अकल्पित -२
संध्याकाळी तिला थोडा कंटाळा आल्यासारखा वाटला . ती खालच्या हालमध्ये जाऊन बसली .चहा मागवला .चहा पिता पिता तिची नजर फळ्यावर लिहिलेल्या नोटीस कडे गेली .
जवळच असलेल्या एकुलत्या एका सिनेमा हौलमध्ये एक जुना हिंदी सिनेमा लागला होता . सिनेमा इतका जुना होता कि तिच्या लहानपणी तो नवा होता हे तिला
आठवले . त्या काळी तो खूप गाजला होता हे तिला आठवले . एका नवीनच उत्साहाने ती उठली व तिने आपला मोर्चा सिनेमाघराकडे वळवला .गर्दी मुळीच नव्हती .
जयतुनबी
बदली झाली की नविन गाव कस असेल याची उत्सुकता व जुनं गाव सोडताना वाईट वाटणं दोन्ही असायचच.
गाव सोडताना मित्र येऊन भेटत. खुप रडु यायच. गावानी केलेल प्रेम, शाळॆत शिक्षकांनी दिलेली शिकवण. सर्व आठवायच. शेजारी झालेल्या ओळाखी, आपंण लावलेली झाड, पाळलेले प्राणी सर्व त्याच गावात सोडुन जाव लागायच. अशी किती गावं पाहिली किती प्रकारचे लोकं भेटले. साधारणपणॆ या लोकांची व माझी परत भेट झाली नाही. एखाद्या माणासाची भेट गाठ झाली की सर्व जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. कोण कुठे आहे काय करतोय या सर्वाची चौकशी होते.
जेमतेम वाहणार्या नदीकाठी बसून गढूळ पाण्यात आणि आपल्यात किती साम्य आहे याचा विचार करत असावी सुनिला! प्रवाह आहे तसे आपले आयुष्य आणि पाण्याचा रंग जसा गढूळ तसे आपले अनुभवविश्व!
दोन मनांमध्ये इतके जाड आणि अमोज पडदे का असावेत हे तिला समजत नव्हते. आजच दुपारी प्राथमिक शाळा सुटायच्या वेळी शाळेत झालेला प्रकार तिला अजून मनातून बाहेर फेकून देता येत नव्हता.
देव बोलतो बाल मुखातून' कोणा एका गीतकाराच्या गीतातील वाक्य, याची प्रचीती मला आली ती आमची 'ननु' म्हणजे चुलत भावाची मुलगी बोलायला लागल्यानंतर. तिचे बोबडे बोल, खुदकन गालावर खळी पडून हसणे. तिचे चिमुकले हात ती गळ्यात टाकून मान डोलवत बोलणे सगळेच लाजवाब होते. दिवसभर कितीही काम केले कितीही थकलो तरी ननुच्या नुसत्या जवळ येण्यानेच सारा थकवा दूर व्हायचा. वाड्यातील सर्वच जणांना तिने जणू भुरळ घातली होती. तिच्याबरोबर बोलताना बहुतेक जन आपापली बोबडे बोलण्याची हौस भागवून घ्यायचा. बाकीचे इतर सख्खे , सख्खे चुलत भाऊ देखील स्वताच्या मुलांना कपडे आणताना ननुला देखील कपडे घ्यायचे .
"तर मि. भालेराव, तुम्ही ३ दिवसापुर्वी दिल्लीला गेला होता."
"हो. मी अधूनमधून आमच्या दिल्ली ब्रांचला जात असतो."
"तुमच्या घरात घडला प्रकार हवालदार चौगुलेनी फोन केल्यावर तुम्हाला कळला. बरोबर "
"हो."
"तुम्ही दिल्लीला जाणार.... हे तुमच्या घरच्याव्यतिरिक्त अजून किती जणांना माहीत होतं ?"
"ऑफिसमधे आणि घरात श्यामलला. बाकी कोणाला काहीच कल्पना नव्हती."
"तुमच्या बिल्डींगमधे ? "
"नाही. कुणालाच नाही. हं... कदाचित आमच्या शेजारच्या शाह फॅमिलीला. त्यांची आणि आमची गॅलरी लागून आहे. श्यामल बोलली असेल तरच."
"तुम्ही कुठल्या शेजार्याला बोलला होता का काही ?"
ह्या आधीचे..........
राजाराम सीताराम एक राजाराम सीताराम दो।...... भाग १ प्रवेश.
राजाराम सीताराम....... भाग २... पुढचे चार दिवस.
राजाराम सीताराम....... भाग ३... सुरवातीचे दिवस – भाग १.
राजाराम सीताराम....... भाग ४... सुरवातीचे दिवस – भाग २.
राजाराम सीताराम....... भाग ५... आयएमएतले दिवस.
राजाराम सीताराम....... भाग ६... मसुरी नाइट.
राजाराम सीताराम....... भाग ७….. ड्रिलस्क्वेअर.
राजाराम सीताराम....... भाग ८....शिक्षा.
राजाराम सीताराम....... भाग ९.... एक गोली एक दुश्मन।.... भाग १.
राजाराम सीताराम....... भाग १०.. एक गोली एक दुश्मन।.... भाग २.
राजाराम सीताराम....... भाग ११...पिटी परेड.
ब्लू पॅरॅडाईज.
अतीउच्चभ्रूंसाठी अतीउच्चभ्रूंच्या वस्तीपासून वीस किलोमीटर लांब आणि एकंदर शहरापासून तीस ते पस्तीस किलोमीटर लांब असलेले एक हॉटेल कम रेस्टोरंट.
हायवेवर असलेले हे रेस्टॉरंट आतून इतके भारी असेल याची कल्पनाही यायची नाही. कारण ते दिसायचेच नाही. फक्त भल्यामोठ्या गेटवर असलेले दोन साडे सहा फूट उंचीचे शस्त्रधारक गुरखे, एक केबीन आणि दोन अजस्त्र कुत्रे दिसायचे. बाकी सगळी झाडेच! झाडांवर निळे दिवे. बाकी काहीही दिसायचे नाही.
सहा लाखाच्या खालची गाडी गेटपाशी आली तर खोदून चौकशी व्हायची.
स्टाफला आत जायला वेगळे प्रवेशद्वार होते.
तो आवाज आजही मला साद घालतो..!
`स्नायपर शिंदे शुद्धीवर आलाय ताबडतोब हेड ऑफिसला पोहोचणे'
हातातल्या त्या तारेचा आशय नक्की मला कळतोय तोच असल्याची मी चार-चारदा खात्री करून घेतली. अजूनही त्या गोष्टीवर विश्वास बसणं सोपं वाटत नव्हतं.
गेल्या दशकातलीच गोष्ट आहे ही,
आसामच्या जंगलात नाईलाजास्तव सैन्य तैनात करावं लागलं होतं, एकमेव कारण बोडो अतिरेकी.
B.Com. चे शेवटचे वर्ष. कॉलेजची ओव्हरनाइट ट्रीप होती. शेवटची असल्या मुळे वर्गातले सर्व जण आले होते. तीही.
दिवसभराच्या दंगामस्ती नंतर रात्री कॅम्पफायर भोवती सगळे बसले. बैठे खेळ, अंताक्षरी झाली. दमलेले, पेंगुलळलेले झोपायला गेले..... हळू हळू सगळेच गेले. मीही.
पाच दहा मिनिटांनी कसली तरी चाहुल लागली म्हणून बाहेर आलो......पाहतो तर ती एकटीच
कॅम्पफायर शेजारी निखारे न्याहाळत बसली होती. डाव्या हाता वर भार देऊन, दोन्ही पाय मागे दुमडून एकटक निखारे न्याहाळत, कसल्याशा विचारात दंग.
धीर करून मी पुढे गेलो. तिच्या बाजूला बसलो ...तिला अजून माझी चाहुल लागली नसावी, इतकी ती विचारात दंग होती.