ताटकळलेला बुद्ध.
फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मनुष्यप्राणी डोळे मिटून हजारो वर्षे देव्हार्यापुढे ध्यानस्थ बसला होता. या आधी आपण डोळे कधी उघडले होते हे सुद्धा त्याला आठवत नव्हते. समोरचा देव्हारा नक्की कसा दिसतो हे सुद्धा तो विसरलेला होता. त्याला फक्त एका गोष्टीची खात्री होती की समोरच्या या देव्हार्याची एकूण लोकसंख्या आहे बरोबर तेहेतीस कोटी.
घटनाकार हा जनतेने उस्फूर्तपणे दिलेला आणि आता कोणाच्या देण्याघेण्यापलिकडचा एकमेव आणि अद्वितीय गौरव ज्यांना प्राप्त झाला आहे अशा डॉ.आंबेडकर यांना विनम्र अभिवादन!
डॉ.आंबेडकर जयंतिनिमित्त सर्व भारतीयांना शुभेच्छा!
माझ्या अष्टविनायकदर्शन या फेब्रुवारी २०११ मध्ये विनामुल्य डाऊनलोड करण्यासाठी प्रकाशित केलेल्या ई-बुकात एका पानावर डॉ.आंबेडकर आणि स्वा.सावरकर यांची छायाचित्रे देऊन त्यांना खालीलप्रमाणे अभिवादन केले आहे. तेच येथे पुन्हा उद्धृत करतो.