कथा

THE AWEKEN OF WARLORD

Submitted by protozoa on 8 May, 2012 - 09:57

आजतागत या जगावर राज्य करण्याचि इच्छा धरणारे कमी नव्ह्ते पण ते कोणाच्या हाती आले नाहि . तरिहि अशा मह्त्वकांशि लोकांच्या मह्त्वकांशेंने हे जग किती वेळा होरपळून निघाले आणि कितीतरी वेळा रक्ताचे समुद्र वाहले तरीहि या मह्त्वकांशेंचि भूक कधीही भागली नाहि. हेच कारण म्हणा कि आज आपला अर्धाअधिक इतिहास रक्ताने माखला आहे.

पण कोनताहि काळ सारखा राहात नाहि चाहे तो अस्थिरतेचा असो वा शांततेचा .अस्थिरता तर निवळली व शांततेत
नविन मानविय समाज आकार घेत आहे .पण ही शांतता येणार्‍या वादळाचि चाहुल सुध्दा असु शकते . काळाच्या गर्भातुन कधी काय येउन पुढे ठाकेल याचा काहि नेम नाहि पण शेवटी काळच सर्व जख्मांची दवा आहे.

गुलमोहर: 

एक होता रोमेल

Submitted by निशदे on 7 May, 2012 - 23:45

====================================================================
आपल्यासमोर एक अत्यंत धाडसी आणि बुद्धिमान शत्रू आहे आणि युद्ध बाजूला ठेवून मी म्हणेन की तो एक अत्यंत शूर सेनापतीही आहे.
-विन्स्टन चर्चिल (ब्रिटिश पार्लमेंटसमोर)

====================================================================

गुलमोहर: 

एक रात्र भूss..र क ट ले ली..!!

Submitted by तुमचा अभिषेक on 6 May, 2012 - 08:53

या आधी मी " एक रात्र सरपटलेली ~‘~‘~‘ ...!! " या नावाची कथा प्रसिद्ध केली होती. नसेल वाचली तर खालील लिंकवर जाऊन जरूर वाचा.

http://www.maayboli.com/node/34540

तर याच कथेवरून तसेच काहीसे आणखी सुचले, दोन्ही कथा वाचल्या तर आपल्याला काहीसे साधर्म्य जाणवेलही.
पण ती कथा मी जराशी भयप्रद आणि थरारक बनवली होती. तर ही मात्र हलकीफुलकी केली आहे.

तरी तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा करतो.
तर या कथेचे नाव आहे .. " एक रात्र भूss..र क ट ले ली..!! "

.......................................................................................................

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

वाट बघेन पण……………

Submitted by रुपेरी on 4 May, 2012 - 05:44

मध्ये एकदा प्रवासात बर्‍याच दिवसांनी "वाट बघेन पण एसटीनेच जाइन" ही पाटी बघितली आणि तोंडभर हसू तरळले. त्यात अभिमान होता, 'एस टी ने प्रवास? हे काहितरी काय !' ही कुचेष्टा होती की नॉस्टेल्जिया होता हे माझे मलाच झेपले नाही. कदाचित सगळेच थोडे थोडे असेल. पण एस टी म्हटल्याबरोबर बर्‍याच आठवणी ग्रामोफोनवर झरझर फिरणार्‍या तबकडीसारख्या सुळकन डोळ्यासमोरुन तरळुन गेल्या.

गुलमोहर: 

वाचला र वाचला!!!

Submitted by रावण on 3 May, 2012 - 06:54

धोतराचा सोगा हातात धरुन दारा समोरच मुतत असताना लक्ष्मण आणी विष्णु पैलवानची भितीने वाईट अवस्था झाली होती. दोघांनाही कळुन चुकले होते की आज आपण वाचत नाही कारण त्या झोपडीतून ती त्यांच्यावर नजर रोखुन होती. तरीपण लक्ष्मण पैलवान इशार्‍याने विष्णु पैलवानला धीर देत होता शेवटची हिंमत धाखवण्यासाठी कारण ते वाचले तर देवाचाच चमत्कार म्हणावा लागेल. अशक्य कोटीतली गोष्ट होती ती. लक्ष्मण आणी विष्णु पैलवाननी स्वप्नातही विचार केला नसेल अश्या भयानक वास्तवाला सामोरे गेले होते.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

"काहीच्या बाही!"

Submitted by एक नसलेल अस्तित्व on 30 April, 2012 - 14:55

"ओ पाव्हन, आव इकडं कुठ आज? या कि बसू जरा पाराखाली"
"काय सखाराम, कसा आहेस मित्रा?"
"हाय आता जसा हाय तसा तुमच्या म्होरं" "तुम्ही बोला, आज इकड काय काम काढलं बाय्कुच्या माहेरला?"
"अरे होतं जरा काम!"
"व्हय, राहतंय तुम्च काम! मास्तर होते न जणू तुम्ही?
" होतो रे पण आता रिटायर झालो"
"म्हंजी आता घरीच का?" "आता काय कामधाम करायला नको तुम्ला"
"अरे आयुष्य गेल काम करण्यात आता घरी बसून कुठ करमणार आहे का?"
"हा, म्हणी तुम्ही काम केलं, शाळात बसून लई त लई पोरांच्या टेर्या झोडल्या असतील"
"हा हा हा!!!"
"हसता काय? बायकू-पोर्ह कुठ आहे?"
"अरे अस काय करतोस सखाराम, अरे हिला जावून दोन वर्ष झाले"

गुलमोहर: 

भयानक : भाग ८

Submitted by यःकश्चित on 30 April, 2012 - 12:31

भयानक भाग १
भयानक भाग २
भयानक भाग ३
भयानक भाग ४
भयानक भाग ५
भयानक भाग ६
भयानक भाग ७

=========================================================

" हलगर्जीपणा करू नकोस. याचा मला नाही तुलाच तोटा होईल. "

गुलमोहर: 

डायरी - एक रहस्यमय प्रेमकथा (भाग १ > २ > ३)

Submitted by तुमचा अभिषेक on 30 April, 2012 - 02:13

-------------------------------------------------- भाग १ --------------------------------------------------

आई.. आई.. आयई ग्ग..!! शमीन’ने एक कचकचून आळस दिला. ट्रींग ट्रींग.. ट्रींग ट्रींग.. ट्रींग ट्रींग.. ठप्प.. वाजणारा अलार्म बंद केला आणि ताडकन उठून दोन्ही हात गर्र्कन फिरवत आळस झटकून दिला.
"अरे आजकाल काय चालू आहे तुझे? रोज वेळेवर उठतोस", आई कौतुकानेच म्हणाली.
"अग, सांगितले ना, हल्ली नियम खूप कडक झालेत, त्यात नवीन बॉस आलाय, जावे लागते ग मग अश्यावेळी काही दिवस वेळेवर." सहजपणेच शमीन’ने उत्तर दिले.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

परत एकदा ... असेच एकदा ..

Submitted by aabhagwat@hotma... on 28 April, 2012 - 09:04

"मुलींकडे बघू नकोस." दारातून बाहेर पडता पडता अदितिच्या वाक्याने मी दारातच थबकलो .. थोड्याश्या आनंद मिश्रित आश्चर्याने तिच्या कडे बघत मी काही म्हणनार तेवढ्यात ती पुढे म्हणाली."मुंबईला चालला आहेस ना? मुलींकडे बघत बसू नको.. कामाकडे लक्ष्य दे..नाही तर काम राहील बाजूला." असे म्हणून तिने एक गोड स्मितहास्य दिले. आज दोन वर्षात पहिल्यांदाच ती असे आपलेपणाने बोलत होती "आणि हो परत आल्यावर येऊन जा." आश्चर्य आणि आनंदाने तोंडून शब्दच फुटले नाहीत. "कधी येणार आहेस परत?".."आठवडा तरी लागेल." "ठीक आहे मी वाट बघतिये." " हो हो "म्हणत मी जिना जणू तरंगतच उतरलो

मोटर सायकलला किक मारून निघालो ...

गुलमोहर: 

ह्याची डोळा पहिले मी

Submitted by aabhagwat@hotma... on 28 April, 2012 - 00:39

“हर्ष हर्ष” एयरपोर्ट वरून बाहेर पडतोय तोच पाठीमागून हाक मारणारा ओळखीचा वाटणारा आवाज आला. मागे वळून बघितल तर मागे नेहा उभी होती. आज पाच वर्षानी हर्ष यूएस हून परत येत होता. रंग उडालेल्या, पडझड झालेल्या एखाद्या जुन्या बंगल्यागत नेहा दिसत होती.. अगदी बघवत न्हवते तिच्या कडे. हीच ती रसरशीत, प्रसन्न नेहा हे सांगूनही कोणाला पटले नसते. तिला बघताच हर्षच्या मनात अनेक वर्ष खदखदत असेलेला राग उफाळून बाहेर येऊ पाहत होता. पण अताची तिची ती केविलवाणी व्यक्तीछाया बघून काय करावे हर्षला कळेना. अनाहूत पणे त्याच्या हाताच्या मुठी वळल्या पण तोंडातून शाब्द बाहेर पडेना .. "हर्ष अरे कुठे होतास येवढे दिवस?

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - कथा