छत्रपती शिवजी महाराजांनी ३ एप्रिल १६७९ रोजी लिहिलेले हे पत्र औरंगजेबाला लिहिलेले बहूदा शेवटचे पत्र असावे. ह्या पत्रात ते जिझिया कराकरिता औरंगजेबाचा तीव्र शब्दात निषेध करतात आणि पुर्वीच्या पादशहांची, खास करुन अकबराची आठवण करुन देतात. 'पादशहाचे घरी दारिद्र्याचा वास जाहला', 'या प्रकारचे करण्यातच पुरुषार्थ पादशहा समजतात', 'गरीब मुंग्या चिलटासारख्या आहेत त्यांस उपद्रव करण्यात मोठेपणा नाही.' असेही बजावतात.
*********************************************************************************
३-४ दिवसापुर्वी अचानक फेसबुकवर एका मित्राने एक शिवकालीन पत्र सापडले अशी पोस्ट टाकली आणि सोबत खाली दिलेल्या पत्राचा हाच फोटो दिलेला होता. मला अत्यानंद झाला. पण क्षणापुरता....... कारण.....
शके १५५७ म्हणजेच इ. स. १६४५ च्या एप्रिल महिन्यात १५ तारखेला वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी राजांनी स्वराज्य शपथ वाहिली. रोहिड खोरे आणि वेळवंड खोरे येथील देशपांडे - कुलकर्णी दादाजी नरसप्रभु हे राजांसोबत होते असे काही वतनदारांकडून कळल्यावर आदिलशहाच्या शिरवळ येथल्या सुभेदाराने त्यांना ३० मार्च १६४५ रोजी धमकीवजा पत्र पाठवले होते. या पत्रामुळे दादाजी व त्यांचे बावा चिंतेत असल्याचे कळताच राजांनी त्यांना 'हे राज्य व्हावे हे श्रीचे मनांत फार आहे' या आशयाचे पत्र पाठवले.
प्राचीन राजनीतीपर ग्रंथांमध्ये बलाचे ३ प्रकार सांगितले आहेत.
मंत्रशक्ती, उत्साहशक्ती आणि प्रभुशक्ती.
ज्येष्ठ शुध्द त्रयोदशी, शके १५९६ या दिवशी 'महाराजांनी शिरी छत्र धरले. राजे चक्रवर्ती सम्राट झाले. मराठा राजा छत्रपती जाहला ही गोष्ट सामान्य नाही जाहली.'