेलिकॉप्टरने अत्यंत धाडसी ऑपरेशन करून वाचवले. पण तोपर्यंत काय हाल झाले असतील कल्पना करा. मी कुठेतरी वाचले कि त्यात एक लहान मुलगा वाचला होता. त्याच्या मनावर इतका विपरीत परिणाम झाला तो पुढे मोठा झाल्यावर सुद्धा नदीच्या वगैरे पुलावरून जाताना पाणी बघून किंचाळत असे. तशी हि खूप जुनी घटना आहे. तेंव्हा केबल खूप खाली होती आणि समुद्रातून जाणाऱ्या एका प्रचंड जहाजात ती अडकली.

हो ना च्यायला. रोज आपल्या घरात अशी डेअरींग करून कोण राहणार. नवी मुंबई मध्ये घर शोधताना हे आढळले. एका वीस बावीस माळ्याच्या बिल्डींगमध्ये असेच किचनलाही एका भिंतीच्या जागी जवळपास त्याच आकाराची काच होती. थोडक्यात एक भिंतच वीटादगडांऐवजी काचेची होती. तिथून खडेखडे आसपासच परीसर बघून डोके गरगरवून घ्यायचे. ऑफिसवगैरे जागी हे ठिक आहे. पण रोजच्या राहत्या घरात. बहुधा हे सारे वेस्टर्न फॅड असावे. पण तेथील मजबूती आणि क्वालिटीबद्दल जास्त खात्री असते, आपल्याकडे जास्त शंका असते. ते घर सुद्धा बाद केले. तसेही बजेटच्या जरा बाहेर होते. सव्वा करोड बोलत होता. मुंबईच्या बाहेर अशी सव्वादिड करोडची घरे विकायला लोकांना आकर्षित करायला हे ग्लास फंडे वापरताहेत वाटते.

आताही आम्ही मुंबईत राहतो ती ईमारत अशीच गगनचुंबी आहे. पण तिला ग्यालरीच नाही. नेहमीसारखी खिडकी आणि मजबूत फुल विंडो ग्रिल. त्या ग्रिलच्या पिंजरयात उतरून मस्त बागडून आले तरी जराही भिती वाटत नाही. बारकी पोरंही छान कपडे सुकत घालावेत तसे तंगड्या टाकून त्यात बसलेली असतात. एकदा मनातली भिती गेली की जास्त मजा येते. आपल्याकडे ग्लास विंडो आणि ग्यालरीनी तो विश्वास अजून कमवायचा आहे असे वाटते..>>>>>>

महाशय धागा तुमच्या बिल्डींगला लावलेल्या ग्लास विंडो बद्दल नसुन सिंहगडावरच्या रोपवे वर आहे. त्यावर जमत असेल तर बोलावे.

महाशय धागा तुमच्या बिल्डींगला लावलेल्या ग्लास विंडो बद्दल नसुन सिंहगडावरच्या रोपवे वर आहे. त्यावर जमत असेल तर बोलावे.>>>
ओके - 5 months 3 आठवडे
अजुन थोड्या दिवसात कळेल तुम्हाला, एक वेळ पालथ्या घड्यातुन सुद्धा थोडेसे पाणी झिरपेल (at the very least तो ओला तरी होतो)पण....असो..

तुमच्या बिल्डींगला लावलेल्या ग्लास विंडो ......
>>>>>
आमच्या बिल्डींगला ग्लास विंडो कुठे आहेत? उगाच काहीही आरोप/अफवा नको प्लीज _/\_

तसेही तो ग्लास पॅनेल विषय वर कुठेतरी दुसरया प्रतिसादात आला होता. त्यावर माझ्याकडे बोलण्यासारखे होते म्हणून बोललो ईतकेच.

सिंहगड आणि रोपवेबद्दल माझ्या पोस्टी वर दिसतीलच.
तरीही आपल्याकडे असे काही होत असेल तर त्याचे कौतुकच आहे. फक्त सुरक्षिततेची काळजी वाटते ईतकेच..