दिपगृह

जलदुर्ग ५ - खांदेरी. उंदेरीच्या जलमुलुखांत.. (भाग २ . खांदेरी)

Submitted by हेम on 4 August, 2016 - 15:12

जलदुर्ग ४ - खांदेरी. उंदेरीच्या जलमुलुखांत.. (भाग १ . उंदेरी): http://www.maayboli.com/node/33168

खांदेरी..! मराठ्यांच्या आरमारी इतिहासातील एक महत्त्वाचा साक्षीदार!! .. खांदेरीच्या कवेत असलेल्या धक्क्यावर आमची नांव लागली. पायउतार होतांना अंगावर रोमांच उभे रहात होते. समोरच कान्होजी आंग्रे द्विप असं नांव असलेली पाटी होती. माझं खूप वर्षांपासून असलेलं स्वप्न आज साकारत होतं. या खांदेरीचा निर्मितीपासूनचा इतिहासच मुळी, केवळ मराठी माणूसच नव्हे तर प्रत्येक भारतीयाची छाती गर्वाने तट्ट फुगावी असा ज्वलंत आहे.

Subscribe to RSS - दिपगृह