स्वप्नांच्या पलीकडले
कोल्हापूरची मीटिंग संपली आणि मी घरी जाण्यासाठी एस टी पकडली. मीटिंग म्हणावी तशी यशस्वी झाली नव्हती . मन जरा खट्टू झालं होतं. तरी बरं की एस टी तरी लगेच मिळाली. . एस टी वाटेला लागली आणि मग सकाळपासून मनाआड केलेले घरचे विचार मनात पिंगा घालू लागले .
"सर, मला दोन महिन्यांची रजा हवी होती"
काळेने आठ्या पाडत दासकडे पाहिले.
"यू नो दास? आय हॅवन्ट टेकन लीव्ह सिन्स लास्ट सिक्स मन्थ्स... इव्हन वन डे... तुझा नेमका काय प्रॉब्लेम चालू आहे ते सांगशील का? मला वाटते तुझे लक्षच तिसरीकडे आहे"
"सर... विषय अतिशय वेगळा आहे... सांगावा लागणारच आहे... पण... असा.. तुम्ही आत्ता इतके बिझी असताना सांगणे मला जरा... अयोग्य वाटत आहे.. "
"दास... सांगच सांग... नेमके काय झाले आहे???"
चूक
==================================================
" आयला संत्या, किती वेळ लावतोस रे प्यायला . पटापट पी आणि चल. "
" गप् रे वाकड्या, पिऊ दे कि त्याला निवांत. आणि एवढ्या लवकर घरी जाऊन काय अंडी घालायची आहेत ? "
" अरे तसं नाही रे पण आता बारा वाजत आलेत आणि - "
" बारा तेरा मला काय माहित नाही. एवढा चकणा संपेपर्यंत थांब. फार फार तर अर्धा तास लागेल. मग साडे बारा वाजता निघूया आपण. "
वाकड्या काय बोलतो यावर ! तो बसला गप् चकणा खात.
(पहिल्यांदाच कथा लिहिली आहे...जस जसं सुचेल तसं माझ्या फेसबुकच्या पेजवर भाग प्रदर्शित केले होते... इथे आहे तशी टाकतोय
लिहिण्याची खूप इच्छा असणाऱ्या पण जमत नसणाऱ्या लोकांपैकी मी एक....
अनुभवींचा प्रतिसाद आणि सल्ला हवाय)
स्थळ : एका मध्यमवर्गीय घराचा दिवाणखाना.
काळ : चालू म्हणजे सांप्रतकाळ.
पात्रं : एका मध्यमवर्गीय घराच्या दिवाणखान्यात योग्य अशी - वडिल (वय वर्षे ५० च्या आसपास), मुलगी (वय वर्षे २५ च्या आसपास), मुलगा (वय वर्षे २५ च्या पुढे आणि बहिणीपेक्षा २ वर्षांनी मोठा), आई (नवर्यापेक्षा बरोबर ५-६ वर्षांनी लहान).
वेशभुषा : एका मध्यमवर्गीय घराला आणि काळाला योग्य अशी - वडिल, मुलगा शर्ट्-प्यांटीत. आई - पंजाबी ड्रेसात, मुलगी - जीन्स-टॉप मध्ये.
" नको रे कटकट करूस !!! माहिती आहे ना आज....." मीनल चं वाक्य पुर न करू देता रुची म्हणाली.
"सोमवार आहे !!!!" .
नेहेमी प्रमाणे अजित आणि रुची च्या खाणाखुणा झाल्या. आणि दोघे फिसफिसायाला लागले.
" मार देईन हा दोघांना !!! खा आता पुढ्यातल. आणि मादाम तुम्ही. लक्षात ठेवा की आपल्याला एक घर आहे. सुट्टी असली तरी घरातच राहायचं. सगळ जग उंडारत फिरायचं नाही. "
" ए आई, घे ना कलटी ... बाबा काय बोर आहे हो तुमची बायको. आज १० दिवसांनी ही ऑफिस ला जाते आहे आणि आमच्या डोक्याला ताप. "
बाबा काय लगेच तत्परतेने हासला. " मिनू डियर शांत हो पाहू. खूप दिवसांनी ऑफिसला जाते आहेस ना, मग शांत डोके ठेव. "
व्यक्ती आणि वल्ली - १ ..... "खुफियापंक्ती"
स्थळ - आमची मुंबई लोकल ट्रेन
वेळ - थोड्याफार गर्दीची.
प्रमुख कलाकार - दोन निरागस(?) मुले. एक किडकिडीत शरीरयष्टीचा, तर दुसरा अगदी त्याच्या उलट.. आणि त्यांच्या सोबतीला एक सुंदरशी मुलगी.
आणि मी??
नाही हो, मी आपला फक्त निवेदक..
चला, तर मग घटनास्थळीच घेऊन जातो तुम्हाला.
....................................................................................................
....................................................................................................
मध्यंतरी बंगलोरला काही कामानिमित्त गेलो असताना अंकित घाटपांडेशी ओळख झाली, ऑफिशियल नाही पण एक जिंदादील माणूस म्हणून एकदम आवडून गेला तो. तो आलेला एका सॉफ्टवेअर कंपनीतून म्हणजे बंगलोरच्या त्या कंपनीत सॉफ्टवेअर अपडेटींगचं काम चालू होतं. एक एक कंप्युटर फ़ॉरमॅट करून मग अपडेट करायचं फारच कंटाळवाणं काम ते. त्या टीम मधला हा अंकित. रोज भेट होत होती आणि आधी एकभाषिक म्हणून आणि नंतर मित्र म्हणून आमची ओळख बरीच वाढली.
आता कंपनीतल्या लोकांना सण वार सुटी मिळणार असेल तरच लक्षात राहतात त्या दिवशी अचानक तिथल्या मराठी सेक्रेटरीनं त्याला गाठलं आणि म्हणाली