४ जुलै १७२९ - सरखेल कान्होजी आंग्रे स्मरणदिन.

Submitted by सेनापती... on 4 July, 2012 - 03:59

४ जुलै १७२९ - सरखेल कान्होजी आंग्रे स्मरणदिन.
समाधी स्थळ - ठुकराली नाका, अलिबाग.

तुकोजी संकपाळ व बिंबाबाईचा हा मुलगा राजगुरुनगर येथे जन्मला. नवसाने आणि अंगाऱ्या धूपाऱ्याने जन्मला म्हणुन आडनाव आंग्रे लाविले. त्यांनी ३ लग्ने केली.

पाहिली पत्नी राजूबाई / मथुराबाई कडून त्यांना सेखोजी आणि संभाजी उर्फ़ आबासाहेब अशी २ मुले झाली. सेखोजी हे नाव त्यांच्या आजोबांच्या नाव वरुन ठेवले गेले.

दूसरी पत्नी राधाबाई / लक्ष्मीबाई कडून त्यांना मानाजी आणि तुळाजी असे २ पुत्र झाले. तर तिसरी पत्नी गहिणबाई कडून त्यांना येसाजी व धोंडजी असे २ पुत्र झाले. याशिवाय शेवटी एक मुलगी झाल्याने तिचे नाव 'लाडूबाई' ठेवले गेले.

छत्रपति शिवाजी महाराजांच्या काळात कान्होजी सुवर्णदुर्ग येथे चाकरीला होते. १६८८ मध्ये सुवर्णदुर्गचा किल्लेदार अचलोजी मोहिते पैसे घेउन फितुरीने किल्ला सिद्दीकड़े सोपवणार असे कळल्यावर कान्होजी यांनी सिद्दीविरुद्ध किल्ला लढवला आणि पराक्रम केला.

पुढे १६९८ मध्ये सरखेल सिधोजी गुजर गेल्यानंतर राजाराम महाराजांनी कान्होजी अंग्रे यांना सरखेल (आरमाराचा सरसेनापती) पद सोपवले. ते त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांसकडेच होते. मराठा - मुघल युद्धामध्ये कोकणपट्टी सांभाळण्याचे कार्य कान्होजी आंग्रे यांनी पार पाडले. पोर्तुगीज, इंग्रज आणि सिद्दी यांना त्यांनी चांगलेच जेरिस आणले आणि संपूर्ण भागात आपला वचक प्रस्थापित केला.

१७०७ मध्ये मराठेशाही मध्ये फुट पडल्यावर मात्र त्यांनी कोणाचीही बाजु न घेता स्वतंत्रपणे कारभार सुरु केला. मात्र पुढे त्यांचे बालमित्र असलेले बाळाजी विश्वनाथ पेशवे यांनी त्यांचे मन वळवून सातारा गादी बरोबर वळवंड, लोणावळा येथे तह करवला.

सरखेल कान्होजी आंग्रे यांची मुद्रा -

"शाहूकार्ये धुरंदर तुकोजी तनुजनमानहा कान्होजी सरखेलस्य मुद्री येकम विराजते"

पुढे त्यांनी अलीबाग हे आपले मुख्य ठाणे बनवले जेथे आजही त्यांचे वंशज राहतात. ४ जुलै १७२९ रोजी ह्या विराला मरण आले. परकियांची सत्ता या भूमीत रोवु न देण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी पार पाडले. त्यांना लक्ष्य लक्ष्य प्रणाम ...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओह्हो!! 'आंग्रे' आडनावाची मजेदार व्युत्पत्ती कळली.. Happy
धन्स रोहन, तुझ्यामुळे किती इतिहास समजतो..

शिवरायांनी आरमाराचे महत्व ओळखून निर्माण केलेले आरमारी द्ल आणखी नावारूपाला आले ते कान्होजींमुळे! त्यांचे स्मृतीस अभिवादन!
त्यांनी केलेल्या ठळक आरमारी लढायांबद्दल वाचण्यास आवडेल.

त्यांनी केलेल्या ठळक आरमारी लढायांबद्दल वाचण्यास आवडेल.
>>> मी नक्की लिहेन. मागे ज्योती ताईंनी देखील मला सुचवले होते ह्यावर. काही वाचन सुरु आहे ते पुर्ण झाले की नक्की लिहेन.

सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या स्मृतिस अभिवादन!!!

रच्याकने - समाधी स्थळ - ठुकराली नका झालय, ते नाका असं पाहिजे होतं का?

रोहन, तुझी 'इतिहास' विषयातील रुची वाखाणण्याजोगी तर आहेच पण त्या अभ्यासाच्या साहाय्याने इथल्या सदस्यांत इतिहासाचे जे प्रेम तू निर्माण करतोस आपल्या लेखणीच्या मदतीने, त्याबद्दल खास अभिनंदन करतो तुझे.

सरखेल कान्होजी आंग्रे यांच्याविषयी लिहायचेच झाल्यास ते खर्‍या अर्थाने 'लॅण्डशार्क' होते. हे विशेषनाम ब्रिटिशांनी कान्होजीना बहाल केले होते कारण कान्होजी केवळ 'पाण्या'चे सरदार नव्हते तर जमिनीवर देखील त्यांचा पराक्रम ब्रिटिश आणि पोर्तुगीज दोघांच्याही चिंतेचा विषय बनला होता. व्यापारी वसाहतीवर मालकी कोणाचीही असो पण त्या शतकाच्या कालावधीत कोकणच्या पाण्यावर एकट्या कान्होजींचीच सत्ता होती हे सर्वमान्य होते. थोरल्या छ्त्रपतींच्या साम्राज्याला आपल्याकडील अपरिहार्य अशा कौटुंबिक कलहाने तडा गेला असता त्याही कालखंडात दोन महासत्ताशी आपले सर्वस्व पणाला लावून पश्चिम सागरावर मराठेशाहीचीच हुकमत असल्याचे कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमाने सिद्ध झाले होते.

[अवांतर : "आंग्रे" कुलनामाची व्युत्पत्ती तू दिली आहेस, पण माझ्या वाचनात असे आले होते की कान्होजींचे "आंग्रे" हे आडनाव पुण्याजवळच्या "आंगरवाडी" वरून पडले. या घराण्याचे मूळ आडनाव 'संकपाळ' असल्याची रियासतकारी नोंद आहे. कान्होजीच्या अगोदरच्या पिढीतील सारे पुरुष आपले आडनाव 'संकपाळ' असेच लावीत.]

अशोक पाटील

"आंग्रे" कुलनामाची व्युत्पत्ती जी मी दिली आहे तीस मळगावकर यांच्या पुस्तकाचा संदर्भ आहे. अजुन ३ नवी पुस्तके वाचवयाची आहेत. त्यातुन काही नव्याने कळले तर नक्की बदल करीन. तुमचे मार्गदर्शन स्वागतार्ह आहे. Happy

जरूर...... माझ्या माहितीच्या आधारे तू स्वतःच्या वाचनाची दिशा बदलू नकोस. मी लिहिले आहे ते स्मरणातून [खात्रीसाठी परत रियासतीकडे जातोच.]

छान संकलन सेनापती.
सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या कार्यकाळात लढलेल्या महत्वपूर्ण लढायांची माहीती, निनाद बेडेकर यांच्या "विजयदुर्गाचे रहस्य" या छोटेखानी पुस्तकात अगदि सविस्तर मिळते.

सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या स्मृतीस अभिवादन. त्यांच्या बासष्ट वर्षाच्या पराक्रमी कारकिर्दीत ते जवळ-जवळ ३१ वर्षे मराठा आरमाराचे सरखेल होते.

समाधी स्थळ - ठुकराली नाका, अलिबाग. >> सेन्या.. चांगली माहिती.. ठुकराली नाही ठिकरुळ नाका नाव आहे.. आणि ठिकाण चुकलाय्स वाट्टय ठिकरुळ नाका नाही जोगळेकर नाका असावा तो कन्फर्म कर बघू..

सुवर्णदुर्ग किल्ला म्हणजे सध्याचा विजयदुर्ग किल्ला ..
सिंधुदुर्ग जिल्हा , देवगड तालुका , हेलिअम या मूलद्रव्याचा शोध लावण्यासाठी याच किल्ल्यावरून स्पेट्रो ग्राम लावण्यात आला होता

सुवर्णदुर्ग किल्ला म्हणजे सध्याचा विजयदुर्ग किल्ला ..<<

हे कोणी सांगितले तुम्हाला?

सुवर्णदुर्ग किल्ला, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी.
विजयदुर्ग किल्ला. तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग

बरोबर विजय, सुवर्णदुर्ग म्हणजे हर्णैचा किल्ला, तालुका दापोली. तिथे किनार्‍यापाशी अजुन तिन छोटे किल्ले आहेत, या चार किल्ल्यान्चे मिळुन ते ठाणे होते, मुख्य किल्ला सुवर्णदुर्ग समुद्रात आहे. Happy

कान्होजी आन्ग्रे अजरामर आहेत Happy
जर शिवाजी शिकलात तर आरमाराचे दृष्टिने कान्होजी आपोआपच शिकला जातो इतके त्यान्चे समकालिन ऐतिहासिक महत्व आहे. Happy

तिथे किनार्‍यापाशी अजुन तिन छोटे किल्ले आहेत,<<

लिंबुभौ, ते तीन छोटे किल्ले म्हणजेच गोवा किल्ला, फत्तेगड आणि कनकदुर्ग शिवाय सुवर्णदुर्ग हा संपूर्ण जलदुर्ग आहे. तर विजयदुर्ग हा मिश्रदुर्ग आहे.

मी नुकतेच पु ल देशपान्दे नी भाशान्तर केलेले कान्होजी आन्ग्रे चे पुस्तक वाचले. एवदहे माहित नव्हते त्यान्च्याबद्दल ... त्यानी मराथा आरमाराला खरी ओलख दिली. तुमच्याकदून आनि माहिती मिलाली तर आवदेल . mazi marathitun type karaichi pahilich vel aahe ... samjun ghya ... pan i was really impressed with kanhoji angre after reading the book.. and when I checked here in this thread there was no article about him (end of june) ...

सेनापती,

लेख उत्तम आहे. तुमच्यासारख्या लेखकांमुळे इतिहास जिवंत होऊन डोळ्यासमोर येतो.

इ.स. १९४७ साली स्वतंत्र भारत अंदमान आणि निकोबार बेटांवर दावा सांगू शकला ते कान्होजी आंग्र्यांमुळेच! इथे त्याबद्दल त्रोटक माहिती मिळते.

आ.न.,
-गा.पै.

छान माहिती.
पण त्या अभ्यासाच्या साहाय्याने इथल्या सदस्यांत इतिहासाचे जे प्रेम तू निर्माण करतोस>>> अगदी ...

Pages