B.Com. चे शेवटचे वर्ष. कॉलेजची ओव्हरनाइट ट्रीप होती. शेवटची असल्या मुळे वर्गातले सर्व जण आले होते. तीही.
दिवसभराच्या दंगामस्ती नंतर रात्री कॅम्पफायर भोवती सगळे बसले. बैठे खेळ, अंताक्षरी झाली. दमलेले, पेंगुलळलेले झोपायला गेले..... हळू हळू सगळेच गेले. मीही.
पाच दहा मिनिटांनी कसली तरी चाहुल लागली म्हणून बाहेर आलो......पाहतो तर ती एकटीच
कॅम्पफायर शेजारी निखारे न्याहाळत बसली होती. डाव्या हाता वर भार देऊन, दोन्ही पाय मागे दुमडून एकटक निखारे न्याहाळत, कसल्याशा विचारात दंग.
धीर करून मी पुढे गेलो. तिच्या बाजूला बसलो ...तिला अजून माझी चाहुल लागली नसावी, इतकी ती विचारात दंग होती.
काही प्रॉब्लेम? मी विचारले..
एकदम दचकून तिने माझ्याकडे पहिले.. बारीकसे हसून म्हणाली नाही. काही नाही .. मग इथेच अजून? सहजच .......
तिच्या सहज सुलभ बोलण्यामुळे रीलॅक्स होऊन मीही तिच्या शेजारी बसलो ...तिला न्याहाळत. मोकळे सोडलेले तिचे केस वार्याचे निमित्य करून तिच्या गालाशी खेळत होते.....वार्याच्या झुळकिने निखारे फुलले की त्याचा लाल उजड तिच्या चेहर्या वर पडत होता, त्याच्याशी ते केस लपंडाव खेळत होते. मधूनच आपल्या उजव्या हाताने ती ते केस सावरून काना मागे सारत होती. मी आता तिच्या अगदी जवळ बसलो होतो.....
अनाहूत पणे माझा हात तिच्या चेहर्यावर झुळझुळणार्या केसान कडे गेला ...
पण मी तो आवरला. घड्याळ बघायच नाटक करून हात मागे घेतला. पुढे पसरलेले पाय दुमडून छातीशी घेतले, गुडघ्याला मिठी मारून, हनुवटी गुढग्या वर ठेऊन तिच्या चेहर्यावरचा तो लाल प्रकाशाचा लपंडाव न्यहाळत राहिलो.. निलमने पण केस मागे बांधले ..
निलम ...... दोन तीन महिन्यां पूर्वीच आमच्या कॉलेज मध्ये, आमच्या वर्गात आली, आणि सरळ आमच्या सर्वांच्या मनात रूजली.
निलम रूजली पण रूळली नाही. ती कोणाशीच फारसे बोलत नसे. कॉलेजला सोडायला बहुदा वडील आणि न्यायला भाऊ येत असे. तिच्याशी बोलायचा मी एक दोनदा प्रयत्न केला पण फारशी दाद नाही मिळाली. आमच्या कंपू बरोबर कॅंटीनला आली ती तीन चार वेळा पण आमच्यात कधी मिसळली नाही.
एक दिवस आमचा कंपू असाच कॉलेजच्या आवारात टवाळ्क्या करत होता. अचानक सर्वजण शांत झाले आणि माझ्या मागे बघू लागले ......... काय आहे रे मागे असे म्हणत मी मागे बघितले तर मागे निलम होती. मी काही म्हणायच्या आत ती म्हणाली “मला तुझी अक्कौंट्स ची वही पाहिजे”. “माझी अक्कौंट्स ची वही? “ “हो तुझी वही” असे म्हणत तिने मी रोज जी एकमेव फुल्लस्केप नोटबूक कॉलेजला आणत असे ते माझ्या हातातून घेत “मी यायच्या आधी काय काय झाले ते पाहिजे होते” असे म्हणत निघून गेली॰
दोन तीन दिवसांनी वही परत आली. मी ती वही बघायच्या आत सर्व कंपूने ती ताब्यात घेऊन तिचे dissection केले, कुठे काही मेसेज वगैरे सापडतोय का बघाला पण काहीही नाही.
मी दाखवले नसले तरी मीही तेच कारयला खूप उत्सुक होतो. त्यामुळे घरी गेल्या गेल्या मी पण वहीचे संपूर्ण dissection केले पण कुठेही काहीही सापडले नाही. नाही म्हणायला शेवटच्या दोन तीन पानानवरच्या ग्राफ्फीटी मध्ये माझ्या लुनाचा नंबर आणि त्या खाली काही तरी अगम्य भाषेत बहुदा एखादा सुविचार लिहलेला होता. पण हे कंपू पैकी कोणाचेही काम असू शकते म्हणून जास्त लक्ष नाही दिले.
“मला आवडतोस तू खूप” शांततेचा भंग करत अचानक निलम म्हणाली. मी दचकून तिच्या कडे बघून “काय?” असे जवळजवळ ओरडलोच. वाचले नाहीस का? तुझ्या वहीत मागच्या पानावर लिहाले होते मी. लुंनाच्या नंबरच्या खाली. “ते तू लिहाले होतेस? सतोडवआ असे काही तरी होते ते?” “हो, उलटे वाच उर्दू सारखे.” असे म्हणत ती उठली आणि “चला आता झोपूयात गुडनाइट” असे म्हणत तिच्या खोली कडे गेली सुध्या.
आता थंडी चांगलीच जाणवू लागली होती. विझत्या निखर्यान वर फुंकर मारून मी ते चेतवायचा प्रयत्न केला. आवाक झालेला मी तसाच पाठीवर आडवा होऊन अकाश्याकडे बघत विचार करू लागलो व्हॉट नेक्स्ट? आता पुढे काय आणि कसं?
विचारात किती वेळ गेला कळलं नाही पण अचानक आवाज आला “ए दगडा झोपायच नाही का तुला? चल आत.“ अरविंद. दुसरे कोण? कंपुतला माझा सगळ्यात जवळचा मित्र. जाता जाता त्याने विचारलन “काय म्हणत होती ती?” “कोण?” मी साळसूद पणे विचारले...”निलम मला माहितीये ती पण होती इथे बराच वेळ.” “काही नाही रे विशेष” असे म्हणून विषय झटकून मी आत खोलीत येऊन डोक्यावरुन पांघरूण घेऊन झोपेचे नाटक केले.
ट्रीप परत आली. दिवळीच्या सुट्ट्या संपल्या, कॉलेज परत सुरू झाले. तेच रूटीन आमचे आणि निलमचे. दिवस भराभरा गेले. फाईनल्स सुरू झाल्या आणि संपल्या सुध्या. शेवटच्या पेपर नंतर आम्ही सगळा कंपू पेपर डिसकस करत येत होतो तेवढ्यात अरविंद कानात कुजबुजला नीलाम येतीये, मी सगळ्यांना घेऊन सटकतो तू आज तरी काही तरी सेरियसली बोल तिच्याशी.
मी आणि निलम चालत गेट कडे निघालो. “काय ठरवलायस पुढे?” निलमने विचारले.
“काही नाही नोकारी बघतोय. बहुदा सीए पण करीन.” “त्या विषयी नाही विचारलं” ... निलम म्हणाली...”आमच्या कडे मला स्तळ बघताएत. माझ्या साठी. दोन तीन महीने फक्त मी हे पुढे ढकलू शकते त्या पलीकडे नाही. चल बाय दादा अलाय” असे म्हणत ती तिच्या दादा बरोबर निघून गेली.
मी सुन्न होऊन नुसताच उभा होता. “काय म्हणाली?” अरविंद दुसरे कोण? “काही नाही रे” “खोट बोलू नकोस. मी तुझ्या वहीतल वाचलाय तिने लिहलेले” “तू वाचलस?” “हो तुझ्या लूंनाच्या नंबर खाली तिने काय लिहल होत ते मला माहिती आहे” अरविंद म्हणाला.
“मी तिचा पत्ता काढलाय. आपण तिच्या घरी जाऊयात. मी बोलेन पाहिजे तर तिच्या वडिलांशी पण be serious atleast now.”
“माझ्याकडे ह्या रत्नाचे कोंदण नाही रे अरविनदा.” मी म्हणालो. “मूर्ख आहेस. अरे रत्नांच कधीच म्हणणं नसतं सोनच पाहिजे म्हणून. चांदीत पण ती सेट होतात, अगदी उत्तम रित्या. जास्त विचार नको करूस.”
hmm माझा ट्रेडमार्क रीप्लाय वर “तू म्हणजे ना” असे म्हणत तो चिडचिडत निघून गेला. पण घरच्या जवाबदर्या, आईचे आजारपण आणि दोन बेडरूमच्या फ्लॅट मध्ये राहणारे आम्ही सहा जण ह्या परिस्थितीत अजून पाच सहा वर्ष तरी लग्नाचा विचार करण शक्य न्हवते हे अरविंदला कसे समजाऊ?
बघता बघता रिजल्ट आले. रिजल्ट बघायला कॉलेज वर गेलो. माझ्या रिजल्टचा प्रश्नच न्हवता माझा फर्स्ट क्लास ठरलेला पण तिला बघायचे होते. लिस्ट मध्ये तिचे नाव होते, पण ती न्हवती. आसपास कुठेही.
“तिचे लग्न झाले.” अरविंद दुसरे कोण? “तिचे लग्न झाले आणि त्यमुळे ती नाही दिसणार तुला आता इथे. मला दिसली होती लग्नानंतर. आमची नजरा नजर झाली. खूप आरततेने बघितले रे तिने माझ्या कडे. दगडा... तू असे नको होतेस करायला.”
हे सगळे काल पासून का आठवते आहे येवढ्या त्रिव्यतेने? गेल्या तीस पस्तीस वार्ष्यात दहा वेळाही न आठवलेली ही गोष्ट काल पासून सतत का भेडसावतीये येवढी?
“बाबा तुमचा फोन” ह्या आवाजाने दचकलो. माझी मुलगी हातात फोन घेऊन उभी होती...”कोण ग?” “अरविंद काका” ...”काय रे अरविनदा?” असे म्हणे पर्यंत अरविंद म्हणाला “आजचा पेपर बघितलास?” त्याचे वाक्य संपताय तो पर्यंत समोर पाडलेल्या वर्तमांपत्रावर नजर गेली...द्रुतगती मार्गावर भीषण.....
आज पर्यंतच्या आयूषात कधीही रडलो न्हवतो. आई गेली तेव्हा सुध्या. उर भरून आला होता, अश्रु डोकावले होते पण कधी बाहेर नाही पडले. आज प्रथमच एक अश्रु सगळ्यांची नजर चुकवून समोच्या चहाच्या कपात पडला.......
--00--
अतुल, छान आहे, थोडक्यात आहे.
अतुल,
छान आहे, थोडक्यात आहे. सत्यकथा असल्याचा भास होतोय. पुलेशु
पण ४ दिवसात शुध्द्लेखन चांगलेच केले आहे.
शेवट आवडला.. पु.ले.शु.
शेवट आवडला..
पु.ले.शु.
कथा छान आहे आवडली खुप ! कोलेज
कथा छान आहे आवडली खुप !
कोलेज जीवनातील प्रेम हा विषय जर घेतला तर प्रत्येकाची अशी वेगवेगळी कथा तयार होइल आणि अशा हजारो कथांमध्ये बोटांवर मोजण्या इतपत कथांचा शेवट सुखद असेल ( माझा अनुभव ).
......... अतुलजी पुन्हा धन्यवाद...........
ठीक आहे कथा. शुद्धलेखनाकडे
ठीक आहे कथा.
शुद्धलेखनाकडे जरा लक्ष द्याल का प्लीज?
कोलेज जीवनातील प्रेम हा विषय जर घेतला तर प्रत्येकाची अशी वेगवेगळी कथा तयार होइल आणि अशा हजारो कथांमध्ये बोटांवर मोजण्या इतपत कथांचा शेवट सुखद असेल ( माझा अनुभव ).
>>>>> जादुगरला अनुमोदन.
माझे मराठी जरा कच्चे आहे....
माझे मराठी जरा कच्चे आहे....
त्यातून इंग्लिश टाइप करत मराठी जरा अवघड जाताय..
एखादा शब्द सहज सुटू शकतो नजरेतून ...
पण पुढे नक्कीच जास्त प्रयत्न करीन सुद्धलेखनाचा
छान आहे कथा.. सुरुवातीला
छान आहे कथा.. सुरुवातीला अशुद्धलेखन जेवताना तोंडात येणार्या खड्यासारखे भासले.. पण नंतर प्रसंगांनी वेग घेतला तसे फारसे जाणवले नाही.. तरीही आपल्या पुढच्या लिखाणात मात्र नक्की याची काळजी घ्यालच.. शुभेच्छा आहेतच..
छान आहे कथा. आवडली.
छान आहे कथा. आवडली.
चांगली आहे पु ले शु.
चांगली आहे
पु ले शु.
<<<“माझ्याकडे ह्या रत्नाचे
<<<“माझ्याकडे ह्या रत्नाचे कोंदण नाही रे अरविनदा.” मी म्हणालो. “मूर्ख आहेस. अरे रत्नांच कधीच म्हणणं नसतं सोनच पाहिजे म्हणून. चांदीत पण ती सेट होतात, अगदी उत्तम रित्या. जास्त विचार नको करूस.”>>>
हे चांगलं आहे. पण इतक्या खोलवर कथा पोचली नसल्यामुळे ऑड वाटलं.
साधी सरळ पण छान कथा
छान साधी सरळ कथा, आवडली.
छान साधी सरळ कथा, आवडली.
पहिलं प्रेम नेहमीच अपुर्ण का
पहिलं प्रेम नेहमीच अपुर्ण का रहातं ?
खुप कमी लोक नशिबवान असतात
अप्रतिम!
काही वाक्य मनातली असल्यासारखी वाटली
छान आहे आवडली
छान आहे आवडली