दिवस कलता कलता बैलगाडी पाचाडजवळ पोचली. गाडीत लवंडलेला येसाजी गाडीच्या कठड्याचा आधार घेत उत्सुकतेने हळूहळू उठून बसला आणि समोर बघू लागला. दिवसभराच्या प्रवासाने कंटाळलेली त्याची नातही आता हुशारली आणि आज्याच्या मागून त्याला बिलगून समोर बघू लागली. गाव माणसांनी फुलून गेला होता. येसाजीची कारभारीण धर्माला म्हणाली, " धर्मा, ल्येका, त्या झाडाच्या बुडाशी सोड गाडी. बैलास्नी पानी पाज. आज लय दमलीत बैलं. तिकडं हीर हाय बग." धर्माने मान हलवली. गाडी झाडाखाली आल्यावर बैलांना चुचकारून खाली उडी मारत तो म्हणाला, " मामी, तू चूल मांड पलीकडं.
श्रीमद् रायगिरौ
शिवकालीन रायगड नगररचना आणि वास्तू-अभ्यास
लेखक- श्री. गोपाळ चांदोरकर (आर्किटेक्ट)
लेखक श्री. गोपाळ चांदोरकर आता ८५+ वर्षांचे आहेत. हे पुस्तक २०१७ मध्ये प्रकाशित झालेलं आहे. (बुकमार्क पब्लिकेशन्स, पुणे)
रायगडावर जेंव्हा पहाट उजाडते ....
रायगड वारी… ( अंतिम भाग ) !!!
रायगड ! पहिल्या पायरीलाच तुला नमन… नव्हे, वाकून नमस्कार !!! इथे आल्यावर मला नेहमी वाटतं ती रायगड माझ्याकडे पाठ करून उभा आहे, गर्विष्ठपणे. पण त्याचंही बरोबर आहे. का करू नये गर्व ? माझ्या राजांचा एकटाच तर साक्षीदार आहे. कित्त्येक क्षण अनुभवले याने राजांसोबत, काय काय नाही पाहिलं याने, काय काय नाही सोसलं याने. याला बोलता आलं असतं तर विचारलं असतं सांग माझा राजा कसा होता…
सात वर्षापुर्वी माझ्या ट्रेकची सुरवात ज्या गडाने झाली.. ज्या गडाने सह्याद्रीचे वेड लावले.. त्या 'रायगड'शी या दिर्घ कालावधीनंतर भेटीस जात होतो.. बायकोला घेउन तसे ट्रेक केले होते पण यावेळी माझी चिऊ (पुतणी) होती.. तिला रायगड दाखवायचे वचन जे दिले होते.. रज्जुमार्गेच जाणार होतो त्यामुळे ट्रेक कम सहलच होती.. पण मुख्य आकर्षण रायगडच होते..
गडांचा राजा रा्ज राजेश्वर रायगड...
कितीही वर्णनं करा,कौतुक करा अपुरीच पडणारा माझ्या राजाची किर्ती दिगंतात करणारा रायगड..
गडकोटं पाहाणं हा खरतर मराठी मातीत रुजलेला पुर्वपार छंद आहे... अगदी फारसा इतिहासात न रमणार देखील महाराष्ट्राबाहेर किल्ला पहायला गेला तर लगेच महाराष्ट्रातल्या किल्ल्याचं कौतुक आणि तुलना करत राहातो...प्रत्येक किल्ला वेगळा आणि त्याहुन त्या कडे पहाणारे, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या प्रमाणे..
....क्रिकेट-बॉलीवूड-राजकारण-भ्रष्टाचार-गुंठेवारी-पैसा-स्वार्थ-दहशतवाद यांच्या कर्कश्य कोलाहलानं कधीकधी खरंच शीण येतो.. अन् मग आपण सह्याद्रीकडे ‘धाव’ घेतो, सह्याद्रीचा 'धावा' करतो... कारण अगदी सोप्पं आहे. आजंही सह्याद्रीच्या कडेकपा-यात, वाड्या-वस्त्यांमध्ये, शेतां-शिवारांत घमघमत असतात इतिहासाची स्मरणं, शिवरायांच्या अन् त्यांच्या शिलेदारांच्या पाउलखुणा - एक अदृश्य कालातीत शक्तीस्त्रोत!!!
(साभार: ‘शेलारखिंड, श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे)
पहिल्या दिवशी शिवथरघळीत राहून मग पहाटे निघालो ते रायगडाकडे! तसा हा नेहमीचा रूट आहे असं घळीत समजलं होतं. आणि मी २० वर्षांपूर्वी अगदी असाच प्रवास केला होता. घळीतल्या शिबिरानंतर २ रात्री गडावर आम्ही सगळ्यांनी मुक्काम केला होता. गडाचा कानाकोपरा पाहिला होता. त्यामुळे तिथे जाऊच हा माझा आग्रह माझ्या बेटर हाफ ने ऐकला आणि घळीतून निघून सकाळी ९:१५ ला गडाच्या पायथ्याशी आलो. रोप वे ने जाऊन येऊ असं ठरवलं नि त्या बेताला पायथ्याशीच सुरूंग लागला.. साडेचार तास वेटिंग आहे म्हणाले. मग परत उलट फिरलो आणि जमेल तेवढं जाऊ चढत, कंटाळा आला, फारच दमलो तर असू तिथून उलटपावली येऊ असा बेत करून पायी निघालो.
दुर्ग रायगडाच्या दुर्गमत्वाचं कोडं सोडवण्यासाठी, आसपास दाटीवाटी केलेल्या अजस्र सह्यरांगांतून आडवाटेच्या घाटवाटांचा वेध घेण्यासाठी भटकंती चालू होती. पहिल्या दिवशी काळ नदीच्या खो-यातील पाने गावातून ट्रेकर्सना अनोळखी अशी ‘निसणी’ची वाट चढून, सह्याद्रीच्या अस्पर्शित भागांना देत घाटमाथ्यावर सिंगापूर गावी पोहोचायला तब्बल एक दिवस लागला होता. रायलींग पठारावरून दिसणा-या विराट दृश्यानं खुळावलो होतो..
वाचा पूर्वार्ध: http://www.maayboli.com/node/40397