जीए कथा एक आकलन - सांजशकुन- अस्तिस्तोत्र - १
Submitted by अतुल ठाकुर on 13 January, 2020 - 23:34
जीएंच्या सांजशकुन मधील अस्तिस्तोत्र ही पहिली कथा. कथा फक्त चार पानांची. पण संस्कृतात सूत्र वाङ्मय असतं त्या धर्तीची आहे. सूत्रं अगदी छोटी असतात. किंबहूना ती छोटीच असावी असा नियम आहे. अल्पाक्षरत्व हा येथे फार मोठा गुण मानला जातो. मात्र या एकेका सूत्राचा आवाका प्रचंड असतो. त्यावर नाना तर्हेच्या टिका लिहिल्या जातात. अनेक विद्वान अनेक तर्हेने त्यांचा अथ लावतात. खरं तर "सांजशकुन" मधील सर्व कथाच सूत्राप्रमाणे आहेत. अणी मी विद्वान नसतानादेखील त्यांतील काही कथांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करणार आहे.