लेख

इतस्ततः

Submitted by रंगारी on 18 February, 2023 - 02:43

आजकालपासून – किंवा असं म्हणता येईल की कालपरवापासून – सामाजिक स्थितीमुळे आपल्या वैयक्तिक जीवनातील कोणत्याही कृतीत बेगडीपणा घुसून जणू काही मुरून बसलाय. हा बेगडीपणा हल्ली इतका सामान्य झालाय की कोणी ‘सामान्य’ वागला तर तोच इतरांना ‘बेगडी’ वाटायचा! इतरांना सामान्य वागणं वेगळेपणाचं वाटेल की नाही ते मला निश्चित सांगता यायचं नाही; पण सामान्य वागण्याला ‘मागास’ समजण्याची नवीन रीत निर्माण झाली आहे. हा सुद्धा आपल्या सामाजिक व्यवस्थेचा दुष्परिणाम आहे, असे ना का! आपण पुन्हा बेगडीपणाकडे वळूयात.

माझी दृष्टी (अचानक) जाते तेव्हा...

Submitted by पराग र. लोणकर on 3 March, 2022 - 04:00

माझी दृष्टी (अचानक) जाते तेव्हा...

पंचवीस-एक वर्ष झाली असतील या घटनेला. एकोणीस-वीस वर्षाचा असेन मी तेव्हा.

मोठ्या बहिणीचे लग्न होऊन ती बदलापूर-उल्हासनगर जवळच्या अंबरनाथला सासरी जाऊन काहीच वर्षे झाली असावीत.

अंबरनाथला जायचे म्हणजे पुण्याहून कर्जत passenger पकडायची. कर्जतला उतरून पुढे लोकलने अंबरनाथ. या प्रवासाची अधून मधून जाऊन मला आता सवय झाली होती.

शब्दखुणा: 

व्यसनातील नैराश्य आणि नैराश्यातील व्यसन - डॉ. मैथिली उमाटे

Submitted by अतुल ठाकुर on 2 September, 2020 - 22:27

व्यसनामुळे नैराश्य येतं कि नैराश्यामुळे माणसे व्यसनाला जवळ करतात हा एक कठीण प्रश्न आहे. पण काहीवेळा या दोन्ही गोष्टींचं सहचर्य आढळतं. दु:ख विसरण्याचं निमित्त म्हणून व्यसन जवळ करणारी काही माणसे आपल्याला आढळतात. अनेकदा माणसांना आयुष्यात अपयशाचा सामना करावा लागतो. निरनिराळ्या प्रकारची संकटे येतात. काही आपदा स्वतःच्या चुकीमुळे सहन कराव्या लागतात तर काही त्रास इतरांमुळे भोगावे लागतात. प्रत्येक माणसांची या संकटांना तोंड देण्याची पद्धत आणि क्षमता निरनिराळी असते. काहीजण सकारात्मक दृष्टीकोण वापरुन प्रयत्नाने संकटांवर मात करतात तर काही निराश होऊन व्यसनाला जवळ करतात.

विषय: 
शब्दखुणा: 

शुभंकराविषयी सर्वकाही - डॉ. अमित करकरे यांनी शुभंकरांशी केलेले जिव्हाळ्याचे हितगुज

Submitted by अतुल ठाकुर on 9 June, 2020 - 04:10

CIUD557Q_400x400_0.jpg

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - लेख