सिलेक्शन

Submitted by बेफ़िकीर on 25 June, 2012 - 06:42

"गूड. बी कॉम, डी बी ए.. अं?"

"येस सर"

"वेल.. एक्स्पिरिअन्स... फाईव्ह अ‍ॅन्ड अ हाफ इयर्स... अ‍ॅडमीन..."

"येस सर..."

"एक्स्ट्रॉ करिक्युलर??? ... ओह... वॉव.. फर्स्ट इन स्टेट लेव्हल सायकलिंग?? .. प्लेझंट..."

"थॅन्क यू सर..."

"सो... मिस... "

"रचना... "

"रचना कृष्णमूर्थी... टेल मी... कॉमर्सकडून एकदम अ‍ॅडमिनिस्ट्रेशनमध्ये कसे काय काम करू लागलात तुम्ही?"

"सर... मी बिझिनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशनचा डिप्लोमाही केला आहे..."

"आय नो... बट धिस इज अ‍ॅन एन्टायरली डिफरन्ट पोझिशन"

"आय विल बी एबल टू हॅन्डल इट सर..."

"टेल मी अबाऊट यूअरसेल्फ..."

"सर... आय अ‍ॅम ट्वेन्टी एट इयर्स ओल्ड तमिलियन फ्रॉम मुंबई... अ‍ॅम मॅरिड... टू किड्स... आय लॉस्ट माय हसबंड थ्री इयर्स बॅक.. इन अ‍ॅन अ‍ॅक्सिडेन्ट सर... अ‍ॅन्ड.. आय हॅव बीन अ विनर इन सायकलिंग... आय कॅन हॅन्डल अ ग्रूप ऑफ पीपल.. आय डिड माय ग्रॅज्युएशन फ्रॉम मुंबई ... डी बी ए फ्रॉम मुंबई अ‍ॅज वेल... अ‍ॅन्ड आय अ‍ॅम लूकिंग फॉर अ चॅलेंजिंग जॉब नाऊ.. "

"चॅलेंजिंग?"

"सर..."

"हं... चॅलेंजिंग... तुम्हाला काही कल्पना आहे की या जॉबमध्ये काय चॅलेंजेस आहेत?"

"येस सर..."

"काय काय आव्हाने आहेत असे वाटते तुम्हाला?"

"नाचक्की होऊ शकते... जॉब जाऊ शकतो..."

"हंहं??"

"टीका होऊ शकते.. माझे करीअर धोक्यात येऊ शकते..."

"आणि टीम हरू शकते... हो की नाही???.. देशाचे नांव खाली जाऊ शकते..."

"येस सर..."

"आणि तुम्हाला दोन मुले आहेत... आणि तुम्हाला हा जॉब हवा आहे... आणि हे सगळे मॅनेज करून तुम्ही आपल्या टीमला साऊथ एशिया गेम्समध्ये मेडल देऊ शकता असे तुम्ही म्हणताय..."

रचना कृष्णमूर्थीने अभय सिंगच्या डोळ्यात डोळे घालून पाहिले आणि म्हणाली...

"येस सर..."

"यू नो रचना... देअर आर थाऊझंड अ‍ॅप्लिकेशन्स लायिंग ओव्हर देअर... दोज आर फ्रॉम टूडेज सायकल रायडर्स.."

"येस सर..."

"यू हॅव लॉस्ट टच एट इयर्स अ‍ॅगो..."

"येस सर... बट आय अ‍ॅम अप्लायिंग फॉर द ट्रेनर्स पोझिशन..."

"दॅट्स व्हॉट... इव्हन अ ट्रेनर हॅज टू बी इन टच नो???"

"नक्कीच सर... पण मला खात्री आहे क..."

"पण मला खात्री आहे की मी हे काम करू शकेन.. त्याला न्याय देऊ शकेन.... विश्वास टाकून बघा... वगैरे"

जॉब मिळणार नाही हे रचनाला लगेचच समजले. आठ वर्षापूर्वी स्टेट लेव्हल सायकलिंगमध्ये नंबर मिळवलेली रचना नंतर एकच वर्ष ट्रेनर म्हणून होती आणि नंतर सर्वसामान्य आयुष्याकडे वळली होती... जयनचा अपघात आणि त्यानंतर दत्तक घेतलेली दोन मुले आणि सासूबाई. इतकेच तिचे वर्तुळ आणि अनुभवविश्व. आणखी एक म्हणजे गेल्या पाच वर्षातील एक जॉब. दोन्ही मुलांना आईपेक्षा आजीचा लळा जास्त असल्याचे कारणही हा जॉबच होता. जयन ही एक धूसर स्मृती आणी सासूबाईंचाही मुलगाच गेल्याने त्यांचे रचनावरच बसलेले मुलीसारखे प्रेम ही जमेची बाजू. आणखी एक जमेची बाजू म्हणजे पैसा. तो कमी नव्हता. जयनच्या वडिलांनीच इतके कमावलेले होते की जयनलाही जॉबची गरज नव्हती खरे तर.

या समोर बसलेल्या अभय सिंगच्या तोंडावर तीन लाख कॅश फेकली की हा जॉब मिळतो असे तिने बाहेरच्या हॉलमध्ये बसलेल्या अनेकांपैकी एकाकडून ऐकले होते. तीन लाख तिने फेकलेही असते. पण तिचे तत्व वेगळे होते. जीवन मरणाचा प्रश्न असला तर भ्रष्टाचार करावा. नाहीतर नीट जगावे. हा तिच्या जीवनमरणाचा प्रश्न नव्हता.

जीवन मरणाचा प्रश्न नसणे, अगदीच वाटले तर पैसेही देता येण्याची क्षमता असणे आणि एवीतेवी जॉब गेलेलाच आहे हे समजलेले असणे.... या तीनही घटकांनी रचनाला धीट बनवले आणि तिने ठरवले...

जे काय आहे ते समक्ष बोलूनच उठायचे... या तरी लोकांच्या लूज कमेंट्स कशाला ऐकायच्यायत आपण? आपल्याला तसाही एक चांगला जॉब आहेच की?

"येस मिस रचना... व्हॉट मेक्स यू थिंक??... की आठ वर्षांनी तुम्हाला हा जॉब मिळावा... जो घेण्यास आजचे यशस्वी ट्रेनर्स आणि अतियशस्वी सायकलपटू तयार आहेत?"

"येस सर... मला असे वाटते की हा जॉब मला मिळावा.. याचे कारण असे.. की मी जरी आठ वर्षे प्रत्यक्ष टचमध्ये नसले ... तरी सायकलिंगमद्ये आपली झालेली एकंदर प्रगती, नवीन तंत्रज्ञाने आणि आपल्याकडचे टॅलेंट याची मला पूर्ण कल्पना आहे... आणि मुख्य म्हणजे.. माझी प्रशिक्षण पद्धतीच पूर्णपणे भिन्न आहे..."

चारजणांच्या पॅनेलच्या आठ भुवया वर चढल्या... एकमेकांकडे चुटपुटत्या नजरेने पाहून घेतले गेले.. एक चेहरा कुत्सितपणे स्मितहास्यही करू लागला.....

आश्वासने... खात्री... प्रॉमिसेस... या सर्वांची खैरात करणारे हजारोजण या चौघांनी पाहिलेले होते... मी आलो तर मी अख्खे विश्वच बदलून दाखवेन अशी देहबोली जवळपास प्रत्येकाचीच असायची.. एवढे करूनही श्रीलंकेच्या सायकलपटूंपुढे आपला एकहीजण जायचा नाही... जॅपनीज बुटके वेटलिफ्टर्स भारतीय पैलवानांपेक्षा जास्त वजन जास्त सहजपणे उचलायचे... आणि पाकिस्तानी धावपटू आपल्याला मागे टाकायचे...

रचना कृष्णमूर्थी - फॉर देम - वॉज जस्ट अनादर कॅन्डिडेट लिव्हिंग इन ड्रीम्स...

"अच्छा.. तुमची प्रशिक्षण पद्धती भिन्न म्हणजे काय आहे सांगता का?"

"नक्की सर... पण त्यापूर्वी एक विनंती आहे..."

"काय?"

"गंभीरपणे माझे म्हणणे ऐकून घेतले जावे..."

"ओह शुअर... प्रश्नच नाही..."

अभय सिंग उपरोधिकपणे म्हणाला आणि रचनाच्या मेंदूतील एक नस चमकली... अतीच शहाणपणा होता त्याच्या वागण्यात... पण निदान आपली भूमिका तरी मांडायचीच असे तिने ठरवले..

"सर... गेम्स सव्वा वर्षांनी आहेत... मी सिलेक्ट झालेच... तर स्पर्धेत सहभागी होणार्‍या सर्व मुली पुढच्या महिन्यापासून मला जयपूर येथे एक वर्ष राहायला हव्या आहेत..."

पहिल्याच वाक्याने रूम सर्द झाली होती... प्रत्येक स्पर्धक फार तर दिड महिना एकत्र असू शकणार होता.. ही बया काहीही सांगत होती... जयपूर येथे एक वर्ष राहायचा खर्च सरकारच्या बापाने का करावा?

"अ‍ॅन्ड हू विल स्पेन्ड मनी फॉर दॅट?"

"डोनेशन्स... आय डोन्ट नो एनी अदर वे"

"डोनेशन्स... कोणी द्यावीत अशी डोनेशन्स?? आणि का?"

"का म्हणजे? तुम्हाला आणि मला जर भारत जिंकावा वाटतो आणि बाकीच्यांना जर ती बातमी पेपरात वाचावीशी वाटते तर देशासाठी थोडी रक्कम का काढून देऊ नये कोणीच???"

"मिस रचना.. प्लेयर्सचे टीशर्ट्स.. संपूर्ण वॉर्डरोब्ज.. अनेक गेम्समध्ये प्रवास आणि राहण्याचा खर्च ... बहुतेक गेम्ससाठीचे ट्रेनिंग... यातील जवळपास पंच्याऐंशी टक्के खर्च ऑलरेडी स्पॉन्सर झालेला आहे... त्यामुळे डोनेशन्स डोक्यातून काढून टाका.."

"मग विजयही डोक्यातून काढून टाका... ज्या मातीतल्या माणसांना मातीसाठी पदरमोड करायची इच्छा नाही त्यांच्यासाठी जिंकायचं कशाला??? तुम्ही मी आणि हे बाकीचे तिघे... आपण घालू की वीस वीस हजार?"

"आणि एक लाखात वीस सायकलस्वार मुली जयपूरला एक वर्ष राहणार आणि प्रशिक्षण घेणार असं म्हणताय?"

"थोडासा उपरोध बाजूला ठेवलात तर डोनेशन्स मिळवता येतील... "

"समजा मिळवली... किती लागतील.. समजा एक कोटी रुपये लागले.. आणि ते मिळाले... पुढे???"

"जयपूरच्या हवामानाला प्रत्येक खेळाडू सूट होईल एक वर्षात..."

"मग?"

"मग काय? मी प्रशिक्षण घेणार... "

"समजा सरकारनेच स्वखर्चाने या मुलींना जयपूरला ठेवलं... पण त्या आल्याच नाहीत..."

"तर त्यांना घ्यायचंच नाही... साऊथ एशियन गेम्स म्हणजे मजाक नाही ना?"

"अच्छा.. त्यांना घ्यायचंच नाही.. असं सांगितल्यावर धावत आल्या.. आणि अधेमधे कधीही कुठेही गेल्या नाहीत... रोज प्रशिक्षण घेऊ लागल्या... की आपण जिंकू का?"

"छे... आपण कसले जिंकतोय... आपण जिंकू असे वाटणारी माणसे प्रत्येक क्रॉस सेक्शनमध्ये असल्याशिवाय आपण नाही काही जिंकणार"

पायातल्या वहाणेने थोबाड फोडावे तसा चेहरा झाला अभय सिंगचा...

"अच्छा... म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की मलाच असं वाटत नाहीये की आपण जिंकावं..."

"शक्यता आहे... वर्षानुवर्षे हारण्याची सवय लागली की मनोवृत्ती तशी होऊ नक्कीच शकते..."

"ओह... ओके .. राईट मिस रचना... थॅन्क्स फॉर यूअर टाईम... वुइ विल लेट यू नो..."

जाहीर अपमान झाल्यामुळे अधिकारांची जाणीव होऊन अभय सिंगने सरळ आवराआवरीच्याच मूडमध्ये वाक्य टाकले... ते पाहून उठत असलेल्या रचनाकडे बघत पॅनेलवरची सुशिला असरानी भोचकपणे पण ठासून बोलत रचनाला पुन्हा जागेवर बसवत म्हणाली...

"एक मिनिट... एक मिनिट... हाऊ आर यू सो व्हेरी कॉन्फिडंट रचना?"

"आय अ‍ॅम.. इट्स सिंपल.... आय कॅन ओन्ली विन..."

"हंहं?... तुझ्या शब्दावर अवलंबून आम्ही निर्णय घ्यावा?"

"तो प्रश्न पूर्णपणे तुमचा आहे... पण अ‍ॅरोगन्स असल्याशिवाय विजयाच्या पताकेचा कोपराही दिसत नाही... इतर देशांच्या प्लेयर्सच्या बॉडी लॅन्ग्वेजमध्ये अ‍ॅरोगन्स आणि कॉन्फिडन्सचे मिश्रण असते... जे पाहून स्वतःचा आत्मविश्वास नुसता टिकवून ठेवणेही भारतीय खेळाडूंना जमत नाही... गुण मातीचा आहे हा.. कोणाची चूक नाही ही..."

"ओह ओ?... सो यू मीन.. अ‍ॅरोगन्स कॅन गेट यू देअर.."

"नॉट ... ओन्ली अ‍ॅरोगन्स... खरा सरावही करायला हवा... स्पर्धा चीनमध्ये असत्या तर आपण तेथे फार तर पंधरा दिवस आधी डेरेदाखल होऊ शकलो असतो.. भारतातच आहेत... भारतात कुठेही जायला पासपोर्ट आणि व्हिसाची गरजच नाही... तर पूर्ण प्रयत्न का करू नयेत??? स्पर्धकांमध्ये एकमेकांमध्ये निखळ मैत्री निर्माण होणे याहीसाठी तितका कालावधी असायला हवा... आणि निखळ मैत्री नसली... आपापसातच हेवेदावे आणि चढाओढ असली तर... स्पर्धाही आपापसातच होतात... इतरांशी नाही... "

तिवारीचे काळ्याचे पांढरे आणि पांढर्‍याचे 'नसलेले' केस त्या टेबलवरच झालेले होते... सुशिला असरानी आणि अभय सिंगला मिळालेली लेक्चर्स ऐकून रचनाकडे बघत खोखो हासत आणि चष्मा काढून 'इतके हासणे' सहन होत नसल्यासारखे आविर्भाव करत तो रचनाला हासत हासतच म्हणाला...

"यू नो व्हॉट???? .. आय अ‍ॅम इन्क्लाईन्ड टू अ‍ॅग्री टू यू.. अ‍ॅन्ड आय कान्ट बिलीव्ह.. आय अ‍ॅम सेयिंग धिस...अ‍ॅबसोल्यूटली... नॉट द गेम्स... बट यू सीम टू हॅव वन द इन्टरव्ह्यू...."

त्याच्या स्वरात उच्च दर्जाचा उपरोध असल्याने रचना नुसतीच शांत बसून राहिली... अभय सिंगने आता रचनाला काउन्ट आऊट केलेले होते... तो निव्वळ मागे टेकून होत असलेली मजा पाहणार होता... आणि सुशिला असरानी संतप्त अवस्थेत एकदा तिवारीकडे आणि एकदा रचनाकडे बघत होती...

हसून थांबलेला तिवारी आता जळजळीत नजरेने रचनाकडे पाहात म्हणाला..

"थ्री आऊट ऑफ फोर ऑफ अस हॅव बीन ट्रेनर्स इन व्हेरियस गेम्स.. अ‍ॅन्ड नो वन ऑफ अस हॅज बींग सो ओव्हर कॉन्फिडन्ट..."

"कंग्रॅच्युलेशन्स सर... दो आय डोन्ट नो हाऊ मेनी टाईम्स वुई हॅव वन इन दोज गेम्स..."

रचनाला खरे तर माहीत होते. सुशिला असरानी तर मागे एकदा सायकलिंगचीच ट्रेनर झालेली होती.... आज म्हातारा असला तरी अतिशय वेल बिल्ट वाटणारा तिवारी एकेकाळी धावपटू होता... त्याला स्वतःला एक पदक मिळालेले होते आणि ट्रेनर म्हणून केलेल्या कारकीर्दीत त्याच्या दोन शिष्यांनाही... आणि अभय सिंगचा तर प्रश्नच नव्हता... तो उत्तम व्हॉलीबॉलपटू होता... उंची ताडमाड... आणि ट्रेनर म्हणून त्याने स्विमिंग आणि व्हॉलीबॉल या दोन गेम्ससाठी काम केलेले होते... फक्त गोची एकच होती... ट्रेनर म्हणून फक्त तिवारीच्याच एक दोघांना मेडल मिळालेले होते... बाकीचे इन्टरव्ह्यू घ्यायला तरबेज झालेले होते...

ही मुलाखत का कन्टिन्यू करण्यात येत आहे हेच त्या चारपैकी तीन सदस्यांना कळत नव्हते... खरे तर ते स्वतःच ही मुलाखत लांबवत होते... अभयने मगाशीच रचनाला जायला सांगितलेले होते... आणि मुलाखत लांबण्याचा परिणाम असा होत होता की मुलाखत घेणार्‍यांचीच थोबाडं अपमानाने खाली जात होती..

तिवारी सरकला की वेळ जातो हे इतरांना माहीत होते... आता तिवारी रचनाचा पूर्ण अपमान झाल्याशिवाय तिला सोडणार नाही हे समजून सुशिलाही मागे टेकली आणि नुसते पाहण्याची भूमिका घेऊन बसली...

तिवारीचे आपोआप मोठे झालेले डोळे रचनावर रोखले गेले आणि म्हणाला...

"यू नो हू यू आर टॉकिंग टू?"

"शुअर सर.. दोज ट्रेनर्स.. हू हॅव नॉट बीन एबल टू विन द गेम फॉर द नेशन.."

"कॅन यू प्लीज गेट लॉस्ट धिस मोमेंट??"

"शुअर सर... पण एक गोष्ट सांगते..... तुम्ही तिघे तर सत्याचा स्वीकार या टेबलवरच करत नाही आहात... जिंकाल कसले???"

"प्लीज... गो... अवे..."

"मी चाललेली होते.. पण ज्या पद्धतीने मला घालवून देण्यात येत आहे... मी काही आता इथून उठत नाही... माझी मुलाखत व्यवस्थित व्हायलाच हवी... माझी मुलाखतच झालेली नाहीये अजून... "

"तो निर्णय आमचा आहे... आपण निघण्याचे करावेत..."

"सॉरी.. मला प्रश्नच विचारण्यात आले नाहीत की मी आपल्या संघाला कशी जिंकून देणार आहे..."

"आपण जिंकून देऊ शकायचा नाहीत हे स्पष्ट दिसत आहे... "

"जयपूरच्या सॉईलचा प्रश्न आहे..."

"त्या आमच्या चिंता आहेत..."

"तुमच्यापैकी एकानेही जयपूरच्या आर्टिफिशिअल हार्ड ट्रॅकवर सायकलिंगही केलेले नाही... आणि मी त्यावर महाराष्ट्रातर्फे पहिली आलेली आहे.."

"त्यानंतर तुम्ही संसार केलात आणि तुम्हाला दोन मुले झालेली आहेत..."

"मी ट्रेनरच्या मुलाखतीला आली आहे.. रायडरच्या नाही..."

"आणि मुलाखत संपलेली आहे.. की सिक्युरिटीने सांगितलेलेच ऐकू येते???"

" फाईन... सो सॉरी टू बॉदर यू... बट वन थिंग सर.. आपण तर काय .. हारणारच आहोत... असे चेहरे करून तुम्ही सगळे मुलाखती घ्यायला बसलेला आहात.. निदान वागण्यात तरी जेत्याची लक्षणे दाखवत जा.. जग हासेल"

रचना पाठमोरी होऊन चालू लागली तेव्हा तिचे जळजळीत शब्द कानातून मेंदूत घुसलेले होते सगळ्यांच्या... आणि दोन मुले होऊनही ही बाई चांगलीच सेक्सी दिसते हा अभय सिंगचा विचार तिच्या त्या शब्दांनी ढवळला गेला होता... तिवारीच्या डोळ्यासमोर होते इतर जगातील फूटबॉलचे आक्रमक कोच... जे उड्याही मारायचे आणि हारल्यावर जमीनीतही लोळायचे.... जिवंत खिलाडू वृत्तीचे प्रतीक असलेले कोच... आणि सुशिला असरानी स्त्री सुलभ मत्सर वाटून 'बट हाऊ कॅन वुई टॉलरेट सच कॅन्डिडेट्स' असे म्हणत त्या चौथ्या माणसाला बोलायला प्रवृत्त करत होती... चौथा माणूस... सुशिलाचे ते वाक्य ऐकून न ऐकल्यासारखे करत तोंड उघडून बोलत होता..

"मिस कृष्णमूर्थी... आय अ‍ॅम विल्फ्रेड परेरा.... यू कॅन कॉल मी विल... प्लीज बी सीटेड..."

विलच्या स्वरात एक बर्फाळ थंडपणा, हुकुमत आणि शहारे आणणारी तीव्रता होती... हा विल कोण आहे हे काही रचनाला माहीत नव्हते... ते कोडे त्यानेच सोडवले..

"आय अ‍ॅम हेडिंग धिस पॅनेल... आय अ‍ॅम फ्रॉम गोवा... हाऊ डू यू डू???"

"व्हेरी वेल सर.. हाऊ अबाऊट यू???"

"गूड... बाय द वे... आय नो मराठी..."

"नमस्कार सर..."

"अ‍ॅन्ड अल्सो तमिल..."

रचना हासली की छान दिसते हे चौघांना आत्ताच समजले...

"सो मिस कृष्णमूर्थी...यू वेअर"

"सर् यू कॅन कॉल मी रचना..."

"फाईन.... रचना... आय पर्सनली डोन्ट लाईक टू अ‍ॅग्रेसिव्ह नेचर..."

"सॉरी सर..."

"बट यू मेड सम पॉईंट्स.. टेल मी... आपली टीम कशी जिंकेल?? जर तू ट्रेनर असलीस तर????..."

उत्तर द्यायला एक क्षणही न घालवता रचना म्हणाली...

"सर्वात पहिल्यांदा मी टीमला सांगेन सर... की आपण हारणार आहोत... "

हासरा, मिश्कील आणि आश्चर्य झालेला चेहरा घेऊन आता विलही मागे खुर्चीला टेकला... आणि म्हणाला....

"कम अगेन???"

"की आपण हारणार आहोत.... मुळातच आपण जिंकणार नाही आहोत... इन फॅक्ट.. मला परवानगी मिळाली तर मी सरळ पेपरमध्येच स्टेटमेंट देईन.. की यावेळेसची टीम सामान्य कामगिरी करू शकेल.. "

"आणि तू त्यांचा कॉन्फिडन्स घालवणार..."

"अगदी बरोबर सर... "

"मग काय होईल???"

विलच्या स्वरात कुतुहलाचा समुद्र अवतरला होता... आणि बाकीचे तिघे पापणीही न लववता रचनाकडे पाहात होते...

"ते डिवचले जातील.."

"आणि?"

"आणि त्यांना मी सांगेन... की आपल्यासमोर काहीही ध्येय ठेवू नका..."

हे वाक्य ऐकून विलचे स्मितहास्य आणखीनच रुंदावले.. त्याने कोणत्यातरी आनंदात बेल वाजवली आणि आत आलेल्या माणसाला पाच चहा सांगितले..

"हं! तर आपल्यासमोर काहीही ध्येय ठेवू नका असे तू सांगणार..."

"येस सर..."

"मग??? सरकारचे पैसे वाया घालवायचे???"

"नाही सर... मी त्यांना सांगणार की फक्त आपल्या पुढची जी सायकलस्वार आहे.. म्हणजे इमिजिएट पुढची तिच्याच फक्त पुढे जायचे आहे.. बाकी कुणाच्या नाही..."

"आणि असे ती मुलगी सर्वात पहिल्या सायकलस्वाराला मागे टाकेपर्यंत करत राहणार..."

"पण ते तिचे ध्येय नसणार.... तिचे ध्येय असणार फक्त आपल्या इमिजिएट पुढे जी आहे तिच्या पुढे जायचे..."

"टू चाइल्डिश..."

"मे बी... बट विन्स द गेम..."

"पण ती सतत पुढे राहू इच्छिणारच नाही.. कारण तिचे ध्येय फक्त एखादीच्या पुढे जाण्याचे आहे.. पुढे राहण्याचे नाही..."

"पण फायनल पॉईंटला तिच्यापुढे कोणीच नसावे हेच ती बघणार..."

"म्हणजे सराव बिराव जिंकण्याचा... आणि प्रत्यक्ष सहभाग घेताना हारण्याची तयारी..."

"हारण्याची तयारी नाही सर... हारण्याचे ध्येय... "

"प्लीज... प्लीज.. प्लीज.. मला नीट सांग... हारण्याचे ध्येय म्हणजे काय???"

"जिंकायचे नाहीच आहे.. फक्त कोणी पुढे असता कामा नये... "

"म्हणजेच जिंकणे ना?" - अभय सिंग पचकला.

त्याला उजव्या हाताने खुण करत परस्पर गप्प बसवत विलने विचारले..

"मुलींच्या मनात काय असणार एक्झॅक्टली???"

"हारलो तर कोणीही काहीही विचारणार नाही... "

"वॉव्ह.. आणि???"

"आणि जिंकणे अशी कोणतीही अवस्था या शर्यतीत नाही..."

"पण रचना.. खेळप्रकारामाधून जिंकणे आणि हारणे या संज्ञाच काढून घेतल्या तर राहिले काय??? आणि ते जे काय राहिले ते का प्राप्त करावे कोणीही???"

"दोन्ही संज्ञा तश्याच आहेत सर.... पण आपल्यासाठी जे 'त्यांचे जिंकणे' आहे ते त्यांच्यासाठी 'त्यांचे जिंकणे' नाही आहे"

"मग??"

"त्यांच्यासाठी त्यांचे जिंकणे म्हणजे फक्त 'प्रयत्न' आहेत... आपल्यापुढे कोणीही नसावे यासाठी केलेले..."

"बट व्हाय विल दॅट वर्क???"

"कारण एक वर्षात् मी त्यांचा इगो फुलवणार... सराव करून घेणार.. इतर स्पर्धकांचा... त्यांच्या पुढे जाण्याचा राग यावा अशी मनस्थिती निर्माण करणार... पाठींबा देणार... प्रोत्साहने देणार... टीका करणार.... बोचरे टोमणे मारणार... जाहीर शिव्या देणार... 'इन्डिया' हे नांव पाठीवर नसलेला खेळाडू तुमच्यापुढे असणे हे तुमच्या स्वाभिमानावर घाला घातल्यासारखे आहे हे रक्तात भिनवणार..... मी त्या वीसजणींचे एक कुटुंब बनवणार.. त्यांच्यासाठी ट्रीप्स ठेवणार... ट्रेकिंग ठेवणार.. ग्रेडियन्ट बायकिंग नियमीत करणार... हळूहळू त्यांचा त्यांच्या मूळ कुटुंबाशी संपर्क निल करत जाणार... आयुष्य म्हणजे ही स्पर्धा अशी जोरदार भावना निर्माण करणार... जगज्जेते खेळाडू ज्या वेगाने जातात त्यापेक्षा जास्त वेग मिळवता येण्यासाठी खास प्रशिक्षण देणार... त्या वीस जणींच्या वागण्यात स्पर्धा आधीच जिंकलेली आहे आणि औपचारीकता राहिलेली आहे हा अ‍ॅन्गल प्रभावीपणे दिसेल हे डोळ्यात तेल घालून बघणार... मुलींचा आहार.. व्यायाम ... आणि सराव यासाठी तीन स्वतंत्र माणसे नेमणार... पहिल्या महिन्यात मौजमजा करणार्‍या वीस मुली शेवटच्या महिन्यात एकमेकींना नावानेही ओळखत नसतील... फक्त नंबरने ओळखत असतील.. त्यांना कोणाचेही आडनांव आठवणार नाही... फक्त वेग आठवेल.... आपल्या शहराचे नांव आठवणार नाही... पण ट्रॅकचा बिंदू अन बिंदू पाठ होईल... त्यांना म्युझिकमध्ये इन्टरेस्ट राहिलेला नसेल... पण प्रत्येक राऊंड पुरी करताना मनात स्वतंत्र.. आपले आपले असे एक संगीत निर्माण होत राहील... कोणताही परदेशी कोच, प्लेयर त्यांना स्पर्धेआधी एकदाही पाहू शकणार नाही.... एवढेच काय.. तुम्हा चौघांशिवाय सरावाच्या शेवटच्या टप्प्यात कोणालाही तेथे प्रवेश नसेल... सराव कोणता आणि स्पर्धा कोणती हेही मुलींना ओळखणे अवघड जाईल असा सराव होईल.. आपण जे केले त्याचे हे फळ आहे ही भावना प्रबळ होणे आवश्यक ठरेल.. फीत कापून पुढे गेलेली आणि पहिली आलेली मुलगी सायकलच चालवत राहील... आपण जिंकलो हे तिला प्रेक्षकांमुळे कळेल.. आत्ता हे सगळेच स्वप्नवत वाटत आहे सर... पण आपण नेहमी घेतो तसा दोन अडीच महिन्यांचा सराव आणि वेगवेगळी वातावरणे यातून काही साध्य होणार नाही.. जर हे करायचे असले तर नीट केले पाहिजे अशा मताची मी आहे.. हीच मेथडॉलॉजी घेऊन तुमच्यातीलही प्रत्येकजण हे करू शकेल... मीच पाहिजे असे नाही... पण मी त्या मुलींसाठी नवीन असेन... माझ्याबद्दल त्यांच्या मनात एक भीतीही असेल... तसेही... आजवर अनेकदा हारत असलेल्या आपल्याला हा जुगार खेळायला हरकत काय म्हणा... पण मुलाखत म्हणजे फार्स नसावा... कागदोपत्री श्रेष्ठ ठरणारे उपक्रम राबवण्याचा बावळटपणा नसावा.. प्रत्यक्ष सायकलिंग करणार्‍यापेक्षा काहीवेळा ट्रेनर महत्वाचे बोलू शकतो याची जाण असावी.. डोळे उघडे ठेवून बदल स्वीकारण्याची मानसिकता जपावी.. आय अ‍ॅम सॉरी... तुम्ही सर्व एवढे सिनियर्स असून मी इतकी बोलले... निघते सर... विचार पटले तर जरूर कळवा मला.. "

"शुअर रचना... वुई विल लेट यू नो..."

रचना निघून गेली. चहा घेऊन शिपाई आत आला... चौघांसमोर चार कप ठेवून त्याने पाचवा कप हातात धरून विल्फ्रेडला विचारले..

"पाचवा कप कोणासाठी सर?"

विलने नुसताच हात केला... शिपायाने कप कुठेतरी तिथेच ठेवला आणि निघाला.. दोन पावले चालून मागे वळला आणि विलकडे बघत म्हणाला..

"सर.. त्या रचना कृष्णमूर्थी नाहीत का? मागे एकदा पहिल्या आल्यावत्या बघा सायकलिंगमध्ये... ???"

"हं??"

"त्यांनी आज सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली सर"

========================================================

-'बेफिकीर'!

"

गुलमोहर: 

बेफिकीर बहुदा ' आय अ‍ॅम ट्वेन्टी यिअर्स ओल्ड' मध्ये काही टायपिंग मिस्टेक झालेली दिसतेय .

भूताचं अ‍ॅग्रेशन आवडलं. भूतं हल्ली सर्टिफिकेटच्या फाईली सारख्या फिजीकल गोष्टीपण कॅरी करतात हे वाचून मजा वाटली.
पण बिचार्‍या रचनाने आत्महत्या का केली कुणास ठाऊक?

hello,

goshta khup chan fulawali ahe pan end abrupt watala. Ka marala tila? nahi zepala. Please explain if possible.

-
Thanks