मल्लिनाथ
बादलीभर धुणं.................
सौमित्रयांची क्षमा मागुन...
पहिलंच लाटणं, पहिलाच मार,
पहिल्याच बायकोचा, पहिलाच वार.....
पहिलाच खटका, पहिलंच भांडण
पहिलीच कुणकुण, पहिलीच भुणभुण
बादलीभर धुणं, भांडी अंगणभरुन,
घाबरले मन, धुनार हे कोणं...
टाकीचे घाव...!!!
गेल्या महिन्यात श्रीशैलला
जाण्याचा योग आला. वाटेत कोणत्यातरी गावी आम्ही थांबलेलो (गावाचं नाव लक्षात नाहीय
आता. ) जिथे गाडी थांबवलेली होती, तिथेच शेजारी काही मुर्ती दिसल्या.
आठवणीतले क्षण !!!
"अरेऽ मधुऽऽ, उऽठ. ८ वाजलेत. आजपासुन ऑफिस आहे नाऽऽ?"
"काय हे ! लग्नाच्या ८ व्या दिवशी सक्काळ सकाळी ८ वाजता कोणी उठतं का? ते ही ऑफिसला जाण्यासाठी ?" इति अस्मादीक.
"ए कोट्या काय करतोयस? आई येतील इतक्यात ओरडत. उऽऽठ ना रे. बघ, नाष्टा सुद्धा तयार आहे आणि आजपासुन तुझा डब्बा मी करणारे..."
"ओऽह शिट्ट !"
"ओऽऽ.... ठिक आहे मग. उद्यापासुन तुझ्या आईच्याच हातचा डबा घेउन जा. मी नाही बनवणार.." असं फणकारुन ती रागाने पाय आपटत वळून बाहेर जाणार इतक्यात मी तिचा हात धरुन मागे ओढले.
"एऽ लाडाबाई, रागावलीस..?"
फरक...
"काय सालं हे ट्रॅफिक! च्यामारी, या पुण्याच्या रस्त्यावर गाडी चालवायची म्हणजे जिवावर येतं बे!" नव्यानेच पुणेकर झालेल्या एका मित्राचा सात्त्विक संताप.
"माहीताय बे, झाली की आता ४-५ वर्ष ! सवय झालीय मला या सगळ्याची, तुलाबी होइल, उगीच कचकच करु नको." अस्मादिक करवादले.
संभ्रमात मी
डॉ.कैलास यांच्या या उपक्रमात दिलेल्या मिसर्यावरुन सुचलेली गझल. जाणकारांचे मार्गदशन अपेक्षीतच आहे.
उमजले न मला कसा गुंतलो तुझ्यात मी
सावली दिली तुला नि राहिलो उन्हात मी
शोधू नकोस मजला तुझ्या आसवातही
हो, हरवले स्वतःला तुला शोधण्यात मी
निसटुन गेली रात्र तुझ्या आठवांसवे
रमलो होतो तेव्हा कुठे चांदण्यात मी
नको चिंब पाऊस... न हवी सांज मखमली
हलकेच सखे स्पर्श तुझा... अन नभात मी
न भिजल्या क्षणात मी... न ओल्या श्वासात मी
तुझ्या माझ्या नात्याच्या संभ्रमात मी.
प्रवास !!!
नकळत झालेल्या स्पर्शाचा तो भास माझा होता,
तुझ्या काळजाचा चुकलेला तो श्वास माझा होता.
बांधले किनार्यावरी घरटे माझे, माझा काय दोष ?
लाटांवर जडलेला तो विश्वास माझा होता.
हसुनच सारे तुझे नकार सोसलेले,
मुखवट्यातला चेहरा तो उदास माझा होता.
तु माझी... मी तुझा... अन आपल्या स्वप्नांचा पसारा,
क्षणात मोडलेला तो मिजास माझा होता.
तुझ्याच हातावर एक रेष मोठी होती,
तरी मरणाला भेटण्याचा तो कयास माझा होता.
आयुष्य संपले तुझ्या सोबतीवीनाच सखे,
तुजपासुन-तुजपर्यंतचा तो प्रवास माझा होता.
-- मल्लिनाथ
![Subscribe to RSS - मल्लिनाथ](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/misc/feed.png)