२००५...जुलै महिना... कर्नाळा अभयारण्याजवळ माझा आणि शामिकाचा बाईकवरून पडून अपघात झालेला. जोरदार पडूनही तिचे फक्त मुक्यामारावर निभावले होते. एस.टी. वाल्याच्या चुकीचे बक्षीस म्हणून मला उजव्या हाताला एक प्लास्टर बक्षीस...
महिनाभर विश्रांती घेतल्यावर ऑगस्टमधला हा ट्रेक. मी, अभिजित, हर्षद आणि आशिष असे चौघेजण कर्जत येथील वदप गावावरुन पुढे ढाक गावाजवळ असलेल्या ढाक-भैरीला आणि तिकडून पुढे कुंढेश्वरमार्गे राजमाचीला गेलो होतो. मोजून २ दिवस आधीच माझ्या उजव्या हाताचे प्लास्टर निघाले होते.
आता ह्यावर्षी तरी ह्यापैकी एक ट्रेक झालाच पाहिजे. मी अभिला संगत होतो.
बघता बघता भटकंतीची १० वर्षे सरली. कधी? कशी? काहीच कळले नाही. ह्या १० वर्षात अनेक चांगले-वाईट अनुभव आले. गावागावातून विविध स्वभावाची लोक भेटली. खूप काही शिकलो. खूप काही घेतलं. काही देता आलं आहे का माहीत नाही. म्हणतात ना 'निसर्ग सर्वोत्तम शिक्षक आहे' पूर्णपणे पटले ह्या १० वर्षात. कधी उन्हात करपुन निघालो तर कधी पावसात भिजून. कधी वाटले नदीत वाहून जाईन की काय तर कधी वाटले दरीत पाय सरकतो की काय. नुसत्या पाण्या आणि पार्ले-जी च्या पुड्यावर सुद्धा दिवस काढले तर कधी गुलाबजाम सुद्धा हाणले. माझी प्रत्येक भटकंती काहीतरी नवीन देऊन जातेय मला.
गेल्या महिन्यात २५ सप्टेंबर रोजी तब्बल २५ भटक्यानी पवना धरणाच्या समोर असलेला तिकोनागड सर केला. तारीख २५ आणि भटके देखील २५. पहाटे ६ वाजताच ट्रेकसाठी धाव मारली. आता धाव गाडीने मारली. आम्ही आपले त्यात बसून...
तासाभरात पनवेलला आणि मग अजून तासाभरात लोणावळ्याला पोचलो. सर्वात महत्वाचा असा खादाडी ब्रेक घेतला आणि मग तिथून कामशेतच्या दिशेने निघालो. कामशेत फाट्याला उजवू मारत आमचा लवाजमा तिकोना पेठ गावाच्या दिशेने निघाला.
संदर्भ ग्रंथ - 'सह्याद्री' - स. आ. जोगळेकर.
"आयुष्यावर बोलु काहि" या माझ्या मालिकेला आपला माबोकर सुन्या आंबोलकर याने "तुझ्याकडे सह्याद्रीची थीम असेल तर पहायला आवडेल" असा प्रतिसाद दिला होता. त्याच प्रतिसादाचा मान ठेवत घेऊन आलो आहे "गडकोटांचा राजा, महाराष्ट्र माझा".
==================================================
==================================================
सह्याद्री, इथल्या मातीचे ढेकुळ पाण्यात टाका, जो तवंग उमटेल तो इतिहासाचाच. वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही, वेडी माणसंच इतिहास घडवतात.
जानेवारी महिन्यात माणिकडोह - जुन्नर परिसरात भटकंतीसाठी गेलो होतो. उदिष्ट होते किल्ले शिवनेरी आणि जवळच असलेले हडसर आणि निमगिरी हे किल्ले. गेल्या सुट्टीमध्ये आम्ही जास्त बाइकनेच फिरलो. किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत बाइक घेउन जायची, मग पुढे चढाई सुरु. सकाळी माळशेज घाटाच्या रस्त्याने निघालो. कल्याण ते मुरबाड रस्ता एकदम मस्त आहे. सकाळी फारसे ट्राफिक नसते आणि वातावरण पण एकदम मस्त. आमच्या अत्यंत महत्वाच्या अश्या 'नाश्ता ब्रेक'साठी मुरबाडला थांबलो आणि मग गाड़ी दामटवली. उजव्या हाताला सिद्धगड़ आणि गोरख-मछिन्द्र आमची साथ करत होते.
गेल्यावर्षी पनवेल जवळ असणाऱ्या प्रबळगड़ - कलावंतीण सूळका येथे गेलो होतो. सवयीप्रमाणे बाइक्स काढल्या आणि सकाळी ६ला ठाण्यावरुन निघालो. मी आणि अभिजितने २००० पासून एकत्रच भ्रमंती सुरु केली. अभि आणि मी एकदम 'बेस्ट ट्रेक बड़ी'. पनवेलनंतर पळस्पे फाटयाला नेहमीप्रमाणे नाश्ता आटोपला आणि सुसाट निघालो ते थेट शेडुंग फाटयाला डावीकड़े वळालो, कर्जत - पनवेल रेलवेचा बोगदा लागला त्यापलीकडे प्रबळगड़ दिसत होता. पायथ्याला ठाकुरवाडीला पोचलो. ठाकुरवाडीच्या डाव्या हाताला असलेल्या टेकाडावरुन कलावंतीण सुळक्याकड़े रस्ता वर जातो. त्या टेकाडाच्या पायथ्याला गाडया लावून निघालो.