ठाणे पाठपुरावा वर्धापनदिन म्हणजे एक मेजवानी असते. माधव कोल्हटकरांच्या कल्पक आयोजनामुळे यादिवशी तासदीड तासाच्या कर्यक्रमात अतिशय मौलिक माहिती हा कार्यक्रमाला येणार्यांच्या पदरी पडते. स्वतः माधवसरांचे खुसखुशीत निवेदन, विनोदाची पखरण असतेच. त्यातून डॉ. शैलेश उमाटेंसारखे विनोदाचे वावडे नसलेले, आपले व्याख्यान अतिशय सहज, सोप्या भाषेत, घरगुती उदाहरणाने समजावून देणारे आणि त्याजोडीला अभिनयाचे अंग असलेले, तरुण व्यक्तीमत्व जर कार्यक्रमाला लाभले तर कार्यक्रमाची रंगत वाढतच जाणार यात नवल नाही. कालचा कार्यक्रमही तसाच रंगला.
जीएंच्या सांजशकुन मधील अस्तिस्तोत्र ही पहिली कथा. कथा फक्त चार पानांची. पण संस्कृतात सूत्र वाङ्मय असतं त्या धर्तीची आहे. सूत्रं अगदी छोटी असतात. किंबहूना ती छोटीच असावी असा नियम आहे. अल्पाक्षरत्व हा येथे फार मोठा गुण मानला जातो. मात्र या एकेका सूत्राचा आवाका प्रचंड असतो. त्यावर नाना तर्हेच्या टिका लिहिल्या जातात. अनेक विद्वान अनेक तर्हेने त्यांचा अथ लावतात. खरं तर "सांजशकुन" मधील सर्व कथाच सूत्राप्रमाणे आहेत. अणी मी विद्वान नसतानादेखील त्यांतील काही कथांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करणार आहे.
नवीन वर्षाच्या पहिल्या लेखनाची सुरुवात सहचरींबद्दलच्या कृतज्ञतेच्या भावनेने करणे मला आवश्यक तर वाटते कारण खरोखर त्यांनी मला न मागता बरेच काही दिले आहे. शिवाय अशी कृतज्ञता व्यक्त करणे हा माझ्या आनंदाचाही भाग आहे. यामुळे पाय जमिनीवर राहण्यास मदत होते. सुरुवातीलाच स्वतःच्या मर्यादांबद्दल बोलावं लागेल. संशोधनाच्या दरम्यान व्यसनमुक्तीसाठी काम करणारी अनेक माणसे पाहिली. त्यांच्या मनात व्यसनी व्यक्तींबद्दल करुणा, सहानुभूती होती. अनेकांना स्वतःला व्यसनाचा अनुभव असल्याने त्यांच्याकडे अनुभवजन्य ज्ञानही होते.
तर लहानपणापासून चहा हवाच असं काही ठरलेलं नव्हतं आणि ठरलेलं नसल्याने काही एक अडायचं नाही . मुळातच लहान मुलांना चहा मिळायचाच नाही . दूध पिणं मात्र अत्यावश्यक!
पुढे यथावकाश चहाने आयुष्यात एंट्री घेतली . चहा आवडू लागला .मात्र अस्मादिकांचे चहा पिण्यातले नखरे बघून स्वतःचा चहा स्वतःच बनवायचा असं फर्मान निघालं. खरेतर चहा किंचित चॉकलेटी पांढरा असायला हवा , खूपप गोड नको , त्यात कुठल्याही प्रकारचा मसाला नको आणि "ताजाच" हवा , ज्यादा उकळलेला नको या अटी फार नव्हेत असे आमचे प्रांजळ मत आहे .पण हाय ये जालीम दुनिया ! तर ते असो ..
काल नवरात्री मंडपातून दुरून, अस्पष्टसे गाण्याचे स्वर ऐकू आले, "रात्र काळी, घागर काळी, यमुनाजळी ही काळी वो माय". आवाज स्पष्ट नसल्याने ओरिजनल गाणे लावले आहे की नाही ते ओळखु शकलो नाही. मात्र चित्राने मूळ वस्तुची आठवण यावी त्याप्रमाणे गोविंद पोवळे आणि प्रभाकर नागवेकरांच्या या गाण्याने मन भूतकाळात निघून गेले. माझं काही गाण्यांनी असं होतं. जणू काही टाईम मशीनमध्ये बसून टाईम ट्राव्हल करावी तसं मन जुन्या जगात निघून जातं.