रायगड वारी… ( अंतिम भाग ) !!!
Submitted by MallinathK on 8 August, 2016 - 01:50
रायगड वारी… ( अंतिम भाग ) !!!
रायगड ! पहिल्या पायरीलाच तुला नमन… नव्हे, वाकून नमस्कार !!! इथे आल्यावर मला नेहमी वाटतं ती रायगड माझ्याकडे पाठ करून उभा आहे, गर्विष्ठपणे. पण त्याचंही बरोबर आहे. का करू नये गर्व ? माझ्या राजांचा एकटाच तर साक्षीदार आहे. कित्त्येक क्षण अनुभवले याने राजांसोबत, काय काय नाही पाहिलं याने, काय काय नाही सोसलं याने. याला बोलता आलं असतं तर विचारलं असतं सांग माझा राजा कसा होता…
विषय: