"शिवाजी" या नावात एकेरी उल्लेख असूच शकत नाही
'शिव' ला "जी" हा आदरार्थी शब्द जोडलाय….
आणि त्यानंतर "शिवाजी" हे नाव पूर्ण झालेय….
हल्ली बरेच जण "शिवराय" असा उल्लेख करतात. - (मी ही करतो कारण हे नाव मलाही खूप चांगल वाटत. पण शिवाजी या नावातही एकेरी उल्लेख नाहीय)
शिव हे नाव आणि राय हि पदवी… आदर दाखवणारा शब्द.
शिवराई - स्वराज्याचे चलन "शिवराई" शिवाजी महाराजांचे स्वतःचे चलन त्यावर " एका बाजूला "श्री राजा शिव"
आणि "दुसऱ्या बाजूला "छत्रपती"
अस लिहिलंय…
म्हणजे "शिव" हे राजांचे नाव होते
तर "जी" हा आदरार्थी लावलेला शब्द होता हे स्पष्ट होते.
राजांना लहानपणापासूनच "शिवाजी" म्हणत. आणि पुढे हि शिवाजीच म्हणतील.
[यात एकेरी उल्लेख होतो अस बिनडोक लोकांनी अजिबात म्हणू नये. आणि जे म्हणतात त्यांना "शिवाजी" अजूनही कळलेले नाहीत अस म्हणायला हरकत नाही.]
काही लोक "जय भवानी, जय शिवाजी" या मराठ्यांच्या घोषणेवर आक्षेप घेतात.
आणि आक्षेप घेताना "शिवाजी" हे नाव एकेरी उल्लेख आहे अस दर्शवतात.
कारण -
घोषणेत 'जय शिवाजी' या नावाच्या आधी "जय भवानी" म्हटलंय.
आणि हिंदू विरोधी लोकांना "जय भवानी" मान्य नाही. '
"जय जिजाऊ, जय शिवराय"
या घोषणेत गैर काहीच नाहीय.
पण "जय भवानी जय शिवाजी" हि घोषणा म्हणताना शिवरायांचा एकेरी उल्लेख होतो अस म्हणणे चुकीच आहे
"जय भवानी जय शिवाजी" घोषणेत
मग "जय शिवाजी" या नावाच्या आडून जय भवानी हे नाव पुसून टाकले व "जय जिजाऊ, जय शिवराय" हि नवीन घोषणा आजकाल पसरवली जात आहे (षडयंत्र ओळखा हिंदूंनो, जय भवानी म्हणायला विसरू नका)
लेखक- गणेश पावले
श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान
अचूक युक्तिवाद.... हे लक्षातच
अचूक युक्तिवाद.... हे लक्षातच आले नव्हते आधी.
धन्यवाद.
पावले सर, लिंबूकाका, सहमत.
पावले सर, लिंबूकाका, सहमत.
"जय जिजाऊ, जय शिवराय" या
"जय जिजाऊ, जय शिवराय"
या घोशणेत गैर काय आहे ?
"जय जिजाऊ, जय शिवराय" या
"जय जिजाऊ, जय शिवराय"
या घोषणेत गैर काहीच नाहीय.
पण "जय भवानी जय शिवाजी" हि घोषणा म्हणताना शिवरायांचा एकेरी उल्लेख होतो अस म्हणणे चुकीच आहे
पण शिवाजी महाराजांचा प्रेमाने
पण शिवाजी महाराजांचा प्रेमाने एकेरी उल्लेख केला गेला तर चालणार नाही का? आपण भगवंतालाही एकेरी नावाने हाक मारतो. विठ्ठल, शंकर, गणपती, मारुती असे! तसेच काही लोकोत्तर व्यक्तिमत्त्वांनाही एकेरी संबोधतो. तुका, कलिदास, झाशीची राणी, टिपू सुलतान वगैरे!
मला वाटते की अनेकदा ते व्यक्तिमत्त्व कोणत्या काळातील किंवा किती जुने आहे ह्यावरही ते ठरत असावे. जसे, गांधी गेल्याच शतकात होऊन गेल्यामुळे 'तो गांधी' असे कोणी म्हणत नाही. हेच टिळक, सावरकर, नेताजी, बाबासाहेब ह्यांच्याबाबत होत असावे. पण ज्ञानेश्वर जुने आहेत, त्यांचा उल्लेख ग्यानबा असा केला जातो. तुकारामांना तुक्या म्हणणारेही खूप आहेत. तसेच शिवरायांचेही होत असावे. त्यातून एकेरी उल्लेख करण्याच्या इच्छेपेक्षा श्रद्धेतून निर्माण झालेले अतीव प्रेम व्यक्त होत असावे असे वाटते.
आता शिवाजी महाराजांबद्दल वाटणारी ही आपुलकी, प्रेम, श्रद्धा हे सगळे ह्या 'एकेरी की आदरार्थी' अश्या प्रकारच्या वादामुळे प्रभावित होऊ शकेल, असे नाही का वाटत?
बेफी, ग्यानबा, तुक्या हे
बेफी, ग्यानबा, तुक्या हे अभंगात वैगेरे असेल. पण
'संत ज्ञानेश्वर एक महान संत होता.
किंवा तुक्या म्हणजे तुकाराम असा एक महान संत होउन गेला.'
असं कुणीही म्हणत नाही. तेव्हा संतांचाही एकेरी उल्लेख होत नसावा.
हिंदू विरोधी लोकांना "जय
हिंदू विरोधी लोकांना "जय भवानी" मान्य नाही. ' >>>> फाट्यावर मारा हो पावले साहेब अशांना !
असे किती आले न किती गेले. हिंदू मात्र अनादी काळापासून आहे न तो तसाच राहील..
हिंदूला कोण धक्का लावणार ! ऐवढी ऐपत नाहीये कोणाची ...
घराच्यावरीं ठेविती तुळशीपत्र
घराच्यावरीं ठेविती तुळशीपत्र |
उरीं धगधगे ' हिन्दवीराज्य' मंत्र ||
जरी प्राण गेला तरी नाही खंत |
अशांची 'शिवाजी' असे जन्मजात ||
महाराजांचा उल्लेख फक्त शिवाजी
महाराजांचा उल्लेख फक्त शिवाजी करताना आदरार्थी बहुवचनाने करण्यास हरकत नाहि (उदा. आले, गेले, होते इ.), परंतु काहि दीडशहाणे महाराजांचा उल्लेख जेंव्हा एकेरी (आला, गेला, होता) करुन स्वतःचं अज्ञान पाजळतात तेंव्हा मात्र त्यांची किंव येते....
फाट्यावर मारा हो पावले साहेब
फाट्यावर मारा हो पावले साहेब अशांना !
असे किती आले न किती गेले. हिंदू मात्र अनादी काळापासून आहे न तो तसाच राहील..
हिंदूला कोण धक्का लावणार ! ऐवढी ऐपत नाहीये कोणाची ...>>>+१११११११११
ह्याची दुसरी बाजू
षडयंत्र ओळखा हिंदूंनो,>>>+११११११११
हल्लीच्या हिंदूंमध्ये ती ताकद असती तर बातच काही और होती . मा बो वरच्या वरच्या अनेक लेखांमधून आणि त्यावरच्या प्रतिसादांमधून हिंदू षडयंत्र ओळखण्याचं बाजूलाच राहूद्यात उलट स्वतःच त्याच्यात सामील होवून स्वतःच्या पायावर धोंडा पडून घेतायेत .चांगला फटका बसेपर्यंत त्यांचे डोळे उघडणार नाहीयेत .
लेख आवडला. महाराजांना
लेख आवडला.
महाराजांना घडवण्यात त्यांच्या आईचा जिजाऊचा मोठा वाट होता. सर्व देवात पहिला मान आईचा. त्यामुळे हि घोषणा "जय जिजाऊ, जय शिवराय, जय भवानी" अशी योग्य वाटेल. आपल्या महाराष्ट्राला लाभलेला लोकशाहीवादी नि धर्मनिरपेक्ष सर्व धर्मांना समान न्याय देणारा राजा म्हणून शिवराय हे सर्वांना वंदनीयच राहतील.
सचिन पगारे, शिवराय
सचिन पगारे,
शिवराय लोकशाहीवादी नि धर्मनिरपेक्ष कसे होते ते जरा सविस्तरपणे स्पष्ट करणार का?
आ.न.,
-गा.पै.
देव,राजा,मित्र, आई यांचा
देव,राजा,मित्र, आई यांचा उल्लेख हा एकेरीच असतो असे व्याकरणात सांगतात. पानसरेंचे शिवाजी कोण होता? यावर काही लोकांनी एकेरी उल्लेख म्हणुन नाराजी व्यक्त केली होती. अहो जाहो हा उल्लेख औपचारिक असतो. वर उल्लेख केलेली नाती ही औपचारिक नसतात. बर्याचदा संतांचे उल्लेख देखील एकेरीच करतात. पुलंचे कुठ तरी वाचल होत एका साहित्यिकाची मुलगीही साहित्यिक असते तेव्हा अमुक अमुक या सुप्रसिद्ध साहित्यिक तमुक तमुक यांच्या 'मुलग्या' आहेत.मुलगी अस एकेरी कस म्हणायच ना?
पुलंचे कुठ तरी वाचल होत एका
पुलंचे कुठ तरी वाचल होत एका साहित्यिकाची मुलगीही साहित्यिक असते तेव्हा अमुक अमुक या सुप्रसिद्ध साहित्यिक तमुक तमुक यांच्या 'मुलग्या' आहेत.मुलगी अस एकेरी कस म्हणायच ना? >> तमुक ढमुक यांच्या पुत्री आहेत - असा एक पर्याय आहे.
ज्यांनी रत्नागिरीच्या कोर्टात
ज्यांनी रत्नागिरीच्या कोर्टात आपल्या जुन्या नावाचे एफिडेविट करुन आदराअर्थी नाव लावुन घेतले तरी जनता त्यांना आदरार्थी मानत नाही हेच काय ते सत्य..!