४ जुलै १७२९ - सरखेल कान्होजी आंग्रे स्मरणदिन.
समाधी स्थळ - ठुकराली नाका, अलिबाग.
तुकोजी संकपाळ व बिंबाबाईचा हा मुलगा राजगुरुनगर येथे जन्मला. नवसाने आणि अंगाऱ्या धूपाऱ्याने जन्मला म्हणुन आडनाव आंग्रे लाविले. त्यांनी ३ लग्ने केली.
पाहिली पत्नी राजूबाई / मथुराबाई कडून त्यांना सेखोजी आणि संभाजी उर्फ़ आबासाहेब अशी २ मुले झाली. सेखोजी हे नाव त्यांच्या आजोबांच्या नाव वरुन ठेवले गेले.
जलदुर्ग खांदेरी... समुद्री मार्गाने मुंबईच्या मुखाशी असणारा एक अत्यंत महत्वाचा असा जलदुर्ग शिवरायांनी राजापुरी येथील सिद्दी आणि मुंबई मधील इंग्रज यांच्या बरोबर मध्ये उभारला.
उदिष्ट्ये होती २ . एक म्हणजे सिद्दीला जमिनीपाठोपाठ आता समुद्री मार्गाने सुद्धा कोंडीत पकडायचे आणि मुंबईला इंग्रजांच्या आश्रयाला जाण्यापासून रोखायचे. तसेच दुसरे म्हणजे थेट मुंबई वर तलवारीचे टोक ठेवायचे. इंग्रजांना धाकात ठेवायचे. मराठ्यांनी इंग्रजांशी केलेल्या राजकारणाचा हा एक मोठा भाग होता.
पाहूया काही महत्वाच्या घडामोडी ज्या सप्टेंबर महिन्यातल्या होत्या...