जलदुर्ग ४ - खांदेरी. उंदेरीच्या जलमुलुखांत.. (भाग १ . उंदेरी): http://www.maayboli.com/node/33168
खांदेरी..! मराठ्यांच्या आरमारी इतिहासातील एक महत्त्वाचा साक्षीदार!! .. खांदेरीच्या कवेत असलेल्या धक्क्यावर आमची नांव लागली. पायउतार होतांना अंगावर रोमांच उभे रहात होते. समोरच कान्होजी आंग्रे द्विप असं नांव असलेली पाटी होती. माझं खूप वर्षांपासून असलेलं स्वप्न आज साकारत होतं. या खांदेरीचा निर्मितीपासूनचा इतिहासच मुळी, केवळ मराठी माणूसच नव्हे तर प्रत्येक भारतीयाची छाती गर्वाने तट्ट फुगावी असा ज्वलंत आहे.
वातावरण सगळे उन्हात होरपळून गेलेले... घामाच्या धारांनी अभिषेक सुरु झालेला मग दिवस असो वा रात्र... हवेचा मागमूस नाही... गेल्या तीन -चार महिन्यात ट्रेक नाही... अश्यातच सरत्या मे महिन्यात 'खांदेरी' ट्रेक ने साद घातली.. नेहमीचा कंपु तयार झाला.. अगदी बच्चेकंपनीसकट.. छोटा-मोठा इंद्रा, छोटा-मोठा भीडे, आमचा मुकादम - गिरी, रो.मा आणि नविन... आमच्यातला सुन्या मात्र नोकरीशी प्रामाणिक राहुन गैरहजर राहीला.. कंपुत दोन पाहुणे.. एक छोटा-मोठा संत्या नि दुसरी मायबोलीकर सेलिब्रेटी म्हणजे कांदबरी.. च्च सॉरी.. नंदिनी ! मान पाहुण्यांचा म्हणून खाण्याची तजवीज करुन येणे आधीच बजावलेले...
सध्या ऊन वाढायला लागलंय. गडमाथ्यांवरचे आणि आडवाटांवरचे पाणीसाठेही आटायला लागलेत. सकाळी दहा-अकराच्या उन्हात टेकडी जरी चढायची म्हटलं तर शरीर घामेजायला लागलंय आणि घसा कोरडा पडायला लागलाय. 'जलदुर्ग' हा अशा वातावरणात हौस भागवणारा पर्याय असू शकतो.
देशाच्या या वर्षी झालेल्या जनगणनेत लोकसंख्येच्या मोजणी बरोबर देवांची पण गणना झाल्याचे ऐकीवात नव्हते पण भक्तांच्या कल्याणाकरीता मंदिरात बसलेल्या ह्या रामाच्या शिष्योत्तमाची पण गणना झाल्याचे बघुन आश्चर्य वाटले..
जलदुर्ग खांदेरी... समुद्री मार्गाने मुंबईच्या मुखाशी असणारा एक अत्यंत महत्वाचा असा जलदुर्ग शिवरायांनी राजापुरी येथील सिद्दी आणि मुंबई मधील इंग्रज यांच्या बरोबर मध्ये उभारला.
उदिष्ट्ये होती २ . एक म्हणजे सिद्दीला जमिनीपाठोपाठ आता समुद्री मार्गाने सुद्धा कोंडीत पकडायचे आणि मुंबईला इंग्रजांच्या आश्रयाला जाण्यापासून रोखायचे. तसेच दुसरे म्हणजे थेट मुंबई वर तलवारीचे टोक ठेवायचे. इंग्रजांना धाकात ठेवायचे. मराठ्यांनी इंग्रजांशी केलेल्या राजकारणाचा हा एक मोठा भाग होता.
पाहूया काही महत्वाच्या घडामोडी ज्या सप्टेंबर महिन्यातल्या होत्या...