बदअमलाबद्दल कड़क शासन...

Submitted by सेनापती... on 18 December, 2012 - 22:31

३-४ दिवसापुर्वी अचानक फेसबुकवर एका मित्राने एक शिवकालीन पत्र सापडले अशी पोस्ट टाकली आणि सोबत खाली दिलेल्या पत्राचा हाच फोटो दिलेला होता. मला अत्यानंद झाला. पण क्षणापुरता....... कारण.....

हे पत्र पुर्वीपासूनच उपलब्ध होते. त्याचा पुर्ण मराठी अनुवाद १९४२ सालीच डॉ. रामदास यांनी त्यांच्या 'पत्ररुप शिवदर्शन' मध्ये दिलेला आहे. त्यानंतर दीर्घकाळ, म्हणजे तब्बल किमान ७०-७५ वर्षे या पत्राचा ठावठिकाणा नव्हता याचा अर्थ मंडळाच्या दफ्तरखान्यात हे पत्र नीट वर्गीकरण करून ठेवलेले नव्हते असा होतो. हे दुर्दैवी आहे. जुन्या कागदपत्रांची निगा कशी राखायला हवी हे त्यांस ठावूक नाही काय? नव्हते काय?

मंडळाकडे असलेल्या सर्व पुरातन कागदपत्रांची निगा राखण्याच्या दृष्टीने त्यांनी पावले उचलायला हवीत. आयश्यक ती रसायने त्यावर लावून, सर्व कागदपत्रांचे संगणकीकृत वर्गीकरण व्ह्यायला हवे. हे काम मोठे असले तरी महत्वाच आहे. अन्यथा पुढे ही अशीच अनेक पत्रे पुन्हा पुन्हा सापडतील....
.
.
स्त्रियांशी गैरवर्तन करणाऱ्या लोकांविरुद्ध शिवरायांचे धोरण अतिशय कडक होते. ह्या बाबतीत ते कोणाचाही मुलाहिजा ठेवत नसत. 'बदअमलाबद्दल कड़क शासन' ते करत असत. जानेवारी १६४६ मध्ये त्यांनी रांझे गावचा पाटील बाबाजी उर्फ़ भिकाजी गुजर याला एका स्त्री सोबत गैरवर्तनासाठी चौरंग करण्याची शिक्षा दिली होती. (चौरंग करण्याची शिक्षा म्हणजे दोन्ही हात व दोन्ही पाय तोडणे, पण त्यानंतर माणूस रक्तस्त्राव होउन दगावू नये ह्यासाठी जखमा गरम तुपात बूडवल्या जात.) आणि त्याचाच कुळातील सोनजी गुजर ह्याला २८ जानेवारी १६४६ च्या पत्रानुसार राजांनी पाटिलकी मान्य केली आहे.

सदर पत्रात राजांनी काय लिहिले होते ते बघूया....

राजेश्री सिवाजीराजे दामदौलत ज्यानिब कारकुनानी हाल व इस्तकबाल देसमुखानि व देसकुलकर्णियानी तर्फ खेडेबारे बिदानद के सुहुरसन सीत अर्बैन अलफ बावाजी बिन भिकाजी गुजर मोकदम मौजे रांजे तर्फ मार हा मौजे मारची मोकदमी करित असता यासपासुन काही बद अमल जाला हे हकिकत हूजूर साहेबाशी विदित जाली. त्यावरून बहुकुमी तलब करुन साहेबी हुजुर आणुन वाजपुस करिता खरे जाले याकरिता बावाजी याची वतनी मोकदम हुरुर अनामत केली. बावाजीचे हातपाय तोडून अनामत केला ते वरुती सोनजी गुजर किले पुरंधर हे जनात गोत म्हणुन येउन अर्ज केला. जे आपले हाती देणे बराय अर्ज खातिरेस आणुन बावाजी मार याचे माथा गुन्हेगार होन पा तीनसे करार केले ते सोनजी मार याने देउन बावाजीस हाती घेतले. याचे पोटी संतान नाही हे कुळीचे गुजर होउन साहेबी मेहेरबान होउन मौजे रांजे ता माची मोकदमी सोनजी बीन बयाजी गुजर याचे दुमाला करून याजपासून दिवाणात सेरणी होन पा दोनसे होन करार करून घेउन मोकदमी त्यास दिधली. असे यास कोणी मुजाहीम न होणे असल पत्र फिराउन भोगवटियास देणे.
उजुर न करण.

मोर्तब सुद.

रुजु सुरनिवीस

मायबोलीवर पूर्वप्रकाशित इतर ऐतिहासिक पत्रे :
तुर्काचा जवाब तुर्कितच दिला पाहिजे..
हे राज्य व्हावे हे श्रींचे मनात फार आहे
सर्व ज्ञातीने कस्त करून शत्रु पराभवाते न्यावा...
ब्राह्मण म्हणुन कोण मुलाहिजा धरु पाहतो?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अशा प्रकारची बातमी पेपरमध्येही वाचली होती. शिवरायांचे सर्वात जुने पत्र सापडले असा उल्लेख होता त्यात

हे पत्र आधीच सापडलं होतं ना? ते सध्याच्या दिल्ली घटनेमुळे फेबुवर नव्याने परत एकदा टाकलं गेलं असेल. आय विश, अशा काही शिक्षा अजुनही अस्तित्वात असत्या. Sad

शिवरायांचे सर्वात जुने पत्र सापडले अशी बातमी एका मराठी वृत्तवाहिनी वर पाहिली होती. त्यात
वरिल पत्राची मुळ पत्र दाखविली होती.

माउ... दिल्लीच्या घटनेशी या पत्राचा फेबुवर येण्याशी काहीही संबंध नाही. इथे (माबोवर) लावला तरी हरकत नाही.

हे पत्र १९२७ सालीच उपलब्ध होते आणि मराठीत अनुवादीत झाले होते. मी वर अनुवाद दिला आहे तो १९४२ च्या डॉ. रामदासांच्या पुस्तकातला आहे. Happy मग हे पत्र कुठेतरी गहाळ झाले ते काही दिवसापुर्वी पुन्हा नव्याने सापडले. अवस्था बघा आता त्याची... Sad

अजून एक आवर्जुन सांगण्यासारखे म्हणजे हे राजांचे कायम स्वरुपी धोरण होते. लोकांची सहानभुती मिळावी म्हणून त्यांनी अशी शिक्षा देण्याचा निर्णय घेतला नव्हता कारण १६७७ च्या आसपास त्यांनी स्वतःचा निष्ठावान सेनापती सखोजी गायकवाडला देखील ह्याच आरोपाखाली हात कापण्याची शिक्षा दिली होती.

मुघल-आदिलशाही काळात स्त्रियांची गुलाम म्हणून विक्री होत असे. स्वराज्यात ते आठवडी बाजार त्यांनी बंद करवले.

रोहन, आपल्याकडे इतिहासाबद्दल अनास्था कोणत्या थराला पोचली आहे त्याचे उदाहरण.

शिवरायांनी दिलेल्या या शिक्षेचा परत वापर सुरू करावा असे वाटण्यासारखे दिवस परत आले आहेत, हे आमचे दुर्दैव.

अवांतर :
मुघल-आदिलशाही काळात स्त्रियांची गुलाम म्हणून विक्री होत असे. स्वराज्यात ते आठवडी बाजार त्यांनी बंद करवले.

>>>

ह्याबाबत शंका आहे . माझ्या माहीती नुसार महाराज प्रचंड इच्छा असुनही हे करु शकले नव्हते ... मग पर्याय म्हणुन त्यांनी गुलामांच्ह्या विक्रीवर प्रचंड टॅक्स बसवला होता ...

प्रसाद... ह्याला काही पुरावा? मी माझ्या म्हणण्याला दुजोरा म्हणुन लवकरच एक पुरावा देईन.

सध्या कामावर आहे आणि संदर्भ हाताशी नाहीत.

प्रसाद.. एक रेफ. मिळालाय. हा बघ. शिवाजी राजांनी १६७७ नंतर दक्षिण दिग्विजय दरम्यान तिथल्या वलंदेज म्हणजे हॉलंद्स / ड्च अधिकार्‍याला लिहिलेले पत्र...

Shivaji’s letter to Dutchmen about trade agreement is very important here.

He says,“Under the rule of Mohammedans, you had unrestricted permission to sell & purchase men & women as slaves. But now in my territory you will not have permission for the sell & purchase men & women as slaves. Were you to try, you will be prohibited from doing so by my men.

राजांना दक्षिणॅत जाउन अवघे २ वर्ष झालेली असताना जर ते ह्याचा अवलंब करु शकत असतील तर कोकणात आणि इतरस्र हे केले नसेल????