अकल्पित -२
संध्याकाळी तिला थोडा कंटाळा आल्यासारखा वाटला . ती खालच्या हालमध्ये जाऊन बसली .चहा मागवला .चहा पिता पिता तिची नजर फळ्यावर लिहिलेल्या नोटीस कडे गेली .
जवळच असलेल्या एकुलत्या एका सिनेमा हौलमध्ये एक जुना हिंदी सिनेमा लागला होता . सिनेमा इतका जुना होता कि तिच्या लहानपणी तो नवा होता हे तिला
आठवले . त्या काळी तो खूप गाजला होता हे तिला आठवले . एका नवीनच उत्साहाने ती उठली व तिने आपला मोर्चा सिनेमाघराकडे वळवला .गर्दी मुळीच नव्हती .
तिकीट काढून ती आत शिरली . सिनेमा तिला आवडला . मध्यंतर झाले, लोक काही बाही घेण्यासाठी म्हणून बाहेर पडले . तिला काही नको होते म्हणून ती तशीच
बसून राहिली .रिकामपणी इकडे तिकडे बघू लागली .एकदम तिची नजर अगदी समोरच्या रांगेकडे गेली .तेच ते जोडपं पहिल्या रांगेत बसलेलं तिला दिसलं. तिथे
बसून देखील ते तसाच हसत खिदळत होतं, जणू काही ते हालमध्ये नसून पार्कमध्येच बसले होते ! त्यांना गाठून त्यांच्याशी बोलावं म्हणून ती उठणार तेव्हढ्यात
मध्यंतर संपले व सिनेमा सुरु झाला .ती हिरमुसली . पुढच्या सिनेमात तिचे म्हणावे तसे लक्ष लागले नाही . सिनेमा संपल्यावर दिवे लागले . तिने पुढच्या रांगेकडे
नजर टाकली . ते दोघे नव्हतेच ! आधीच उठून गेले असावेत . त्या जोडप्याच्या विचाराने तिचे मन व्यापून टाकले .कोण असावेत ते दोघे ? सारखे दिसतात पण
भेटत मात्र नाहीत ! आपल्याला तरी त्यांच्याबद्दल एवढी उत्सुकता कशासाठी ? आपला आणि त्यांचा काही ऋणानुबंध असेल का ? रूमवर ती परतली ती विचारात
बुडूनच .
दुसरया दिवशी सकाळी ती सर्व आटोपून पार्कमध्ये जाऊन बसली . रोज ते दोघे सकाळी येऊन बसायचे . आज ते आले की मुळीच वेळ न घालवता त्यांना भेटायचं
असं तिने मनाशी ठरवूनच ठेवलं होतं . पण नशिबाने जणू तिची थट्टाच करायची ठरवली असावी बहुधा ! खूप वेळ वाट पाहून ही ते जोडपं आलंच नाही ! शेवटी
उन तापायला लागल्यावर नाईलाजाने ती रूमवर परतली . दिवसभर एक वेगळाच उदासपणा तिला जाणवत राहिला . कोणताही संबंध नसलेल्या जोडप्याने आपला
सहलीचा आनंद असा नासवून टाकावा याचा तिला रागही येत होतं आणि दुसरीकडे त्यांच्या भेटीची आस लागल्यासारखी झाली होती . संध्याकाळी ती पार्कमध्ये
येऊन बसली . आजची ही शेवटचीच संध्याकाळ ! उद्या संध्याकाळी ती परतीच्या गाडीत असणार होती . परवापासून रोजचे रुटीन ! बाकावर बसून ती विचार करू
लागली . दहा वर्ष झाली असतील ह्या ठिकाणाची माहिती होती पण कधी येण्याची असोशी नाही वाटली पण यंदा सहल निघाल्यावर मात्र राहावेनच ! आई बाबांचा
थोडा राग पत्करून देखील तिने सहलीला येण्याचा निर्णय घेतला होता. ठिकाण पाहिल्यावर तो योग्य असल्याचे जाणवले . मन अगदी ताजेतवाने झाले . फक्त
ही एक विचित्र हुरहूर सोडली तर ! एक उसासा सोडत तिने समोर पाहिले .ती एकदम दचकलीच ! दूरवरच्या एका बाकावर तेच ते जोडपं बसलेलं दिसलं तिला .
जीवाच्या आकांताने धावत जाऊन त्यांना गाठावं असं तिला वाटून गेलं. पण ती थबकली . आत्तापर्यंतच्या अनुभवावरून आपण पोहोचेपर्यंत ते पुन्हा निघून गेलं तर?
शेवटी उत्सुकतेने विचारांवर मात केली .ती त्या बाकाकडे निघाली.
दिवस बुडत आला होता . सूर्याचे शेवटचे काही किरण धरतीला स्पर्शून तिचा निरोप घेत होते . दूरवरच्या 'त्या' बाकापर्यंत ती पोहोचेपर्यंत सूर्य बुडालाच !
"क्षमा करा मला , तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटलं म्हणून ......."
त्या जोडप्याने आणि निशाने एकाच वेळी एकमेकांकडे पाहिले .
" तू .....तू ....तुम्ही "
एवढेच शब्द तिच्या तोंडून बाहेर पडले आणि पुढच्याच क्षणी ती भोवळ येऊन बाकावर कोलमडून पडली .
कथा आहे कुठे ?
कथा आहे कुठे ?
प्रयत्न च।लु आहेत पण कथ। ज।तच
प्रयत्न च।लु आहेत पण कथ। ज।तच नाहि आहे.
कथा लिहायची असते. तुम्ही नविन
कथा लिहायची असते.
तुम्ही नविन काय करत आहात ?
कथ। लिहुन तय।र आहे पण ति
कथ। लिहुन तय।र आहे पण ति मायबोलि वर कशि ट।कवि हे म।हित न।हि आहे.
कथा इथे लिहावी
कथा इथे लिहावी लागते............... वर धागा संपादन असेल तिथे जा आणि धागा संपादन (एडिट ) करुन कथा लिहा ...........
वर्ड वर लिहिलेली कथा इथे कॉपी पेस्ट करा हवे तर...
wordmadhye kruridev10 ya font
wordmadhye kruridev10 ya font madhye type keleli katha tayar aahe. copy paste karnyacha khup prayatna kela pan chitravidhitra akrutya umatatat.marathi katha lihun tayar asunhi mi ti vachakanparyant pathwu shakle naahi yaache mala dukkha aahe. tyachpramane maybolichya keypadvar type karne dekhil khup kathin jaat aahe- . mi pdf file karun ti copy paste karnyacha dekhil prayatna kela pan ---all in vain. katha punha type karaydhi mhatli tar mothi aahe tyamule himmat hot naahi . sarva vaachakano kshamaswa.
म।झय। सुनेकडुन म्।य्
म।झय। सुनेकडुन म्।य् बोलिबद्द्ल खुप ऐकले होते . म्ह्नणुन ति।च्य्।क्डुन मेम्बर्शिप करुन घेतलि. हे क्।म तिल्।हि येत नव्ह्ते.खुप खटपट केल्य्।वर सभ्।सदत्व मिल्।ले. कथ। त य्।र होति म्हणुन तिच आधि प।ठव्।वि असे व।ट्ले.पण ल।ख प्र् य्त्न करुनहि ते जम ले न।हि आणि अकल्पित न।व।चि कथ। न देत। ह। अकल्पित अनुभव द्य।व। लागला.

शिल्पा महाजन - नमस्कार.
शिल्पा महाजन - नमस्कार. मायबोलीवर आपले स्वागत आहे.
मायबोलीवरच्या विभागांची थोडक्यात माहिती येथे मिळेल. तसेच मराठी लिहीण्याचा सराव आपण चाचणीची जागा या ठिकाणी करू शकता. मदतपुस्तिकेमध्ये वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे संकलीत केलेली आहेत. कृपया ती देखील एकदा नजरेखालून घालावीत.
आपण जिथे प्रतिसाद टंकलिखीत करता, त्या खिडकीच्या डोक्यावर B , I अशी बटणे असलेली एक पट्टी आहे. त्याची माहिती खालीलप्रमाणे आहे.
वरती दाखवलेल्या चित्रात [लाल, निळा, भगवा आणि हिरवा असे] ४ रंगीबेरंगी चौकोन आहेत. त्या चौकोनात ज्या गोष्टी आहेत त्यांची माहिती खालीलप्रमाणे
त्यात असणार्या प्रश्नचिन्हावर क्लिक केल्यास देवनागरी अक्षरांचा तक्ता दिसेल. तोच तक्ता मदतपुस्तिकेतल्या देवनागरीत कसे लिहावे? या धाग्यावरही सापडेल. aa वापरून लिहील्यास | हे अक्षर देऊन काना द्यायची गरज पडणार नाही.
साहित्य लेखनाविषयीचे धागे निर्माण करण्याबद्दल माहिती या दुव्यावर आहे.
हितगुजच्या कोणत्याही ग्रूपमधे नवीन "गप्पांचं पान", "लेखनाचा धागा", "कार्यक्रम" किंवा "नवीन प्रश्न" कसा सुरू करायचा?
मदत_समिती
>> wordmadhye kruridev10 ya
>> wordmadhye kruridev10 ya font madhye type keleli katha tayar aahe.
मायबोली आणि आंतरजालावर इतरत्र देवनागरी [मराठी भाषेची लिपी] लिहीण्यासाठी युनिकोड वापरले जाते. त्यामुळे कुठल्या इतर फाँटची गरज नसते. तुम्ही एखादा फाँट वापरून कथा लिहीली असल्यास कॉपी पेस्ट करून ती मायबोलीवर दिसणार नाही. तुम्हाला ती मायबोलीवर नवीन कथा स्वरूपात किंवा बरहा किंवा गूगल किंवा मायक्रोसॉफ्टचे ट्रांसलिटरेशन सॉफ्टवेअर वापरून परत लिहावी लागेल. त्यासंदर्भातली माहिती मदतपुस्तिकेत लेखनासंबंधी प्रश्न विभागात "ऑफलाईन लिखाण" या सदरात सापडेल.
तुम्हाला या पर्यायांनी मदत होईल अशी आशा आहे.
-मदत_समिती
पण ल।ख प्र् य्त्न करुनहि ते
पण ल।ख प्र् य्त्न करुनहि ते जम ले न।हि आणि अकल्पित न।व।चि कथ। न देत। ह। अकल्पित अनुभव द्य।व। लागला.
आहो असा अकल्पित अनुभव सर्वांनाच आलेला असतो. थोड्याच दिवसात तुम्हाला इथे लिहिण जमेल. काहीच कठिण नाही त्यात.
katha punha type karaydhi
katha punha type karaydhi mhatli tar mothi aahe tyamule himmat hot naahi . sarva vaachakano kshamaswa.
शिल्पाकाकू असे करू नका, लिहा परत कथा, कारण ही तुमची पहिली असली तरी शेवटची कथा नाहीये, अजून तुम्हाला बरेच लिहायचे आहे, सुरुवात तर करा, इथे मराठी लिहिणे खूप सोपे असते, तुमची कथा छोटी असती तर मीच तुम्हाला फटाफट लिहून दिली असती. माझा ईंग्लिश पेक्षा मराठी टायपिंगचा स्पीड हल्ली भारी झालाय, तुमचाही होईल, फक्त ट्राय करा..
जे तुम्ही लिहिले आहे वर्ड मधे
जे तुम्ही लिहिले आहे वर्ड मधे ते आपण सगळॅ सिलेक्ट करा....त्यांनतर फाँट बदला त्याचा...arial unicode ms
हा फाँट करा सिलेक्ट...........त्यानंतर आपण ते इथे कॉपी पेस्ट केले तर दिसेल... बघा प्रयत्न करुन
आपण धागा तयार केलेत. त्याला
आपण धागा तयार केलेत. त्याला शीर्षकही दिलेत.. ते जसे केलेत तसेच आता शीर्षकाच्या खालच्या विंडोत मॅटर टायप करा.
शिल्पाकाकू, एक करून
शिल्पाकाकू,
एक करून बघा.
तुमचा वर्ड मधला लेख *.doc असा सेव्ह न करता *.rtf असा सेव्ह करा. याकरिता 'सेव्ह अॅज'चा पर्याय वापरा. मग ती rtf फाईल वर्डपॅड मध्ये उघडा. आता तो लेख मायबोलीवर (कदाचित) कॉपी/पेस्ट करता येईल.
आ.न.,
-गा.पै.
Unicode मध्ये कथा लिहायला
Unicode मध्ये कथा लिहायला सुरुवात केलि आहे . रोज थोडि थोडि लिहिन .माझा उत्साह वाढवणाऱ्या सर्व लोकांना धन्यवाद.
संध्याकाळी तिला थोडा कंटाळा
संध्याकाळी तिला थोडा कंटाळा आल्यासारखा वाटला . ती खालच्या हालमध्ये जाऊन बसली .चहा मागवला .चहा पिता पिता तिची नजर फळ्यावर लिहिलेल्या नोटीस कडे गेली .
जवळच असलेल्या एकुलत्या एका सिनेमा हौलमध्ये एक जुना हिंदी सिनेमा लागला होता . सिनेमा इतका जुना होता कि तिच्या लहानपणी तो नवा होता हे तिला
आठवले . त्या काळी तो खूप गाजला होता हे तिला आठवले . एका नवीनच उत्साहाने ती उठली व तिने आपला मोर्चा सिनेमाघराकडे वळवला .गर्दी मुळीच नव्हती .
तिकीट काढून ती आत शिरली . सिनेमा तिला आवडला . मध्यंतर झाले, लोक काही बाही घेण्यासाठी म्हणून बाहेर पडले . तिला काही नको होते म्हणून ती तशीच
बसून राहिली .रिकामपणी इकडे तिकडे बघू लागली .एकदम तिची नजर अगदी समोरच्या रांगेकडे गेली .तेच ते जोडपं पहिल्या रांगेत बसलेलं तिला दिसलं. तिथे
बसून देखील ते तसाच हसत खिदळत होतं, जणू काही ते हालमध्ये नसून पार्कमध्येच बसले होते ! त्यांना गाठून त्यांच्याशी बोलावं म्हणून ती उठणार तेव्हढ्यात
मध्यंतर संपले व सिनेमा सुरु झाला .ती हिरमुसली . पुढच्या सिनेमात तिचे म्हणावे तसे लक्ष लागले नाही . सिनेमा संपल्यावर दिवे लागले . तिने पुढच्या रांगेकडे
नजर टाकली . ते दोघे नव्हतेच ! आधीच उठून गेले असावेत . त्या जोडप्याच्या विचाराने तिचे मन व्यापून टाकले .कोण असावेत ते दोघे ? सारखे दिसतात पण
भेटत मात्र नाहीत ! आपल्याला तरी त्यांच्याबद्दल एवढी उत्सुकता कशासाठी ? आपला आणि त्यांचा काही ऋणानुबंध असेल का ? रूमवर ती परतली ती विचारात
बुडूनच .
दुसरया दिवशी सकाळी ती सर्व आटोपून पार्कमध्ये जाऊन बसली . रोज ते दोघे सकाळी येऊन बसायचे . आज ते आले की मुळीच वेळ न घालवता त्यांना भेटायचं
असं तिने मनाशी ठरवूनच ठेवलं होतं . पण नशिबाने जणू तिची थट्टाच करायची ठरवली असावी बहुधा ! खूप वेळ वाट पाहून ही ते जोडपं आलंच नाही ! शेवटी
उन तापायला लागल्यावर नाईलाजाने ती रूमवर परतली . दिवसभर एक वेगळाच उदासपणा तिला जाणवत राहिला . कोणताही संबंध नसलेल्या जोडप्याने आपला
सहलीचा आनंद असा नासवून टाकावा याचा तिला रागही येत होतं आणि दुसरीकडे त्यांच्या भेटीची आस लागल्यासारखी झाली होती . संध्याकाळी ती पार्कमध्ये
येऊन बसली . आजची ही शेवटचीच संध्याकाळ ! उद्या संध्याकाळी ती परतीच्या गाडीत असणार होती . परवापासून रोजचे रुटीन ! बाकावर बसून ती विचार करू
लागली . दहा वर्ष झाली असतील ह्या ठिकाणाची माहिती होती पण कधी येण्याची असोशी नाही वाटली पण यंदा सहल निघाल्यावर मात्र राहावेनच ! आई बाबांचा
थोडा राग पत्करून देखील तिने सहलीला येण्याचा निर्णय घेतला होता. ठिकाण पाहिल्यावर तो योग्य असल्याचे जाणवले . मन अगदी ताजेतवाने झाले . फक्त
ही एक विचित्र हुरहूर सोडली तर ! एक उसासा सोडत तिने समोर पाहिले .ती एकदम दचकलीच ! दूरवरच्या एका बाकावर तेच ते जोडपं बसलेलं दिसलं तिला .
जीवाच्या आकांताने धावत जाऊन त्यांना गाठावं असं तिला वाटून गेलं. पण ती थबकली . आत्तापर्यंतच्या अनुभवावरून आपण पोहोचेपर्यंत ते पुन्हा निघून गेलं तर?
शेवटी उत्सुकतेने विचारांवर मात केली .ती त्या बाकाकडे निघाली.
दिवस बुडत आला होता . सूर्याचे शेवटचे काही किरण धरतीला स्पर्शून तिचा निरोप घेत होते . दूरवरच्या 'त्या' बाकापर्यंत ती पोहोचेपर्यंत सूर्य बुडालाच !
"क्षमा करा मला , तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटलं म्हणून ......."
त्या जोडप्याने आणि निशाने एकाच वेळी एकमेकांकडे पाहिले .
" तू .....तू ....तुम्ही "
एवढेच शब्द तिच्या तोंडून बाहेर पडले आणि पुढच्याच क्षणी ती भोवळ येऊन बाकावर कोलमडून पडली .
अरे तुम्ही संपादन
अरे तुम्ही संपादन करा.......आणि त्या खाली लिहा.......अन्यथा दुसरा धागा उघडा त्यात लिहा........ पुढचा भाग २ म्हणुन प्रतिसाद मधे कथा लिहु नका .....
नमस्कार शिल्पा तुम्ही भाग २
नमस्कार शिल्पा
तुम्ही भाग २ वर कॉपी पेस्ट करतांना पहिला १ चुकुन डीलीट झालेला दिसतोय. तो भाग कुठे सेव्ह करून ठेवला असेल तर तो नवीन धागा काढून परत टाकता येईल.
तसेच मायबोलीवर अपूर्ण लेखन पूर्ण लिहीपर्यंत अप्रकाशित ठेवायची सोय आहे. http://www.maayboli.com/node/1523
तुम्ही इथेच संपादन केलेत, पण
तुम्ही इथेच संपादन केलेत, पण जुने डिलिट केलेत..... आता जुने पुन्हा लिहून याच्या आधी कॉपी पेस्ट करा किंवा सरळ त्याचा भाग १ वेगळा धागा काढा... पुढच्या लिखाणाचे धागे वेगळे वेगळे काढा.... त्यात एक मेकांच्या लिंक द्या.
शिल्पदी मायबोलीवरच्या तुमच्या
शिल्पदी मायबोलीवरच्या तुमच्या पहिल्या कथेसाठी तुमच अभिनंदन. कथा मस्त रंगत आहे लिहीत रहा तुमच्या सवडी प्रमाणे. पुढील लेखनासाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेछा !!!
छान आहे कथा, पुढचा भाग लवकर
छान आहे कथा, पुढचा भाग लवकर टाका
छान... आता पुढील भाग लवकर
छान...
आता पुढील भाग लवकर टाका.
शिल्पाकाकू, आम्ही पहिला भाग
शिल्पाकाकू, आम्ही पहिला भाग वाचलाच नाही, उडवलात वाटते तुम्ही, जरा गोंधळ उडतोय तुमचा वाटते, कोणाशी तरी वाटल्यास चॅटवर बोलून काय कसे ते समजून घ्या हो, आम्हा वाचकांचे हाल होत आहेत.
(No subject)
प्रत्येक भागा साठी नविन धागा
प्रत्येक भागा साठी नविन धागा उघडा