रफीच्या कारकिर्दीतले मैलाचे 'दगड'
मैलाचे दगड कसे असतात तुम्हाला माहिती आहेच. ते नसले तर तुमचा प्रवास काही थांबत नाही. पण असलेच तर तुम्हाला गंतव्यस्थानी पोहोचायला थोडी मदत होते. रफीची गाणी उत्तम ठरण्यासाठी त्यावर कुणी चांगला अभिनय केलाच पाहिजे अशी काही गरज नव्हती. पण काही दगडांनी आपल्या न-अभिनयाने रफीच्या जीव ओतून गाण्याकडे आपले लक्ष वेधून घेतले. म्हणजे मॉडेल्सनी चेहरे कोरे ठेवले कि त्यांच्या अंगावरच्या कपडे किंवा दागिन्यांकडे आपले लक्ष जास्त जाते तसेच काहीसं…..
पहिला मानाचा दगड आहे 'प्रदीप कुमार'. गाणं - 'हम इंतज़ार करेंगे'.