अरे कुंदा किती दिवसांनी भेटलास रे, काय करतोस, आता धंदा कसा चाललाय? मी मुकुंदाला पटापट विचारत होतो तो म्हणाला चल खूप वर्षांनी भेटतोय आपण चहा घेऊ या असे म्हणून तो व मी एका उपहार ग्रहात बसलो. घरगुती गप्पा झाल्या गावाकड्च्या लोकांची खुशाली कळली फार बर वाटलं. तेथुन आम्ही बागेत बाकावर जाऊन बसलो. तो म्हणाला माझा दूधाचा धंदा ठीक चालू आहे . एक दुकानही चालवतो त्यामुळे मला आता वेळ्च होत नाही नाहीतर मी एका वृधाश्रमात जेष्ट नागरीकांना दूध देत असे नेऊन. आता दूध आहे पण वेळ नाही. तुझ्या माहितीत कोणी आपुलकीने करणारा असेल तर सांग आठवड्यातून एक दिवस जायचे, वृधाश्रमात सर्व कामे त्यालाच करावी लागतील.
साधारण ५५-६० साल असेल मी इंदिरा डॉकमधे कामास होतो, राहाण्यास गिरगावात होतो. एकदा रात्रपाळीला निघालो पान सुपारीच्या गादिवर पान घेतले व पुढे झालो. तो दिवाळीचा आदला दिवस होता. दुस-या दिवशी सर्वांनाच घरी जायची घाई. म्हणून आम्ही तडजोड करायचो. जवळ राहाणारे ४ वाजता घरी जाऊन फराळ करुन ६ वाजता कामावर परत येणार. त्या दिवशी कामावर निघताना गादि जवळ एक माणूस पटकन पुढे आला, व हात जोडून गयावया करू लागला. साहेब काहितरी द्या ना. मी त्याला झिडकारल म्हंटल तू पैसे घेणार आणि जाऊन दारू पिणार चल जा असे भीकारी रोजच भेटतात.
सकाळचे ७:०० वाजले आहेत.
अजून ७:१५ पर्यंत झोपाव असा विचार करुन मी पांघरुण डोक्यावर ओढून पुन्हा झोपी गेले. जेंव्हा जाग आली तेंव्हा घड्याळात ७:४५ झालेले...मी दचकून जागी झाले.. शेजारी तो शांतपणे झोपला आहे. त्याला पाहून मला परत एकदा झोपण्याची इच्छा झाली...पण आत्ता नाही उठले तर पुढे ऑफिसला जायला उशीर होणार...म्हणून मी पलंगाच्या खाली पाय ठेवला..
माझा मोठेबाबा-पांडूरंग याच्या घराकडे जातांना त्याच्या घराजवळ कोपर्यात चिंचेचं झाड लागत होतं. या झाडाचं खोड भारीच जुनाट व वयस्कर झालं होतं. त्याच्या फांद्या चांगल्या भोवताल पसरलेल्या होत्या - जणू काही एखाद्या पक्षाने पंख पसरल्यासारखे दिसत होत्या. हे झाड हिरव्याकंच बारीक पानाने गच्च भरलेले दिसायचं.
हे झाड म्हणजे आम्हा मुलांना खेळण्याचं व लोकांना बसण्याचं एक सार्वजनिक ठिकाणच होतं, म्हणा ना...! मस्त करमत होतं तेथे !
यंदा पावसाने ताण दिला नि आख्या पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. कुठून कुठून पैदा केलेले बियाणे ज्याने त्याने घाई करून पेरले होते. पालख्या पंढरपुरात पोहचल्या कि हमखास पाऊस लागतो असा आजपर्यंतचा अनुभव होता. परंतु यंदा पालख्या परत फिरल्या तरी पाऊस जोर धरत नव्हता. दिवसातून एखादी सर यायची पण अंगावरील कपडे देखील भिजायची नाहीत. कमी ओलीमुळे दाणा पीठाळला नि उगवण चांगली झालीच नाही. उगाच कुठतरी फुटा दोन फुटावर मोड दिसत होता.
'संकेत! इकडे ये! हे हीन अभिरुचीचे फोटो उद्या पर्यंत निघाले नाहीत तर मी स्वतः ते काढून जाळून टाकेन!'.. संध्याकाळी घरी आलेल्या शहाणे मास्तरांनी विलायती कपड्यांची होळी करणार्यांच्या आवेषात ठणकावलं. त्यांचा आवाज होताच तसा.. ठणठणीत! त्यांनी वाहतुकीच्या गोंगाटाच्या वरताण सूर लावला की प्रत्येक पोराला ते आपल्याच कानात ओरडताहेत असं वाटायचं!
'हीन अभिरुची काय बाबा? ते सही फोटो आहेत बरं का! एकदम फट्टाक! तुम्हाला नाही समजायचं त्यातलं! सारखी उगीच नावं ठेवता तुम्ही!'.. हा डायलॉग ऐकल्यावर लव-कुशांनी खुद्द वाल्मिकींना रामायण शिकवल्यासारखं मास्तरांना वाटलं.
धापा टाकतच राहुल उठला. त्याच्या सर्वांगाला पाणी सुटले होते. छातीतील धडधड थांबायचे नाव घेत नव्हती. एका हाताने ती धडधड रोखायचा प्रयत्न करत दुसर्या हाताने बिछान्याचा आधार घेत तो आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज घेऊ लागला. आपण आपल्या घरातच, स्वत:च्याच बेडवर आहोत याची खात्री पटू लागली तसे हळूहळू नॉर्मल होऊ लागला. पण मन अजूनही साशंक होते. छतावर फिरणार्या पंख्याचा वेग दर दुसर्या क्षणाला कमीजास्त होत असल्याचे जाणवत होते. पंख्याच्या वाढत्या वेगाबरोबर छातीतील धडधड वाढताना भासत होती, तर कमी होणार्या वेगाबरोबर कमी होत कायमची थांबतेय की काय असे वाटत होते.
१९६६, १९६७ अणि १९६८ साली पावलो कोएल्होला मानसिक रुग्ण ठरवून समाजाला घातक ठरण्याची शक्यता आहे असे सांगून द्वाखान्यात भरती करण्यात आले. त्यावेळी त्याने लिहीलेली ही काही पाने..........
ही पाने ब्राझीलच्या सिनेटमधे वाचून दाखवण्यात आली आणि या संदर्भातील बरेच कायदे बदलण्यात आले व अशा रुग्णांकडे माणूसकीच्या दृष्टीकोनातून विचार करण्याची पद्धत रूढ झाली.
निद्रेचा तुरूंग. – स्वैर भाषांतर.
२० जुलै, बुधवार.
८.००
हि प्रेम कथा वाचून डोळ्यातून अश्रू नाही आले
तर नवलच...
त्या दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते.
त्याचं जरा जास्तच. तिच्यासाठी काय करु
आणि कायनको असं त्याला
झालेलं. पण त्याचा खिसा कायम फ़ाटलेला. कडकाच
होता बिचारा. पण भलताच romantic . तिच्याशिवाय
जगण्याची कल्पनाही त्याला करवत
नसे.तिला काहीतरी गिफ़्ट द्यावं असं त्याला मनापासुन
वाटतं होतं. पण द्यायच काय...? खिशात तर
दिडक्या नाहीत..शेवटी न राहवुन त्याने तिला रंगीत
कागदांची फ़ुलंच प्रेझेण्टकेली.. ती खुष
होती..तशीही तिची त्याच्याकडुन फ़ार
मोठी अपेशा नव्हती. तो जे देत होता त्यात
ती समाधानीचहोती..
वारीच्या निमित्ताने एक घटना आठवली जी मी कधीही विसरू शकत नाही. घटना साधारणता सहा सात वर्ष्यापुर्वी ची. पालखी निघायला अवघे सात दिवस शिल्लक होते. त्यामुळे वारीला जाणाऱ्यांची कामे उरकायची धावपळ चालू होती. एकदा पेरण्या झाल्या कि बिनघोर दिंडीबरोबर चांगले पंधरा दिवस जाता येत होते. म्हणून वारकरी मंडळी आपापली कामे उरकण्यात दंग होते . मी हि दिवसभर शेतात काम करून घरी आलो. घरी आल्या आल्या आई म्हणाली तात्यांना (चुलत चुलते ) दवाखान्यातून सोडलंय पर त्यांना काय बरं वाटत न्हाय बाबा.