कथा
डायरी - एक रहस्यमय प्रेमकथा (अंतिम भाग)
या आधीचे भाग १-२-३ खालील लिंक वर वाचू शकता.
http://www.maayboli.com/node/34649
आणि जर का ते वाचले नसतील तर ते वाचूनच मग हा भाग वाचायला घ्या..
........................................................................................................................
.
.
------------------------------------------ भाग -४ (अंतिम भाग) -------------------------------------------
.
.
.......................................................................................................................
.
.
उंबरठ्यातील खिळे
उंबरठ्यातील खिळे. - एक लघुकथा....
आई जाऊन आज १२ दिवस झाले होते.
आमच्या घरासाठी कष्ट उपसत बिचारीच्या हाडाची काडे झाली. वडिलांच्या तुटपुंज्या पगारावर संसाराचे गाडे ओढताना तिची होणारी दमछाक आम्ही आमच्या डोळ्यांनी पहात होतो. जमेल तसा तिला हातभारही लावत होतो. मी स्वत: पहाटे उठून वर्तमानपत्रे टाकायला जायचो तर धाकटा दुधाचा रतीब घालायला जायचा. दिवस भर शाळा कॉलेज करून शिकून आम्ही दोघेही आता स्थिरस्थावर झालो आणि आईच्या मागची विवंचना संपली. पण सुखाचे दिवस फार काळ बघायचे तिच्या नशिबात नसावे.
“खोल दो” : सआदत हसन मंटो : मराठी अनुवाद
५० च्या दशकात आपल्या लघु कथांच्या माध्यमातुन फ़ाळणीचे विखारी सत्य सांगुन गेलेल्या ’सआदत हसन मंटो’ला आपण सगळेच विसरुनही गेलोय. आजच्या पिढीला तर ’सआदत हसन मंटो’ हे नावही माहीत नसेल. ’मंटो’ च्या फ़ाळणीमुळे उदभवलेल्या परिस्थीतीवर भाष्य करणार्या कथा असोत किंवा एकंदरीतच दारिद्र्य, हिंसा, कारुण्य यांनी ओतप्रोत भरलेल्या , कधीकधी, कधी-कधी का? नेहमीच अंगावर येणार्या, वाचता वाचताच सुन्न करुन टाकंणार्या कथा कधीही विसरता न येण्यासारख्याच आहेत. मंटोच्या अनुभवसमृद्ध लेखणीची सर माझ्या बोटांना नाही. शेवटी मी फ़क्त एक पोष्टमनच !
पानसे ***** आहे
"पानसे आला का रे?"
कर्माने म्हणजे पानसेच्या बॉसने आपल्या दुसर्या सबऑर्डिनेटला मध्याला विचारले
"पानसे कुठला येतोय? गल्लीतली म्हातारी मेली असेल एखादी"
मध्याने वर न बघताच कर्माला निरुत्तर केले. करमाळकर सिनियर मॅनेजर होता. मध्या सिनियर ऑफीसर आणि पानसे बार्गेनेबल कॅटेगरी, म्हणजे वर्कर, पण मार्केटिंगमध्ये कामाला. त्याच्यामागे युनियन, त्याला हात लावणे फक्त 'व्हीपी अॅन्ड अबोव्ह' ला शक्य. बाकीच्यांनी त्याला फक्त झापणे शक्य.
मृत्यूचा उलगडा
शारदा होस्टेल फॉर वर्किंग वूमेनच्या तिसर्या मजल्यावर अनया पोचली तेव्हा ती सर्वार्थाने संपलेली होती. तीन मजल्यांचे सहा जिने चढण्यापूर्वी ती ऑफीसपासून बस स्टॉप आणि बस स्टॉप पासून होस्टेल असे एकंदर एक किलोमीटर चाललेली होती. संध्याकाळचे साडे सहा वाजूनही उकाडा कमी झालेला नव्हता. कधी एकदा पाण्याची बाटली तोंडाला लावतीय असे तिला झाले होते. पण इतकी दमणूक रोजच व्हायची. आज काहीतरी विशेष झाले होते. त्यामुळे अनयाचा संपूर्ण धीर संपलेला होता. अक्षरशः लोटलेल्या दारातून ती आत आली आणि बेडवर दाणकन आडवी झाली.
ताटकळलेला बुद्ध.
ताटकळलेला बुद्ध.
फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मनुष्यप्राणी डोळे मिटून हजारो वर्षे देव्हार्यापुढे ध्यानस्थ बसला होता. या आधी आपण डोळे कधी उघडले होते हे सुद्धा त्याला आठवत नव्हते. समोरचा देव्हारा नक्की कसा दिसतो हे सुद्धा तो विसरलेला होता. त्याला फक्त एका गोष्टीची खात्री होती की समोरच्या या देव्हार्याची एकूण लोकसंख्या आहे बरोबर तेहेतीस कोटी.
देव भेटलेला माणुस!
देव भेटलेला माणुस!
रविवारचा दिवस, हातात मस्त कॉफी..आणि सोबतीला वर्तमानपत्र....!
तस हे वर्णन आमच्या घरातल्या कुठल्याही सकाळसाठी फिट बसेल कारण पेपर वाचल्या शिवाय माझा दिवस पुढे सरकतच नाही. लहानपणी अनेकदा त्यावरुन आईचा मारही खाल्लायं. "सकाळी सकाळी कामधाम सोडुन पुरुषासारखा पेपर काय वाचत बसलियेस कार्टे?" हा आजीचा प्रश्न इतक्या वर्षात काहीच बदल न झाल्याने "पारच वाया गेलीये ही मुलगी!" हा भाव असलेल्या सुस्कार्यांमध्ये बदललाय इतकाच काय तो इतक्या वर्षाच्या सकाळमध्ये झालेला बदल.
डोक्याला शॉट
"हॅलो, बीएसएनएल का ? "
" हो, बोला "
" अहो ब्रॉडबँड बंद पडलेय "
" तुमचंच नाही, सगळीकडेच बंद आहे"
" का हो ? "
" टेक्निकल प्रॉब्लेम" खाSSड फोन बंद
*****
" हॅलो, बीएसएनएल ? "
" दोन दिवस झाले नेट बंद आहे हो, कामं अडलीयेत "
" काय करू साहेब ? सगळ्यांची तीच बोंब आहे"
" नक्की काय प्रॉब्लेम आहे हो ? "
" एक्चेंजमधे उंदराने केबल खाल्ल्यात "
" काय सांगता ? तरी किती वेळ लागेल चालू व्हायला ? "
" काही सांगता येत नाही केबल शोधायला वेळ जाणारच " खाSSड फोन बंद
*****
"हॅलो बीएसएनएल ?"
" बोला "
" तुमच्या एक्चेंजमधे प्रॉब्लेम आहे ना "
" हो ना साहेब, केबल खाल्ल्या उंदरांनी "
एन्काऊंटर
बिल्डींगच्या चवथ्या मजल्यावरील गालरीत संध्याकाळी आराम खुर्चीवर बसुन मुम्बईच्या समुद्राची गार हवा खात मस्त ड्रींक्स घेत आरामात कबाब चघळत थकवा घालवण्याचा आनंदच काही और असतो. तो पण आठवडाभराच्या चौकितल्या कटकटी, कामाचा बोजा, रात्री अपरात्रीच्या गस्ती धाडी करुन करुन दमल्यावर सुट्टीच्या दिवशी बायकापोरांबरोबर दिवस घालवुन रात्री असा शांत ड्रिंक्स घेण्याची मजा मस्तच. असा विचार करत करत एक मालबोरो शिलगावली आणी पहीला झुरका मरल्या बरोबर फोनची रींग वाजली. रात्रीचे ११:३० झाले होते जराश्या वैतागानच मी सेलफोनच्या स्रिन वरच नाव वाचल."कमीशनर चौधरी साहेब"