"खरं प्रेम हे एकदाच होतं का?"
........ टीप:(कृपया हा लेख वाचताना मायबोलीकरांनी एकांतवास शोधावा कारण पहिल्या प्रेमाची गोष्ट इथे मी अधोरेखित केलेली आहे वाचताना आपले मन भरून आलेच तर अश्रूंना वाट मोकळी करून देता येईल
बस एवढच!.....)
........ टीप:(कृपया हा लेख वाचताना मायबोलीकरांनी एकांतवास शोधावा कारण पहिल्या प्रेमाची गोष्ट इथे मी अधोरेखित केलेली आहे वाचताना आपले मन भरून आलेच तर अश्रूंना वाट मोकळी करून देता येईल
बस एवढच!.....)
काय सांगू मी माझ्या प्रेमाबद्दल
काय अर्थ लावू मी तिच्या वागन्याबद्दल
प्रेम झाल्यावर खूप छान वाटलं
मनात स्वप्नाचं काहूर दाटलं
पण तिच्या नकारानेच आभाळ फाटल्यागत वाटलं
का उगाच प्रेमात पडलो असं वाटायला लागलं
दुःख डोळ्यात साठायला लागलं
डोळ्यातून अश्रू वाहायला लागलं
इतकं प्रेम कोणावर का होते
मिळालं नाय तर रडू येते
पहिल्या प्रेमाचं गणित कळालं नाही
आणि कळणार कसं
पहिलंच प्रेम झालं पण तेच मिळालं नाही
अजूनही ओढ तिची आहे या मनाला
सौमित्रयांची क्षमा मागुन...
पहिलंच लाटणं, पहिलाच मार,
पहिल्याच बायकोचा, पहिलाच वार.....
पहिलाच खटका, पहिलंच भांडण
पहिलीच कुणकुण, पहिलीच भुणभुण
बादलीभर धुणं, भांडी अंगणभरुन,
घाबरले मन, धुनार हे कोणं...