४ जुलै १७२९ - सरखेल कान्होजी आंग्रे स्मरणदिन.

Submitted by सेनापती... on 4 July, 2012 - 03:59

४ जुलै १७२९ - सरखेल कान्होजी आंग्रे स्मरणदिन.
समाधी स्थळ - ठुकराली नाका, अलिबाग.

तुकोजी संकपाळ व बिंबाबाईचा हा मुलगा राजगुरुनगर येथे जन्मला. नवसाने आणि अंगाऱ्या धूपाऱ्याने जन्मला म्हणुन आडनाव आंग्रे लाविले. त्यांनी ३ लग्ने केली.

पाहिली पत्नी राजूबाई / मथुराबाई कडून त्यांना सेखोजी आणि संभाजी उर्फ़ आबासाहेब अशी २ मुले झाली. सेखोजी हे नाव त्यांच्या आजोबांच्या नाव वरुन ठेवले गेले.

दूसरी पत्नी राधाबाई / लक्ष्मीबाई कडून त्यांना मानाजी आणि तुळाजी असे २ पुत्र झाले. तर तिसरी पत्नी गहिणबाई कडून त्यांना येसाजी व धोंडजी असे २ पुत्र झाले. याशिवाय शेवटी एक मुलगी झाल्याने तिचे नाव 'लाडूबाई' ठेवले गेले.

छत्रपति शिवाजी महाराजांच्या काळात कान्होजी सुवर्णदुर्ग येथे चाकरीला होते. १६८८ मध्ये सुवर्णदुर्गचा किल्लेदार अचलोजी मोहिते पैसे घेउन फितुरीने किल्ला सिद्दीकड़े सोपवणार असे कळल्यावर कान्होजी यांनी सिद्दीविरुद्ध किल्ला लढवला आणि पराक्रम केला.

पुढे १६९८ मध्ये सरखेल सिधोजी गुजर गेल्यानंतर राजाराम महाराजांनी कान्होजी अंग्रे यांना सरखेल (आरमाराचा सरसेनापती) पद सोपवले. ते त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांसकडेच होते. मराठा - मुघल युद्धामध्ये कोकणपट्टी सांभाळण्याचे कार्य कान्होजी आंग्रे यांनी पार पाडले. पोर्तुगीज, इंग्रज आणि सिद्दी यांना त्यांनी चांगलेच जेरिस आणले आणि संपूर्ण भागात आपला वचक प्रस्थापित केला.

१७०७ मध्ये मराठेशाही मध्ये फुट पडल्यावर मात्र त्यांनी कोणाचीही बाजु न घेता स्वतंत्रपणे कारभार सुरु केला. मात्र पुढे त्यांचे बालमित्र असलेले बाळाजी विश्वनाथ पेशवे यांनी त्यांचे मन वळवून सातारा गादी बरोबर वळवंड, लोणावळा येथे तह करवला.

सरखेल कान्होजी आंग्रे यांची मुद्रा -

"शाहूकार्ये धुरंदर तुकोजी तनुजनमानहा कान्होजी सरखेलस्य मुद्री येकम विराजते"

पुढे त्यांनी अलीबाग हे आपले मुख्य ठाणे बनवले जेथे आजही त्यांचे वंशज राहतात. ४ जुलै १७२९ रोजी ह्या विराला मरण आले. परकियांची सत्ता या भूमीत रोवु न देण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी पार पाडले. त्यांना लक्ष्य लक्ष्य प्रणाम ...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ महेश ~

"सरखेल" म्हणजे इंग्लिशमध्ये ज्याला 'कमांडर' म्हणतात ते पद. "सर" हे नाम 'हेड' या अर्थानेही वापरतात, उदा.प्राचार्य, अधिक्षक आदी पददर्शक नामे.

तर 'खेल' चा अर्थ होतो 'दल'...सैन्यदल....पायदल या अर्थाने. आता अशा 'खेल'चा नायक म्हणजे "सरखेल". हा किताब नौदलप्रमुखासाठी देण्याचा प्रघात त्या शतकात पडला होता.

अशोक पाटील

Pages