तास भराच्या योगा नंतर
सगळी गात्र दमली, थकली
आता सगळं हलकं हलकं
मन शांत, एकाग्र ध्यान.
अलगद बंद चंक्षु समोर
एक अलवार ढग तरंगतोय
अन त्यासमोर मी निश्चल.
आसपासचा थंड गार वारा
एक भरून राहिलेली तृप्तता
शांतीचा तो अविरत अनुभव
अस्तित्वा शिवाय लहरत असणं.
हलकेच ढग पुढे येतो
त्याचा न कळणारा स्पर्श
तरीही तन मनाला जाणवणारं
हलकेच अलवार एक चुंबन!
पहिल्या दिवशी शिवथरघळीत राहून मग पहाटे निघालो ते रायगडाकडे! तसा हा नेहमीचा रूट आहे असं घळीत समजलं होतं. आणि मी २० वर्षांपूर्वी अगदी असाच प्रवास केला होता. घळीतल्या शिबिरानंतर २ रात्री गडावर आम्ही सगळ्यांनी मुक्काम केला होता. गडाचा कानाकोपरा पाहिला होता. त्यामुळे तिथे जाऊच हा माझा आग्रह माझ्या बेटर हाफ ने ऐकला आणि घळीतून निघून सकाळी ९:१५ ला गडाच्या पायथ्याशी आलो. रोप वे ने जाऊन येऊ असं ठरवलं नि त्या बेताला पायथ्याशीच सुरूंग लागला.. साडेचार तास वेटिंग आहे म्हणाले. मग परत उलट फिरलो आणि जमेल तेवढं जाऊ चढत, कंटाळा आला, फारच दमलो तर असू तिथून उलटपावली येऊ असा बेत करून पायी निघालो.
गेल्या आठवड्यात ३ दिवस सलग मिळालेली सुट्टी अनपेक्षित धनलाभासारखी 'लाभली' मला! आधीपासून ठरत होतं, कुठेतरी फिरून येऊ.. अगदी टिपिकल टुरिस्ट ठिकाणं धुंडाळून झाली, नि काही कारणाने बेतच रद्द झाला. पण शुक्रवारी, सुटीच्या पहिल्या दिवशी जरी घरीच होतो, तरी काहीतरी ठरवलं, त्या दिवशी बाकीची बाहेरची कामं उरकली, थोडी विश्रांती घेतली नि दुसर्या दिवशी चक्क शिवथरघळीत जायला निघालो! सासुबाईंनी सुचवलं ठिकाण, आणि बरेच दिवस मनात घोळत होतंच जायचंय म्हणून... मग तयारी केली नि निघालो. घळीतच जास्त वेळ राहून थोडी साधना करावी असा विचार पक्का झाला.