छत्रपती शिवाजी महाराज
सप्त शिवपदस्पर्श : भाग ३ - तोरणा ... !
सप्त शिवपदस्पर्श : भाग १ - पुरंदर - वज्रगड - सिंहगड ... !
सप्त शिवपदस्पर्श : भाग २ - राजगड ... !
दिवस - ५
आज होता ट्रेकचा पाचवा दिवस. गेल्या ४ दिवसात ४ किल्ले सर करत आता आम्ही निघालो होतो 'किल्ले तोरणा' कड़े. सकाळी झटपट आवरून निघालो. संजीवनी माचीवरच्या अळू दरवाजामधून निघून थेट तोरणा गाठता येतो पण आम्हाला राजगडाच्या राजमार्गाने उतरायचे होते. त्यामुळे आम्ही पाली दरवाजा गाठला.
सप्त शिवपदस्पर्श : भाग २ - राजगड ... !
सप्त शिवपदस्पर्श : भाग १ - पुरंदर - वज्रगड - सिंहगड ... !
२००२ सालचा ट्रेक आहे हा. तब्बल ८ वर्षांपूर्वीचा. त्यावेळी आमच्याकडे रोल भरायचा अवघा एक कॅमेरा होता. सोबत अजून एक रोल घेतला होता. तेंव्हा ट्रेकच्या १० दिवसात ७२ ह्या अंदाजाने आम्ही दररोज अवघे ७ - ८ फोटो काढाचे असे ठरवून होतो. तेंव्हा ह्या ट्रेकचे सुद्धा जास्त फोटो नाहीत माझ्याकडे नाहीत हे सांगायला नको. जे आहेत ते सुद्धा जुने आहेत. फोटोंचा दर्जा चांगला नसेल पण असे फोटो बघायला देखील मज्जा येते.
गेल्या ८ वर्षात मी सिंहगड, राजगड आणि रायगड ह्या गडांवर अनेकदा गेलो तेंव्हाचे काही फोटो लिखाणासोबत देणार आहे.
सदर ट्रेकच्या १० दिवसाचे वर्णन एकूण ५-६ भागात लिहायचा मानस आहे.
छत्रपती शिवाजी महाराज
माध्यम : ऑइल
हा छत्रपती शिवाजी महाराज ना कॅनव्हास वर रंगविन्याचा एक प्रयत्न...छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्याचेंच आदर्श स्थान आहेत..त्यामळे काही चुकले असल्यास माफी करावी (मी काहे लेखक नाही एक साधा शिकाऊ चित्रकार आहे त्यामुळे प्रस्तवाना जास्त लिहीत नाहिये)
महाराजांबद्द्ल थोडस....
ज्या देवाने या माती मध्ये उभे राहुन या मातीसाठी या मातीतुनच हिंदवी स्वराज्य उभे केले त्या देवाला त्रिवार वंदन.
टिपः हे चित्र मी आभियांत्रीकीच्या शेवट्च्या वर्षाला काढले होते(वर्ष : २००६), आणि महाराजांची मान खुप जास्त सरळ आली आहे त्यासाठी दिलगीरी व्यक्त करतो
गतिमान 'जाणता राजा'
काल जाणता राजा हे नाटक पहिल्यांदा बघितले. त्यातील ते अतिभव्य सेट, अचाट कलाकुसर आणि कलावंतांचा काफिला बघताना मन हरवून गेले. बाबासाहेब पुरंदर्यांच्या कल्पनाशक्तीची कमाल वाटते. ज्याकाळी हे एवढे प्रचंड नाटक नुसते स्वप्नात डोळ्यांपुढे उभे करणे कठीन, तिथे त्या माणसाने ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवून दा़खवले. नुसते दाखवूनच नाही तर चालवूनही दाखवले आणि अजूनही शंभर वर्षे त्या नाटकाला मरण नाही.
अफझलखान वध : शिवप्रताप दिवस ... १० नोव्हेंबर १६५९
सन १६५५ - १६५६...
भटकंतीची १० वर्षे ...
बघता बघता भटकंतीची १० वर्षे सरली. कधी? कशी? काहीच कळले नाही. ह्या १० वर्षात अनेक चांगले-वाईट अनुभव आले. गावागावातून विविध स्वभावाची लोक भेटली. खूप काही शिकलो. खूप काही घेतलं. काही देता आलं आहे का माहीत नाही. म्हणतात ना 'निसर्ग सर्वोत्तम शिक्षक आहे' पूर्णपणे पटले ह्या १० वर्षात. कधी उन्हात करपुन निघालो तर कधी पावसात भिजून. कधी वाटले नदीत वाहून जाईन की काय तर कधी वाटले दरीत पाय सरकतो की काय. नुसत्या पाण्या आणि पार्ले-जी च्या पुड्यावर सुद्धा दिवस काढले तर कधी गुलाबजाम सुद्धा हाणले. माझी प्रत्येक भटकंती काहीतरी नवीन देऊन जातेय मला.
दुसरी सुरत लुट आणि मराठा - मुघल लढाई ...
१६ वर्षात जे कमावले ते जवळ-जवळ सर्व पुरंदरच्या तहात राजांनी गमावले होते. लढण्याची किमान ताकद शिल्लक राहिली होती. सोबत होती ती फक्त प्रचंड आत्मविश्वासाची, निर्धाराची, जिजाउंच्या आशीर्वादाची आणि स्वराज्यस्वप्न साकार करायचेच ह्या ध्येयाने झपाटलेल्या सोबतींची. नोव्हेंबर १६६६ मध्ये आग्र्याहून स्वतःची सुटका करून परत आल्यावर शिवरायांनी औरंगजेबाच्या दख्खन सुभेदाराला म्हणजे शहजादा मुअझ्झम याला 'आपण झालेला तह मोडणार नाही' असे पत्र लिहून स्पष्ट कळवले होते. ह्या मागचे राजकारण साधे सरळ होते. लढण्याची ताकद पुन्हा एकदा निर्माण करायला काही अवधी जावा लागणारच होता.
जलदुर्ग खांदेरी ...
जलदुर्ग खांदेरी... समुद्री मार्गाने मुंबईच्या मुखाशी असणारा एक अत्यंत महत्वाचा असा जलदुर्ग शिवरायांनी राजापुरी येथील सिद्दी आणि मुंबई मधील इंग्रज यांच्या बरोबर मध्ये उभारला.
उदिष्ट्ये होती २ . एक म्हणजे सिद्दीला जमिनीपाठोपाठ आता समुद्री मार्गाने सुद्धा कोंडीत पकडायचे आणि मुंबईला इंग्रजांच्या आश्रयाला जाण्यापासून रोखायचे. तसेच दुसरे म्हणजे थेट मुंबई वर तलवारीचे टोक ठेवायचे. इंग्रजांना धाकात ठेवायचे. मराठ्यांनी इंग्रजांशी केलेल्या राजकारणाचा हा एक मोठा भाग होता.
पाहूया काही महत्वाच्या घडामोडी ज्या सप्टेंबर महिन्यातल्या होत्या...