रजनी

Submitted by अनाहक on 7 June, 2012 - 01:01

(पहिल्यांदाच कथा लिहिली आहे...जस जसं सुचेल तसं माझ्या फेसबुकच्या पेजवर भाग प्रदर्शित केले होते... इथे आहे तशी टाकतोय
लिहिण्याची खूप इच्छा असणाऱ्या पण जमत नसणाऱ्या लोकांपैकी मी एक....
अनुभवींचा प्रतिसाद आणि सल्ला हवाय)

रात्रीचे ११.५० झाले होते पण रमेशला त्याच भान नव्हतं. तिच्या स्पर्शाच्या नशेत तो पूर्ण बुडाला होता. त्यातच त्याला कधी झोप लागली त्याचं त्याला कळल नाही.....अन १२ चा ठोका पडला. आपल्या विवस्त्र बायकोच्या मिठीत त्याचे डोळे खाडकन उघडले. रेशमाचं अंग कधीच थंड पडलं होतं. आणि यावेळी ते खूपच थंड होतं. काही क्षणापूर्वी तिची कोमल वाटणारी त्वचा आता अधिकच खडबडीत आणि पुरुषी झाली होती. त्याच्या लक्षात आलं आज आपण हिला बांधायचा विसरलो आहे.....पुन्हा त्याला ती रात्र आठवली, याच वासनेला बळी पडून त्याने हे संकट ओढवून घेतलं होतं...... भूतकाळातल्या काटेरी विचारांनी त्याला क्षणात करकचून बांधलं.....तो पुन्हा ताळ्यावर आला. ही विचार करण्याची वेळ नव्हती. रेश्मा शांत पडली तोच तो उठला, तिच्या चेहऱ्याकडे पाहण्याचं धाडस त्याला झालं नाही, तो तसाच कपाटाकडे गेला आणि कपाट उघडलं तर त्या बाहुल्याचे डोळे याच्या डोळ्याला भिडले, तो दचकला, पण अजून तो बाहुला निर्जीव होता, धीर एकवटून त्याने त्या बाहुल्याकडे बघत बघतच बाजूची दोरी उचलली. आणि घाई घाईत कपाटाला कुलूप लावलं.....अन मागे वळून पाहतो तर रेश्मा पलंगावरून गायब.........रमेशला घाम फुटायला लागला त्याच सोबत त्याचं शरीर थंड पडलं, शरीर आतल्या आत थरथरत होतं . पूर्ण खोलीत शांतता.. नेहमी येणाऱ्या खिडक्यांच्या कर्रकर्र आवाजात आज काहीतरी वेगळेपण वाटत होतं....झाडाची सावली पलंगापर्यंत यायची अन घाबरल्यासारखी दुप्पट वेगाने सळसळ करत तेथून माघारी फिरायची. खिडकीतून बाहेर पाहिलं तर तिथे एकही झाड नव्हतं... कोरड्या पडलेल्या ओठांवरून जीभ फिरवत त्याने आवंढा गिळला.....इतक्यात त्याच्या पायाला कसलातरी कापडी स्पर्श झाला...."पप्पा , मला घ्या ना...."त्याने पटकन तसाच पाय भिरकावून दिला. तो बाहुला तसाच भिंती जवळच्या फ्लॉवर पॉट वर जाऊन आदळला, काचा फुटण्याचा आवाज आला, तो बहुला रडायला लागला, त्याचा तो आक्रोश कुत्र्याचं मांजराचं विव्हळण सर्व मिश्रित आवाज येत होतं, त्याचा ते कर्कश विव्हळण कानातून मेंदूत सरकत होतं. आवाज घुमल्यासारखा उगीचच भास होत होता. अतिशय भयानक...."माझा जीव घेतला आता आपल्या बाळाचा का घेतोय???".काहीतरी विचित्रच आवाज.... दोन आवाज एकाच वेळी, अगदी पाव सेकंदाच्या फरकानेही येत नसतील, आणि त्यातला एक आवाज घोगरा तर दुसरा तेवढाच कोमल. वळून पाहतोय तर रेश्मा.......पण रेश्मा, रेश्मा राहिली नव्हती . ते शरीर तिचं, चेहराही तिचा पण ती रेश्मा नव्हती . केस विस्कटलेले, ड्रेस फाटलेला. त्वचा पांढरी पडलेली अगदी बर्फसारखी, भुवया पांढऱ्या, पापण्याही पांढऱ्या, त्यात डोळे पूर्ण काळे, पांढरा एक ठिपका नाही, तोंडात एक दात नाही, त्यामुळे काळी जीभ वळवळताना स्पष्ट दिसत होती. मानेच्या इथे तो ओरखडा अगदी तसाच, ताजा , नुकतीच जखम झाल्यासारखा, आणि त्याच्या विरुद्ध बाजूला मान वाकडी करून ती रमेश कडे पाहत आहे, हसते आहे, पण डोळ्यातून काळ पाणी टपकतय , हसण्याचा आणि रडण्याचा आवाज एकाच वेळी.....या आधी बऱ्याच वेळा त्याने तिचा हे रूप पहिला होतं पण आज ते काही तरी वेगळं अन भयावह दिसत होतं. जणू रेश्मा रडते आहे आणि रजनी हसते आहे.....होय रजनी......

क्रमश:....

भाग -२ (काही वर्षापूर्वी)होय रजनी ......एम.म.सी.सी मधील सर्वांच्या चर्चेचा विषय, तरुणांची आशा.... म्हणजे हिचा काही संबंध नसतानाही बाकीचे आपापसात भांडायचे. तिला पटवणं तर लांबच कमीत कमी चार चौघांनी हिच्या नावाने आपल्यालाच चिडवलं पाहिजे असाच सगळ्यांचा मानस होता....पण रजनीला स्वतःच्या सौंदर्याचा माज तर सोडा जाणीव देखील नव्हती, अगदी भोळसट. सोज्वळ, चालतानाही खाली मान घालून चालणारी, दबक्या आवाजात बोलताना मधेच वेडेपणा करणारी आणि मग जीभ चावून कानामागे केस घेत सावरत वागणारी... तिच्या या अदामुळेच कदाचित तिचं सौंदर्य आणखी खुलून येत होतं. आणि 'मिस एम.म.सी.सी' किताबही तिच्या या भोळसटपणा मुळेच रेश्माला मिळायचा"अगं वेडे पूर्ण कोलेजची तू स्वप्नसुंदरी आहेस... हा क्राऊन सगळ्यांना तुझ्या डोक्यावर पाहायचाय..." रेश्मा रजनी च्या डोक्यावर क्राऊन ठेवत बोलली."गप ग , मला भीती वाटते स्टेज ची, आणि सगळी मुले पण पाहत असतात, मला नाही आवडत" रजनी नेहमीसारखी केस कानामागे टाकत म्हणाली रेश्मा तिच्या कानाजवळ गेली आणि म्हणाली--"मूलेच कशाला, कधी कधी मीही चोरून तुझे हे गुलाबी गाल पाहत असते ..." "रेशमे नालायक, इकडे ये..." रजनी रेश्माच्या मागे पाळायला लागली...

अशा या रजनी-रेश्मा ची मैत्री पूर्ण कोलेज मध्ये प्रसिद्ध होती.......रेश्मा तशी धाडसी होती. रजनीबद्दल कोणाचा जरा संशय आला की ही कट्टा, क्लासरूम काही पाहत नसे आणि तिथेच त्याला उभा आडवा फायर.. याउलट रजनी मात्र भित्री होती पण ती सुद्धा रेश्माची तेवढीच काळजी घ्यायची.... तिच्यावर ओरडून चिडून...

असाच रेश्माच्या आयुष्यात रमेश आला... रमेश डिसुजा... लास्ट इयरला होता....तसा हा सगळीकडे दिसू नावानेच ओळखला जायचा...सगळीकडे म्हणजे याला पिऊन पासून प्रिन्सिपल पर्यंत सगळे ' वाया गेलेला' या गटातलाच समजायचे.... तसं त्याला कसलं व्यसन नव्हता की काही नाही, अभ्यासातही बऱ्यापैकी हुशार, पण याला पोरी पटवायचा भारी नाद, आणि त्याचा रुबाब ही तसाच होता... त्याचा हा आकडा एखाद्या मुलीलाही लाजवेल असा होता....आणि यावेळी त्याच्या लिस्ट मध्ये आणखी एक नाव वाढणार होतं....'रेश्मा'

भाग -3

आणि यावेळी त्याच्या लिस्ट मध्ये आणखी एक नाव वाढणार होतं....'रेश्मा'____रमेश आजकाल या दोघींच्या आजूबाजूला भटकायला लागला होता. त्याने संधी साधून त्यांच्याशी मैत्री केली सुद्धा . कॉलेज मध्ये नेहमी दोघीच दिसणाऱ्या ह्या आता 'तिघे' झाले होते. आणि बाकींच्या मुलांचा जळफळाट होणं साहजिकच होतं. एव्हाना रजनीला सुद्धा त्याचा हेतू समजला होता. आणि रजनीला याचं आश्चर्य वाटत होतं कि 'आपल्यापेक्षा 'हुशार' अशा ह्या रेश्माला ही साधी गोष्ट का नाही कळावी.... काहीही होऊदे आज रेश्माला स्पष्ट बोलायचच' असा निर्धार रजनीने केला.

"ए चल मी जातो त्या म्हातारीला assignment द्यायची आहे." मग पुन्हा मागे वळून- " बाय द वे परत एकदा सांगतो आज तू खरच खूप छान दिसते आहेस " अस म्हणत रेश्माच्या गालाला टीचकी मारून रमेश तेथून निघाला......तो जरा दूर गेल्यावर रजनी रेश्माला म्हणाली..."अगं काय चाललय तुझं?"पण रेश्मा, गालावर त्याने स्पर्श केलेल्या जागी उलटी बोटे फिरवत एकटक पाठमोऱ्या रमेशकडे पाहत होती.रजनी जराशी चिडून , हलवून रेश्माला म्हणाली- "रेश्मा....""हा काय झालं? कशाला ओरडतेस? बहिरी नाहीये मी" -भानावर येत रेश्मा म्हणाली"बहिरी नाहीस पण महामूर्ख आहेस, अगं तुला कळत नाहीये का???""वेडे, सारे कळत नकळतच घडते" ओढणी हातात घेऊन स्वतःशीच गिरकी घेत रेश्मा म्हणाली "अगं, समज काहीतरी......""जानम समजा करो...जानम..... " वाकून रजनीच्या नाकाला बोट लावत रेश्मा म्हणालीशेवटी रजनीच चिडून मन फिरवून बसली. रेश्मा मग तिच्या गळ्यात पडून हसत म्हणाली- "अगं वेडे तुलाच समजत नाहीये. मला तो आधीपासून आवडायचा. आणि अब खुद ही उंट पहाड के नीचे आया हे तो गाढवोपे सवारी क्यू करना??"- रेश्मा स्वतःच्याच दुबळ्या हिंदीला आणि पाणचट जोकला एकटीच हसायला लागली."अगं पण तो चांगला मुलगा नाहीये "- रजनीने खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण रेश्मा त्याच्या प्रेमात पूर्ण वेडी झाली होती. आज न उद्या हा प्रोपोज करेल आणि रेश्मा त्याला हो म्हणून बसेल याचीच भीती तिला वाटत होती. काय करावे रजनीला सुचत नव्हतं . शेवटी एकच पर्याय तिला दिसत होता....

भाग-४

रजनीला एकच पर्याय दिसत होता. रमेशला सुधारण्याचा आणि त्याला रेश्मावर मनापासून प्रेम करण्यास उद्युकत करण्याचा.तेव्हापासून रजनी जास्तीत जास्त वेळ रमेश सोबत घालवू लागली.रेश्माचा स्वभाव कसा आहे,ती किती गोड आहे,वरवर धाडसी असली तरी आतून किती अल्लड आहे,हे सगळे अप्रत्यक्षपणे रमेशला पटवून द्यायला लागली.आणि त्या कामामध्ये जवळपास यशस्वी झालीच होती.असेच एका संध्याकाळी दोघे तळ्याकाठी बोलत बसले होते.आता रजनीला विजयी डाव टाकायचा होता.बोलता बोलता तिने संधी साधून विषय बदलून ती म्हणाली:-"वस्तुसारख्या मुली बदलणारा तू, तुला काय कळणार प्रेम म्हणजे काय असते ते”रमेश मिश्किल हसला आणि म्हणाला“ बरोबर आहे पण प्रेमाच्या आधी बऱ्याच गोष्टी कळाल्या मला ,रजनी प्रत्येक माणसाच्या दोन प्रतिमा असतात .एक जी त्याला दिसते आणि एक जी दुसरयाच्या मनात असते.आणि कधी कधी माणूस दोन्ही प्रतिमेपेक्षा वेगळा असतो"“म्हणजे??”"म्हणजे बघ ,न्यायालयात खटला चालू असताना कितेक वेळा दोन्ही बाजू आपल्या परीने बरोबर असतात. पण न्यायाधीशाला कोणत्या तरी एकाच बाजूने निकाल लावायचा असतो.पण त्यामुळे हरणारयाचे अर्धे सत्य तरी खोटे ठरत नाही ना....""तुझे अर्धे सत्य??" कसली तरी चाहूल लागल्यासारखी रजनी म्हणाली" अर्धे सत्य नाही पण प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही कारण असत.आपल्याला ते दिसत नाही .कारण माणूस तोलताना स्वभाव, विकृती,चारित्र्य ही नावे द्यायची आपल्याला घाई झालेली असते....”रजनीने प्रश्नार्थक नजरेने पहिलं“माझा नाव रमेश डिसूझा .तुला कधी विचित्र नाही वाटले??"हो पण..."“मी अगदी लहान असतानाच आई गेली,मला काही कळत देखील नव्हते ,बापाला ते दुख सहन झाले नाही.ते वेड्या सारखे करायला लागले,दारू प्यायला लागले, त्यांना कामावरूनही काढून टाकल होत.दारू साठी बापाने सगळ विकल,कितेक दिवस तर घरीपण यायचे नाहीत वाटत. असच एक दिवस बाप घरी आला तर शेजारच्या कोणी त्यांच्या कानाखाली मारून संगितले - 'मुलाकडे काही लक्ष आहे की नाही,दोन दिवस उपाशी होता,आत्ता कळले तेव्हा थोडे खायला दिल.स्वत:ची नाही पण मुलाची तरी काळजी घे”रमेश डोळे पुसायला लागला.रजनीने पहिल्यांदाच रमेश ल रडताना पहिले होते.तिला ते पाहावल नाही म्हणून उगाच विचारल“ पण तुला हे सगळे कोणी संगितल??"माझ्या आईने .....""आईने?????"

क्रमशः

भाग-५

“होय आईनेत्या रात्रीच बापाने दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला.पण अश्या व्यसनी आणि एका मुलाचा बाप असणाऱ्याशी कोण लग्न करणार? शेवटी कोकणात रामवाडी म्हणून एक गाव आहे,तिथल्या सरपंचची मुलगी, अंतरजातीयच लग्न झाल. तीच माझी आई झाली, पण त्यासाठी बापाला घरजावई होण्याची अट मंजूर करावी लागली.त्यांनीच माझे नाव रमेश केले.....कारण बाप त्यांच्या ताटाखालचे मांजर झाले होते. बाप दिवसभर दारू प्यायचा,घरात नेहमीचीच भांडण, घाणेरड्या शिव्या , आरडाओरड. या सगळ्यातच माझे बालपण गेले. लहानपणापासून प्रेम कुठे मिळालेच नाही, मग मला काय कळणार ना काय असते प्रेम.......”रमेश डोळे पुसू लागला....”रजनी, त्यासाठी आला दिवस मी जगून घेतो. मी उद्याचा विचार कधी केला नाही.मी आजवरुण माझा उद्या बनवतो...”रजनीची काहीच हालचाल नव्हती. ती तळ्यातल्या एकट्या चंद्राकडे नजर खिळवून बसली आणि डोळ्यातून पाण्याचे ओघळ तळ्याकडे धाव घेत होते..

त्या रात्री रजनीला झोप लागू शकली नाही.. डोळ्यासमोर रमेशचे चित्र,डोक्यात त्याचेच विचार,कानात त्याचाच आवाज आणि मनात त्याचीच व्यथा...रजनी त्याचे विचार डोक्यातून काढून टाकण्याचे खूप प्रयत्न करत होती,पण तिला काही शक्य होत नव्हत ...'का होतय अस?? त्याचा अन आपला काय संबध?? २-३ आठवड्याची ओळख ..आणि झाली ती पण रेशमामुळेच .....रेशमा...अरे तिला तर २-३ आठवड्यात भेटले सुद्धा नाही...काय चाललय आपल??? का असं होतय ???'रजनी स्वतालाच विचारायला लागली ... ’रमेश बोलतो तेच खर.माणसाच्या दोन प्रतिमा असतात.आणि खरा माणूस कधी कधी यापेक्षा वेगळा असतो ...मी आज मलाच ओळखत नाही ...मला रेश्माने तर ओळखले असेल??? रमेशने ?? 'प्रश्नाचा गुंता वाढत होता ..त्यातच तिचा डोळा कधी लागला तीलाही कळलं नाही..त्यानंतर २ दिवस रजनी कॉलेजला गेली नाही... कोणालाही भेटली नाही ना कोणाशी बोलली..रात्री एकदा अशीच ती खिडकीत पावसाचे थेंब हातावर घेत होती.काही मुठीत यायचे. काही फक्त स्पर्श करून जायचे. त्यांना पकडण्याच्या नादात मुठीतलेही निघून जायचे... या झटापटीत शेवटी हातात यायचा तो फक्त ओलावा...त्यात कोणाचा वाटा किती काही माहीत नाही....फक्त ओलावा,________तितक्यात तिला आठवले .'आज रमेशचा शेवटचा पेपर,उद्या सकाळीच तो “पुणे”सोडून जाणार...त्याची नि आपली पुन्हा भेट कधी???' ती तशीच त्या मुसळधार पावसात रमेशकडे निघाली. _________12 वाजता दरवाज्यावर थाप पडली...एवढ्या रात्री कोण असेल याचे रमेशला जराही आश्चर्य वाटल नाही. कोण असणार त्याला माहीत होते..त्याने शांतपणे दरवाजा उघडला .... रजनी पूर्ण ओलीचिंभ झालेली....तिला धाप लागलेली ..रमेश तिच्यावरून नजर काढून आत आला.“रमेश”....रजनीने मागून त्याला मिठी मारली ..त्याने वळून तिचे डोळे पुसले..तस तिच्या चेहऱ्यावर एकस्मित उमटलं ..रमेशने तिच्या हनुवटीला बोट लावल..रजनीने डोळे झाकून थरथरणारे ओठ त्याच्या ओठावर टेकवले..........

क्रमशः

भाग -६

सकाळी रजनीला जाग आली आणि स्वतःला अशा अवस्थेत पाहून ती कोसळलीच . स्वतःला सावरत कसेबसे तिने अंगावर कपडे चढवले. तिला रात्रीचा एक एक प्रसंग आठवू लागला. आणि तिचा पुन्हा कंठ फुटला ........."हे आपल्याकडून काय झालं???" डोकं गुडघ्यात घालून ती मोठ्याने रडायला लागलीतेवढ्यात रमेश तिथे आला. टेबलावर चहा ठेवत शांतपणे म्हणाला-"पाहिलस रजनी , हाच फरक आहे तुमच्यात अन माझ्यात... काल जे काही झालं त्याला 'चूक' नाव देऊन तू रडतीयेस, स्वतःला दोष देतीयेस. पण त्या प्रत्येक स्पर्शातला प्रामाणिकपणा , उत्कटता तुला कळली नाही. त्याला चूक नाव देऊन त्याचा तू अपमान करतीयेस. पश्चाताप करणं म्हणजे स्वार्थीपणाच . केलेल्या गोष्टीला चूक हे नाव देऊन त्यातून मोकळं व्हायचं"रजनीला काही कळत नव्हतं, पण रमेशवर, त्याच्या विचारांवर तिचा पूर्ण विश्वास होता...पण तरीही त्याला पुढे बोलतं करायचं म्हणून ती म्हणाली-"म्हणजे??? ही चूक नाहीये???""नाही, रजनी तुला कळत नाहीये. आपला एकमेकांवर प्रेम जडलय. कालची रात्र त्याचीच साक्ष आहे "रमेशने पलंगाच्या इथे गुडघ्यावर बसत रजनीचे हात हातात घेतले आणि म्हणाला....."रजनी, माझ्याशी लग्न करशील????"तसच त्याचं डोकं कुशीत कवटाळून घेऊन रजनी पुन्हा रडायला लागली.. पण या वेळी तिच्या अश्रूत तिच्या उरात न मावणार सुख वाहत होतं.....

"रजनी, मला निघायला हवं, वेळ झालीये""पण...अरे.... मी अशा अवस्थत इथे एकटी नाही राहु शकत, मला घेऊन चल""रजनी समजून घे, मी दोन महिन्यातच परत येईल. मग तुला कायमचा घेऊन जायील..अधून मधून पत्र पाठवेलच""रमेश मला भीती वाटतीये""माझ्यावर विश्वास नाहीये??" रमेश तिचा चेहरा हातात घेऊन म्हणाला..."घरची परिस्थिती तुला माहित आहेच. मी तुला तिथ नाही ठेऊ शकत, माझ्यावर जे संस्कार झाले ते आपल्या बाळावर नकोत...आपण या जगापासून दूर जाऊ... "रजनी पुढे काही बोलली नाही... त्याच्या खांद्यावर डोकं ठेऊन ती फक्त त्याचं बोलणं ऐकत राहिली... रमेशने तिचा निरोप घेतला

त्यानंतर रजनी त्याच्या आठवणीत एक एक दिवस काढत होती. कधी, कसं सगळं झालं तिलाही कळलं नव्हतं... ती एक एक प्रसंग आठवत स्वतःशीच बोले....'हेच असतं का प्रेम??? ' त्याच्या आठवणीत असताना मधेच रेशमाची आठवण डंख मारे... आणि रडत राही .. आपण रेश्माला फसवलं म्हणून ती स्वतःलाच दोष देई.. तिला रेश्माचा खूप हेवा वाटत असे. एवढं सगळं होऊनही रेश्मा आपल्याशी किती चांगली वागत आहे.. आपली काळजी घेत आहे. एव्हाना रेश्माला सगळं समजलं होतं.. आणि रेश्माला कळलं असणार याची रजनीलाही जाणीव होती. पण दोघीही याबद्दल स्पष्ट बोलत नव्हत्या. बोलायला काही नव्हतंच

म्हणता म्हणता ६-७ महिने उलटले पण रमेश काही आला नाही ना त्याचं एखादं पत्र आलं.. रजनी त्याच्या वाटेकडे डोळा लाऊन बसली होती. एवढ्या दिवसात रजनीच्या आईलाही सगळा प्रकार लक्षात आला होतां. पण अशा वेळी रजनीला साथ देणच त्यांना योग्य वाटलं. तिघींचीही चिंता वाढली होती"त्याला पत्र लिही" - रेश्मा म्हणाली"त्याने पत्ता दिला नाही. त्याच्या घरी प्रोब्लेम होईल म्हणून...." -भोळसटपणे रजनी म्हणाली...रेश्माला अन रजनीच्या आईला सारा प्रकार लक्षात आला. ते थेट त्यांच्या कोलेज मध्ये गेले."तो रिझल्ट न्यायला सुद्धा आला नाही . त्याचा पत्ता आहे आमच्याकडे पण तो बहुतेक चुकीचा आहे. आम्ही त्यावर त्याला रिझल्ट पाठवला होतां पण ते पत्र परत आलं "कोलेज कडून असं उत्तर आल्यावर तर त्यांची खात्रीच पटली... त्यांनी रजनीला सगळी हकीगत सांगितली. रजनीचा विश्वासच बसत नव्हतं.."नाही ,तो असा करणार नाही " "रजनी पण हेच सत्य आहे.."दोघी बऱ्याच वेळ तिची समजूत काढत होते.. एकमेकांकडे पाहत शेवटी रेशमाने कसाबसा तो विषय रजनी पुढे काढला...."रजनी.....तुला हे मुल पाडाव लागेल "

क्रमशः

भाग-7

दोघी बऱ्याच वेळ तिची समजूत काढत होते.. एकमेकांकडे पाहत शेवटी रेशमाने कसाबसा तो विषय रजनी पुढे काढला...."रजनी.....तुला हे मुल पाडाव लागेल ""काय??? नाही , हे शक्य नाही..""रजनी, समजण्याचा प्रयत्न कर. जगासमोर तू हे मुल कोणाचं म्हणून सांगणार आहेस??""नाही, मी केलेल्या चुकीची शिक्षा माझ्या बाळाला का?? त्या निष्पाप जीवाचा यात काय दोष ??" - रजनी रडत रडतच त्यांना विरोध करत होती.रजनी ऐकत नाहीये हे पाहून त्यांचाही नाईलाज झाला....

रजनीला कोणत्याही इस्पितळात admit करण्याची सोयच नव्हती..जे होतं ते तिघांमधेच ठेवाव लागणार होत... त्यामुळे बाळाचा जन्म तिच्या घरातच झाला....एक गोंडस बाळ जन्माला आलं, बापाविना... अगदी रजनीच्या रुपाला साजेसं... त्या तिघांच्या कौतुकात फक्त रजनीच त्याच्यामध्ये रमेशचे अंश शोधत राहिली ... त्याच्याकडे पाहतच तिने त्याला पुकारलं......"रंजन...."अन रजनीने हुंदका गिळला. बाळाला मनसोक्त पाहून घेतलं ... आणि अस्पष्टच काही उच्चारलं... आई माझ्या नंतर बाळाची काळजी घे... ते कोणी ऐकलं नाही....रेश्मा व रजनीची आई बाळाला अंघोळ घालत होते... तितक्यात आतून कसलासा आवाज आला...दोघीही पळत आत मध्ये गेल्या. तर....."रजनी....." दोघेही किंचाळल्यारजनीचे प्रेत पंख्याला लटकत होता..... दोघींचाही एकाच आक्रोश ,,,त्यात बाळाचं रडणं मिसळलेलं . जणू त्याला सारच कळत होता.रेश्मा.... तिने तर हंबरडाच फोडला. ती आतल्या आत रमेशला दोष देऊ लागली..पण त्यांना शोक करायलाही वेळ नव्हता...उशिरा रात्री रजनीच प्रेत जाळलं... दोघींनीच...कसलेही अंत्यसंस्कार नाही, कसल्या विधी नाही. करणं शक्यही नव्हतं . ... सारं काही झालं फक्त तिघांच्या साक्षीने ...

जळत्या प्रेताच्या उजेडाला पायाखाली तुडवत ते परतीच्या वाटेवर निघाले ..तिथे एकटी रजनी जळत नव्हती... कोणाची तरी पत्नी ,कोणाची मुलगी ,कोणाची जीवाभावाची मैत्रीण, तर कोण्या कोवळ्या जीवाची आई....सारं काही आठवत दोघी चालल्या होत्या...मागे कसला कण्हण्याचा आवाज आला. रेश्माने मागे पाहिलं तर कोणी नव्हतं. रजनीच्या आठवणीने भास झाला असेल म्हणून ती परत पुढ चालू लागली....पण तो भास नव्हता.. त्या प्रेताच्या ज्वाळात रडका आवाज मिसळला...."मला उशीर झाला रजनी...."

क्रमशः

भाग-८

त्यानंतर रमेश रेश्माला भेटण्याचा खूप प्रयत्न करत होता... पण रेश्मा त्याच्याशी बोलायला तयार नव्हती... ती रमेशला खुनीच मानू लागली होती. एकदा रमेशने जबरदस्तीने तिला बोलायला भाग पाडलच..."रेश्मा ऐकून तर घे माझं...""काय ऐकू??? हेच की तू रजनीला कसं फसवलं, तिला आत्महत्या करायला भाग कसं पाडलं.. तू का आला नाहीस ते???... की तुझ्या बापाकडे कशी ऐश करत होता ते?? काय ऐकू??""गेला बाप...." एकाएकी रमेश हुंदके द्यायला लागला.... रेश्मा स्तब्धच झाली.."काही राहिला नाही गं रेश्मा, सगळं संपलं " रमेश रडत रडत सांगू लागला."इकडून जाताना किती उत्साहात होतो... आमची स्वप्न रंगवत होतो.. आठवडाभर राहून असेल नसेल तेवढे पैसे घेऊन सरळ निघायचं आणि रजनी आणि बाळासोबत कुठेतरी लांब जाऊन राहायचं... पण घरी गेलो आणि क्षणार्धात सारं भंगलं...राखेशिवाय काही शिल्लक राहिलं नव्हतं. आदल्या रात्रीच आमचा वाडा पूर्ण जळालेला. . माझ्या साऱ्या स्वप्नांचीच राख होती रे ती. आजूबाजूला विचारपूस कली तर कळलं सगळे आगीत गेले"रमेशला भावना अनावर झाल्या तो पुन्हा रडायला लागला. अन पुढे बोलू लागला.." फक्त बाप वाचला पण त्यालाही झटका आला आणि वेडा झाला... कोणीतरी सांगितलं 'कालपर्यंत तर इथेच होता पण नंतर कुठे गेला कोणालाही माहित नाही'. मी तेथून बापाला शोधायला निघालो...कुठे असल काय करत असेल... जिवंत असेल कि मेला असेल ते देखील कळत नव्हतं रे. सगळीकडे शोधलं पण कुठेही मिळाला नाही रे. उपाशी राहून, रस्त्यावर झोपून मी एवढे दिवस काढले रे... रजनीच पत्र आलं का पाहायला गावी सुद्धा गेलो पोष्टात पाहिलं पण रजनीने एकाही पत्राला प्रतिसाद दिला नव्हता... तिला २-३ पत्र केली होती मी""पत्र??? पण रजनीला एकही पत्र आलं नव्हतं. तिने सांगितलं असतं मला""मी पाठवली होती रे, रेश्मा यात माझी काय चूक असेल तर मला त्याची शिक्षा मिळाली आहे , पण माझ्या मुलाला माझ्यापासून वेगळं करून मला अजून मारू नका.. मला माझं बाळ हवय रे.. त्याच्या रूपाने माझी रजनीच नेहमी माझ्या जवळ राहील .."रेश्माला रमेशची दया यायला लागली. 'रमेशला खोटं वागायचच असतं तर तो परत आलाच नसता, मुलाची जबाबदारी घेतलीच नसती. आता हा एकटा कुठे जाणार? बाळाला कसा सांभाळणार?, आईविना पोराचं कसं होईल?'

रेश्मा बाळाला घेऊन जाणाऱ्या रमेशच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिली... तिला कॉलेजचा तो दिवस आठवला... आपल्याशी फ्लर्ट करून जाणारा रमेश आणि आजचा बाळाला घेऊन जाणारा... किती फरक??? आणि आपल्यात काही फरक झालाय??? नाही...कदाचित अजूनही रमेश तेवढाच हवाय. फक्त तेव्हा आकर्षण होता, तारुण्यातील एक पायरी होती. आणि आता आहे ती जबाबदारी उचलणार प्रेम, सात्विक भाव, बाळाबद्दल माया.रेश्माने रमेशला हाक मारली. रमेश ने वळून पाहिलं. त्याचे डोळे अजूनही पाणावले होते."रमेश.... माझ्याशी लग्न करशील??तुझी बायको म्हणू नाही पण रंजनची आई म्हणून तरी स्वीकार. त्याला आईची गरज आहे..."रमेशला भरून आलं. केविलवाणे त्याने बाळाकडे पाहिलं . तो गोंडस जीव हसत होता. त्याने त्याच्या आईचा स्वीकार केला होता......

क्रमशः

भाग-९

रमेश अन रेश्माचा संसार सुखात चालला होता. रेश्मा तर रंजनवर पोटच्या मुलासारखं प्रेम करू लागली होती. ती पूर्ण दिवस त्याच्याशीच खेळी, गप्पा मारे. रमेशला अधून मधून रजनीची आठवण त्रास देई . पण तो स्वतःला नेहमी कोणत्या ना कोणत्या कामात गुंतवून ठेवत .

पण काहीच दिवस जातात अन रेश्माला खूप विचित्र विचित्र स्वप्नं पडायला लागली. भूतांची , सापांची , चेटकिनींची. एकदा दोनदा तिने दुर्लक्ष केलं पण रोजच रेश्माला जाग ह्या अशा भयानक स्वप्नांनीच यायची. तिने रमेशला सांगितलं पण 'फक्त स्वप्नेच ती ' असं म्हणत रमेशने दुर्लक्ष केलं. पण नंतर रेश्माला ते असह्य व्हायला लागलं. शेवटी वैतागून फक्त रेश्माच्या समाधानासाठी रमेश तिला घेऊन मानसोपचार तज्ञाकडे गेला. पण त्यांनीही 'रोजच्या धावपळीमुळे आणि ताण-तणावामुळे होतं असं. विश्रांती घ्या ' असं निदान केलं . पण दिवसेंदिवस रेश्माला पडणाऱ्या स्वप्नांची संख्या आणि भयानकता वाढतच होती. आणि नेहमीसारखच रमेश त्याच्याकडे गांभीर्याने पाहणार नाही हे तिला माहित होतं. त्यामुळे तिने त्याला सांगनही बंद केलं

रेश्माने तिथल्या एका बाईला सारा प्रकार सांगितला. ती बाई त्या गावची मूळ रहिवासी होती. ती म्हणाली-"तिकडं शिवं च्या जंगलामंधी यक बाबा राहातु. तू त्याच्याकड चल. त्याला समद कळत. तो काहीतरी इलाज सांगल. "रेश्माला तिचा म्हणण पटलं. 'असेही सगळे उपाय करून झाले होते. मग एकदा जायला काय हरकत आहे??' . रेशमाने तिला होकार दिला

त्या रात्रीच ती तिकडे जाण्याचं ठरवते. रमेशला सांगून तर काही सोयच नव्हती... तो आलाच नसता उलट आपल्यालाच अडवलं असतं. त्या दोघी निघतात.

बराच वेळ पायपीट केल्यानंतर रजनीला दूरवर कसला आगीचा ठिपका दिसतो- "तिथे काय?""व्हय तिथच "हळू हळू तो आगीचा ठिपका मोठा मोठा व्हायला लागला. अखेर त्या दोघी तिथे पोहोचतात. तिथल्या जागेचं ते अक्राळविक्राळ रूप पाहून रेश्मा घाबरतेच. ती बाई रेश्माला त्या डोंगराच्या कपारीत घेऊन जाते. तिथे वाटेत पडलेली हाडं, कवट्या, पायाखाली वळवळणारे साप आणि फडफड करत डोक्यावरून गेलेला वटवाघळाचा थवा , रजनी खूप घाबरायला लागते. तेवढ्यात आतून आवाज येतो"घाबरू नकोस , ते सारे माझे रक्षक आहेत. बस इथे "त्या जागेइतकच त्या बाबांचं अक्राळविक्राळ रूप,वाढलेले केस अन दाढी , बाजूला घातलेलं कवट्यांचा रिंगण , त्यापुढे केलेला होम, लिंबू मिरच्या, काळ्या बाहुल्या...सारं भयानक होतं रेश्मासाठी

ती बाई बाबांना सांगायला लागते तर बाबा हात वर करून तिला थांबवतात."चूप... माहित आहे मला सारं. योग्य वेळी आलीस पोरी. जरा उशीर केला असता तर....." अर्धवट बोलून बाबा थांबतात. व त्या बाईला बाहेर जायला सांगतात.रेश्मा घाबरतच बोलते- "उशीर म्हणजे?? अहो मला ती भूतांची ...""...सापांची स्वप्नं पडतात,. तू तुझ्या नवऱ्याच्या आधीच्या बायकोचं मुल सांभाळत आहेस. तिचा खून झाला होता.....सगळा जाणतो मी ""खून???? नाही नाही, अहो रजनीने आत्महत्या केली होती...""हा हा हा ...पण रजनीच्या दृष्टीने तो खुनच होता म्हणून तर ती परत येतीये...तुला पडणारी स्वप्ने हा त्याचाच पूर्व इशारा आहे..."रेश्मा आता खूपच घाबरली होती -"म..म... म्हणजे??""होय.. ती गेल्यावर तिच्या शवावर अंत्य संस्कार झाले नव्हते... त्यामुळे तिच्या आत्म्याला मुक्ती मिळाली नाही. तिचा अंश तुमच्या घरात वाढतोय. ती त्याच्यासाठी जरूर येणार.."

"हे सगळा तुम्हाला कसा माहित?? बाबा तुमच्याकडे नक्कीच काहीतरी उपाय असेल , मला काही उपाय सांगा बाबा मी काहीही करायला तयार आहे ....""काहीही?? ऐक तर..." बाबा जरा वेळ थांबतात, बाजूचा अंगारा हातात घेऊन कसला तरी मंत्र म्हणतात. अन पुढे बोलतात.----

क्रमशः

भाग-१०

"हे सगळा तुम्हाला कसा माहित?? बाबा तुमच्याकडे नक्कीच काहीतरी उपाय असेल , मला काही उपाय सांगा बाबा मी काहीही करायला तयार आहे ....""काहीही?? ऐक तर..." बाबा जरा वेळ थांबतात, बाजूचा अंगारा हातात घेऊन कसला तरी मंत्र म्हणतात. अन पुढे बोलतात.----"तुला तुझ्या मुलाचा बळी द्यावा लागेल..." बाबा हातातला अंगारा आगीत टाकतात...मोठा भडका होतो.."काय???" रेश्मा ताडकन उठते.."होय.. ती त्या बाळामुळेच परत येतीये .. ती येण्याच्या आत त्याला संपवावं लागेल. जास्त विचार करू नकोस. एकदा रजनी खाली आली की तुझ्या नवऱ्याचा मृत्यू अटळ आहे, कदाचित तुझा सुद्धा.."रेश्मा खूपच घाबरते, रडायला लागते.."मी असं कसं करू?? स्वतःच्या मुलाला.....""यावर दुसरा उपाय नाही "

रजनी रडत रडतच तेथून निघते. घरी येते. रमेशला त्यातलं काहीच कळू देत नाही. काय करावे तिला कळत नाही

एक एक दिवस असाच जात असतो. त्या चिंतेत तिला रात्रीची झोप देखील येत नाही. चुकून झोप लागलीच तर ती भयानक स्वप्ने तिला झोपू देत नाही. बाळाकडे पाहिलं तर तो गोड खिदळत असे... त्याचा तो हसण्याचा आवाज तिच्या कानाला गोड स्पर्श देई. ती लगेच त्याला मिठीत कवटाळून घेई अन रडत असे- 'कसं रे संपवू तुला, तुला मी जन्म देखील दिला नाही अन तुलाच मारू??? काय हक्क माझा??? एका बाजूला तू दुसऱ्या बाजूला रमेश...देवा या कसल्या यक्ष प्रश्नात अडकवलस रे. एक वेळ माझा जीव घे पण त्या दोघांना जगुदे '

रेश्माचा एक एक दिवस याच विचारात जायचा. शेवटी तिला काहीतरी निर्णय घेणं भागच होता. वेळ खूपच कमी होती.. उशीर करून चालणार नव्हतं... अन रेश्माने तो निर्णय घेतला. रंजनचा बळी द्यायचा...ते केला नाही तर तिघांचाही मृत्यू अटल आहे.. पण रमेशसाठी तरी.. 'बापाच्या जीवनासाठी मुलाचा बळी.. आणि न्याय करणारी कोण तर आई... हा कसला न्यायनिवाडा करतो आहेस देवा '

२-३ दिवस रमेश बाहेर गावी जाणार असतो. त्याच दिवशी रेश्मा हे अघोरी कृत्य करण्याचा निर्णय घेते.

ती रंजनला झोपवते. घराच्या मागच्या बाजूस जरा दूरवर जाऊन तिथे खड्डा खणते. झोपलेल्या रंजनला एकदा डोळे भरून पाहून घेते. तिचे डोळे ओलावतात त्याला आवेगाने मिठीत कवटाळून घेते. स्वतःला आवरत ती त्याला खड्ड्यात ठेवते अन वरून माती टाकून गाडून टाकते.. एकदमच ती कोसळते अन तिथेच पडून ढसाढसा रडायला लागते. रंजन नावाचा धावा करते. स्वतःला दोष द्यायला लागते...

घरी येते तर दारातच रंजनचा बाहुला पडलेला असतो. ते त्याचं आवडत खेळणं. रेश्मा त्यालाच रंजन समजून मिठीत घेते अन रडायला लागते ......तेवढ्यात तो बाहुला हसायला लागतो. रजनी दचकून पटकन मिठीतून त्याला बाजूला करते... पाहते तर चुकून त्याचा खटका चालू झालेला असतो... ती त्याला घेऊन आत जाते....

दोन दिवसांनी रमेश घरी येतो..........

क्रमशः

भाग-११

दोन दिवसानंतर रमेश घरी आला. रेश्मा दारातच त्याच्या मिठीत कोसळली. अन हुंदके देऊन रडायला लागली.
"अगं काय झालं????"
"रंजन......."
"काय झालं रंजनला??"
रेश्माला पुढे बोलवलच नाही.ती आणखी मोठ्याने रडायला लागली.रमेश घाबरला. तसाच घरात पळाला. सगळीकडे रंजनला शोधायला लागला.
"कुठय रंजन?? रेश्मा काहीतरी बोल. काय झाला रंजनला..."
"रंजन गेला..."
"गेला??? अगं, काय बोलतीयेस तू?? " रमेशचा आवाज रडवा झाला. दरवाज्यातच दोघे जण रडायला लागले. रेश्माने रडत रडतच त्याला खोटं काही सांगितला, रंजनला साप चावला वगैरे... खरं सांगणं शक्यच नव्हतं.

रमेशलाही ते दु:ख अनावर झालं होता. कित्येक दिवस रडण्याशिवाय दुसरं काहीच झालं नाही. दोघेही जेवत नव्हते कि काही नाही. उगीच एकमेकांना जेवण्यासाठी हट्ट करायचे, अन दोघेही उपाशी राहायचे. एकमेकांचच काय सांत्वन करणार. जमत असतं तर स्वतःचच नसतं का केलं?

शेवटी काही दिवसांनी ते सगळं विसरून नव्याने आयुष्य सुरु करण्याशिवाय त्यांना काही गत्यंतरच नव्हतं. दुसरा पर्यायच नव्हता त्यांच्याकडे. रमेशला तर आता सगळ्याची सवयच झाली होती. तो रडत रडत रेश्माला म्हणे...
''आधी आई घर सोडून गेली, ती आजतागायत आली नाही . मग बाप गेला. तो देखील सापडला नाही . मग माझी रजनी कायमची मला सोडून गेली. आता रंजन....माझाच प्राण का गेला नाही आजवर.. का हे भोगायलाच मी उरलोय. माझी यातून सुटका होणारच नाही का ग रेश्मा. कधीकधी तर वाटत या साऱ्याला जबाबदार मीच आहे..''
ते ऐकताच रेश्माने चमकून त्याच्याकडे पाहिलं. एक संशयाची पाल तिच्या मनात चुकचुकली. पण रमेश ते अविभार्वितपणे बोलतोय ते पाहून तीला जरा हायसं वाटलं. व त्याचं सांत्वन करायला लागली.

रंजन गेल्यापासून रेश्मा त्या बहुल्याशीच खेळत असे, त्याच्याशी गप्पा मारत असे. व आपला रंजनच आपल्या जवळ आहे अशी स्वतःची समजूत काढत ती दिवस घालवत होती. रमेशही तिच्या अश्या वागण्यात आड येत नव्हता.
रेश्माला आता स्वप्न पडनही बंद झालं होतं. ते बाबा खोटं सांगत नव्हते यावर रेश्माचा पूर्ण विश्वास बसला. आता रजनीचा काही धोका नाही रमेशला. या विचाराने ती सुखावली. तिच्या मनातील अपराधी भावना नाहीशी व्हायला लागली.

पण हळू हळू रमेशला घरात विचित्र वाटायला लागला. आपल्यावर आलेल्या दुखामुळे आपल्याला अस्वस्थ वाटतंय, त्यामुळे हे बदल वाटत असावेत, असा रमेशचा समाज होता. पण त्याला रोजच घरात काहीतरी विचित्र घडताना दिसायला लागलं. रात्री कधी कधी चित्र विचित्र आवाज येई. दारं-खिडक्यांचे, झाडांच्या पानांचे सळसळणारे . रात्री मधेच जोरात वारा येई, आणि क्षणार्धात नाहीसाही होई.
त्याने रेश्माला पण खूप वेळा पहिला, ती दिवसा खूप झोपत आणि रात्रीच झोपल्यावर मधेच उठून त्या बहुल्याशी खेळत असे, एकदा दोनदा त्याने दुर्लक्ष केलाही पण असं सारखच व्हायला लागलं. कधी कधी डोकं दुखतंय म्हणून तक्रार करत असे.

क्रमशः

भाग-१२

एके रात्री अशीच रमेशला जाग आली. तर रेश्मा नेहमीप्रमाणे त्या बाहूल्याशी खेळत होती. रमेश झोपेतच तिला म्हणाला-
"रेश्मा, झोप आता, खूप उशिर झालाय " असं बोलत रमेशने कूस बदलली.
"तू झोप गप... " रेश्मा उद्धटपणे म्हणाली. रेश्माचा आवाज वेगळाच होता. अतिशय खडबडीत. घोगरा. पण झोपेत रमेशला ते कळलं नाही. तो तसाच झोपून गेला.

सकाळी उठल्यावर ऑफिसला जाताना रमेश असच प्रेमाने रेश्माला मिठीत घेत म्हणाला.
"रात्री कधीही उठून काय खेळतेस रे त्या बहुल्याशी?"
"रात्री?? वेड्या स्वप्न पडलं असेल तुला. मी तर शांत झोपलेले." लाडाने त्याच्या छातीत डोकं घुसळत रेश्मा म्हणाली
रमेश जरासा गोंधळला. पण ते स्वप्न नव्हता याची त्याला पूर्ण खात्री होती.
"काय झालं??" रमेश पुढे काहीच बोलला नाही पाहून रेश्मा म्हणाली..
"न... न... नाही... काही नाही.. चल निघतो मी" असं म्हणत रमेश निघाला.
रमेश ज्या अस्वस्थतेत गेला, रेश्माला वेगळच वाटलं. एक खंत मनाला लागली.. आपण कधीच रजनीची जागा घेऊ शकणार नाही....
पण रमेशच्या डोक्यात जाताना तोच विचार.....ते स्वप्न नव्हतं. रेश्मा खोटं का बोलतीये...

असंच काहीना काही नेहमी घरात घडायला लागलं. आणि ते दिवसेंदिवस वाढत होतं. किंवा कदाचित रमेशला ते आत्ता आत्ता कळायला लागलं होता. रमेश सावध झाला होता. खुद्द रेशमाच विचित्र वागत होती त्यामुळे तो तिलाही विश्वासात घेऊन सांगू शकत नव्हता. आणि नंतरच्या एका प्रसंगाने तर त्याची खात्रीच पटली-
त्या दिवशी त्यांना झोपायला खूप उशीर झालेला. रमेश ने मुद्दामच बाजूला पडलेल्या बाहुल्याला उचलून आत नेलं आणि कपाटात ठेवलं, अन कपाटाला कुलूप लावलं. अन बाहेरच्या खोलीत येऊन पहिला तर त्याला धक्काच बसला... रेश्मा त्या बहुल्याशी खेळत होती... तो डोक्याला हात लावून तिथेच बसला. त्याला सारा प्रकार लक्षात आला.

त्या रात्री रमेश कसाबसा झोपून गेला. तर रमेशला रात्री अचानक गुदमरल्यासारखं झालं. तो हात पाय आपटायला लागलं. पण समोर सगळं अंधार होता.. त्याला काहीच दिसत नव्हतं. तो तसाच बेशुद्ध झाला. जाग आली ती सकाळीच. त्याला रात्रीचा प्रसंग आठवला. ते स्वप्न नक्कीच नव्हतं. त्याने गळ्याला हात लावला तर त्याला तिथे खरचटलं होतं . मग त्याला खात्रीच पटली ते स्वप्न नव्हतच... सहज रेश्माकडे लक्ष गेलं तर तिच्या नखाला रक्त लागलेलं....
'रेश्मा???? ही का मला मारण्याचा प्रयत्न करेल... ' त्याला काही कळेना. त्याने रेशमाच्या बोटाचा रक्त पुसलं.

रमेशला काही समजत नव्हतं . रेश्मा असं का करतीये. ती आपल्याला मारायचा प्रयत्न का करेल? ती रात्री अचानक उठून त्या बहुल्याशी खेळते. रात्री विचित्र वागते .. रमेशला वाटलं बहुतेक रंजन गेल्यापासून तिला वेड्याचे झटके येत असावेत. किंवा हिला नक्कीच काहीतरी मानसिक आजार असणार. पण मग तो बहुला.... तो कपाटातून बाहेर कसा आला??'
त्या दिवशी पूर्ण वेळ तो रेश्माचा निरीक्षण करायला लागला. पण रेश्मात काहीच वेगळं दिसत नव्हतं, उलट ती त्याच्यावर खूप प्रेम करत. रमेशला काळत नव्हतं, हि रेश्मा का आपल्याला मारेल???

एक दिवस मग रमेश मुद्दाम लवकर झोपण्याचा नाटक करतो. मग रेश्माही लवकर झोपते. रेश्मा पूर्ण झोपलीये याची खात्री झाल्यावर रमेश उठला. दोरी घेऊन रेश्माला घट्ट बांधून ठेवला. अन तसंच झोपण्याचं नाटक करत पडून राहिला. बराच वेळ रेश्माची काहीच हालचाल झाली नाही. रमेशला कधी डोळा लागलं त्यालाही कळलं नाही. ....... तेवढ्यात १२ चा ठोका पडला. रमेश चे डोळे खाडकन उघडले... अचानक वातावरण बदललेला.....

क्रमशः

भाग-१३

रमेशला कधी डोळा लागलं त्यालाही कळलं नाही. ....... तेवढ्यात १२ चा ठोका पडला. रमेश चे डोळे खाडकन उघडले... अचानक वातावरण बदललेला.....
खिडक्या खाडकन उघडल्या . वाऱ्याचा प्रचंड झोत आल्याचा आवाज झाला. खिडकीतून जोरात वारा आला अन पलंगाजवळ येऊन शांत झाला.
रमेश रेशमाच्या विरुद्ध बाजूला तोंड करून झोपला होता. समोरच्या टेबलावरच्या वस्तू हलताना त्याला स्पष्ट दिसत होतं. आणि भिंतीवर दिसणारी वाऱ्याची सावली. त्यासोबत घेऊन आलेला पालापाचोळा आणि त्यासोबत त्याला एक वेगळीच सावली येताना दिसली.... तो जरा घाबरला .
अचानक रेश्माचे डोळे उघडले. एक वेगळीच चमक त्यातून बाहेर पडली. खोलीत अंधुकसा प्रकाश पडला. अन रेश्मा दोरीला हिसके द्यायला लागली. तिच्या त्या हिसक्याने पूर्ण पलंग हालत होता. ती मोठ्या मोठ्याने ओरडायला लागली ' सोड मला. सोड....'
तो आवाज माणसाचा वाटतच नव्हता. वेगळच काही होतं त्यात. पुरुषासारखा खडबडीत आवाज तरीही त्यात एक बायकी मार्दव आलेलं. जरासा ओळखी जरासा अनोळखी. रजनीचा...... रजनीचा आवाज असाच होता.
रमेशने पलंगावरून उडी मारली. अन रेश्माचा ते भयाण रूप पाहू लागला. त्याचे पाय लटपटत होते. रेश्मा ओरडत ओरडत रडायला लागली.... तिच्या डोळ्यातून काळ पाणी यायला लागलं. अगदी भडक . रमेश पुरता घाबरून गेला होता. काय करावं त्याला कळत नव्हतं.
रजनीने त्याच्यावर डोळे रोखले.... "नाही सोडणार तुला.... नाही सोडणार... तू मारला मला . माझ्या बाळालाही... "
बऱ्याच वेळ रमेश तिचा हे विक्राळ रूप पाहत होता... शेवटी जीव गेल्यासारखं
किंचाळत रेश्मा तशीच निपचित पडली...
सकाळी लवकर उठून रमेश ने रेश्माचे दोर सोडले. रेश्मा तशीच पडली होती... मग पुन्हा रमेश झोपून गेला
पूर्ण दिवस रमेश रेशमाचं निरीक्षण करू लागलं. पण ती अगदी नॉर्मल वाटत होती. रमेशला सारा प्रकार लक्षात आला . त्याला कळलं हा काही मानसिक आजार नाहीये. रेश्माच्या अंगात रात्री काही तरी शिरत. अन सकाळी जाता . पण काय??? त्याचा भूत वगैरे असल्या गोष्टींवर विश्वास नव्हता. पण तरीही त्याच्या मनाला शंका चाटून गेली. त्याला एकच उपाय दिसला...... ते डोंगरावरचे बाबा..............
रमेश त्यांच्याकडे गेला. सारा प्रकार त्या बाबांना सांगितला. बाबांच्या सारं लक्षात आला.. रेश्माने रंजनचा बळी द्यायला थोडा उशीर केला होता. ती रंजनला घेऊन गेली तेव्हाच रजनीने घरात प्रवेश केला होता.....परिणामी रेश्माला पडणारी स्वप्न तर बंद होणारच होती.. म्हणजे रंजन चा बळी फुकटच गेला होता. पण रेश्मा आपल्याकडे आली होती वगैरे काहीच बाबांनी रमेशला सांगितलं नाही.
"ते भूत रजनीच आहे..."
"काय रजनीचा???" रजनीच्या आठवणीनेच रमेशला भरून आलेला. तो तिला अजूनही विसरू शकला नव्हता.. तो रडत रडतच बाबांना म्हणाला.
"पण माझी रजनीच मला का मारेल??. अन ती असं का म्हणत होती तूच मारलं मला अन माझ्या बाळाला"
'आता काय सांगू पोरा तुला, सगळाच गैरसमज ' बाबा मनातल्या मनातच म्हणाले....
"किती वाजता रेशमाचं असं रूप पाहिलस तू?" बाबा म्हणाले
"१२ चा ठोका नुकताच पडला होता.. अन अचानक दारं-खिडक्या......." रमेश सगळं सांगायला लागला... बाबा डोळे झाकून हातात अंगारा घेऊन ते सारं ऐकत होते...
"रजनीचा, तुझा, अन बाळाचा, बारा वाजण्याशी काही संबंध???"
रमेश आठवून म्हणू लागला.... "होय रजनी माझ्याकडे आली होती तेव्हा बराच वाजले होते... आणि तेव्हाच...."
त्याचा वाक्य अर्धवट तोडत बाबा म्हणाले-"रजनीच खूप प्रेम होतं तुझ्यावर ती तुला विसरायला पाहते . तिला तुला त्रासही द्यायचा नाहीये. पण १२ वाजले कि तिला ते सारं आठवत. तुझी अन रंजनची आठवण तिला अस्वस्थ करते... म्हणून ती १२ वाजताच रेशमाच्या अंगात प्रवेश करते... पोरा तेवढे २-३ तास सोडले तर तुझी रजनी तुला कधीच त्रास देणार नाही. ती वाईट कधीच नव्हती अन आता सुद्धा नाहीये. पण त्या २-३ तासात स्वतःचं रक्षण कर तेव्हा तिच्या अंगात प्रचंड शक्ती येते. काळी शक्ती तिच्या अंगात संचारते... तेव्हाच तुला धोका आहे.. आणि हि शक्ती दिवसेंदिवस वाढत जाणार......"
बाबा बराच वेळ बोलत होते... पण रमेशला पाणावलेल्या मनात फक्त रजनीची आठवण राहिली होती... बाबांचे शब्द अंधुकच कानावर पडत होते... त्या वेळात बाबा खूप काही महत्वाचं सांगून गेले...

क्रमशः

भाग-१४

जड मनाने रमेशने बाबांचा निरोप घेतला. डोंगराची काळी वाट तुडवत त्याने घर गाठलं... पाहिलं तर रेश्मा निरागसपणे त्या बाहुल्याशी खेळत होती. 'रंजन.. रंजन' म्हणत उगीच बोबडं बोलून त्याला खेळवत होती. रमेशचे डोळे पाणावले.. कशामुळे?? रजनीच्या दुरावलेल्या सहवासामुळे , रेश्माच्या दयेने कि रंजनच्या आठवणीने. त्याचं त्यालाच कळलं नाही. डोळे पुसून तोही रेशमाच्या त्या पोरखेळात सामील झाला.
तेव्हापासून बाबांनी सांगितल्याप्रमाणे तो रोज झोपल्यावर रेश्माला बांधून ठेवत असे. आणि बाबांनी दिलेला अंगारा त्या दोरीला फासत असे... पहिल्या कित्येक रात्री रमेश झोपू देखील शकला नाही. रेशमाचे हाल पाहून रात्रभर रडत बसे. पण नंतर नंतर ते सारं त्याच्या अंगवळणी पडलं. त्याचा नित्यक्रमच झाला तो.
ते सारं रेश्मापासून लपवताना त्याचं गोंधळ उडत असे. तर रेश्माही त्याला झालेल्या गोष्टी कळू नये याचा पुरेपूर प्रयत्न करत असे. सारं काही चाललेलं... एकमेकांच्या प्रेमामुळे... काळजीमुळे...

पण ती रात्रच जणू वैराची होती... अमावस्या तर नव्हती पण तरीही खूप काळोख होता. रात्रीचे ११.५० झाले होते पण रमेशला त्याच भान नव्हतं. तिच्या स्पर्शाच्या नशेत तो पूर्ण बुडाला होता. त्यातच त्याला कधी झोप लागली त्याचं त्याला कळल नाही.....
अन १२ चा ठोका पडला. आपल्या विवस्त्र बायकोच्या मिठीत त्याचे डोळे खाडकन उघडले. रेशमाचं अंग कधीच थंड पडलं होतं. आणि यावेळी ते खूपच थंड होतं. काही क्षणापूर्वी तिची कोमल वाटणारी त्वचा आता अधिकच खडबडीत आणि पुरुषी झाली होती. त्याच्या लक्षात आलं आज आपण हिला बांधायचा विसरलो आहे.....पुन्हा त्याला ती रात्र आठवली, याच वासनेला बळी पडून त्याने हे संकट ओढवून घेतलं होतं...... भूतकाळातल्या काटेरी विचारांनी त्याला क्षणात करकचून बांधलं.....तो पुन्हा ताळ्यावर आला. ही विचार करण्याची वेळ नव्हती. रेश्मा शांत पडली तोच तो उठला, तिच्या चेहऱ्याकडे पाहण्याचं धाडस त्याला झालं नाही, तो तसाच कपाटाकडे गेला आणि कपाट उघडलं तर त्या बाहुल्याचे डोळे याच्या डोळ्याला भिडले, तो दचकला, पण अजून तो बाहुला निर्जीव होता, धीर एकवटून त्याने त्या बाहुल्याकडे बघत बघतच बाजूची दोरी उचलली. आणि घाई घाईत कपाटाला कुलूप लावलं.....अन मागे वळून पाहतो तर रेश्मा पलंगावरून गायब.........रमेशला घाम फुटायला लागला त्याच सोबत त्याचं शरीर थंड पडलं, शरीर आतल्या आत थरथरत होतं . पूर्ण खोलीत शांतता.. नेहमी येणाऱ्या खिडक्यांच्या कर्रकर्र आवाजात आज काहीतरी वेगळेपण वाटत होतं....झाडाची सावली पलंगापर्यंत यायची अन घाबरल्यासारखी दुप्पट वेगाने सळसळ करत तेथून माघारी फिरायची....अन खिडकीतून बाहेर पाहिलं तर तिथे एकही झाड नव्हतं... कोरड्या पडलेल्या ओठांवरून जीभ फिरवत त्याने आवंढा गिळला.....
इतक्यात त्याच्या पायाला कसलातरी कापडी स्पर्श झाला....
"पप्पा , मला घ्या ना...."
त्याने पटकन तसाच पाय भिरकावून दिला. तो बाहुला तसाच भिंती जवळच्या फ्लॉवर पॉट वर जाऊन आदळला, काचा फुटण्याचा आवाज आला, तो बाहुला रडायला लागला, त्याचा तो आक्रोश कुत्र्याचं मांजराचं विव्हळण सर्व मिश्रित आवाज येत होतं, त्याचा ते कर्कश विव्हळण कानातून मेंदूत सरकत होतं. आवाज घुमल्यासारखा उगीचच भास होत होता. अतिशय भयानक....
"माझा जीव घेतला आता आपल्या बाळाचा का घेतोय???".....
काहीतरी विचित्रच आवाज.... दोन आवाज एकाच वेळी, अगदी पाव सेकंदाच्या फरकानेही येत नसतील, आणि त्यातला एक आवाज घोगरा तर दुसरा तेवढाच कोमल. वळून पाहतोय तर रेश्मा.......पण रेश्मा, रेश्मा राहिली नव्हती . ते शरीर तिचं, चेहराही तिचा पण ती रेश्मा नव्हती . केस विस्कटलेले, ड्रेस फाटलेला. त्वचा पांढरी पडलेली अगदी बर्फसारखी, भुवया पांढऱ्या, पापण्याही पांढऱ्या, त्यात डोळे पूर्ण काळे, पांढरा एक ठिपका नाही, तोंडात एक दात नाही, त्यामुळे काळी जीभ वळवळताना स्पष्ट दिसत होती. मानेच्या इथे तो ओरखडा अगदी तसाच, ताजा , नुकतीच जखम झाल्यासारखा, आणि त्याच्या विरुद्ध बाजूला मान वाकडी करून ती रमेश कडे पाहत आहे, हसते आहे, पण डोळ्यातून काळ पाणी टपकतय , हसण्याचा आणि रडण्याचा आवाज एकाच वेळी.....या आधी बऱ्याच वेळा त्याने तिच हे रूप पहिला होतं पण आज ते काही तरी वेगळं अन भयावह दिसत होतं. जणू रेश्मा रडते आहे आणि रजनी हसते आहे.....

भाग-१५

या आधी बऱ्याच वेळा त्याने तिच हे रूप पहिला होतं पण आज ते काही तरी वेगळं अन भयावह दिसत होतं. जणू रेश्मा रडते आहे आणि रजनी हसते आहे.....
तिचं ते भयाण रूप पाहून तो घाबरला . काय करावे रमेशला कळत नव्हतं. त्याचे हात पाय गळून पडले होते. त्याला हलताही येईना. जणू रेश्माच्या त्या काळ्या डोळ्यातील नजरेने त्याचे पाय बांधून ठेवले होते. त्याने पूर्ण ताकद एकवटली आणि तेथून पळायला लागला. तो थेट दरवाजाच्या दिशेने पळाला . तो दरवाज्यापाशी पोहोचणार इतक्यात बाहेरून जोरात पालापाचोळा उडवत वारा आला. आणि तो वारा अतिशय वेगाने आत घुसला. अन दारं खिडक्या बंद झाली. त्या वाऱ्याच्या प्रचंड ताकदीने रमेश आत फेकला गेला. अन थाडकन तिथल्या काचेच्या टेबलावर आदळला. त्याच्या डोक्यात, अन शरीरभर काचा घुसल्या. काचेने कापून त्याच्या कानाचा टवका उडाला. अन कानामागे काच घुसून तेथून रक्ताची ओघळ आली...
रजनी अन तो बहुला कर्कश आवाजात हसायला लागले. झालेल्या जखमांपेक्षा तो आवाज रमेशला जीवघेणा वाटत होता. क्षणार्धात त्या आवाजाने त्याच्या मेंदूवर घट्ट पकड केली. रमेशला गुंगी यायला लागली. त्यातही तो कान जोरात दाबून मोठ्याने किंचाळला. तशी रजनी अन तो बाहुला अजून मोठ्याने हसायला लागले.
तो जिथे पडला होता तिथे उजव्या बाजूला त्याला चंद्रप्रकाशाची एक रेघ दिसली. त्याने उजवीकडे पाहिलं तर गच्चीकडे जाणारा दरवाजा जरा उघडा होता. त्या परिस्थितीतही त्याने पुन्हा बळ एकवटलं आणि गच्चीच्या दिशेने पळायला लागला. तो दरवाज्यापर्यंत पोहोचणार तेवढ्यात मागून तो बाहुला अतिशय वेगाने त्याच्याकडे येताना दिसला. चालत नाही की पळत नाही. जमिनीपासून अधांतरी, उडतच येत होता तो. हवेचा कसलाच प्रतिकार त्याला होत नव्हता. सोबत प्रचंड धूळ, माती.... त्यातही चित्र विचित्र आकार... रमेशला एक-एक भयानक रूप पाहायला मिळत होतं.
तो रमेश जवळ पोहोचणार तेवढ्यात रमेशने गच्चीचा दरवाजा पटकन ओढला. तर त्या बाहुल्याच डोकं दरवाजात अडकलं. मुंडकं बाहेर तर धड आत. तो बाहुला कुत्र्याच्या आवाजात विव्हळायला लागला. रमेशचे कान ठणकायला लागले. त्याने प्रसंगाधावन राखून त्याचा डोकं जोरात पिळगळल आणि ओढलं. डोकं धडापासून वेगळं झालं. त्याने तसच ते फेकून दिला. बाजूला असलेल्या एका विहिरीत ते डोकं पडलं. विहिरीतून पाणी वर उसळल. आणि विहिरीच्या भिंतीला तडा गेला. तेव्हाच रमेशला त्यांच्या वाढलेल्या ताकदीचा परिचय आला. तो बाबांचे बोलणे आठवायला लागला.... तशातच त्याने गच्चीवरून खाली अंग सोडून दिलं. झालेल्या जखमा अजूनच फाटल्या. तो कसाबसा लंगडत तेथून पळाला. अन थकून घराच्या मागच्या बाजूला जरा दूरवर गेल्यावर तसाच आडवा पडला. त्याच्या श्वासाचा वेग वाढला होता. धापा टाकत होता, छाती वेगात वर खाली होत होती. त्याला काहीच सुधारत नव्हतं.
घरापासून दूर आल्यामुळे आपलं संकट टळल असं त्याला क्षणभर वाटला. पण अचानक त्याला अंगाखालाची जमीन सरकल्यासारख झाला. संकट टळल नव्हतं... योगायोगाने तो नेमका रंजनला गाडलं त्याच ठिकाणी पडला होता. इतक्यात जमिनीतून दोन हाडांचे हात वर आले....

क्रमशः

भाग-१६

योगायोगाने तो नेमका रंजनला गाडलं त्याच ठिकाणी पडला होता. इतक्यात जमिनीतून दोन हाडांचे हात वर आले....आणि रमेशच्या गळ्याभोवती विळखा पडला. त्या हातांची रुंदी जरी कमी होती तरी रमेशला गळ्याभोवती चांगलाच फास बसला. त्याचा जीव गुदमरायला लागला. रमेश हात पाय आपटायला लागला. काहीतरी काटेरी मानेत घुसल्यासारख त्याला जाणवला. तो सापळा निम्मा जमिनिबाहेर आलेला. रमेशला अर्ध्या डोळ्यांनी अंधुकच एक छोटीशी कवटी त्याच्या डोक्यावर उलटी आलेली दिसली . ती त्याच्याकडे पाहत बीभत्सपणे हसत होती. तो त्यावर काही प्रतिक्रिया देणार तोवरच रंजनच्या त्या कवटीचे दात रमेशच्या कपाळात रोवले गेले. खटकन हाड तुटल्याचा आवाज झाला. तो आघात एवढा प्रचंड होता की त्याचे दात रमेशच्या कपाळातील हाड भेदून इंचभर आत गेले. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. त्या तीव्र वेदनेने रमेश कळवळला. मेंदू चीरडल्यासारख्या वेदना त्याला झाल्या. त्याने त्या झटापटीतच कोपरा जोरात मागे आदळला. तो फटका जोरात रंजनच्या सापळ्यावर बसला. रंजनच्या इवल्याशा सापळ्याचा जागीच भुगा झाला. कवटी तेवढी वाचली.
_________रमेश कपाळातून वाहणारा रक्तप्रवाह दाबत तेथून पळायला लागला. मागे पाहतो तर ती कवटी चेंडूसारखी जमिनीवर आपटत त्याच्या दिशेने वेगात येत होती.. रमेश मागे पाहतच पळायला लागला... अन व्हायचं नव्हतं तेच झालं... तो पोहोचला शेवटी घरातच..
________एवढ्या वेळा वाचलो, पण आता आपली सुटका नाही हे त्याला कळून चुकला. तो डोक्यावर जोरात हात दाबत तिथेच खाली बसला. कवटी त्याच्या दिशेने वेगात येत होती. त्याने डोळे मिटले. तर दोन मिनिट काहीच झाले नाही. कवटी त्याच्या बाजूने जाऊन त्या बाहुल्याच्या धडाला चिकटली. त्या बाहुल्यामध्ये पुन्हा जीव आला. खाली कापडी बाहुला तर त्यावर कवटी, दात रक्ताने माखलेले. रमेशला एका मागून एक भयानक रुप दिसत होती. रमेशचा भेदरलेला चेहरा पाहून रजनी अन रंजन जोर जोरात हसायला लागले. आणि हे आपला इतक्या सहज सहजी जीव घेणार नाहीत हे रमेशला कळून चुकलं होतं. त्याला जास्त विचारही करवत नव्हता. डोक्यातून खूप रक्त वाहत होतं. पूर्ण शरीर रक्ताने माखलं होतं. त्याला गुंगी येत होती. डोळ्यावर अंधारी आली होती.
_________तेवढ्यात रजनी किंचाळली अन बाजूचा बेड जोरात ढकलला. काय होतंय त्याला समजल नाही. पण आपल्या दिशेने काहीतरी येतंय एवढं त्याला कळलं. तो डाव्या बाजूला कलंडला. थोडक्यात वाचला.... बेड भिंतीवर जोरात आपटला.
_________रमेश पडला ते थेट देव्हाऱ्यासमोर. त्याचा डोकं आपसूकच देवाच्या चरणी पडलं. ती तेजस्वी मूर्ती प्रसन्नपणे हसत होती. त्याला बाबांचं वाक्य आठवलं-- 'हिम्मत हरू नकोस, तुझ्याच हाती त्या काळ्या शक्तीचा विनाश लिहिला आहे'
_________तिथली ज्योत त्याच्या डोळ्यात चमकली. शरीरात एक प्रकारचं बळ आलं. त्याचा मेंदू आधीपेक्षा वेगात काम करायला लागला. डोळ्यावर आलेली अंधारी गेली. त्याला समोरच्या फोटोच्या काचेत मागून तो बाहुला येताना दिसला. रमेश तसाच पडून राहिला.. तो बाहुला त्याला स्पर्श करणार........

क्रमशः

भाग-१७

तेवढ्यात रमेशने देवासमोरच निरंजन उचललं आणि त्या बाहुल्याच्या अंगावर टाकलं. क्षणात बाहुल्याने पेट घेतला. तो कर्कश आवाजात ओरडायला लागला . ती आग इकडे तिकडे सैरावरा पळू लागली. ते पाहून रजनीने सुद्धा मोठ्याने टाहो फोडला . रमेश कानावर हात ठेऊन तो सारा तांडव पाहत होता. तो स्वतः खूप घाबरला होता. हळू हळू बाहुला पूर्ण जळाला. त्याचे हात गळून पडले. कुठे पाय गळून पडला. शेवटी कवटी थाडकन फुटली. पूर्ण खोलीभर त्याच्या चिंधाड्या उडाल्या . रजनीने पुन्हा मोठ्याने किंकाळी फोडली. अन खाली मान घालून रडू लागली.
________रमेश बराच वेळ तसाच पडून होता. ती संधी साधून त्याने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण दरवाजाकडे जाणार तेवढ्यात तो थबकला. रजनीचा रडण्याचा आवाज वेगळाच वाटत होता. त्यामधला भयावह सूर, तो घोगरेपणा नाहीसा झाला होता. 'अरे हा तर रेश्माचा आवाज... ' त्याने घडाळ्याकडे पाहिलं, तर दोन वाजले होते. तो तसाच मागे फिरला. घाबरत दबक्या पावलाने तो रेश्माजवळ गेला. थरथरत्या हातांनी तिचे हात बाजूला केले. तशी रेश्मा 'रमेश......' म्हणत तिच्या मिठीत कोसळली. त्या स्पर्शाने रमेशची सारी भीती पळून गेली. ती रेश्माच आहे याची त्याला खात्री पटली.
'रजनीच भूत बरोबर दोन वाजता रेश्माचा देह सोडून गेला होता. पण बाबा तर म्हणाले होते-' रजनीची शक्ती दिवसेंदिवस वाढत जाणार', शिवाय आज त्याची प्रचीतीही आली होती. मग त्या गणिताने तर रजनी एवढ्या लवकर म्हणजेच नेहमीच्या वेळेला कशी सोडून गेली????? '
त्या विचारात असतानाच रेश्मा त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणाली.
"काय हाल केले रे तिने तुझे"
रमेश चमकला. रेश्मा असा का बोलतीये... तिला कसं कळलं??
त्याच्या प्रश्नार्थक मुद्रेकडे पाहत रेश्मा सारवासारव करत पुढे बोलायला लागली-
"रमेश मला कळलय सारं. रजनीच भूत माझ्या शरीरात प्रवेश करतं आणि तुला त्रास देतं. मला मघाशी ते सारं दिसत होता. त्या बाहुल्याच उग्र रूप, त्याने तुझ्यावर केलेला हल्ला. पण मला काही करता येत नव्हतं. कशाने तरी मला बांधल्यासारख झालं होतं. माझा स्वतःच्या शरीरावरच ताबा नव्हता. "
_______रेश्मा इतकी कळवळून म्हणत होती त्यामुळे रमेश मनात विचार करायला लागला-'बहुतेक रजनी हिचं शरीर सोडताना हिला ते सगळं दिसलं असावं. ही हिच्या मनाचं का सांगेन. आणि अगदी जे घडलं तसंच??'
______रमेशचा लगेच त्यावर विश्वास बसला. त्याने तिला कवटाळल. त्याला रेश्माची एक प्रकारे दया आली. वाईटही वाटलं. दोघेही रडायला लागले.
______ रमेशच्या तर अंगभर जखमा झाल्या होत्या. रेश्माने त्यावर तात्पुरती मलम पट्टी केली. 'सकाळी लवकर डॉक्टर कडे जाऊ' असं वचनही त्याच्याकडून घेतलं. तिच्या प्रेमाने रमेशला गहिवरून आलं.
______दोघांची डोकी जड झाली होती. खूप रात्रही झाली होती, पहाट व्हायला थोडाच वेळ होता. उद्या डॉक्टर कडे जायचा म्हणून रेश्माने रमेशला झोपी जाण्याचा आग्रह केला. रमेश तिच्या कुशीतच विसावला.
______पण रमेशला आज तिच्या मिठीत वेगळच वाटत होतं. तो स्पर्श नेहमीचा वाटत नव्हता. त्यात ते प्रेम वाटत नव्हता. ती उब नव्हती. एवढ्या सगळ्या झालेल्या प्रकारामुळे व वेदनेमुळे आपल्याला तसं वाटत असावं.... की रजनीचा विचार डोक्यात असताना आपल्याला रेश्माचा स्पर्शही नकोसा होतो??? असं मागेही एकदा वाटलं होतं. अशी अपराधी भावना क्षणभर त्याच्या मनात डोकावली. त्याने ती डोक्यातून काढून टाकली
______रेश्माला मिठीत घेऊन खिडकीबाहेरील अंधारात त्याची पेंगुळलेली नजर हळू हळू अदृश्य होत गेली.... अन त्याला गाढ झोप लागली...
बराच वेळ गेला.... रमेश पूर्ण झोपला आहे याची खात्री झाल्यावर ते काळे डोळे पुन्हा उघडले . रजनीने आपली खेळी बरोबर साधली होती..............

क्रमशः

भाग-१८

_____सकाळ व्हायला थोडाच वेळ बाकी होता, तसं रंजनला काहीतरी गरम जाणवायला लागलं. त्यानेच त्याची झोप मोड झाली. त्याला रेशमाच अंगच गरम लागत होतं. आणि त्याचं तापमान सेकंदाला वाढत होतं. त्याला अक्षरशः चटके बसायला लागले. एखाद्या आगीलाच कवटाळल्यासारख त्याला वाटत होतं. त्याला ते असह्य झालं. त्याने रेशमाच्या मिठीतून डोकं वर काढलं, अन तिच्याकडे पाहिलं, तशी ती मंद हसली.... तरीही त्यात एक भयाण छटा होती. तेच काळे दात.....तेच काळे डोळे.... तीच काळी जीभ.... रमेशला कळून चुकलं. ही....ही... रेश्मा नाहीच....ही तर रजनीच.....
______रमेश तिच्या मिठीतून वेगळं होण्याचा प्रयत्न करू लागला. तोच तिने रमेशला करकचून आवळल. रमेश त्या वेदनेने जोरात किंचाळला. तिचं अंग इतकं प्रचंड तापलं होतं, की तिचा रमेशच्या शरीराला जिथे जिथे स्पर्श झाला होता तिथली त्वचा जळायला लागली होती.... आणि रजनीचे हात त्याची त्वचा जाळत त्याच्या हाडांपर्यंत आत गेले होते.....पायाला झालेल्या स्पर्शाने तर गुडघ्याखाली पाय जळून वेगळा झाला होता..... मानेभोवती तिने टाकलेल्या हाताने तर मान अर्धी चिरली गेली होती.....
______रमेश आयुष्याचे शेवटचे काही क्षण मोजत होता....त्याने त्याही परिस्थितीत थरथरत्या हाताने रेश्माच्या मागे असलेल्या गादीखालील अंगारा काढला.... त्याचे हात निर्जीव व्हायला लागले होते.... बोटातील ताकद गेलेली. तशातच त्याने तो अंगारा रजनीच्या पाठीला जोरात दाबला.... त्यासरशी रजनी भयाण आवाजात ओरडली.... तसा तिचा रमेशच्या अंगाभोवातीचा विळखा ढिला पडू लागला. त्यातही त्याला दैवी शक्तीने साथ दिली अन खिडकीतून सकाळच्या कोवळ्या उन्हाचा एक किरण आला आणि तो नेमका रजनीच्या पाठीवर अंगारा लागलेल्या ठिकाणी पडला. तसा तो किरण तिच्या शरीरात आरपारच घुसला. रजनीच्या पाठीकडून पोटाकडे एक मोठं छिद्र पडलं. रजनी आणखी जोरात किंचाळली... पुन्हा एकदा तो कर्कश आवाज ....घोगरा....दोन तीन आवाज एकत्र.... त्यात कुत्र्या-मांजराचं विव्हळण मिसळलेलं .... आणि ह्या वेळी ते अतिशय भयानक होतं....
______ते छिद्र मोठं मोठं व्हायला लागलं.... तसा रजनीचा आक्रोश वाढत होता... तिचे डोळे काळ्यातून निळ्याकडे ...निळ्यातून भडक लाल असे रंग घेऊ लागले. काळ्या रक्ताचे लोळ तिच्या तोंडातून भळाभळा वाहू लागले.... डोळ्यातून गांडुळासारखे कसले किडे बाहेर येऊ लागले... अन तिच्या चेहऱ्याचा ताबा घेऊ लागले. तिचं चेहरा खाऊ लागले. .... तिचे पाय पिरगळले जाऊ लागले. शरीर ठीकठिकाणी फाटू लागले.... अन त्या किरणाच्या दिशेने काहीतरी ओढत घेऊन जाऊ लागलं... मानवाच्या आकाराचा प्रकाश होता तो... किंचाळत ओरडत कोणीतरी घेऊन जात असल्यासारखं दिसत होतं.
अजब पद्धतीने तिचा मृत्यू झाला....
______रजनीचा आत्मा मुक्त झाला... तिचं काम साध्य झालं होतं. रमेशने तर कधीच जीव सोडला होता. तो ठीकठिकाणी जळाला होता. हाडं पूर्ण दिसत होती. रजनीचा स्पर्श जिथे जिथे झालेला तिथली कातडी जाळून आकसली होती.
______अन रेश्मा.... तिच्या प्रेताला तर प्रेत म्हणताच येत नव्हतं. पोटात भलं मोठं छिद्र पडलेलं. अंगभर जखमा.... पूर्ण शरीरावर किडे....दुर्गंधी पसरलेली.... एखादं जनावर मरून पडाव तशी रेश्माच्या प्रेताची अवस्था झाली होती.....
अशातली ती सकाळ.... दोन प्रेत बेड वर पडलेली... घर अस्ताव्यस्त झालेलं......

क्रमशः

भाग-१९

काही वर्षानंतर...........

"अरे किती भयानक आहे ही जागा, अन हे घर. तुम्हाला फिरायला येण्यासाठी हीच जागा सापडली का? मला भीती वाटतीये , इथे भूत बीत...... " वैजू घाबरत घाबरत घराकडे पाहतच म्हणाली....
"चल्र रे भित्रे... भूत बीत म्हणे... आणि असल तरी त्यांच्याशी तुझं चांगल जमेल. " निखिलच्या त्या बोलण्याच्या समर्थनार्थ सारे हसले. वैजूही स्वतःची भीती घालवण्यासाठी पुसट हसली. आणि त्या साऱ्यांनी घरात प्रवेश केला. साऱ्यांनी घरातल्या वेगवेगळया खोलीचा आणि जागेचा ताबा घेतला. आणि 'हे बघ ते बघ' अस म्हणत सारे एकमेकांच्या भोवती घोळका घालत. पण अनुजा शांतपणे एका कोपऱ्यात उभी राहुन काहीतरी वाचत होती. सारे तिच्या इथे आले.
"काय आहे ग हे?"
"काय माहित कसलं पत्र आहे, इथे कपाटामागे पडला होत."
धुळीनं माखलेल पत्र झटकून अनुजा वाचायला लागली.

चि. रमेश,
चि. लिहिल म्हणून गोंधळून जाशील म्हणूनच मी कोण हे सांगून तुझा आणखी गोंधळ वाढवत नाही. माझ्या अभागीची पूर्ण गोष्ट ऐकशील तर तुला समजेलच.
२२-२४ वर्षापूर्वीची गोष्ट आहे. नवऱ्याच्या पिण्याला आणि त्रासाला वैतागून मी घरदार आणि मुलगा सोडून पुण्याला आले. सुदैवाने पुण्यात राहण्याचा, पोटापाण्याचा प्रश्न लगेच मिटला. एका माझ्यासारख्याच समदु:खी स्त्रीने मला आश्रय दिला. मी त्यांची मोलकरीण म्हणून जरी काम करत असले तरी ती मला चांगली मैत्रीण मानायची. पण काहीच महिन्यात तिला मुलगी झाली अन तिला देवाज्ञा झाली. जाताना 'माझ्या मुलीला सांभाळ. तू तुझं ऋण फेडायचे समज किंवा माझ्यावर ऋण कर पण तिचा मुलीसारखा सांभाळ कर, आणि तू तिची खरी आई नाही हे तिला कधीही कळू देणार नाही अस वचन मला दे....' मी दिल. अन तिचा पोटच्या मुलीसारखा सांभाळ केला.
त्यानंतर सार सुखात चालू होत ती मोठी झाली. कोलेजात जायला लागली. अन कोणाच्या तरी प्रेमात पडली. त्या प्रेमाचे परिणाम स्वतःच्या पोटात वाढवू लागली... अन तिच्या समजाप्रमाणे त्याने तिला धोका दिला होता. पण सत्य मलाच माहित होत
कारण त्याची 'परत येण्याची ' बरीचशी पत्र आली होती. पण मला ती तिच्या हाती पडू न देता निर्दयीपणे परस्पर जाळावी लागली.
तू म्हणशील मी तिची खरी आई नाही म्हणून तस करताना मला काहीच वाटल नसेल. किंवा अजूनही काही मनात ग्रह करशील. तुला त्याचा हक्क सुद्धा आहे. पण माझी बाजूही समजावून घे. ती नंतर आत्महत्या करेल हे मलाही वाटल नव्हत. नाहीतर कदाचित मी दुसरा कोणता मार्ग अवलंबला असता. ती माझी पोटाची मुलगी नसली तरी तिच्या जीवाच्या पुढे काही नव्हत रे...
तू म्हणशील मी ती पत्र जाळण्यामागे काय कारण???
ती पत्र येण्याच्या २-३ दिवस आधीच माझ्या पतीची पत्र आलेली. त्यांनी माझा पत्ता कोठून तरी शोधून काढला होता. त्या पत्रात होत...'मी इकडच सोडून पुण्याला येत आहे. काय झाल ते तिकडे आल्यावरच सांगेल. आपण तिघे पुन्हा आपल घर बसवू... तू, मी अन आपला मुलगा रमेश डिसूजा....... '
जास्त काही सांगण्याची गरज नसावी. तुझ्या वडिलांना वेड लागल नव्हतं. ते पूर्ण विचार करून तिथून आले होते.
रजनीचं आणि तुझं लग्न होण शक्यच नव्हतं. मी तिला खरं कधीही सांगू शकले नसते......
जमल तर माफ कर...... तू नाही करणार माहित आहे म्हणूनच पत्राखाली पत्ता लिहीत नाही.. तुला गरज नाही पडणार कदाचित....
पण न राहवून लिहिते......
तुझी आई...

पत्र वाचून सारेच गोंधळले. मनात खूप प्रश्न उभे राहिले..... पण विचारण्याचही धाडस कोणाला झाल नाही. सगळ्यांची डोकी जड झालेली. जणू सार काही त्यांच्या आसपासच घडलं होतं
बिचकत बिचकत वैजुने प्रश्न केला -- ''कोण चुकला असेल रे?''
"नियती...." दरवाजातून त्या बाबांचा आवाज आला. आणि पाठ करून ते डोंगराच्या दिशेने निघाले... सारे थक्क होऊन त्यांच्याकडे पाहत उभे राहिले...

समाप्त............

गुलमोहर: 

दोश कदाचित त्या बाबान्चा असेल ज्यानी त्या निरागस रन्जन ला मारायला सान्गितले... जर रन्जन असता तर कदाचित हे झाले हि नसते...

कथा लिहीण्याचा प्रयत्न चांगला आहे...... थोडी बाळबोध वाटली.......

रजनी हे पात्र तुम्हीच वर्णन केल्याप्रमाणे सुंदर,सोज्वळ व भोळसट आहे, मग अशी मुलगी आपल्या मैत्रिणीला मदत करावी म्हणुन रमेशला समजवायला जाते, तेवढ्या काळात ती रेशमाला देखिल भेटत नाही, आणि शेवट काय होतो तर तिच रमेशच्या प्रेमात पडते ते देखिल त्याची ईमोशनल कथा एकुन, बरं प्रेमात पडली ते पडली त्या प्रेमासाठी रात्री १२ वाजता भर पावसात त्याला भेटायला जाते व करु नये ते करुन बसते, एवढी साधीभोळी मुलगी फक्त आपल्या प्रेमासाठी असले काही करेल हे पटत नाही, व तिच्या घरुन बरी परवानगी मिळते असे रात्री १२ वाजता बिनलग्नाच्या मुलीने प्रियकराच्या घरी जायला व ती रात्र त्याच्याबरोबर काढायला

आता रेशमा हे पात्र , ती धाडसी आहे व तिला रमेश आवडतो तर ती इतक्या सहजासहजी आपला प्रियकर आपल्या जवळच्याच मैत्रिनीने हिरावून घेतला हे मान्य करते हे अजिबात पटत नाही व उलट आपल्याच आवडत्या व्यक्तिकडून आपली मैत्रिण गरोदर राहीली आहे हे कळल्यावर ती अजिबात आकाड-तांडव करत नाही उलट त्या मैत्रिणीला मदत करते.

रमेश हे पात्र आधी मजनु style दाखवले आहे, पोरी पटवने व त्यांना फिरवणे हेच तो करतो....... मग त्याची नजर रजनी सारख्या सुंदर मुलीवर न जाता रेशमावर जाते. तो रेशमाशी मैत्री करतो तेव्हा असे वाटते की त्याला तिच्याशी मैत्री करुन रजनीशी ओळख वाढवायची आहे, व शेवटी तसेच होते. बरे तो जेव्हा आपल्या गावी जातो व आपल्या घराविषयी झालेली दुखःद घटना त्याला कळते त्या वेळेपासुन ते तो पुन्हा रजनीला भेटायला तिच्या घरी कि तिच्या आईने रजनीचे बाळंतपण गुपचुप उरकायला शोधुन काढलेल्या गुप्त जागेत येतो (आता या गुप्त जागेचा पत्ता याला कोण देतो कुणास ठाउक) तेवढया वेळेत ६-७ महिने झाले आहेत असे तुमच्या कथेत आहे, तो पर्यत रमेशचा कोणाशीही संपर्क होत नाही ना रजनीशी ना रेशमाशी ना त्याच्या इतर मित्रांशी हे आताच्या संपर्क क्रांतीच्या युगात पटत नाही, बरे आपण जुना काळ मान्य केला ज्या वेळी संपर्कासाठी फक्त पत्रव्यवहार होत असत तर रमेशचे जर रजनीवर खरे प्रेम होते व तिचा आपल्या पत्राला काहिच प्रतिसाद येत नाही हे बघुन त्याने तिच्याविषयी विचारपुस करणारे पत्र रेशमाला नक्किच पाठवले असते व त्याला रजनीचे गरोदर रहाणे देखिल समजले असते व पुढचे भयानक नाट्य झालेच नसते. बरे हा मुलगा ६-७ महिने गावी राहुन फक्त आपल्या वडिलानांच शोधत होता, हे ना त्याच्या वडिलांना माहित आहे ना त्याच्या खरया आईला हे देखिल जरा चुकिचे वाटते

यात रजनीच्या आईचा सहभाग देखिल विचित्र वाटतो आपली मुलगी ६-७ महिण्याची गरोदर आहे हे त्या आइला कळू नये, तिचा प्रियकराने तिला धोका दिला आहे हे कळल्यावर ते मुल पाडायच्या गोष्टी करतात, वेळ निघून गेल्यामुळे गुपचुप तिचे बाळंतपण उरकने, त्यात असलेला रेशमाचा सहभाग, पुन्हा रजनीने आत्महत्या केल्यावर तिचे कोणाला कळु न देता अंतिमसंस्कार उरकने, हे एकटी बाई कितपत हाताळु शकते हे शंकाच आहे, त्यात रेशमाची तिला मदत होती असे दाखवले आहे, अहो एक कौलेजला जाणारी मुलगी यात किती मदत करणार ..... रजनीचे अंतिमसंस्कार झाल्या झाल्या रमेशचे प्रगट होणे, त्याने लगेच ते मुल घेउन निघणे, त्याला निघालेले बघताना लगेच रेशमाने त्याच्याशी लग्नाचा निर्णय घेणे व ते होणे हे अगदीच हास्यास्पद आहे...........त्यात रेशमाच्या आई-वडिलांचे काहिच मत नाही का..... आपली मुलगी कोणाशी लग्न करायला निघाली आहे त्याचा आगा-पिछा काय हे ते बघणार नाहीत का............

या कथेत रमेश सांगतो की त्याची आई त्याला लहानपणी सोडून गेली व त्यानंतर त्या दुखा:ने त्याचे वडिल दारु पितात तर त्याची आई पत्र लिहून सांगते कि त्याचे वडिल दारु प्यायचे म्हणुन कंटाळुन ती घर सोडून जाते, एखादी बाई फक्त नवरा दारु पितो व त्रास देतो म्हणुन आपल्या पोटच्या पोराला टाकून घर सोडून जाइल का, व लगेच तिला पुण्यात मोलकरणिची नोकरी मिळते , पुन्हा जिथे तिला नोकरी मिळते तिकडची मालकिण स्वताच्या मरणसमयी स्वताच्या पोटच्या पोरीला तिच्या कोणत्याही जवळच्या नातेवाइकाकडे न सोपविता घरच्या मोलकरणीजवळ सोपविते जिच्या स्वताच्याच जेवणा खाण्याची आता चिंता सुरू होणार आहे........

बरे हे सर्व मान्य केले तरी हिला ज्यावेळी कळते कि आपण सांभाळलेली मुलगी आपल्याच जन्म दिलेल्या मुलावर प्रेम करते तर त्याला हिचा विरोध का हे देखिल कळत नाही, ती मुलगी काय त्या मुलाची सख्खी बहिण नाही आहे कि तिला एवढी चिंता पडली, त्या दोघांचे लग्न झाले असते व नंतर सर्व उलघडा झाला असता तरी फक्त त्या मुलिची मानलेली आई तिची सख्खी सासु झाली असती, नाहीतरी आपली सासु ही आपली आईच असते..... इथे आधी आई व नंतर सासु इतकेच.......

बाकी तुमचा पहिलाच प्रयत्न आहे बघता तुमच्याकडून पुढे चांगले लिखाण अपेक्षित, तुमच्या प्रयत्नांना खुप सारया शुभेच्छा.............. Happy

CHAN

हि कथा तुमचिच आहे का अनाहक ..... कारण ही कथा मी ह्या आधी पण वाचली आहे, फेब्रुवारी मध्ये. आणि तुम्ही इथे आत्ता जुने मध्ये पोस्त केली आहे. मी काही facebook च्या लिंक दिल्या आहेत ते बघून घ्याव्या
रजनी
अनाहक | 6 June, 2012 - 21:01

http://www.facebook.com/media/set/?set=a.119140918195150.21352.119114441...

http://www.facebook.com/photo.php?fbid=151822144927027&set=a.11914091819...

http://www.facebook.com/kaybharilihilay/posts/155016984607543

सोनु सोना
ते माझेच पेज आहे... मी तेव्हाच लिहिली होती.. मी तसा वारतो संदर्भ देखील दिला आहे

महाराणी

खूप छान मार्गदर्शन केलंत .... तुमचे खूप खूप आभार....
खरा तर मी हि कथा आता जेव्हा वाचतो तेव्हा मलाही खूप बाळबोध वाटते.. पण फक्त प्रतिक्रिया मिळावी म्हणून मायबोली वर टाकली... इथे खूप अनुभवी मार्गदर्शक आहेत याची कल्पना होती मला

सार्यांचे खूप खूप आभार... इथून पुढेही असेच मार्गदर्शन मिळेल हि अपेक्षा...

सकाळ व्हायला थोडाच वेळ बाकी होता, तसं रंजनला काहीतरी गरम जाणवायला लागलं. त्यानेच त्याची झोप मोड झाली. >>
भाग १८. रंजन ऐवजी रमेश पाहिजे. वाचतेय. पूर्ण वाचून प्रतिसाद देणार.

महाराणी यांच्या पूर्ण पोस्टीला अनुमोदन!

भाग ६ च्या शेवटी -

म्हणता म्हणता ६-७ महिने उलटले पण रमेश काही आला नाही ना त्याचं एखादं पत्र आलं.. रजनी त्याच्या वाटेकडे डोळा लाऊन बसली होती. ................एकमेकांकडे पाहत शेवटी रेशमाने कसाबसा तो विषय रजनी पुढे काढला...."रजनी.....तुला हे मुल पाडाव लागेल " >>>
७ व्या महिन्यात? Uhoh