दिवस कलता कलता बैलगाडी पाचाडजवळ पोचली. गाडीत लवंडलेला येसाजी गाडीच्या कठड्याचा आधार घेत उत्सुकतेने हळूहळू उठून बसला आणि समोर बघू लागला. दिवसभराच्या प्रवासाने कंटाळलेली त्याची नातही आता हुशारली आणि आज्याच्या मागून त्याला बिलगून समोर बघू लागली. गाव माणसांनी फुलून गेला होता. येसाजीची कारभारीण धर्माला म्हणाली, " धर्मा, ल्येका, त्या झाडाच्या बुडाशी सोड गाडी. बैलास्नी पानी पाज. आज लय दमलीत बैलं. तिकडं हीर हाय बग." धर्माने मान हलवली. गाडी झाडाखाली आल्यावर बैलांना चुचकारून खाली उडी मारत तो म्हणाला, " मामी, तू चूल मांड पलीकडं.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या संरक्षणासाठी प्रबळ आरमाराची उभारणी केली. स्वत:ची प्रबळ आरमारीशक्ती असलेले आधुनिक भारताच्या इतिहासातील हे एकमेव उदाहरण. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांना ‘भारतीय नौदलाचे जनक’ म्हटले जाते. योगायोगाने यंदाच्या शिवजयंतीनंतर लगेचच भारताचे राष्ट्रपती येत्या 21
चीन आणि पाकिस्तान आपली शेजारी राष्ट्रे ज्यांनी वारंवार आपल्या परराष्ट्रीय धोरणांमधल्या त्रूटी किंवा राजकीय नेत्यांचा अतिविश्वास शोधून विश्वासघात केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीनशी पुढे व्यापार करावा की नाही, पाकिस्तान ला औषधे द्यावी किंवा नाही यावर नागरिक मत प्रदर्शन करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शन करण्यासाठी छ.शिवाजी महाराज दगाबाज शत्रूशी कसे वागले ही इतिहासप्रेमी निनाद बेडेकरांनी चिंचवड मधील जिजाऊ व्याख्यानमालेमधील अपरिचीत गोष्ट सांगाविशी वाटते.
आता पुढील शब्द निनाद बेडेकरांचे आहेत जे अनेक वर्ष मनात, हृदयात साठवलेले आहेत.
सर्वप्रथम हे मान्यच करायला पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व महाराष्ट्राचे दैवत आहे. त्यांचे चरित्र अतुलनीय आहे. इतिहासात एक द्रष्टा राजा, कुशल राज्यकर्ता, सेनापती, संघटक, शककर्ता, प्रजाहितदक्ष; इतकेच काय - सिंहासनाधीश्वर, प्रौढप्रतापपुरंधर, राजाधिराज - अशी कितीतरी विशेषणे लावली तरी ती कमीच पडतील. त्यांच्या विषयी लिहिताना रामदासस्वामीं पासून ते आजपर्यंत कित्येक इतिहासकार, कादंबरीकर, नाटककार, चित्रपटकथालेखक यांची लेखणी थकली तरी त्यांचे संपूर्ण वर्णन लिहायला ती अपुरीच पडेल इतके उत्तुंग व्यक्तिमत्त्व!
नजरबाज(भाग २)
त्याने खानाच्या सैन्याची इतंभूत माहिती राजांना कळवली, त्यानुसार महाराजांनी आपली पुढची चाल ठरवली. गडावर परतल्यानंतर महाराजांची कौतुकाची थाप त्याच्या पाठीवर पडली आणि त्याला वाटले आपल्या जीवनाचे सार्थक झाले. ती थाप अजूनही त्याच्या लक्षात होती.....
।।क्रमश।।
छत्रपती शिवजी महाराजांनी ३ एप्रिल १६७९ रोजी लिहिलेले हे पत्र औरंगजेबाला लिहिलेले बहूदा शेवटचे पत्र असावे. ह्या पत्रात ते जिझिया कराकरिता औरंगजेबाचा तीव्र शब्दात निषेध करतात आणि पुर्वीच्या पादशहांची, खास करुन अकबराची आठवण करुन देतात. 'पादशहाचे घरी दारिद्र्याचा वास जाहला', 'या प्रकारचे करण्यातच पुरुषार्थ पादशहा समजतात', 'गरीब मुंग्या चिलटासारख्या आहेत त्यांस उपद्रव करण्यात मोठेपणा नाही.' असेही बजावतात.
*********************************************************************************
"शिवाजी" या नावात एकेरी उल्लेख असूच शकत नाही
'शिव' ला "जी" हा आदरार्थी शब्द जोडलाय….
आणि त्यानंतर "शिवाजी" हे नाव पूर्ण झालेय….
हल्ली बरेच जण "शिवराय" असा उल्लेख करतात. - (मी ही करतो कारण हे नाव मलाही खूप चांगल वाटत. पण शिवाजी या नावातही एकेरी उल्लेख नाहीय)
शिव हे नाव आणि राय हि पदवी… आदर दाखवणारा शब्द.
शिवराई - स्वराज्याचे चलन "शिवराई" शिवाजी महाराजांचे स्वतःचे चलन
त्यावर " एका बाजूला "श्री राजा शिव"
राजं यवु नगा...परत फ़िरा
राजं यवु नगा....
तुमच्या मावळ्यांनी मिशा कापल्यात कव्हाच,
डोस्क्याच्या पगड्या सुटल्यात कव्हाच...
मावळे निजलेत ढोरावाणी...राजं...
राजं यवु नगा...राजं तुम्ही यवु नगा...
तुमचा म्हाराष्ट्र इकलाय पहारेकर्यांनी,
किल्ले लुटले तुमचे किल्लेदारांनी....
सोवळी सुटलीत कस्पटावाणी....राजं..
राजं यवु नगा...राजं तुम्ही यवु नगा...
आमच्या तलवारी गंजलात समद्या,
भिताडाला लटकत्यात दांडपट्टे आता...
भगवा आता सरंजामांनी चोरला...राजं....
राजं यवु नगा...राजं तुम्ही यवु नगा...
राजं..आमचं रगात पाणी झालंय कव्हाच,
माणुसकीची सुंता झालीय राजं तव्हाच...
३-४ दिवसापुर्वी अचानक फेसबुकवर एका मित्राने एक शिवकालीन पत्र सापडले अशी पोस्ट टाकली आणि सोबत खाली दिलेल्या पत्राचा हाच फोटो दिलेला होता. मला अत्यानंद झाला. पण क्षणापुरता....... कारण.....