नवीन जागी तिची नजर भिरभिरत होती. मान वळवून ती चारी बाजूंचा अंदाज घेत होती. पाचेक मिनिटे मी शांत बसून राहिलो. घामाने अंग भिजून गेले होते. छातीची धडधड हळू हळू कमी झाली. आपल्या इटुकल्या पायांनी तेव्हढ्या वेळात तिने परस फिरून घेतला. माझ्या घरातून मी सुरा घेऊनच आलो होतो. एका हातात तिची मान घट्ट पकडून मी तिला दगडावर झोपवले.......
===
==
=
==
===
प्रिय बहीण अनामिका,
या आधी तुला बरीच पत्र लिहिली पण एकाही पत्राचं तू उत्तर पाठवलं नाहीस, कदाचित तू ती वाचलीच नसशील तुझं वय नक्कीच पत्र वाचण्याइतकं नसणार तेव्हा, म्हणूनच इतक्या उशीरा तुला हे पत्र लिहीत आहे.
तुला कदाचित माहीतही नसेल की तुला एक मोठा दादा आहे. खरंतर मलाही माहीत नव्हतं की मला लहान भाऊ झालाय की बहीण, पण एकदा आत्याला माझ्या आईबद्दल बोलताना मुलगी बद्दल काहीसं बोललेलं ऐकलं, तेव्हा मला कळलं आणि मी माझ्यातर्फे तुला अनामिका हे नाव देऊन टाकलं. आईबाबांनी तुझं नाव काय ठेवलंय?
कमीतकमी हे तरी सांगितलंय का की तुला एक मोठा भाऊ आहे म्हणून ?
जपानी माणसाने चार ओळी खरडल्या तरी त्याला एक प्रकारचा गूढ अर्थ प्राप्त होतो हेच खरे. त्यांच्या झेन गोष्टीच बघा किंवा हायकू बघा. मी एक हायकू वाचली होती ती अशी काहीतरी होती. माझा त्याचा अभ्यास नाही पण त्यातील गूढ अर्थ माझ्या चांगला लक्षात राहिला होता...तो असा काहितरी होता...
फासा
चार चेहरे.
प्रयत्न
दु:ख
याचा अर्थ असा आहे की तुम्ही कितीही नियंत्रण करायचा प्रयत्न केला तरी फेकल्यावर फासाच्या एका तरी चेहर्यावरचे दान पडतेच आणि मग ते कुठले आहे हे समजून काय करणार...शेवटी दु:खच.... असे काहितरी.
आता ही हायकू बघा..
"गूड. बी कॉम, डी बी ए.. अं?"
"येस सर"
"वेल.. एक्स्पिरिअन्स... फाईव्ह अॅन्ड अ हाफ इयर्स... अॅडमीन..."
"येस सर..."
"एक्स्ट्रॉ करिक्युलर??? ... ओह... वॉव.. फर्स्ट इन स्टेट लेव्हल सायकलिंग?? .. प्लेझंट..."
"थॅन्क यू सर..."
"सो... मिस... "
"रचना... "
"रचना कृष्णमूर्थी... टेल मी... कॉमर्सकडून एकदम अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये कसे काय काम करू लागलात तुम्ही?"
"सर... मी बिझिनेस अॅडमिनिस्ट्रेशनचा डिप्लोमाही केला आहे..."
"आय नो... बट धिस इज अॅन एन्टायरली डिफरन्ट पोझिशन"
"आय विल बी एबल टू हॅन्डल इट सर..."
"टेल मी अबाऊट यूअरसेल्फ..."
तुज येथे कोणी बोलाविले विठ्ठला | प्रार्थील्यावाचुनी आलासी का?| असे चक्क भगवंतांना बोलणारे, संत निळोबाराय हे खरोखरच महान होते. गुरुकृपा व्हावी ती देखील जगद्गुरू तुकोबारायांकडून हा अट्टाहास मनी बाळगून देहूला आले. परंतु हे होणे म्हणजे अशक्य कोटीतील गोष्ट होती. कारण तुकाराम महाराजांना वैकुंठाला जाऊन कित्येक वर्षे झाली. आणि त्यांच्या कडूनच आपल्याला अनुग्रह मिळावा असा निळोबारायांचा ध्यास होता. त्यापायी आपले घरदार सोडून ते देहूला आले. जिथून तुकाराम महाराज वैकुंठाला गेले होते तिथे म्हणजे गोपाळ पुऱ्यात धरणे धरून बसले. अन्नपाणी वर्ज्य करून अखंड तुकोबारायांचा धावा आरंभिला.
मि १९८६ सालचा
माझा जन्म एक
ब्रम्हदेव अतिशय प्रसन्न होते , कुणाला तरी वर दिल्या शिवाय त्यांना चैन पडेनासे झाले. पण गेल्या कित्येक शतकात हिमालयावर तपश्चर्या करण्याची फॅशन लयाला गेली होती. जेव्हा प्रसन्नता अगदीच अनावर झाली तेव्हा ब्रम्हदेव अप्सरे कडे निरोप ठेऊन त्वरीत पृथ्वीतलावर अवतरले . तिथे सतराशे साठ विघ्ने पार पाडून राम गणेश गडक-यांच्या ठकीचे लग्न अखेरीस जुळले होते. वरातीतील बॅन्ड बाजाचे सूर ऐकून ब्रम्हदेव अजूनच प्रसन्न झाले. कुणालाही वर द्यायचाच आहे ना तर इथेच वरदानाचे कार्य पार पाडून मोकळे व्हावे ह्या विचाराने त्यांनी वरातीसह कार्यालयात प्रवेश केला.
विस्तीर्ण समुद्र किनारा.
काय सुरेख नाव आहे ह्या गावाचं!
समुद्रही तितकाच सुंदर आहे इथला.
लख्ख निळं पाणी...तळाला वाळुच्या अगदी बारीक सारीक हालचाली सुद्धा डोळ्यांना स्पष्ट टिपता याव्यात, असं.
लाटांचा एका लयीतील गाज...त्याला वाऱ्याच्या झुळूकेची सुरेख सोबत..
चहु बाजुंनी हिरव्या मऊ सुया अंगावर लेऊन उंच गेलेली सुरुची बनं...
आणि जणु त्यांच्याशी पैज लावल्याप्रमाणे त्यांच्यापेक्षाही उंच जाणारे, डोक्यावर झापांचा मुकुट आणि गळ्यात नारळांची कंठी घातलेले माड...
बदामी रंगाची,पाऊल टाकुनही खराब होईल की काय असं वाटायला लावणारी आणि म्हणुनच की काय, पावलं टाकल्यावर त्यांना भाजणारी, गरम वाळु...
उरल डोंगररांगा रशिया देशाच्या पश्चिमेला आहेत व पार उत्तर दक्षिण पसरलेल्या आहेत, ह्या पर्वतराजीतल्या उत्तरेकडच्या टोकाला भयानक थंडी असते, तिकडच्याच एका गावात घडलेली ही गोष्ट.
नादिया नावाची एक म्हातारी स्त्री गावाबाहेर आपल्या रानातल्या प्लम व चेरींच्या टुमदार बगिच्यात लहानशी बंगली बांधुन राहात असे, दुर्दैवाने तिचा मुलगा तुर्कांसोबतच्या युद्धात दुर दक्षिणेला कॉकेशस पर्वतांमधे झालेल्या एका युद्धात झार मालकांसाठी मरण पावला होता, व तिचा नवरा एकदा उरल मधेच तावदा नदीत मासे पकडायला गेला असताना मरण पावला होता "ग्रेगोरी गेला" हे ऐकुनच तिला धक्का बसला होता.